Submitted by समीर on 26 November, 2008 - 15:36
मुंबईत सध्या युद्धजन्य परिस्थीती झाली आहे. ATS चे ४ प्रमुख अधिकारी मारले गेले आहेत. अनेक ठिकाणी गोळीबार, बाँबस्फोट होत आहेत..त्याची चर्चा /माहिती देण्यासाठी हा धागा.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
दिपुरजा तु
दिपुरजा तु फार चान्गलि साइट दिलि आहेस.
याने तरि निधर्मि वाल्यांचे डोळे उघडतिल.
हा आहे मुघलिस्तान चा नकाशा
सध्याचि
मुस्लिम बहुल भागाचे देशातिल पॉकेटस.
मुस्लिम
मुस्लिम बहुल भागाचे देशातिल पॉकेट्स
पश्चिम
पश्चिम बंगाल मधिल वाढति मुस्लिम संख्या
हा आहे
हा आहे वाढता लोक संख्या दर.
जास्त लोक संख्या तोच राजा हे साधे गणित निधर्मि च्या लक्षात येत नाहि
काहि
काहि डोळ्यात अंजन घालणारे वास्तव
बापरे..... आत
बापरे.....

आता हिंदुनाच हिंदुस्थानात अल्पसंख्य म्हणावे लागेल..
************************
अनाम वीरा जिथे जाहला तुझा जीवनांत
स्तंभ तिथे ना कुणी बांधिला पेटली न वात...
************************
अपेक्षेप्
अपेक्षेप्रमाणे मुंबई हल्ल्या नंतर वेगळ्या मूंबई राज्याची मागणी पुन्हा सुरु झाली आहे,मेघनाद देसाई नामक स्तंभलेखकाने इंडीयन एक्सप्रेसमधे हा सुर लावला आहे.त्याच्यामते मुंबईचे प्रश्न सोडवण्यासठी सर्वात आधी तिचे नाव पुन्हा बाँबे करा!
http://www.indianexpress.com/news/statehood-for-bombay/395192/
*************************************************************
द मोअर यु राईट पर्सनल, द मोअर इट बिकम्स युनिवर्सल
इंसानियत
इंसानियत के दुश्मनों...
नन्ही जानों को यतिम बनाके कौनसा करतब दिखाया है
बेकसुरों का खुन बहाके बोलो तुमने क्या पाया है
प्यार बांटने इस दुनिया में तुमको भेजा है खुदाने
जुनून ये नफरत से भरा तुमको कैसे भाया है
लडना है तो आमने सामने सिपाहीयों से लडो तुम
पिठ में खंजर घोपना तुमको कौन से धर्मने सिखाया है
मिटा देंगे पलों मे तुम्हारा नामोनिशां इस धरती से
तुमने हमारी सभ्यता को बरसो आजमाया है
-गणेश भुते
(२६ नोव्हेंबरला मुंबईवर झालेल्या अतिरेकी हल्ल्याबद्दल प्रत्येक माणसाची हिच भावना असेल)
हे आहेत
हे आहेत मुस्लिम बहुल पॉकेट्स
अजुन ५० वर्षानि हिन्दुस्तान राहिल का?
नाहीतरी
नाहीतरी पूर्वी या देशाला भारतवर्ष हे नाव होते. इतरांनी त्याचे नाव हिंदुस्तान केले. आता त्याला मुगलीस्तान म्हणतील. नि आपले राजकारणी लूत भरलेल्या कुत्र्यांसारखे त्या मुसलमानांचे पाय चाटून उरलेल्या सर्व हिंदू संस्कृतिचा नाश करतील. अति पुर्वेकडे पहा. इंडोनेशिया, मलेशिया, थायलँड सर्वत्र सनातन नि वैदिक धर्माचे लोक पसरले होते. तिथल्या लोकांना रामायण, महाभारत माहित आहे! पण आता काय उरले आहे आपले तिथे?
