न्यु जर्सी ए.वे.ए.ठी. अर्थात बाराकरांचा जी. टी. जी. ७ फेब्रुवारी २००९

Submitted by अनिलभाई on 12 January, 2009 - 16:23

न्यु जर्सी ए.वे.ए.ठी. अर्थात बाराकरांचा जी. टी. जी.

ए.वे.ए.ठी. ला न येण्याची कारणे लिहायला हक्काची जागा.
मग कधी करायचा ए.वे.ए.ठी.
(एकाच वेळी एकाच ठिकाणी) जमणे.
खालील न येण्याची कारणे स्वाती आंबोळे ह्यानी गोळा केली आहेत. व बाकी मायबोलीकरानी त्यात भर टाकली आहे. वाहुन जावु नये म्हणुन येथे देत आहे.

१. घरी पाहुणे येणार आहेत
२. मुलांचा काही कार्यक्रम (गेम / बर्थडे पार्टी / क्लास) आधीच ठरलेला आहे
३. ए.वे.ए.ठि.ची जागा माझ्या घरापासून लांब आहे
४. ज्या कार्यक्रमाच्या निमित्ताने ए.वे.ए.ठि. होणार त्यांचं तिकीट फार महाग आहे
5. मला कोणी आमंत्रण दिलं नाही
६. मला आमंत्रण दिलं
७. मला लाडू करता येत नाहीत
८. मला लाडू खायची परवानगी नाही
९. मला लाडू आवडत नाहीत
१०. मी देवळाबिवळात जात नाही
११. छ्या! बागेत कसलं भेटायचं!!
१२. त्या दिवशी स्नो आहे म्हणे
१३. त्या दिवशी पाऊस आहे म्हणे
१४. माझ्याकडे मायबोली टीशर्ट नाही
१५. माझ्याकडचा मायबोली टीशर्ट मला घालवत नाही
१६. भाईंच्या दाढीची भिती वाटते बुवा!
१७. झक्का उथळ आणि पांचट बोलतात
१८. सगळेच उथळ आणि पांचट बोलतात
१९. ऍडमिन येणार असतील तर मी येईन
२०. अमुकतमुक येणार असतील तर मी येईन
२१. अमुकतमुक येणार नसतील तरच मी येईन
२२. अपेंडिक्स, टॉन्सिल्स काढण्याचं ऑपरेशन आणि (एंडो, एक्झो का स्टेथो)स्कोपी त्याच दिवशी आहे.
२३ (अ). मराठी लिहिता येतं पण वाचता येत नाही
२३ (ब). मराठी बोलता येतं पण समजत नाही
२३ (क). वरील दोन्ही
२४. त्या दरम्यान मी देशात मज्जा करायला जाणार आहे.

पत्ता
४३ -४५ फ्रॅन्कलिन ड्राइव्ह
प्लेन्सबरो, एन जे ०८५३६

भेटायची वेळ : ७ फेब २००९, सकाळी ११.०० - ११.३०

जानेवारी २०१० च्या ए.वे.ए.ठी. खालील ठिकाणी..
http://www.maayboli.com/node/12363

Group content visibility: 
Public - accessible to all site users

चिप्स + साल्सा >>> नको त्यापेक्षा केळ्याचे चिप्स, कुरकुरे वगैरे आणु.

७ फेब्रुवारी च्या ए.वे.ए.ठी ची लिस्ट

झक्की (१), अनिलभाई(१), प्राजक्ता (२ + १/२) , सायोनारा(१ किंवा १.५), संटिनो(१), मैत्रेयी (२+२) , सिंडरेला(२ + १/२), नयनीश (३), विनय (२), लक्ष्मीकांत(४), संदीप(२+१), पन्ना (२ + १/२)

विनयचा चटपटीत मेन्यू...

१. भेळ
२. पाणीपुरी.
३. रगडापॅटिस.
४. दहीवडा.
५. बटाटावडा.
६. भजी.
७. समोसे.
८. पावभाजी.
९. कुल्फी...
१०.मिसळ..

पावभाजी मी आणतो - विनय

मैत्रेयी चा मेनु
अपेटायझर्स मधे बटाटे वडे, पकोडे, चिप्स -साल्सा वगैरे १-२ पदार्थ
मिसळ पाव(किंवा मसालेदार उसळ च करून त्यावर कांदा, शेव वगैरे),
दही वडे,
ज्यांना काही आणणे शक्य नाही त्यांनी सोडा, ज्यूस, पार्टी सप्लाईज (पेपर प्लेट्स, ग्लासेस, चमचे, बाउल्स, ४ पार्टी टेबल क्लॉथ्स,)यातले आयटेम्स निवडले तरी चालतील

मुलांसाठी पास्ता.
१ गोड पदार्थ- गुलाब जाम वगैरे.

