क्लूलेस - ६

Submitted by गजानन on 16 February, 2011 - 04:13

http://ahvan.in/ahvan10/klueless6/
हे सोडवण्यासाठी हा धागा.

(आता हे कंसातले वाक्य वाचू नका. दहा शब्द भरण्यासाठी ठेवलेय-
The मजकूर of your लेखनाचा धागा is too short.)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी आज हा गेम अजून उघडलाच नाही. कामाचा पोपट होतो एकदा उघडून बसलं की Sad पण थोड्यावेळाने उघडणार बहुतेक न रहावलं की आणि प्रत्येक लेव्हलला डोकं बंद, अडकले, सांगा की वगैरे बोलत बसणार Lol

चिमुरी, उत्तर 'कुठे' लिहिलं त्यालाही महत्त्व आहे या लेव्हलीत. Wink

नंद्याशा, दोन पार झाल्या ना? वेल डन! आगे बढो. Happy 'ब्लीप'वाला शब्द कळला? मग तो कळला की सोर्स काय सांगतो? तसं करा, तेच आहे उत्तर.

लेव्हल १६: चित्रं जोडीजोडीने आहेत बघ. एकत्र बघितली तर काहीतरी शब्द मिळतो. ते कशाचं नाव आहे हे तुला इमेजनेम/पेज टायटलवरून कळेल. (इव्हेंटफुल!!) त्यावरून क्लू लागेल.

अकराव्याला पोचलो.
योडे, ती 'चिन्हं' जुळव.
किंवा सोर्सातला क्लू वाच. मला सोर्सातल्या क्लूनं आणि वरच्या मथळ्यानेच पुढं ढकललं.

आता, ९व्यात पक्षाच्या नावात कसा बदल करु तेव्हडं सांगा कोणीतरी?

(बहुदा सगळ्या लेव्हल्स मदत घेवुनच पूर्ण कराव्या लागनार) Sad

(बहुदा सगळ्या लेव्हल्स मदत घेवुनच पूर्ण कराव्या लागनार) अरेरे >>
अनुमोदन Sad
मला पण ते In asia are asians कळत नाहिये

जे नाव सापडलंय ते केवळ पक्ष्याचं नाव आहे का? Happy आणि एशियात राहणारे ते एशियन्स... Wink

योडी, तू बरोबर ट्रॅकावर आहेस. लिपी कोणती ते तुला सोर्स क्लू सांगेल.

Pages