विश्वचषक क्रिकेट २०११ अंतिम लढत : भारत वि. श्रीलंका

Submitted by Adm on 30 March, 2011 - 22:35

२०११ सालच्या क्रिकेट विश्वचषकाची अंतिम लढत २ एप्रिलला मुंबई येथे भारत आणि श्रीलंकेच्या संघांमध्ये होणार आहे.
हा धागा अंतिम लढतीच्या आधीची, दरम्यानची आणि नंतरची चर्चा करण्यासाठी...

चक दे इंडिया.... !!!!!!!!!!!!!!!

आला आला गुढी पाडवा |
भारतीय बॅटिंग चा जोर वाढवा |
मलिंगाचे यॉर्कर बडवा |
मुरलीची फिरकी तुडवा |
दिलशानचे स्ट्रोक्स आडवा |
लंका दहनचा इतिहास घडवा|
विजयी पताकेची गुढी चढवा ||
- Courtesy : DJ

दे घुमाके !!!

मारू छक्के चौके आणि करु त्यांच्या दांड्ये गुल्ल!
आला आला भारत, टरकली लंकेची फुल्ल!!!!!!

जोर लगा के... दे घुमा के !!!!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वेंगसरकरला बघितले कि मला लॉर्ड्स etc न आठवतात फक्त मुंबई १९८७, बांगडे, ग्रॅहम गूच एव्हढेच आठवते Sad

यॉर्कर्स सही टाकतोय झईर! आता नेमका चौका गेला साला, असो.... ये सब चलता है! आता फक्त मारामारी करताना त्यांचे मुडदे पडले पाहिजेत!

Laddu dongar.jpg

हे घ्या, गोड गोड घ्या. आमच्या वाघाने शतक ठोकलय वानरांच्या विरोधात.
वानरं सुद्धा लाडु खाऊ शकतात.

या रे वानरानो.
लाडु घ्या रे वानरानो.

जाऊ द्या! आता बॅटींग!! आधी टाईट नसतं केलं तर ह्यांनी इज्जी ३०० हाणले असते.
विरु!!!!!!! आजा अब तू!

शब्बास मेरे लंकन शेरो, टार्गेट २७५ दिल्या बद्दल तुमचं अभिनंदन.

आता या म्हणा त्या वानरसेनेला.

एका एकाचा समाचार घेऊन कप उचला आता.

लंकन वाघाना विजयाच्या शुभेच्छा.

Not bad!! Not bad at all!
आपली पण तयारी आहेच की! फाटायचं काय त्यात?
इतके दिवस काय झक मारत होतो का आपण, बॅटींग करतोच की आपण ? हो जायेगा!

लंकेचे वाघ भारतातील वानरसेनेच्या घरात घुसुन एका एका लोळवुन, सगळे तख्त फोडुन आपला विजयरथ मिरवित आहेत. वानरसेनेचा पराभव निश्चित दिसतोय. चला शेवटची विजयी धदक दया अन कप उचला आता!
--------------------

चला उदया भेटु आता.

बाय बाय.

लंकन वाघाना परत एकदा शुभेच्छा.
वानरसेनेचा पाडाव करा माझ्या वाघानो.

खल्लास !! अजून काय हवे लंकेला Sad सगळ्या पार्टनरशिपस ४०-५० वर, शेवटच्या क्रिटिकल टाइम्स मधे योग्य वेळी बसलेल्या ४ आणि ६ !! आपल्याला याच्या वरताण जमणार का ? ........घाबरायला होतंय :नखे चावणारी बाहुली:

Pages