पत्ता
४३ -४५ फ्रॅन्कलिन ड्राइव्ह
प्लेन्सबरो, एन जे ०८५३६

भेटायची वेळ : ७ फेब, सकाळी ११.०० - ११.३०

- अनिलभाई

मी भेळ आणते. लहान मुलांसाठी फळांच्या रसाचे छोटे-छोटे डबे आणते.

पत्ता
४३ -४५ फ्रॅन्कलिन ड्राइव्ह
प्लेन्सबरो, एन जे ०८५३६

संटीनो भावु...... आमची आठवण ठेवल्या बद्दल ठांकु..... Proud
मी ही भेळ म्हणणार होतो... पण सिंड्रेला पण भेळच आणतेय त्या मुळे बायको ला विचारुन सांगतो...
आजुन एका मेंब्रानी भेळ आणली तर चालेल ना ?
गुलाब जाम पण मी आणु शकतो...

मी रगडा आणि पा.पु. साठी २ प्रकारचं पाणि (हो, चिक्काssssर) आणते.
प्राजक्ता

मैत्रेयि,
तिथे बीअर नि वाईन प्यायला परवानगी असेल तर मी आणीन.

आजुन एका मेंब्रानी भेळ आणली तर चालेल ना ? >>> कैतरीच हां, दोन दोन भेळा कश्या चालतील! Happy
अजून पुष्कळ आयटेम्स आहेत शिल्लक. दाखवा बायको ल लिस्ट. Happy

आजुन एका मेंब्रानी भेळ आणली तर चालेल ना ? >>> कैतरीच हां, दोन दोन भेळा कश्या चालतील! >>>>>>>> ठीक आहे.... मिसळ.... पण आता दुसर कोणी मिसळ म्हणुन ओरडल तर "कैतरीच हां"" म्हणायला विसरु नका ... किंवा विसरलात तर उरलेली खाऊन संपवायची किंवा घरी घेवुन जायची तयारी ठेवा.... Proud
ठरल तर मग
मिसळ आणी गुलाब जाम मी आणतो...... Happy

ओके मग आतापर्यन्त हे आयटेम्स घेतले गेलेतः

भेळ - सिन्ड्रेला
मिसळ - नयनिश
रगडा, पापु चे पाणी Happy - प्राज
पापु च्या पुर्‍या - ??
पास्ता - सायो
गुलाब जाम - नयनिश
पेये (सोडा , ज्यूस, पाण्याचे कॅन्स)- ??
अपेये Happy - झक्की
बाकीच्यांनी अपडेट करताना हीच यादी वापरा.

भेळ - सिन्ड्रेला
मिसळ - नयनिश
रगडा, पापु चे पाणी - प्राज
पापु च्या पुर्‍या - ??
पास्ता - सायो
गुलाब जाम - नयनिश
पेये (सोडा , ज्यूस, पाण्याचे कॅन्स)- ??
अपेये - झक्की
पावभाजी- विनय

मला कटवलेले दिसतेय... Sad
ठिक पुढच्या ए. वे. ए. ठि. ला येईन...

पेये (सोडा , ज्यूस, पाण्याचे कॅन्स) आणि जिलेबी (लिस्टमधे नाहीय) - मी आणतो..
भेळ - सिन्ड्रेला
मिसळ - नयनिश
रगडा, पापु चे पाणी - प्राज
पापु च्या पुर्‍या - ??
पास्ता - सायो
गुलाब जाम - नयनिश
पेये (सोडा , ज्यूस, पाण्याचे कॅन्स) , जिलेबी - लक्ष्मीकांत
अपेये - झक्की
पावभाजी- विनय

७ फेब.ला भेटायची एकच वेळ कोणती ?

मी काल पार्ल्याच्या बा. फ. वर जाऊन लाडवाक्का, संगितसम्राज्ञि, निनावी अश्या अनेSक नावांनी प्रसिद्ध असलेल्या स्वाती आंबोळे यांना जरा लटक्या रागाने म्हंटले की तुम्ही ए. वे. ए. ठि. ला येत नाही हे काही शो. ना. हो. पण अजून काही उत्तर नाही!

भेळ - सिन्ड्रेला
मिसळ - नयनिश
रगडा, पापु चे पाणी - प्राज
पापु च्या पुर्‍या - मैत्रेयी
पास्ता - सायो
गुलाब जाम - नयनिश
पेये (सोडा , ज्यूस, पाण्याचे कॅन्स) , जिलेबी - लक्ष्मीकांत
अपेये - झक्की
पावभाजी- विनय
केक - हे मुले नक्की खातील म्हणून, आणि काही ऐन वेळी राहिलेले आयटेम्स असतील ते - मैत्रेयी

भाई, सन्तिनो, अन जे उरलेत ते : तुम्ही पार्टी सप्लाइज, अजून काही स्टार्टर्स, इ. निवडू शकता. किंवा इतर काही चॉइस असेल तर तसे लिहा.