दीपू यांनी दिलेली अविनाश धर्माधिकारी यांची भाषणे ऐकली. पटली. मुख्य म्हणजे आपण काय करावे हे त्यांनी सांगितले आहे, व स्वतः तसे करायला सुरुवात केली आहे. पण मला अजूनहि शंका आहे कि गेंड्याची कातडी असलेले आपले राजकारणी व त्यांच्या तालावर नाचणारे अनेक सरकारी अधिकारी, पोलीस इ. त्याकडे लक्ष देतील का?
माफ करा. तरुण लोकांइतका उत्साह, आशावाद आता राहिला नाही. त्यांच्या भाषणातून या राजकारण्यांच्या नालायकपणाची इतकी वर्णने ऐकतो, की ते म्हणतात त्याच्या एक शतांशतरी सुधारणा होतील की नाही याची शंका वाटते.
आज इसकाळला
आज इसकाळला कासबचा कबुलीजबाब आला आहे.दहशतवादी हल्ल्याचा कट कसा शिजला ते सगळ सांगितल आहे.
----------------------
सरणार कधी रण प्रभू तरी, हे कुठवर साहू घाव शिरी|| दिसू लागले अभ्र सभोती, विदीर्ण झाली जरी ही छाती, अजून जळते आंतर ज्योती, कसा सावरु देह परी || होय तनूची केवळ चाळण , प्राण उडाया बघती त्यातून, मिटण्या झाले अधीर लोचन, खङग गळाले भूमीवरी
हा
हा कबुलीजबाब परिपूर्ण वाटत नाही.एक तर तो फार सरळ सोट आहे.कसाबच्या शिक्षणाच्या मानाने गुगल अर्थ वगैरे त्याला समजणे मनोरंजक आहे. त्यातल्या बर्याच गोष्टी प्रसिद्धीमाध्यमाना दिलेल्या दिसत नाहीत. कालच केन्द्रीय गृहसचिवानी कसाबचा कबुली जबाब बाहेर कसा येतो म्हणून मुम्बई पोलीसाना फटकारले होते. तरीही त्यातेल अंश बाहेर येताहेत म्हनजे काही उद्देश ठेवूनच ते बाहेर प्रसृत केले जात असावेत. बहुधा पाकिस्तानी घटकांचा यात सहभाग आहे असे प्रोजेक्ट करण्यासाठी.
या गडबडीत एक तरुण पकडला होता तो बांगला देशातला असून त्याला चांगले इन्ग्लिश येत होते व तो नन्तर लाहोरला होता असेही प्रसिद्ध झाले होते. तो म्हणजेच कसाब काय? कसाब चे फक्त प्राथमिक शिक्षणच झालेले दिसते.
कसाबचे वकीलपत्र कोणी घेत नाही ही बाब गम्भीर आहे...प्रोसिजरप्रमाणे त्याला न्यायालयीन मदत मिळणे आवश्यक आहे.
---------हितगुज दॅट इ़ज....
पंडितसे मिले पंडित, हो जाय दो दो बातें..
गधेसे मिले गधा, हो जाय दो दो लातें.....
>>> कसाबचे
>>> कसाबचे वकीलपत्र कोणी घेत नाही ही बाब गम्भीर आहे...प्रोसिजरप्रमाणे त्याला न्यायालयीन मदत मिळणे आवश्यक आहे.
अजिबात काळजी करू नका. थोडे दिवस थांबा. नंतर नंदिता हक्सर, मजीद मेमन वगैरे हुशार वकील मंडळी स्वतःहून त्याचे वकीलपत्र घ्यायला पुढे येतील.
आपल्या वकिली कौशल्याने त्याला सोडविता आले तर दुधात साखर.
समजा त्याला शिक्षा झाली तर, "त्याच्यावर अन्याय झाला आहे", "त्याचा खटला योग्य पद्धतीने चालविला गेला नाही. सबब, मानवतेच्या दृष्टीकोनातून त्याच्यावरचे सर्व खटले रद्द करून त्याला पुन्हा एकदा बचावाची संधी द्यावी.", अशा (अ)मानवी हक्कवाल्यांच्या आरोळ्या सुरू होतील.
