पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -१

Submitted by admin on 6 July, 2008 - 14:10

पाककृती हवी आहे? इथे विचारा. पण त्या अगोदर

या ठिकाणी
आणि या ठिकाणी

अगोदरच आहे का हे पाहिलत तर आपल्या सगळ्यांचा वेळ वाचू शकेल.

इथे फक्त पाककृतींबद्द्ल प्रश्न विचारणे अपेक्षित आहे. नवीन पाककृती इथे लिहू नयेत. त्या लिहिण्यासाठी "नवीन पाककॄती" हा लेखनाचा धागा वापरावा. असे केल्याने पाककृतींचे योग्य वर्गीकरण होईल, सगळी माहिती एका ठिकाणी संकलित होईल व भविष्यात ती पाककृती शोधणार्‍यास सोपे पडेल.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

रुनी,
हो गं दोनदा पडला क्रॅक.
गूगल केल्यावर तू सांगितलेला उपाय जास्त ठिकाणी दिसला...टेम्प. लो करणे! आता हा उपाय करुन बघते.
माझ्याकडे नॉर्डीकवेअरचं केक पॅन आहे

सायुरी,
ही लिंक बघ. Alton Brown

साधारण ८:२५ मि ला अलटन ब्राउन सागतो की गरम पाण्यानी भरलेला पॅन ठेवला की क्रॅक.पडत नाहीत.
माज्या मते तू खुप वेळ केक ओवेन मध्ये ठेवत असशील. तू केक एकाच भांड्यात ठेवण्या पेक्ष्या दोन भांड्यात ठेव.

~कीर्ति

काहि काहि केक्सना वरुन क्रॅक पडणे अपेक्षितच असते. खुपदा कृतित तसा उल्लेख असतो. तो पडला तर उलट चांगलेच, कारण केक मधे नीट बेक झालाय याची ते खूण असते. गरज वाटलीच तर तो वरुन कापता येतो.
ट्युब पॅन वापरला तर क्रॅक पडत नाही सहसा.

आता हे इथे विचारणे योग्य नाही तरीही विचारतेय,

मी खूप आवडीने मातीचे भांडे आणले, पहील्याच दिवशी त्यात शिरा केला.
आता प्रश्ण असा होता की हे भांडे स्वच्छ कसे ठेवायचे?
मी नुसत्या पाण्याने उकळवून धूवून ठेवले. पण मासे केल्यावर असे कसे ठेवायचे?
मी तर गोडासासाठी वेगळे नी मासे मटणाला वेगळे ठेवायचा विचार करतेय पण मातीची भांडी कशी मेन्टेन करायची?

Sour Cream हा प्रकार मी प्रथमच आणलाय म्हणजे मला Sour Cream चे २ कुपन मिळाले आणी फुकटात २ Soue Cream घरात आले. Happy त्या अधी मी विकत आणलेल सावर क्रीम ही तसच पडलय. श्रिखंड करतांना सावर क्रीम वापयाच होत पण त्या शिवायच श्रिखंड छान झाल म्हणुन वापरल नाही. आता ह्या सावर क्रिमांना कस सावरु ??? म्हणजे उपयोगात आणु???
Pls सुचवा. शाकाहारी मेनु सुचवा Pls सावर क्रीम वापरुन Happy

सोअर क्रिम आणि तांदळाचे पिठ घालुन मस्त चकल्या होतात्..क्रुति आहे जुन्या हितगुजमधे.. डिप्सहि चांगले होतात, हमस मधे सोअर क्रिम घालता येते, क्रुति मनुने लिहलि आहे.

धन्यवाद किर्ती, दिनेश
टेम्प. लो करुन पाहिलं क्रॅक नाही पडला पण केक आतून नीट बेक नव्हता झाला (टोचून पाहिला होता तेव्हा सुरीचं पातं क्लीन आलं होतं आणि वरुनपण झालाय असं वाटलं होतं) पण नीट नव्हता झाला.
यापेक्षा आधी केले होते तेव्हा खूप छान झाले होते केक्स. फक्त क्रॅक पडल्याने लुक चांगला दिसत नव्हता

या धाग्याच्या डोक्यावर दोन लिन्क्स दिल्यात. त्यातली दुसरी "आणि या ठिकाणी" क्लिक करा. तिथे 'गोडवा' नावाचा बीबी आहे. त्यावर <<<

LOL लालू. प्रतिक्रिया वाचून उगाच कोणाची तरी आठवण झाली :))

Thanks Prajakta!

