पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -१

Submitted by admin on 6 July, 2008 - 14:10

पाककृती हवी आहे? इथे विचारा. पण त्या अगोदर

या ठिकाणी
आणि या ठिकाणी

अगोदरच आहे का हे पाहिलत तर आपल्या सगळ्यांचा वेळ वाचू शकेल.

इथे फक्त पाककृतींबद्द्ल प्रश्न विचारणे अपेक्षित आहे. नवीन पाककृती इथे लिहू नयेत. त्या लिहिण्यासाठी "नवीन पाककॄती" हा लेखनाचा धागा वापरावा. असे केल्याने पाककृतींचे योग्य वर्गीकरण होईल, सगळी माहिती एका ठिकाणी संकलित होईल व भविष्यात ती पाककृती शोधणार्‍यास सोपे पडेल.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

लालू, तु जे लिहिले ना फ्लॅक्ससीड बाबत ते खरे आहे(वाटतं) आता नुसते वाटते लिहायचे कारण इतके वर्षे मी सुद्धा ओटमील मध्ये मारे घालून खात होते. मी फ्लॅक्ससीड शेवटी टाकायचे ओटमील मध्ये नी मग उकळायचे नाही ओटमील पुन्हा तरी ऑफीसमधे ते अती थंड ओटमील गिळवत नसले की माय्क्रोवेव मध्ये जरासे गरम करायचे पण काहीच महिन्यापुर्वी वाचले की फ्लॅक्ससीड टाकलेले काहीही गरम केले तर टॉक्सीक क्रिया होते. मग प्रश्ण पडला की माझ्याकडच्या एका खूप फेमस शेफ ने लिहिलेल्या पुस्तकात अंड्याएवजी फ्लॅक्ससीड कसे वापरायचे दिलेय ते कसे काय? आणि मी सुद्धा एगलेस केक बनवलाय कीतीतरी वेळा त्या कृतीने तो मस्त झाला होता. .. त्यामुळे नक्की कीतीपत ते विषारी क्रीया होते गरम केल्याने ते बहुधा अननोन आहे. असो. सद्या मी सुद्धा फ्लॅससीड ओटमील मध्ये टाकले असले नी खाता खाता थंडगार झाले तरी गरम करत नाही. Happy

-------------------------------------------
मला ओली हळद कुठे मिळेल का? मी कितीतरी देसी दुकानात बघितले पण मिळाली नाही.(माझ्या ईकडच्या) कोणाला माहीती आहे का आणखे कुठे त्याचे झाड विकत मिळते ते?

हाय मनु, ओली हळद कधी कधी चपट्यांच्या दुकानात मिळते (इथे तरी). तु चायनीज ग्रोसरीज च्या दुकानात विचारून बघ. त्याला काय म्हणतात ते मात्र मला आठवत नाही. मी इतक्यात गेले तर बघुन सांगेन...

मने
कुठल्याही मोठ्याशा देसी दुकानात मिळते ओली हळद. एडिसन मधे सब्जी मंडी, पटेल कॅश ऍन्ड कॅरी वगैरे मधे मिळत असे. आमच्या इथे सुद्धा सब्जी मंडीत मिळते. अन गुजराथी दुकानदार असेल तर तो मागवून तरी देईल. आमच्या इथे ओली हळद अन ओली आंबे हळद नेहमी मिळते.

धन्यवाद शूनू नी लाजो, मी NJ ला नाहीयेना. मला ह्यावेळेला झाड लावून बघायचेय. असो, बघते मी इकडच्या चपट्यांच्या दुकानात.

मला barley खायचा आहे. कोणाला barley च्या indian recipes माहिति आहेत का?
असतिल तर please सांगा..

बार्ली नुसतीच शिजवून तिची दूध साखर घालुन खीर चांगली लागते. बार्ली वॉटरही बाजारात मिळते, त्याची चव छानच असते.

दिनेशदा, नुसत्या बार्ली वॉटर पेक्षा, लेमन बार्ली वॉटर मिळते बाजारात (मॅप्रो, किंवा माला चे) ते जास्त छान लागतं.