अरूंधती रॉय, तिस्ता सेटलवाड यांसारखे मानवतावादी, "या अतिरेकी हल्ल्याची योजना नरेंद्र मोदी, अडवाणी व संघ परिवाराने तयार केली होती. संघाच्या हिंदू अतिरेक्यांनी हा हल्ला केलेला होता. भारतात प्रचंड अत्याचार सहन करणार्या गरीब मुसलमानांना बदनाम करण्यासाठी हा बनाव रचण्यात आलेला आहे." असा (अप)प्रचार "लोकसत्ता", "हिंदू" इ. दैनिकातून सुरू करतील.
कुमार केतकर लगेचच "लोकसत्ता"च्या पहिल्या पानावर अग्रलेखांची मालिका लिहून, "या आरोपात बरचसे तथ्य आहे. हिंदू अतिरेक्यांचा या हल्ल्यामधील हात बर्याच प्रमाणात सिद्ध होण्यासारखा आहे. या आरोपांची चौकशी झालीच पाहिजे. तो पर्यंत कसाबला शिक्षा न देता जामिनावर सोडावे." अश्या मागण्या करतील.
असे अनेक अग्रलेख लिहून काही दिवसानंतर हे सर्व आरोप सिद्ध झालेलेच आहेत हे गृहित धरून, केतकर पुन्हा एकदा नवीन अग्रलेखांची मालिका लिहून संघ परिवाराला झोडपून काढतील.
अफजल गुरू प्रमाणे कसाब भारतीयांच्या मूर्खपणावर हसत तुरूंगात मजेत दिवस काढेल. काहि दिवसांनी पाकिस्तानी अतिरेकी एखादे विमान पळवून त्याची सुटका करून घेतील.
तेव्हा तुम्ही कसाबची अजिबात काळजी करू नका. फक्त काहि महिन्यांचा तर प्रश्न आहे.
किंवा आपण
किंवा आपण सारी भारतीय जनता आहोतच ना या लोकांना आरामात पोसायला. या हल्ल्याच्या पाउलखुणा आता फिकट होत चालल्याच आहेत तोपर्यंत दुसरी अतिरेक्यांची फळी तयार होतच असेल.
कसाबाने
कसाबाने २०० मुडदे पाडले हि बाब गंभिर कि त्याला वकिल मिळत नाहि हि बाब गंभिर
तेव्हा
तेव्हा तुम्ही कसाबची अजिबात काळजी करू नका. फक्त काहि महिन्यांचा तर प्रश्न आहे.
मी कसाबची काळजी करण्याचा प्रश्न नाही. अफझल गुरूच्या केसमध्येही हाच लोच्या झाला आहे .अफझल गुरुला वकील न मिळाल्यामुळे त्याची केस एक्स पार्टे डिसाईड झाली अशी हाकाटी उठली. तुम्ही देश म्हणून एका आंतरराष्त्रीय समुदायात राहात आहात. तुमच्या न्यायव्यवस्थेच्या आंतरराष्ट्रीय प्रतिमेवर बर्याच गोष्टी अवलम्बून असतात. आता हे बघा भारतात फाशीची क्रूर शिक्षा आस्तित्वात असल्याने बरेच देश आपल्याशी गुन्हेगारांच्या देवाण घेवाणीचा करार करीत नाहीत. मग ही मंडळी नेमकी त्याच देशात आश्रय घेतात. मग आपण त्यांची मागणी करतो . मग ऐनवेळेला समजते आपला आणि त्या देशाचा गुन्हेगार हस्तांतरनाचा करारच नाही . मग का झाला नाही हे पाहताना तो होणे शक्यही नाही हेलक्षात येते कारण त्या देशाच्या असल्या अटी. त्यामुळे बहुधा केदार जोशींनी की कोणी म्हटल्याप्रमाने भारत इतर देशाना फाट्यावर मारण्याइतका राजकीय, आर्थिक्,दृष्ट्या बलवान नाही आहे. त्यामुळे जगाच्या मताची कदर करणे आवश्यकच असते... तुम्हाला ह्या दहशत्वादाच्या इश्यूवर आंतरराश्ट्रीय पाठिम्ब्याचीही गरज आहे. त्यामुळे भारतात फ्री आणि फेअर ट्रायल्स चालतात. The accused is to be given full opportunity to state his case. This is responsibility is rested on judiciary.