चकल्या कराव्याश्या वाटता आहेत, पण इथे तांदळाच पिठ मिळत नाहि, घरि तांदळाच पिट। करता येत का? प्लिज सांगा.
मि मिक्स र मध्ये तांदुळ दळण्याचा प्रयत्न केला पण खुपच जाड्सर पिठ होतय आणि खुप वेळ लागतो.

सास,
कुठल्याही भारतीय किंवा चायनीज ग्रोसरीच्या दुकानात तांदळाचे पीठ मिळते. घरी पीठ करण्यापेक्षा ते जास्त सोईस्कर पडेल तुला.

मला आज ३१ च्या पार्टी साठी अंडी उकडुन न्यायची आहेत उकडलेल्या अंड्याचे काही सोपे पदार्थ आहेत का ? जे झटपट पण होउ शकतात कारण मला ते ऑफीसवरुन गेल्यावर करायचे आहे.

तेलात साधारण तयार ग्रेव्हीचा मसाला परतायचा. तो बराच कोरडा झाला कि उकडलेल्या अंड्याना हलकी चीर देऊन ती त्यात अलगद परतायची. हा प्रकार कोरडा होतो. फारच तेल सुटले असेल तर थोडे बेसन वा तांदळाचे पिठ पेरायचे. त्याने मसाला अंड्याना चिकटतो. वरुन कोथिंबीर पेरली तर फारच छान.
मसाला तयार असेल तर या प्रकाराला फार वेळ लागत नाही.

गव्हाचे सत्व कसे बनवतात? बाळासाठी बनवायचे आहे.....

अल्पना,
गव्हाला मोड आणून्(जसे कडधान्यांना आणतो तसे)...व मिक्सरला लावयचं .मी सुद्धा तसे केले होते पण त्याचे पीठ होत नाही म्हणजे कितीही सुके मोडाचे गहु असले तरी ओलसरपण्ण राहतो..तसं मोड आणुन त्याच दुध काढुन ही मी विदीत ला दिले होते...पण त्याला जास्त आवडले नाही
तसेच तु त्यात नाचणी, सोयाबीन, शेंगदाणे, बाजरी, ज्वारी ही मिक्स करु शकते थोडे थोडे...(रेडीमेड ) केप्र नाचणी सत्व चांगले असते, त्यात साखर , वेलची मिक्स असते.दुधात उकळून द्यायचे.माझा मुलाला मी अजुन देते, आवडते त्याला..
तुला बाळाला काय काय खाऊ घालावे ह्याची माहिती वंशवेल ह्या डॉ. मालती कारवारां च्या पुस्तकात मिळेल विथ रेसिपी...

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
नवीन वर्ष सर्वांना सुख-समृध्दीचे ,भरभराटीचे ,उन्नतीचे , समाधानाचे आणि आनंदाचे जावो , ही सदिच्छा!!!

वरती दिपालीने लिहिले आहेच. गहू तीन दिवस पाण्यात भिजवत ठेव धूवून. पाणी रो रात्री बदलायचे. मग गहू तिसर्‍या दिवशी झाकून ठेव. चांगले मोड आले की पाणी कमीच टाकून वाट. एक दिवस ते तसेच ठेव. गाळ पह्क्त घे नी थोडे दूध टाकून शिजव नी आटव. वाटल्यास वड्या कर. पण बाळ खूप लहान असेल तर मला वाटते ते पचायला खूप जड होइल.
तेव्हा ३ ते ४ वर्षाचे असेल तर वडी देणे ठीक राहील. Happy

आप्पे कसे करतात? इडली च्या पिठा चे करता येतात का?

दिपाली, मनु थँक्स.... वंशवेलमध्ये बघायचे लक्षात नाही आले... आज बघते... मागे जुन्या मायबोलीवर वाचल्यासारखे वाटत होते म्हणुन गहु भिजत टाकले होते काल..पण तरीहि कन्फर्म करुन घेतले....

दिपाली, मनु थँक्स.... वंशवेलमध्ये बघायचे लक्षात नाही आले... आज बघते... मागे जुन्या मायबोलीवर वाचल्यासारखे वाटत होते म्हणुन गहु भिजत टाकले होते काल..पण तरीहि कन्फर्म करुन घेतले....

