बेत काय करावा?

Submitted by admin on 10 July, 2008 - 11:40

पाहुणे येणार आहेत पण बेत काय करावा? या भाजीबरोबर ती कोशिंबीर चांगली लागेल का? तुमचे प्रश्न इथे विचारा.
पण त्या अगोदर मायबोलीकरांनी सुचवलेले Menu Combinations इथे पहा.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हो, भाजीही गरम आणि पावही गर्रम अशा रिक्वायरमेन्ट्स असतात तेव्हा ही पाव वाफवून घ्यायची आयडिया एकदम बेस्ट आहे. बरेच लोक असतील तर पावांसाठी ताटकळत बसावे लागत नाही.

मन्जू, तो आमिरी खमण लईच इन्टरेस्टीन्ग आहे.

मंजुडी, ते पाव आधी भाजून घेण्याची पण गरज नाही!बटर लावून ठेवायचं आणि तसेच कुकरला लावायचे. भाजत बसण्याचा वेळ वाचतो!!

भाजले नाही तर ते पाव मऊच राहत असतील ना? नुसतेच वाफवले तर भाजल्याचा खमंगपणा, किंचीत कुरकुरीतपणा येत नसेल.

योडे, भाजलेले पाव डब्यात ठेवून डब्याच्या तोंडापेक्षा मोठं झाकण त्यावर ठेवायचं. डब्याचंच झाकण लावलं तर झाकण काढताना हात भाजेल.

>>भाजले नाही तर ते पाव मऊच राहत असतील ना
होय, पण २५/३० जणांचे पाव भाजायला कंटाळा येतो ना. त्यामूळे मि ही मेथड १० पे़क्षा जास्त पाहूणे असले तर वापरते!! Happy

ओके ओके , म्हणजे आधी भाजुन घ्यायचे....>>>>>>>>>>>>< नाहि, जेवढा कुकर असेत त्या अंदाजाने पाव घ्यावेत्,(माझ्या कुकरमध्ये जवळ जवळ ९ पाव बसतात,मी पावाची लादीच ठेवते) त्यांना मधुन कापुन बटर ,पाव भाजी वगैरे लावुन घ्यावे,कुकरच्या तळाला तेल किंवा बटर लावुन कुकर थोडा गरम करावा,आणि त्यात पावाची लादी ठेवावी,कुकरच्या झाकणाऐवजी मोठं ताट ठेवावं,मोठ्या किंवा मध्यम आचेवर १-२ मिनिट ठेवावेत्,जास्त वेळ ठेवलेत तर करपतील.
पाव मस्त खरपुस भाजले जातात्,मऊ नाहि पडत.जर जास्त खरपुस हवे असतील जास्त वेळ ठेवायचे,पण मग करपनार नाहित ह्याची काळजी घ्यायची.

हो चालेल... ढोकळा करून तो चुरून त्यात खमंग फोडणी घालून, चवीप्रमाणे मीठ, साखर, लिंबाचा रस आणि मग डाळिंबाचे दाणे, काजूचे तुकडे घालून शेव पेरून देता येईल.<< याला गुजरातमधे खमणी म्हणतात. याच्या बरोबर कच्च्या पपईची चटणी देतात खूप सहि लागतो हा प्रकार.

तो अमीरी खमण प्रकार लई खास वाटतोय.... अजून कधी खाल्ला नाहीए... आता खाऊन पाहाणे मष्ट आहे. धन्स मंजूडी! आणि पाव एकदम गरम करायची कुकरवाली आयडिया पण भारी आहे. घाऊक प्रमाणावर पाहुणे असतात तेव्हा अतिशय उपयोगी.

हो चालेल... ढोकळा करून तो चुरून त्यात खमंग फोडणी घालून, चवीप्रमाणे मीठ, साखर, लिंबाचा रस आणि मग डाळिंबाचे दाणे, काजूचे तुकडे घालून शेव पेरून देता येईल.<< याला गुजरातमधे खमणी म्हणतात.>>>>

खमणी - चणा डाळ रात्री भिजवुन सकाळी मिक्सर मधे वाटायची (पाणी न घालता) , त्यात आले, लसुन व मिरच्या, मिठ टाकायचे.
मग हा गोळा + आंबट दही मिक्स करुन कुकरला चांगला वाफवुन घेणे. भरपुर् तेलात हाताला रग लागेस्तोवर परतायचा. खमणी छान मोकळी झाली पाहिजे. त्यावर मग बारीक शेव टाकुन गरम खावे.