नाझी जर्मनीत जशा 'ठरवून' ट्रायल्स झाल्या तशा भारतात होत नाहीत हे चित्र उभे राहने फार आवश्यक आहे नाहीतर मेरिटवर दोषी ठरूनही हे सगळे 'मॅनेज्ड' होते अहे जागतिक लोकमत होता कामा नये. त्याला वकील न मिळू न देणे हा ह्या' मॅनेजमेन्ट्चा' भाग आहे असे चित्र उभे रहता कामा नये एवढेच मला म्हनायचे आहे. दुर्दैवाने असे म्हणणार्यात पाकिस्ताना पेक्षा भारतातले लोक पुढे असतात त्यांची नावे तुम्ही वर दिलीच आहेत. त्याना यामुळे पुन्हा संधी मिळेल असे तुम्हाला वाटत नाही का? दुर्दैवाने या लोकांचीच स्टेटमेन्ट्स आंतरराष्ट्रीय मिडियात 'बघा आमचे नाही भारतीयांचच हे म्हनने आहे म्हणून उद्धृत केले जाते. विदाऊट कॉमेन्ट म्हणून.
अरुंधती रॉयने अफझल गुरुचा खटला बचावाची संधी मिळाली नाही म्हणून परत चालवावा अशी मागणी केली आहे.
आणि मेधा पाटकर इथे सर्वांच्या आवडीच्या असतील. पाटकरांची आणि अरुंधती रॉयची एकच गॅन्ग आहे.भारत विरोधी.ही बाई भारताबाहेर सुझाना रॉय नाव लावते आणि सही करते.
आता ह्या प्रकरणात नवी 'लाईन' निर्माण केली जात आहे. ती म्हणजे सी एस टी मध्ये कसाबने माणसे मारलीच नाहीत ,. स्टार पोलीस अधिकार्यानाही 'कसाबने' मारलेलेच नाही. आश्चर्य वाटले ना ? मग कोणी मारली ही माणसे?
अहो ही त्याच्या बरोबर असलेल्या आणि गिरगावला मारल्या गेलेल्या दुसर्या 'इस्माईल' नावाच्या माणसाने मारली !! तो तर आता मेला. कायद्याच्या गुंतागुंती अचाट असतात अन त्या लक्षात घेऊन परिश्रम्पूर्वक आपली केस स्टॅन्ड करावी लागते. कसाबने ही माणसे मारली हे त्याचा युक्तीवाद लक्षात घेऊन तो खोडून काढून न्यायालयात सिद्ध करणे फार गरजेचे आणि आव्हानाचे (आणि आता अवघडही)काम आहे. म्हणून जास्तीत जास्त अतिरेकी जिवन्त पकडले जाणे आवश्यक असते. त्यामुळे कटाचाही उलगडा होतो. तो जगापुढे मांडताही येतो. कसाबला शिक्षा देण्यापुरतीच ही केस मर्यादित असती तर पोलीसाना त्याचे एन्काऊन्टर नसते का करता आले?
नाही तर आहेतच नेहमीची कलमे अनधिकृत रित्या शस्त्रे बाळगणे, अन बिन पासपोर्टाचे इथे येणे इत्यादि.
आता कबुलीजबाबाबाबत म्हनायचे असेल तर पोलीसांपुढे दिलेला कबुली जबाब न्यायालयात नाकारल्यास अग्राह्य मानला जातो हे साधे कायद्याचे तत्व इथल्या 'विद्वान' लोकांना माहीत असेलच असे मी मानतो. त्यामुळे कसाबने जबाब दिला आता सगळे सरळ झाले असे नाही.