गव्हाला मोड काढण्यासाठी तीन दिवस नाही भिजवयचे. १२ ते १४ तास भिजवून मग ते ओल्या कपड्यात गूंडाळुन ठेवायचे. त्याला मोड यायला २ ते ३ दिवस लागतील. गहु हे एकदल धान्य असल्याने, त्याचे मोड जरा वेगळे दिसतात. ज्वारीला पण असे मोड आणता येतात. मोड आलेल्या गव्हाची खीर आणि ज्वारीची उसळ उत्तम होते. ( अर्थात हे प्रकार लहान बाळासाठी नाहीत )
गव्हाचा चिक काढायचा असतो त्यावेळीच गहु तीन दिवस भिजत घालायचे असतात. असे भिजवुन मग ते वाटायचे, जास्तच पाणी घालुन ते वाटायचे. हे मिश्रण गाळुन घ्यायचे. मग ते पाणी तीन चार तसेच ठेवायचे. सत्व खाली बसल्यावर वरचे पाणी अलगद ओतायचे. जास्त करायचे असेल तर हे सत्व वाळवून ठेवायचे.
चमकी, ईडलीच्या पिठाचे आप्पे होतील. पण आप्पे करताना गोड हवे असतील तर गूळ आणि खोबरे घालतात, तिखट हवे असतील तर हिरवी मिरची वगैरे घालतात.

कोणाला स्वीट कोर्न सूपची रेसीपी माहीत आहे का?

इथे आहे.

मला कॉर्न ब्रेडची कृती कोण सांगणार ?

शिंडी, माझी जी केळ्याची रेसीपी आहे ना तीच वापर. मस्त होतो. फक्त corn meal नी मासा मरीना नी कणीक असे फक्त प्रमाण करायचे. ज्यास्त वेगळी नाहीये कृती. Happy

मस्तच होतो.

प्रमाण बघ असे घे,
१ कप कॉनमील,
१/२ कणीक,
१/२ मासा हरिना,(का मरिना;कुठल्याही सूपरमार्केटात मिळेल),
३ अंड्याचे फक्त egg whites खूप फेटून ठेव वेगळेच नी शेवटी एकदम फॉल्ड कर मिश्रणात,
१/२ चमचा मीठ,
१ चमचा बेकींग पॉवडर,
१ चमचा बेकींग सोडा,
४ ते ५ मोठे चमचे मध(जर खूप गोड आवडत असेल तर ५), ३ मोठे चमचे ऑलीव ऑइल,१ मोठा चमचा घट्ट दही नी २ मोठे चमचे दूध असे मस्त फेट, अगदी फेसाळ नी एकजीव दिसले पाहीजे मिश्रण असे की एखादा सॉस आहे असे दिसले की थांब. electric egg beater नको वापरूस. मग त्यात किंचीत दालचीनी पॉवडर टाक. सगळ्यात शेवटी अंडे फोल्ड कर्.(मिक्स नाही करायचे. फोल्ड म्हणजे फक्त वरून घालून बाजू बाजूने फोल्ड कर).
३५० वर ओवन ५ मिनीटे आधी तापव मग २५ मिनीटे बेक कर. हाय काय नाय काय Happy

मॉड्स ही रेसीपी विभागात हलवाल का? मला माहीती नाही आधी कोणी लिहिली आहे का नाही ते. Happy

गोड अप्पे कसे करतात?

मला बटाट्याच्या भजींची कृती हवी आहे.. खरे तर बर्‍यापैकी माहिती आहे पण एकच माहिती नाही ते हे की बटाटे हे उकळून घ्यायचे की न उकळताही होतात भजी?

बटाट्याची कापे काढून भजी होतात. काप मात्र पातळ हवेत. नाहीतर ते कच्चे राहतात. बटाटे उकडून कुस्करून त्यात कांदा वगैरे घालूनही भजी करता येतात.

मला घरी Veg Sizzlers करुन बघायचे आहेत.
त्यासाठी लागणारी sizzler plate पुण्यात कुठे मिळेल कुणाला माहित आहे का? कुठल्या दुकानात चौकशी करावी??

साधारणपणे मुंबईत तरी ज्यांच्याकडे भांडी मिळतात त्यांच्याकडे असतो तो तवा. समजा नाहीच मिळाला तर जाड लोखंडी तव्यावर सिझलर्स पेश करता येतात.
ज्या हॉटेलमधे सिझलर्स मिळतात त्यांच्याकडे पण चौकशी करता येईल.

खुप खुप धन्यवाद. Happy आता शोध घेते आणि करुन बघते.

सुरुची veg Sizzlers ची माहीती इकडे टाक

मी अजुन घरी केले नाहीत. sizzler plate मिळाली की करुन बघेन आणि मग महिती टाकेन. नेट वर रेसिपी वाचली आणि सोपी वाटली.

Pages