हाका नूडल्स करायचे आहेत. किती नंबरचे नूडल्स आणु ? कुठुन आणु ? कृपया माहिती द्या Happy

देशी दुकानात मिंग'स चायनीझ नूडल्स मिळतात - माझ्या इथल्या दुकानात तरी अंडं असलेल्या अन नसलेल्या असे दोनच प्रकार पाहिलेत. दोन्ही प्रकारांनी नूडल्स छान होतात.

http://funnfud.blogspot.com/2008/03/vegetarian-schezwuan-hakka-noodles.html इथल्या रेसिपीने करून बघीतलेले शेझवान हाका नूडल्स मस्त होतात. दोनदा केले. घरात होते तेच नूडल्स एकदा वापरून तर दुसर्‍यांदा चक्क होल व्हीट पास्ता नूडल्स वापरून (चपट्या). चव छान आली.

जवस पूड किंवा तेल गरम करु नये म्हणतात. >>>
मग जवसाची चटणी करण्याआधी जवस भाजावेत की नाही?

जवस भाजावेत. तडतड उडेपर्यन्त भाजावेत. तेल मात्र शक्यतो कच्चेच घ्यावे.

शोनु, मृ धन्यवाद Happy

kunala wine tayar karnyas lagnare wine yeast punyat kuthe milel mahiti aahe ka?

मिल्क मावा पावडर चे काय करता येईल..खुप आहे माझ्याकडे..रव्याचे लाडु करताना वापरता येईल का??

ऑलीव्ह ऑईल आणि एक्स्ट्रा व्हर्जिन ऑलिव्ह ऑईल ह्यात काय फरक? कोणत वापराव?

सिंडे, बरोबर आहे शोनूचं. हाका नूडल्स करता मिंग्जचे हाका नूडल्स म्हणून पॅक येतो तो चांगला लागतोच. फक्त उकळत्या पाण्यात नूडल्स टाकल्यावर दोन मिनिटं म्हणजे दोनच मिनिटं शिजू द्यायच्या.नाहीतर गचका गोळा..
अल्पना, तुला ब्रोकोली नुसती मीठ टाकून उकडून सॅलड सारखी खायला आवडत नाही का?

कुटकुटीत भेंडी करतो तशी कुटकुटीत ब्रोकोली पण छान लागते. पुलाव, बिर्याणी, मसाले भातात पदार्थ तयार झाल्यावर वेगळी टाकायची. छान दिसते आणि लागते.

मिल्क मावा पावडर वापरून पेढे वगैरे करता येतील. गुलाबजाम करता येतील, गाजर हलवा, दूधी हलवा यात वापरता येईल.
ऑलिव्ह ऑईल, हे फळांपासून काढण्यात आलेले एकमेव ऑईल आहे. बाकिची खाद्य तेले हि बहुतांशी बियांपासून काढतात. ( काहि माश्यांपासूनही काढतात. )
पिकलेल्या ऑलिव्ह पासून तेल गाळण्याच्या काहि वेगवेगळ्या पद्धति आहेत. त्यावरुन त्याची प्रतवारी करतात. साधारण एक्स्ट्रा व्हर्जिन हे जास्त महाग असते. जाणकार त्यात स्वादही शोधू शकतात.
पण आरोग्यदॄष्ट्या एकंदरच हे तेल चांगले. त्यामूळे कुठलेही वापरले तरी चालेल.
see this also

http://en.wikipedia.org/wiki/Olive_oil

थॅक्स दिनेशजी...:)

मिल्क मावा पावडर घालुन खोबर्‍याच्या वड्याही चांगल्या होतात..

दिपाली, हो, तु म्हणतेस तसे मी रव्याचे लाडु करुन बघितले आहेत मिल्क मावा पावडर घालून, मस्त चव आली होती. दिनेशदा म्हणत आहेत तसे गुलाबजाम पण केले आहेत आणि पेढे व मावा बर्फी सुध्दा.

सुरभी, मी कुकींग साठी रेग्युलर ऑलीव्ह ऑईल आणि व सॅलड्मध्ये कच्चे एक्स्ट्रा व्हर्जिन ऑलिव्ह ऑईल वापरते. मला नीटसे आठवत नाही पण एक्स्ट्रा व्हर्जिन आणि रेग्युलर ऑलीव्ह ऑईलच्या प्रेसिंग प्रोसेस मध्ये फरक असतो. पहिले एक्सट्रॅक्ट एक्स्ट्रा व्हर्जिन ऑलिव्ह ऑईल असते जे गुणांनी जास्त सरस असते पण ते कच्चेच खाल्लेले जास्त चांगले. आणि एक्स्ट्रा व्हर्जिन कायम काचेच्या बाटलीत मिळायचे / मिळते. स्पॅनिश लोक पटाईत असतात तेलाच्या वासावरुनच क्वालिटी ओळखायला.