त्यामुळे भावनाविवश होऊ नका. बुद्धिबलासारखे समोरच्या पक्षाच्या संभाव्य चालींचा अंदाज घेऊन आपली व्यूहरचना असणे आवश्यक आहे. सुदैवाने ह्या प्रकरणाचा तपास मायबोलीवरील विद्वानांकडे नसून योग्य त्या धोरणी माणसांकडे आहे हे नशीब !!!
---------हितगुज दॅट इ़ज....
पंडितसे मिले पंडित, हो जाय दो दो बातें..
गधेसे मिले गधा, हो जाय दो दो लातें.....
अहो ही
अहो ही त्याच्या बरोबर असलेल्या आणि गिरगावला मारल्या गेलेल्या दुसर्या 'इस्माईल' नावाच्या माणसाने मारली !!
--- टोणगा यांची वरची पोस्ट अगदीच प्रकाश पाडणारी. मागचा अनुभव गाठीस धरुन शिका.... पुन्हा तसलीच चुक करु नका. त्याला पुर्ण न्याय मिळायला हवा हे जगाला दिसायलाच हवे... प्रसंगी सरकारने वकील पुरवावा जेणेकरुन नंतर काहीही संदिग्धता रहायला नको. किंबहुना तशी ती संदिग्धता रहावी अशाच प्रकारे आपण खेळ खेळतो आहे (खेळवला जातो आहे). आता कसाब म्हणतो आहे मी ३ अधिकार्यांना मारलेच नाही, मग काय फक्त बघ्याची भुमिका निभावायला आला होता? की त्या 'इस्माईल' ला गुन्ह्यापासुन परावृत्त करायला आला होता.
आज कसाब तुरुंगात आहे, त्याला तेथे कोण मार्गदर्शन करतो आहे? मला नाही वाटत अशी काही आधिपासूनची व्युह रचना होती. तो अशिक्षीत जरुर असेल पण एक नक्की तो तपासणी अधिकार्यांची दिशाभुल कराण्यात पटाईत आहे. त्याने CST ला ठेवलेला बाँब चा स्फोट झाला नाही, पण ४-५ दिवस अटक झाल्या नंतरही त्याने ही बातमी ओठातून बाहेर नाही काढली. आता हा खुप हुशार असेल, किंवा आपले तपासणी अधिकारी अशा माणसांना हाताळायला तयार केले गेले नसावेत.
कसाबने
कसाबने त्याच्या ट्रेनिंग शेड्यूलची माहिती देतानाच पोलीसांची दिशाभूल कशी करायची याचे त्रेनिंग दिल्याचे म्हटलेच आहे. कसाबचे म्हणणे स्वतंत्ररीत्या कॉरो बॉरेट करण्यासाठी आणखी एखादा तरी अतिरेकी जिवन्त सापडणे आवश्यक होते असे मला वाटत्ते . त्याची नार्कोही करायची आहे म्हणे. हे सगळे पुरावे इव्हिडन्स ऍक्ट नुसार कॉरोबॉरोटीव्ह एव्हिडन्स म्हणून मानले जातात. कन्क्लूजिव्ह नाही. अर्थात कसाबला किती अतिरेकी मेले अन किती सापडले हे माहिती नसणार त्यामुळे त्याच्यावरचा दबाव वाढविणे शक्य आहे...(आम्हाला दुसर्याने असे सांगितले आहे वगैरे......)मोक्काही असेलच बहुधा. कायद्याची कलमे व शिक्षा जेवढी कडक तेवढी वस्तुनिष्ठ पुराव्याची मागणी अधिक. तिथे स्पेक्युलेशनला वाव नाही. म्हणून तर पोलीस हुन्डाबळीच्या केसपेक्शा छळाच्या केसचा अधिक आग्रह धरतात. असो. तो विषय वेगळा.आरोपीला वकीलाची मदत मिळवून देणे प्रोसिजरचा भाग आहे. आपल्याकडे गरीब पक्षकाराला मोफत कायदा सहाय्य देण्याचे नियम आहेत आणि यंत्रनाही आहे. अर्थात त्याची याची तुलना नसली तरी फिर्यादी आरोपी कोर्ट हा सेट अप तर तोच आहे ना. आजच येका वकीलाने सनद गेली तरी हरकत नाही पण केस घेणार नाही .असे स्टेटमेन्ट दिले आहे.आरोपीने स्वत; वकील नाकारला तर भाग वेगळा. अनेकदा वकील नाकारून आरोपी स्वतः केस लढवल्याची उदाहरणे कमी नाहीत...