हवे असलेले पार्टी स्प्लाइज:
डिशेस
बाउल्स
चमचे
फोर्क
पेपर नॅपकिन्स
ग्लासेस
४ पार्टी टेबलक्लॉथ्स

पार्टी अरेन्जमेन्ट्स : मैत्रेयी + भाई + विनय (जवळ रहाणार्‍यांना बाय डिफॉल्ट ही जबाबदारी!!:) )
क्लीन अप : निराकार Happy + ?? + ??

भेटायची वेळ : ७ फेब, सकाळी ११.०० - ११.३० ठीक राहील मला वाटते.

झक्कीकाका, मला या वेळी जमणार नाहीये. Sad
(लिहिलं होतं की आधी - कुठे लक्ष असतं!!) Proud

पुढच्या वेळी नक्की. Happy

लिहिलं होतं की आधी - कुठे लक्ष असतं!! ---<<<<<

ते रंपाच्या व्यापात गुंतले आहेत, तेव्हा क्षम्य चूक... Happy
त्यात हुडाचे पुनरागमन आणि ...

विनय

दुष्ट मंडळी नुस्ती!!!!
मला वाटलं 'मी येत नाही' म्हंटल्यावर जरातरी चुकचुकतील, हळहळतील! पण कसलं काय? हादडंपट्टीच्या गप्पात रंगून गेलीत!!! Proud

माझ्यातर्फे ढोकळे आणि मिरच्या (१:५ ह्या प्रमाणात) पाठवू का?

भेटायची वेळ ११:०० ते ११:३०?? फक्त अर्धा तास??
क्यातरीच हा.

मी श्रींप करी व ब्रेड आणिन म्हणतो. चालेल का?
नयनिश.. चिकन च काय झाल.

- अनिलभाई

भाई... अहो लक्ष कुठेय तुमचं? मेन्यु बदलला ना? आता नयनीश तुमच्यासाठी चिकन आणणार असेल तर संध्याकाळी परत पार्टी करता येईल म्हणा...

Shrimp आणि chicken ची हकालपट्टी... Sad

आणि हो.. त्या मॄ ला पण बोलवा रे... तिला वाईट वाटतं म्हणे... Lol

भेटायची वेळ ११:०० ते ११:३०?? फक्त अर्धा तास?? << बाकीचा वेळ फक्त हादडायला ठेवलाय ना?

विनय

आणि हो.. त्या मॄ ला पण बोलवा रे... <<<< झक्कीकाकांच्या घरच्या ए.वे.ए.ठि.ला एक मृ आली होती ना ? (भ.मे. ?) ... Happy

कोण मृ येऊन गेली म्हणे?? भ. मे. असेल तर मीच ती! Proud

मृ येणार नाही...का ? तु लाडु पाठव गं. जास्त वाईट नको वाटुन घेउ.

लालु आणि रुनि येणार आहेत ना ?

शेवटी शोध लागला... भ.मे. म्हणजेच मॄ.. (ती आली नव्हती कुठल्याही ए. वे. ए. ठि. ला तरी)..
आता शिंडने घाबरायचं कारण नाही... (जी काही चर्चा होईल, ती समोरासमोर...)

मॄ, एक फोटो पाठव म्हणजे लावता येईल तिथे. ए. वे. ए. ठि. ला..

विनय

पण मी घाबरले नैच्चे Wink

अरे श्रिम्प , चिकन ला नाही म्हटले नाहिये, कबाब, पॉपकॉर्न चिकन/नगेट्स्, बफेलो विन्ग्स असले ऑप्शन्स या मेनु मधेपण सूट होतील की! Happy

फोटो कशाला? नको नको!! माझे अचरटपणे सहन न होऊन भडकलेले बाराबाफकर फोटोला हार घालून समोर उदबत्त्या लावतील! Proud

सिंडे, लाडू डिपार्टमेंट आपलं नाही!

लाडवाक्का येणात नाहीत म्हणे. मग कुणीतरी लाडु पाठवायला नको का Wink

काल कुणीतरी रगडा आणणार म्हणाले होते ना ? त्यातली टिक्की आणायला विसरु नका बरे Wink आणि दही आधीच एकदम मिसळु नका त्यात. ज्याला जसे हवे तसे घेउ देत. म्हणजे ज्यांना दही नको आहे रगड्यात त्यांची पंचाईत नको, काय ? Happy

हा बाफ 'मनोरंजन' या सदरात ज्याने घातला त्याचं कौतुक आहे! Lol

मग.. मनोरंजन अपना पिढीजात धंधा है क्या?.. Happy
स्वाती तु ये ग.. नाही सांगत आम्ही तुला गायला. Happy

- अनिलभाई

सिंड्रेला, yes boss
प्राजक्ता

Pages