चीजकेक कसा करतात? आणि (आधीच सुरु झालेल्या ) उन्हाळ्यासाठी कोणी डेझर्टच्या रेसीपिज देऊ शकेल किंवा लिंक... प्लीज..

धन्यवाद दिनेशदा!

प्राजक्ता आणि सनश(बरोबर का??)
हो मी करुन पाहीन...रव्याचे लाडु फक्त लक्षात आले हे काही आलंच नाही की डोक्यात...करुन बघते..धन्यवाद..

चीजकेकची कृति असणार इथे. बाजारात त्याचे तयार मिक्स मिळते. त्याचे छानच होतो तो. पण एक बेसिक कृति म्हणजे. आपल्या आवडीच्या बिस्किटांचा जाडसर चुरा करुन तो थोडा लोण्यात परतून घ्यायचा. ओलसर झाला पाहिजे. मग तो एका काचेच्या उभे काठ असलेल्या डिशमधे तळाशी आणि कडेने दाबून बसवायचा.
क्रीम चीज किंवा चक्का घेऊन त्यात आवडीप्रमाणे साखर घालून फेटून घ्यायचे. मग त्यात अनफ्लेव्हर्ड जिलेटीन, कोमट पाण्यात विरघळवून मिसळायचे. किती द्रवाला किती जिलेटीन लागेल ते पाकिटावर लिहिलेले असते. तसे मिसळुन ती डिश सेट व्हायला फ्रीजमधे ठेवायची. वरुन आवडत्या फळाचे तूकडे पसरुन आवडत्या ज्यामचे ग्लेझ करता येते. मी कष्टर्ड वापरुन पण केला होता. हा केक आंबटगोड हवा तसेच सेटही व्हायला हवा. एकदोनदा करुन बघितल्यावर जमतो तो. यात आपल्याला हवा तो स्वाद आणता येतो
वेजेस कापल्यावर त्याचा नीटस काठ उभा राहिला पाहिजे.

मेथि पुड (पावडर) वापरुन करायच्या मेथिच्या लाडवाचि क्रुति मिळु शकेल का?
माझ्याकडे मेथि पावडर, खारिक पुड, डिंक पावडर आहे... डिंक पुड कशि वापरता येईल?

मेथी पूड अगदी मंद आचेवर भाजून घ्यावी लागेल. आणि मेथी दाण्यांपेक्षापेक्षा ती थोडी कमी घालावी लागेल.
डिंकाची पुड एका भांड्यात घेऊन त्यात कडकडीत तापवलेले तूप ओतून ते भांडे दिवसभर तसेच ठेवायचे. ( जास्त दिवसही ठेवतात ). खारीक पूड मात्र भाजता येणार नाही, थोडी गरम केली तरी चालेल.

दोन कप कणीक, अगदी खमंग भाजून घ्यायची. अर्धा कप सुक्या खोबर्‍याचा किस भाजुन कुस्करुन घ्यायचा. त्यात पाव कप मेथीची भाजून पूड. अर्धा कप वरीलप्रमाणे भिजवलेली डिंकाची पूड. अर्धा कप भाजलेले अळीव, अर्धा कप खारीक पूड. पाव चमचा जायफळ पुड, दोन लवंगांची तळून केलेली पुड, पाव कप भाजलेली खसखस, तेवढेच तीळ ( कूट करुन ) चिमुटभर मीठ आणि दोन कप ( कमी चालेल ) बारिक केलेला गूळ घालून लाडु होतील. तूप लागेल तसे. गूळ गरम मिश्रणात मिसळल्यास पाक करायची गरज नाही.
यात गरज वाटली तर साधे पोहे तळून घालता येतील. इतर औषधांपैकी केशर, आस्कंद, शतावरी, गोडांब्या घालता येतील. सूका मेवा आवश्यक नाही, पण हवा तर घालावा.

धन्यवाद दिनेशदा!

Pages