(असो त्यात शिरू नये . मंजुश्री सारडा हुंडाबळीच्या खटल्याचा विषय काढला तर इथे अनेकांच्या नाकाला मिरच्या झोम्बतील )---------हितगुज दॅट इ़ज....
पंडितसे मिले पंडित, हो जाय दो दो बातें..
गधेसे मिले गधा, हो जाय दो दो लातें.....
टोणग्यानी
टोणग्यानी शेवटच्या दोन पोस्ट्स चांगल्या लिहिलेल्या आहेत.
तो कबुलीजबाब पुर्ण नाही हे नक्की.माझ्यामते त्या कबुलीजबाबात या स्थळांची पहाणी कधी केली वगैरे काहीही लिहिलेले नाहीये.फक्त गुगल अर्थ आणि नकाशे यांच्यावर इतका धुमाकुळ घालता येईल हे शक्य वाटत नाही.दुसर म्हणजे कसाबला हे सांगितल आहे की त्याचे इतर काही साथीदारही जिवंत पकडले गेलेले आहेत.शिवाय त्याने जरी दिशाभुल करण्याचे ट्रेनिंग घेतले आहे तरीही पोलिसांनाही गुन्हेगारांकडुन सत्य उगळवुन घेण्याची चांगलीच सवय आहे.राकेश मारीयाच ही केसपण बघत आहेत्.त्यांनी म्हटलय की कसाबला जरी दिड वर्षाच ट्रेनिंग मिळालय तरीही आम्हालाही इंटरोगेशनचा २७ वर्षाचा अनुभव आणि ३ वर्षाच ट्रेनिंग आहे.आता सध्या भारताने पाकवर दबाव आणायला हवा.बाकी दहशतवादी हिंदुच होते अशी काँट्रोव्हर्सी थिअरी पाकीस्तानात खुप हिट झालेली आहे.
----------------------
सरणार कधी रण प्रभू तरी, हे कुठवर साहू घाव शिरी|| दिसू लागले अभ्र सभोती, विदीर्ण झाली जरी ही छाती, अजून जळते आंतर ज्योती, कसा सावरु देह परी || होय तनूची केवळ चाळण , प्राण उडाया बघती त्यातून, मिटण्या झाले अधीर लोचन, खङग गळाले भूमीवरी
सतीश
सतीश माढेकर, तुम्ही माझ्यासारख्या म्हातार्या माणसा प्रमाणे निराश का होता? अहो तुम्हा तरुण मंडळींनी आशावाद बाळगून असले पाहिजे. जरा अविनाश धर्माधिकारी यांची भाषणे ऐका. मलाहि उत्साह आला, पण अनुभव वेगळाच आहे.
भारत इतर देशाना फाट्यावर मारण्याइतका राजकीय, आर्थिक्,दृष्ट्या बलवान नाही आहे. त्यामुळे जगाच्या मताची कदर करणे आवश्यकच असते...
हे सत्य आहे, आणि त्याहिपेक्षा हे सत्य आहे हेच आपले दुर्दैव आहे. जरी जगाचा पाठिंबा मिळाला, तरी आपलेच लोक युद्धाला विरोध करतील, अगदी पंचमस्तंभी कारवाया करायला मागेपुढे पहाणार नाहीत! शिवाय युद्धापेक्षा '३३ टक्के भुकेल्या जनतेला अन्न पुरवणे महत्वाचे नाही का?' असले प्रश्न विचारणारे लोकहि असतील.