मोनाली पण मी बडोद्यात जी खमणी खाल्ली होती त्यात खमणचा चुराच होता म्हणून मला वाटले आता तुझ्या पद्धतीने करून बघेन धन्सः)

मी १का लग्नात रीसेप्शनला करताना पाहीला आणि खाल्लेला प्रकार आहे. म्हणुन मला ही पध्धत माहिती आहे. बाकी खमण घरी उरला तर तुझ्या पध्धतीनेच संपवावा लागतो :). नाव वेगळे सांगायचे ... झाले तर

मला येत्या रविवारी सुपरबोल पार्टी साठी मेन्यू हवाय. मुख्यतः व्हेजी ऑप्शन हवेत. अत्ता पर्यंत ठरलेला मेन्यू चिप्स, वेगवेगळी डिप्स, चिकन रॅप्स, पाईन अ‍ॅप्पल अपसाईड डाऊन केक असा आहे. व्हेजी रॅप्स साठी काही सुचवता येइल का? अजून काय करता येईल? जरा सजेशन्स द्याल का?

रोस्टेड व्हेजी ( वांगी, लाल फुग्या मिरच्या, झुकिनि ,टोमेटो यांचे पातळ स्लाइसेस करून ऑऑ घालूण ओव्हन मधे खरपूस भाजायचे ) , मॉझ्झरेला , बाल्सामिक व्हिनेगर यांचे रॅप्स करता येतील.

बाल्सामिक ऐवजी हुमस पण वापरता येईल .

अल्फाल्फा स्प्राउट, अरुगुला, रॅडिश / मस्टर्ड स्प्राउट / ब्री चीझ असं कॉम्बो पण छान लागतं .

सॉफ्ट अन हार्ड टाको आणून - रोस्टेड भाज्या, पातीचा कांदा , मश्रूम, साल्सा, ग्वाकामोले वगैरे ठेवून टाको बार करता येईल. व्हेज / नॉन व्हेज टाको बार सुद्धा करता येईल - सोबत ब्लॅक बीन सॅलड, नाचो चिप्स, वेगवेगळे साल्सा असे ठेवता येईल - बरोबर मार्गरिटा ;स्लर्प !

माझ्याकडे 10 मोठे ,५ लहान येणार आहेत. दहि वडा,
छोले भतुरे बरोबर दुपारच्या वेळेला आजुन काय देता येइल

स्वरा, ह्या मेनुसोबत भेळ, ढोकळा, सुरळीच्या वड्या चांगला वाटेल. गोडात फ्रुट कस्टर्ड/ आईसक्रीम संडे. वेळेआधी हे सगळे करुन ठेवता येईल.

आईसक्रीम संडे करायला आवडत्या १-२ फ्लेवर्स्चे आईसक्रीम आणी वर सजवायला सॉस, कलरफुल टोपींगस की झाले..:) मुलांना असे आईसक्रीम जास्त आवडते.

आलू बंजारा, भेंडीची भाजी, गाजराची किंवा बीटाची कोशिंबीर, हि मी कोथिंबीर नारळाची कोरडी चटणी, कोथिंबेरीच्य वड्या किंवा अळु वड्या, मठ्ठा आणि पोळ्या, वरण-भात हा मेनु कसा वाटतोय ? गोडामध्ये गुलाबजाम किंवा जिलेबी.

भेंडीची भाजी आणि वरण भात कारण जेवणार्‍यात एक बाळांतीण आहे आणि तिचा मोठा मुलगा वरण-भात वयाचा आहे. तिची आई पण येणार आहे. त्यांच्यासाठी एकदा टिपिकल पनीर फनीर मेनु करुन झालाय.

मसालेभाताबरोबर करतात आणि नुसता प्यायलापण करतात. पण usually उन्हाळ्यात थंड प्यायला बरं वाटतं, तेव्हा करतात.

टोमॅटोचं सार करते. ते मला पण आवडतं.

रच्याकने, मैत्रिणीच्या दोन्ही मुलांची आलटून पालटून आजारपणं, स्नो, इ बघता ते ह्या हिवाळ्यात येतील की कसे शंकाच आहे Wink

mazyakade pujechya tirtha-prasadasathi 25-30 lok yenar aahet. Jevanacha bet nahiye pan kahitari padartha karava asa vichar aahe. Chhole -puri kinva tatsam. Ha kahi naivedya nahi teva hyat kanda chalel pan god ani prasad wegala aahecha. kuni suchavu shakel ka kahi padartha. Kids sudhha aahet.

Please shakyato asa padartha suchava ki jyachi thodi tari tayari aadalya divashi karata yeil.

मैत्री, ह्याच धाग्याची मागची काही पाने चाळलीत तरी भरपूर पर्याय मिळतील. तरीसुद्धा हे काही पर्याय;

१. इडली-चटणी-सांबार
२. कटलेट/समोसा-पुलाव-रायता
३. दहीवडे-मसालेभात
४. साबुदाण्याची खिचडी/उपमा-ढोकळा/तत्सम फरसाण प्रकार

Pages