न्यु जर्सी २९ जानेवारी २०११ हिवाळी ए.वे.ए.ठी.

Submitted by अनिलभाई on 16 December, 2010 - 09:51
ठिकाण/पत्ता: 
ए.वे.ए.ठी चा पत्ता. मैत्रेयीचा हॉल. (हॉल च भाड सगळ्यानी मिळुन भरायच आहे. फार नाही आहे. घाबरु नका. :) ... ४३ -४५ फ्रॅन्कलिन ड्राइव्ह प्लेन्सबरो, एन जे ०८५३६

*************************
*
मेनु :
सुमंगल : मँगो पाय
पन्ना : चिकन करी
एबाबा : तिळाच्या वड्या
झक्की : बियर वाईन.
स्वाति अंबोळे (ईबा) : मसाले भात
वैद्यबुवा : गो चि के , हनी वोडका
सिंडरेला : फालुदा
सिंडरेला : वांग्याची भाजी / नाही मिळाली तर त्याच रश्यात बेबी पोटॅटो /मडक्यात आलू /../../..
सिंडरेला : तुप/../../..
सायो : तुरिया पात्रा वाटाणा - कॅरीओकी सिस्टीम
मैत्रेयी : कढी पकोडे
सिम : साध्या पोळ्या/फुलके
चमन : फिश
नात्या : गुळाच्या पोळ्या
परदेसाई : पेशल भाजी
(स्टार्टर - १ ) V : तिखटमिठाच्या पुर्‍या
(स्टार्टर- २ ) अनिलभाई : समोसा
फचिन : सॉफ्ट ड्रिंक्स , प्लेट्स्, कप्स, चमचे काटे नॅपकिन्स वगैरे वगैरे - तबला

माहितीचा स्रोत: 
ए.वे.ए.ठि. गटग
तारीख/वेळ: 
शनिवार, January 29, 2011 - 10:59 to 17:59
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आता पन्ना वगैरे येत नाहीत तेव्हा... मी पेशल भाजी आणतोय.. >> पापलेटं आहेत ना त्यात? Uhoh

कितीचा मुहुर्त आहे उद्या?

दरवेळी डीसीकर सगळ्यात आधी ११-११:१५ वाजता हॉलवर पोचतात आणि सडा रांगोळी घालून यजमानांचे स्वागत करायला उभे असतात. यावेळी तो मान उदार मनाने बारा/शिट्टी/न्यु यॉर्क वाल्यांना देण्यात येत आहे.

उदार मनाने बारा/शिट्टी/न्यु यॉर्क वाल्यांना देण्यात येत आहे. >> तो मान तुम्हाला मिळावा म्हणुन अजुनही तुम्हाला आग्रहाचे आमंत्रण. ते वाडग्याचे मात्र विसरु नकोस Happy

हो, साडेअकरा धरा साधारण.
पत्ता वर आहेच. गुगल वर शोधायचा असेल तर ४१ Franklin dr , Plainsboro Nj 08536 शोधा.
क्लबहाउस घर क्र. ४१ आणि घर क्र.४७ च्या मधे आहे. पार्किंग वेगळे आहे पुरेसे. आधी पार्किंग, पलिकडे पूल अन त्याला लागून हॉल दिसेल. बहुतकांकडे माझा फो नं . आहेच, नसेल त्यांनी मागून घ्या ईमेल द्वारे.

१. आपापले ट्रे गरम करण्याचे साहित्य /सेटप आणा. मायक्रोवेव हवा तर आहे तिथे.
२. सर्विंग स्पून्स विसरू नका
३. जे कुणी ड्रिन्क्स, पेपर प्लेट्स, ग्लासेस इत्यादि आणणार आहेत त्यांनी वेळेवर यावे ! Happy
४. हॉल च्या भाड्याचे कॉन्ट्रि. (आताच्या लिस्ट च्या हिशेबाने) प्रत्येकी सुमारे $४ होत आहेत. सुट्टे पैसे आणणे.

मुद्दाम टिंबाची जागा चुकवली! काय चावटपणा लावलाय भाई? अजून हनी वोडकाचं बुच पण उघडलं नाहीये. Proud

बाकी नवीन लेखनावर आलो की डायरेक ४० पोस्टी नवीन आलेल्या दिसतायत ह्या बाफं वर. बरय बरय! Happy

काय केव्हाचं मडकी मडकी लावलय, मला वेगळीच "क्रिया" डोळ्यापुढे येते, मडकं म्हंटल की. Proud (खिम्या ऐवेजी बटाट्याचा लगदा घातल्यावर आणखिन काय होणार म्हणा Wink Light 1 )

चीजकेक आणून गाडीतच ट्रंकात ठेवलाय. तिथेच बरा आहे. उद्या, जेवण झालं की काढून ठेवू. "थॉ" करायला.

