क्लूलेस - ६

Submitted by गजानन on 16 February, 2011 - 04:13

http://ahvan.in/ahvan10/klueless6/
हे सोडवण्यासाठी हा धागा.

(आता हे कंसातले वाक्य वाचू नका. दहा शब्द भरण्यासाठी ठेवलेय-
The मजकूर of your लेखनाचा धागा is too short.)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मराठी कुडी आठव्याचे उत्तर सोपे आहे. चित्र पाहु नकोस. उत्तर दुसरीकडे टाइप्करुन एन्टर दाब नाहीतर
खुप वेळ फुकट जाइल.

चिनूक्स, ११व्या करता मदत हवी आहे. इमेज टेक्स्टमध्ये कशी बदलायची? URL बदलण्याकरता सगळी टेक्स्ट extensions वापरून झाली. पण हाती काही गावलं नाहीये. डेमी मूर तशीच स्टेअर करतीये.

मामी,
इमेजचं नाव बघा. आणि तिथल्या तिथे टेक्स्टमध्ये बदलण्यासाठी काय करता येईल ते बघा. आपण एरवी एखादा फाइलफॉर्मॅट कसा बदलतो? तसा तिथे बदलायचा. मग तिच्या डोळ्यांत बघा. Happy
ती नेली फर्टाडो आहे.

छानच जमतं गं मंजू तुला>>> खरं वाटलं की काय शैलजा तुला? ही साईट चालत नाही गो ऑफिसात.. banned Happy

गजा, सातवी कशी पास झालास?

मंजू, सातवीसाठी एक कार्टून कॅरॅक्टर आहे. तो बाण खाली दिशानिर्देश करतो आहे तर तर खाली स्क्रोल करून बघ. त्यावरून हिंट मिळेल.

केदार, ८वीमध्ये फक्त मिरर इमेज, ९वीमध्ये मास्क आणि पक्ष्याचे नाव वगैरे...

श्रद्धा, ते यलो, फेलो, कार्टून सगळे क्लु मिळाले... त्या क्रु मधले सगळ्या कॅरॅक्टरची नावं पन घालुन बघितलि.. काहीच होत नाहिये... Sad

अरे, लेव्हल ७ ला 'यलो कार्टून कॅरॅक्टर्स' असं गूगला. त्यात एक याहू आन्सरचं पेज येईल. त्या पेजवरचे शब्द नीट वाचा आणि गूगल करा. (मला या मार्गानेच उत्तर सापडलं :फिदी:)

श्रद्धा >>> अवल, योडीने लिहिलेले कार्टून कॅरॅक्टर आहे तसेच दिसणारे अजून एक पिवळे, उद्धट कार्टून कॅरॅक्टर आहे. त्याचे नाव हे तुमचे उत्तर. अजून मोठा क्लू: त्या कार्टून कुटुंबातल्या मुलाचे नाव हे उत्तर. <<< नाही गं कळत ... आता कोणीतरी माझ्या विपुत डायरेक्ट उत्तरच टाका बाबा सातव्याचे Sad
मी त्या कार्टूनच्या सगळ्यांचा पार वंशवृक्ष चेक केला पण चालना :भ्याsssssssss :

नाही गं कळत ... आता कोणीतरी माझ्या विपुत डायरेक्ट उत्तरच टाका बाबा सातव्याचे अरेरे
मी त्या कार्टूनच्या सगळ्यांचा पार वंशवृक्ष चेक केला पण चालना :भ्याsssssssss :>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>> सेम....

मला पण कोणितरी सांगा उत्तरच, किमान फॅमिलीच नाव तरी सांगा

ललिता, त्यातले सगळे शब्द टाकुन पाहिले... Sad

सातवी पातळी : अरे, फार काही करू नका. पानावरचा मजकूर गुगलून पाहिल्यावर विकीचं पान शोधयादीत येतंय त्यातच जरा नीट बघा.

हो, सातव्याचं उत्तर विकीच्याच पेजवर सापडेल. श्रद्धाने सांगितलेला नावाच क्लु लक्षात ठेवा फक्त.

मी आठव्यावर अडकलेय. शब्द मिळालाय पण पुढे काय?? Sad

चिमुरी, वर श्रध्दाने दिलेला क्लू लक्षात घे. (फॅमिली, आगाऊ मुलगा वगैरे) याहू आन्सरच्या पेजवरचे शब्द एक-एक करून गूगलून त्यांची विकीवरची माहितीही वाचावी लागेल (जर कार्टून्सबद्दल फारशी माहिती नसेल तर...)

योडी, 'फेमस मास्क्स' असं गूगल करून इमेज शोध. तुला काहीतरी सापडेल त्या मास्काशी संबंधित. मग पुढे प्रोफेसर डंबलडोर तुला मदत करतील. पक्षी मिळेल. बघ. Happy

मी ३३एवर. (केवळ ३ लेव्हली बाकी संपायला!) २०पासून पुढच्या लेव्हली अतिशय रंजक आहेत. Happy

मी अजून पंधरावरच अडकलोय.. अर्थात अडकल्यापासून बाकी काही केलच नाहीये.. पण काही सुधरत नाहीये.. क्लू द्या क्लू..

लेव्हल १५: सोर्स क्लूमधले शेवटचे वाक्य जास्त महत्त्वाचे आहे. ते नाव म्हणजे १५व्या लेव्हलीचे उत्तर. 'त्या' प्रसिद्ध दुर्घटनेत काय काय घडले ते विकिवर तपशीलवार आहे. ते बघ आणि शेवटच्या वाक्याला मॅचिंग काही सापडतंय का बघ.

योडी, मी लिहिलं ते केलंस का? इमेज गूगल केली की तुला एक नाव मिळेल. आणि डंबलडोर हा सगळ्यांत मोठ्ठा क्लू आहे.

Pages