मला नाही वाटत, कसाबचे पुढे काही होईल. तो सुटेलसुद्धा! "त्याने 'एकहि' माणूस मारलेला नाही, तो हल्लेखोरांच्यात नव्हताच, पोलीसांच्या दडपणाखाली त्याने तसे सांगितले!" असले सगळे दावे केले जातील. काही दिवसांनी लोक विसरतील. मग त्याला जरी तुरुंगात टाकले तरी एखादे विमान पळवून नेले की झाले. तो नि अफझल सुटले!!
>>> अफझल
>>> अफझल गुरुला वकील न मिळाल्यामुळे त्याची केस एक्स पार्टे डिसाईड झाली अशी हाकाटी उठली.
त्याने स्वत:च वकील नाकारला होता व स्वतःचा बचाव स्वतःच केला होता.
>>> सुदैवाने ह्या प्रकरणाचा तपास मायबोलीवरील विद्वानांकडे नसून योग्य त्या धोरणी माणसांकडे आहे हे नशीब !!!
हे मात्र अगदी खरे बोलतात. मायबोलीवर अफजलचे अनेक सहानुभूतिदार आहेत. त्यांच्याकडे हा तपास असता तर अफजल व कसाबला एव्हाना "भारतरत्न" हा सन्मान मिळाला असता.
आरे
आरे एक्मेकाना शिव्या द्यायच॑ आता था॑बवा. ज्या राजकर्त्याच्या कालात अशी घटना घडेल, त्या॑नी नुस्ता राजिनामा न देता राजकारणाला पूर्ण विराम द्यायला हवा, या बेरकी पूढार्या॑ना याशिवाय दुसरा काहीच ऊपाय नाही अस॑ मला वाटत॑. निदान सत्तेच्या ह्व्यासापोटि तरि आप्ल्याला काहि सुविधा मिळतील????????
आपणाला काय वाटत॑?
म॑ड्ळ आपल॑ आभारि आहे.
टोनग्या
टोनग्या चांगले पोस्ट. शह आणी काटशह ह्याचा आधीच विचार व्हायला हवा आणि ते आपली राजकारणी करतील अशी भाबडी आशा. ४८ साला सारखे परत नको व्हायला.
नुस्ता राजिनामा न देता राजकारणाला पूर्ण विराम द्यायला हवा >>>
मग राज्य कोण करनार? ह्या प्रश्नाल उत्तर सापडतं नाही ना?
त्यांना आपण शिव्या देतोय पण देउन तिथेच थांबतोय. त्या पुढचे पाउल राजकारणात उतरने. तेच पाउल उचलायला सर्वजन डळमळतात.
अफझल गुरुला वकील न मिळाल्यामुळे त्याची केस एक्स पार्टे डिसाईड झाली अशी हाकाटी उठली >>> माढेकर, तूम्ही वाक्य निट वाचल नाहीत. आता टोणगाही 'हाकाटी उठली' हे म्हणतोय. त्याचा जुन्या पोस्ट मध्ये असे त्याने लिहीले न्हवते. ह्या बदलाचे माझ्या तर्फे स्वागत.
अफझल गुरु ने वकिल नाकारला होता हे सत्यही काही दिवसात झाकले जाणार बहुदा.
एकंदरीतच ह्या आगीचे राखेत रुपातंर व्हायला सुरु झाले आहे. मला नाही वाटत आपण आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रश्न निट हाताळला. आपल्या पेक्षा पाक सध्या चांगल्या रितीने हातळतोय हा प्रश्न. (स्वतःच्या व पर्यायाने अतिरेक्यांचा भल्याकरता).
सुदैवाने
सुदैवाने ह्या प्रकरणाचा तपास मायबोलीवरील विद्वानांकडे नसून योग्य त्या धोरणी माणसांकडे आहे हे नशीब !!! >>
पण तपासात काय जे हाती लागेल ते जाहिर करुन त्याचा उपयोग करुन घ्यायचा की नाही हे शेवटी तपास करणार्यांच्या हातात नाही.
