पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -१

Submitted by admin on 6 July, 2008 - 14:10

पाककृती हवी आहे? इथे विचारा. पण त्या अगोदर

या ठिकाणी
आणि या ठिकाणी

अगोदरच आहे का हे पाहिलत तर आपल्या सगळ्यांचा वेळ वाचू शकेल.

इथे फक्त पाककृतींबद्द्ल प्रश्न विचारणे अपेक्षित आहे. नवीन पाककृती इथे लिहू नयेत. त्या लिहिण्यासाठी "नवीन पाककॄती" हा लेखनाचा धागा वापरावा. असे केल्याने पाककृतींचे योग्य वर्गीकरण होईल, सगळी माहिती एका ठिकाणी संकलित होईल व भविष्यात ती पाककृती शोधणार्‍यास सोपे पडेल.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मेथीचे लाडू इथे आहेत-
http://www.maayboli.com/hitguj/messages/103383/117761.html?1160669014

या बीबीवर आता कोणी रेसिपी लिहिल्या तर मी त्या 'पाककृती' मध्ये व्यवस्थित लिहून (अर्थातच माझ्या नावाने) टाकणार!

इथे कुठे काठी रोल ची रेसिपी आहे का? मि शोधून पाहिली, नाही मिळाली. कोणी सान्गु शकेल का?

लालू माझी परमिशन आहे.

न्याती, काठी रोल शाकाहारी हवेत कि मांसाहारी ?

शाकाहारी!!
आधीच धन्यवाद दिनेशदा.

दिनेश, परमिशन नाही मागितली, मी टाकणारच आहे!

घाबरलो ना मी !!!
काठी कबाब योग्य त्या ठिकाणी ठेवलेत !!!

धन्यवाद दिनेशदा! करुन कसे झाले ते नक्की कळवेन.

प्राजे, तुला दिनेश ह्यांनी रेसीपी दिलीच आहे. पण फक्त डींक पूड साठी एक आयडीया सांगते. दिंक घे एका ट्रे मध्ये पसरून त्याला ऑइल स्प्रे कर नी अवन मध्ये ३५० वर १० मिनीटे फुलव. मधून मधून वर खाली करायचा. मग मिक्सीत वाट.

शिजवलेल्या छोल्यांचे काय करता येईल? परवा माझा अंदाज चुकला, जास्त छोले भिजवले गेले अन सगळेच कुकरमधुन शिजवुन घेतले. काल छोले केल्यानंतरी माझ्याकडे पातेलेभर शिजवलेले छोले उरलेत. दुसरं काही करता येईल का?

अल्पना, सॅलड कर. बरोबर शिजवलेला राजमा, शिजवलेले मूग(एकच शिट्टी), बारीक चिरलेला कांदा आणि टोमॅटो, भरपूर कोथिंबीर, चाट मसाला, लिंबू, लाल तिखट आणि मीठ.

मुग पण सॅलेडसाठी म्हणुन भिजवले होते काल रात्री.. आता मोड न आणता शिजवुन घेते. आज नक्की करेन (करावचं लागेल, नाहीतर छोले वाया जातिल नं Happy ) धन्यवाद सायो.

दिनेश यांनी माझ्या घरी एकदा छोल्यांचे गोळे करुन कढित टाकले होते.
पाणी निथळुन मिक्सर मधे बारीक करुन घेतले, त्याचे छोटे छोटे गोळे करुन तळुन घेतले आणि मग ते कढीत सोडले. मस्त लागले.

मिळुन येण्यासाठी थोडे तांदळाचे पिठ घालावे.

अल्पना, मी नेहमीच जास्ती छोले शिजवून फ्रीझ करते सरळ...

खूप शिजले असतील छोले तर हमस कर. इथे लिहिली आहे मी रेसीपी(स्वताची खपवतेय रेसीपी असे म्हण). नाहीतर फलाफल बनव... Happy

दिनेश यांनी माझ्या घरी एकदा छोल्यांचे गोळे करुन कढित टाकले होते >>> फलाफल असेच बनवतात ना ?