फचिन, तुझे टि शर्टाचे पैसे द्यायचे राहिले आहेत. मी विसरलो तरी कृपा करुन आठवण करुन देणे!
आयला, त्या दगडू मसाल्याची पाकिटं करायला वेळच झाला नाही. पाव पाव किलोची ७-८ पाकिटं आहेत. आता उद्या तेच काम करावं लागेल सकाळी उठून.

आणतो आणतो. उद्या सकाळी उठलो की आधी तेच काम करेन. मृ आणि ज्ञाती करता दोन जपून ठेवायचेत. बाकी सगळे घेऊन येइन.

मला पण हवा बर्का दतेम.

मसुराला काय मोड आले नाहीत. नवर्‍याने ग्रॉसरीत बेबी पोटॅटो आणायचे तर बटाट्यांची मोठी भावंड आणलीत Uhoh मी तूप आणि फालूदा आणते.

लालू येणार म्हणजे रुनी आणि ब व पण येणार का ?

आमच्या कम्यूनिटीतलं तळं १००% गोठल्याने मासे काढायला काही जमले नाही त्यामुळे माश्यांसाठी पुढच्या समरमधल्या गटगपर्यंत थांबावं लागेल.
त्याऐवजी चिकन आणि पाणीपुरी आणतो आहोत ती गोड Wink मानून घ्यावी.

तूप अन फालुदा... चिकन आणि पापु --ऐकायला जरा कसंसंच वाटत आहे बै. पण आणा आणा. आयतं खायला काहीही चालतं आपल्यात!
सिंडे , चमन ल उगीच बर्फ खणायला सांगू नकोस, त्याखाली रेडी असलेली ट्युलिप्स उघडी पडतील थंडीत Happy

एकूण ९ पाकिटं तयार झालीयेत मसाल्याची. प्रत्येकी एक एक घेऊन उरली तर डबल उचला (नवीन बोली (उर्फ ला पि) लावायला पाहिजे खरं तर पण जाऊ द्या.. )

अरे चमन आता चिकन आणतोय? मग मच्छी कोई तो ला रहा है की नाही? भाई? देसाई? और कोई? Proud

पाणीपुरी गोड असेल तर मला नकोय Wink
चमन, तुझ्याकडे माझं तुंबाडचे खोत आहे का? वाचून झालंय का? (तुला हल्ली वाचायला वेळ मिळत नसेलच म्हणा!! ) वरचं तिन्ही 'हो' असल्यास घेऊन येण्याचे करावे. मला परत केलं असशील तर वाचून न वाचल्यासारखे करावे. Proud

गटगसाठी शुभेच्छा ! Happy
बुवा, चीजकेक गाडीतच ठेवलाय म्हणालात. घरी ठेवला तर त्या स्लाईसेसना आधीच गो डाय व्हा ( पोटात ) अशी ऑर्डर सोडाल अशी भिती वाटली की काय ? Proud

बुवा,
मी पण आहे रांएत.
माझं दतेम पाकिट मैत्रेयी कडे द्या ( इतरां पासून वाचवून आधीच द्या :फिदी:)

गटगला शुभेच्छा!!! एन्जॉय Happy

बुवा, माझ्याकरिता आठवणीने एक पाकीट काढून ठेवल्याबद्दल अनेकानेक धन्यवाद!!

मी फर्स्ट. Happy धमाल आली गटगला. Happy सही वाटले सर्वांना भेटुन. बुवांनी माझे वजन खुपच वाकडी वाट करुन दोन्ही वेळा उचलल्या बद्दल त्यांना अनेकानेक धन्यवाद. बाकी डिटेल्स येतीलच.

लोकहो, मी व्यवस्थित घरी पोहोचले.आणि ए.वि.ए.ठी खुपच मस्त झालं. मी नवीन असुन सुध्दा मला अनोळखीपण जाणवल नाही.
पेशल धन्यवाद अनिलभाई, वैद्यबुवा आणि कांदापोहे यांना.... Happy

नेहमीप्रमाणे धम्माल आली! खाण्याचा मेनू सगळाच अप्रतिम. विविध करमणुकीच्या कार्यक्रमांनी वेगवेगळ्या प्रकारे करमणूक केली Proud ओ, अन स्पेशल मेन्शन -भाई अन विनय ने सादर केलेले कौतुक ने लिहिलेले स्किट एकदम मस्त झाले.
नात्या, कापो , आरती , एबाबा अन नक्षी हे प्रथमच आमच्यासारख्या दिग्गज माबोकरांना भेटल्यामुळे ते खास वृत्तान्त लिहिणार आहेत असे कळले. वाट पहात आहे.

Pages