हे तर आश्च्रर्यच आहे की फक्त गुगल च्या मदतीने त्यांनी एव्हडे धाडस केले. त्याचा कबुली जबाब किती खरा किती खोटा हा प्रश्णच आहे पण त्यालाही अतिरेकी संघटनांनी फसवले असण्याची शक्यता आहे. त्यामुळे चिडुन तो खरी माहीती उघड करेल अशी आशा आपण करु शकतो का ?
<< त्यांना आपण शिव्या देतोय पण देउन तिथेच थांबतोय. त्या पुढचे पाउल राजकारणात उतरने. तेच पाउल उचलायला सर्वजन डळमळतात. >>
एकदम बरोबर केदार, सगळेच डळमळतात.
त्यामुळे
त्यामुळे चिडुन तो खरी माहीती उघड करेल अशी आशा आपण करु शकतो का ?
>>>>
बहुधा नाही. आता त्याला चिडण्याचे स्वातंत्र्य नाही. इकडे तोंड उघडल्यावर तिकडे त्याच्या नातेवाईकाना त्रास होऊ शकतो...याची त्याला कल्पना दिलेली असणारच.
---------हितगुज दॅट इ़ज....
पंडितसे मिले पंडित, हो जाय दो दो बातें..
गधेसे मिले गधा, हो जाय दो दो लातें.....
हे तर
हे तर आश्च्रर्यच आहे की फक्त गुगल च्या मदतीने त्यांनी एव्हडे धाडस केले.
मला तर यावर अजिबात विश्वास नाहीये.त्यांनी तो भाग पुर्वीही पाहिला असणारच.
----------------------
सरणार कधी रण प्रभू तरी, हे कुठवर साहू घाव शिरी|| दिसू लागले अभ्र सभोती, विदीर्ण झाली जरी ही छाती, अजून जळते आंतर ज्योती, कसा सावरु देह परी || होय तनूची केवळ चाळण , प्राण उडाया बघती त्यातून, मिटण्या झाले अधीर लोचन, खङग गळाले भूमीवरी
http://www.rediff.com/news/20
http://www.rediff.com/news/2008/dec/08mumterror-are-we-heading-to-being-...
सुझेन अरुंधती रॉयचा लेख
http://www.outlookindia.com/full.asp?fodname=20081222&fname=ARoy+%28F%29...
तिथे सुझेन
तिथे सुझेन कुठे आहे? ते फक्त भारता बाहेर. त्या वैश्विक नागरिक असून त्याना एका प्रकरणात भारतीय असल्याची लाजही वाटली होती म्हणे.
एनी वे, ह्या लेखात त्याना काय म्हणायचे आहे हे मला कळेल का कोणाकडून?
पाटकरणीने अजून अतिरेकी हल्ल्याबाबत तोंड उघडलेले दिसत नाही...
---------हितगुज दॅट इ़ज....
पंडितसे मिले पंडित, हो जाय दो दो बातें..
गधेसे मिले गधा, हो जाय दो दो लातें.....
अफझल गुरु
अफझल गुरु ने वकिल नाकारला होता हे सत्यही काही दिवसात झाकले जाणार बहुदा.
अफझल ने वकील नाकारला नव्हता.
अफझल चे वकिल पत्र घेण्याचा इरादा राम जेठमलानी यानी दाखविताच शिवसेनेने त्यान्च्या
कार्यालयावर हल्ला केला होता. आताही कस्सब चे वकिलपत्र कुणी घेता कामा नये असली टूम
निघाली आहे. असा रडीचा डाव खेळण्यात काय अर्थ आहे?
कसाबला वकिल मिळू न देणे हे एका अर्थाने कसाब विरुद्ध आमच्याकडे भक्कम पुरावा नाही हे कबूल करण्यासारखे आहे.
कसाबला सरकारी खर्चाने निश्णात वकिल देवून त्याला आपल्या बचावाची पुर्ण सन्धी देवून मग जाहिरपणे फाशी देणे योग्य ठरेल.
Pages