नाही फलाफल साठी त्या वाटलेल्या चण्यात पालेभाजी व मीठ मसाले घालून त्याचे मोठे चपट गोळे करुन डीप फ्राय करतात. आखाती भागात त्यात मेथीसारखी एक भाजी घालतात. मग ते खबूस म्हणजे पिटा ब्रेड मधे घालून खातात. पण आपल्या चवीला ते खमंग असले तरी सपक लागतात.
याच्या पिठाचे तयार पाकीट मिळते.
मुंबईला चौपाटीवरच्या न्यू यॉर्कर मधे छान मिळतात.

ते कढी गोळे गिर्‍याच्या केळवणाला केले होते, आम्ही सगळ्यानी. फ्लॉवर पराठे, पुरणपोळी, कढी गोळे, डाळिंबाचे सलाड, अजून आठवतोय मेनू.

फलाफल सोपे आहेत करायला.
फलाफल रेसीपी: मी तर देसी + मेडीटेरीयन मिक्स स्टाइलनेच केले आहेत. एक वाटी मॅश्ड उकडलेले काबूली चणे + डिल भाजी बारीक चिरलेली + लसून पेस्ट + हिरवी मिरची पेस्ट + ३ ब्रेड स्लाइस टोस्ट करून त्याचे ब्रेड क्रम्स + मीठ + आवडते म्हणून बारीक चिरलेली कोथींबीर +लिंबाचा रस असे करून ठेवायचे अर्धा तास नी डीप फ्राय करायचे. वाटल्यास खसखस टाकायची जराशी.

मने योग्य जागी टाक ग फलाफल ची कृती लवकर. नाहीतर ....
Happy

छोले (जमल्यास सालं काढुन) मॅश करून त्यात भाजणी, चिरलेला कांदा, कोथिंबीर, चवीला मीठ, तिखट घालून, चपटे गोळे (पॅटीस) करून शॅलो फ्राय करायचे आणि दह्याबरोबर/सॉस बरोबर खायचे. मस्त लागतात.... इतर कुठलीही उकडलेली कढधान्य (१ किंवा काँबीनेशन) घालून पण करता येतात हे पॅटीस... भरपूर पोषण मुल्य मिळतात आणि मुलांना कळत पण नाही त्यात काय दडलय ते.......

साउदिंडिअन लोक प्रसाद करतात वाटल्या डाळीसारखा पण छोले वापरुन. हिंग/मोहोरी/कडिपत्ता/हिरव्या मिरच्यांची फोडणी करुन त्यात मीठ घालुन छोले परतायचे. एक वाफ घेउन त्यात नारळाचा चव आणि कोथिंबीर पेरायची. छान लागते.

अल्पना, केवढ्या काबुली चण्याच्या रेसिपी आल्या बघ. सगळ्या करुन बघ म्हणजे सासूबाई सगळीकडे 'सून वेगवेगळे प्रकार करुन बघते आणि अन्न अजिबात वाया जाऊ देत नाही' असं कौतुक करत फिरतील. Wink

नाचणीच्या पीठाच्या काही रेसीपी सुचवा .
-----------------------------------------
सह्हीच !

नाचणीच्या पिठाच्या भाकर्‍या, शेवया, आंबिल, पापड, वड्या, डोडोल, शिरा, उपमा असे अनेक प्रकार करता येतात. केकही करता येतो. या बहुतेक कृति इथे आहेतच. नाहीतर मी आहेच. नाहीतर ????

त्याचे थालीपीठ करता येइल का ? कृती सांगता का प्लीज .
-----------------------------------------
सह्हीच !

पुरण करताना सुण्ठ केव्हा (म्हणजे पुरण शिजवताना की नन्तर) आणि किती घालावी? लवकर सान्गा प्लीज :), पुरण शिजवायला घ्यायचे आहे

शिजवतानाच घातले तरी हरकत नाही. किती वाटी डाळ आहे? आवडत असेल सूंठ तसे घालावे नाहीतर. पण १/२ चमचा २ वाट्या डाळीला हरकत नाही.

पूरण आळत आले की. एक किलो डाळीला एक सपाट चहाचा चमचा सुंठ घालावी.
पण पुरणाला सुंठीपेक्षा जायफळ चांगले. दोन्ही डाळ पचायला हलकी करतात.
जायफळ किसून अर्धा चहाचा चमचा गॅस बंद केल्यावर घालायचे.

Pages