मुंबईवर अतिरेकी हल्ला

Submitted by समीर on 26 November, 2008 - 15:36

मुंबईत सध्या युद्धजन्य परिस्थीती झाली आहे. ATS चे ४ प्रमुख अधिकारी मारले गेले आहेत. अनेक ठिकाणी गोळीबार, बाँबस्फोट होत आहेत..त्याची चर्चा /माहिती देण्यासाठी हा धागा.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पा॑र॑पारिक पेसेखाऊ, कामचोर, जबाबदारि झटकणारया, फालतु, खतरूड नेत्या॑ना हटवून आता किरण बेदी सारख्या कर्तबगार लोका॑नी पुडे यावे कि॑बहूना आपणच त्या॑ना पुडे आणावे. देशासाठई असलेली तिची तळमळ प्रत्येक वाक्यातून जाणवते.

एकुण दहा होते त्यापैकि ९ मारले आणि एकाला पकडले.
---- नक्की किती अतिरेकी भारतात आले होते हे त्यांच्या जन्मदात्यांनाच (आय एस आय) माहिती असणार.

नक्कीच अजुनही काहीजण मोकळे फिरत असणार्
---- शंकाच नाही (भारतात/ बाहेर), संधीची वाटच पहात असणार. आजच CNN वर एकले आहे की असे बरेच लोकं पाकच्या सेनेने तयार केलेले आहेत. आपले हेरखाते, सुरक्षा दले, त्यांना असलेल्या सुविधा, नेत्यांकडे असलेली (अ)दुरदृष्टी पाहिल्यावर प्रश्न हो(णार) किंवा नाही (होणार) याचा नाहीच आहे तर पुढे कधी आणि कोठे?

पाक मीडीया चा का॑गावा पाहीलात ना?? सारे पाकिस्तानी आपल्याला पाण्यात पाह्तात यात काही श॑काच नाही.

लाजो,

तुमची पोस्ट वाचून अंगावर एकदम काटा आला.. Sad

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
नयी तहज़ीब में दिक़्क़त ज़ियादा तो नहीं है I
मज़ाहिब रहते हैं क़ायम, फक़त ईमान जाता है II
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

पाकीस्तानी लोकांना पुरावा हवा आहे की अतिरेकी हे पाकिस्तानमधील होते. आपल्याकडे जो एक जिवंत अतिरेकी आहे त्याची मुलाखत CNN वर का नाही दाखवत ही मिडीयावाली लोकं. तो तर कबुल करतो आहे की तो पाकिस्तानामधील आहे. मग आणखी काय पुरावा हवा आहे? म्हणजे त्याचे म्हणणे खरे आहे याला देखील आणखी एक पुरावा हवा आहे आणि मग जो कुणी पुरावा देईल त्यालाही ही लोक पुरावे मागतील.

आणि जे अतिरेकी लोकं मारल्या गेलेत, त्याचे छायाचित्र सर्व वर्तमानपत्रात आणि TV channels वर प्रसिद्ध केलेत तर त्यांना ओळखू शकणारे त्यांच्या देशात असतीलच ना. इतकं साध सरळ काम का नाही करत ही लोकं!

अरे एक जिवंत अतिरेकी तुम्हाला सापडला तुमच्या हातात त्याचा तुम्ही वापर करून खूप काही माहिती काढू शकता. त्याला आम्ही मारू फासावर चढवू असे जर केले तर तुम्ही तुमच्या हातातील एक चांगला पुरावा नष्ट करून टाकणार आहात. त्याला उलट कडेकोट ठेवून त्याच्याकडून खोदूनखोदून माहिती मिळवायला हवी. जिवाच्या भितीनी तो माहिती नक्की सांगेल. दुसरे असे की त्या अतिरेक्याला मारायला बरेच जण टपले असतील कारण तो सर्व भेद जगासमोर आणू शकेल. सिनेमात जसे दाखवतात की पुरावा देणार्‍यांना कसे मारून टाकले जाते, तसे या अतिरेक्यासोबत होऊ नये म्हणून भारताने सतर्क रहावयास हवे.

असं वाटतं मीच त्याची मुलाखत घ्यावी. माझ्या डोक्यात अनेक प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.

>>असं वाटतं मीच त्याची मुलाखत घ्यावी. माझ्या डोक्यात अनेक प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.
बी ही idea भारी आहे... तुझ्या प्रश्णांन्ना तो अधिक घाबरेल अन पोपटासारखा बोलेल यात शंका नाही..:)
~d

बी - कारगील युद्धात पाकने नॉर्दन लाईट इंफ्रंट्री चे जवान भारतात घुसवले होते. जे पाकचे सैनीक मारल्या गेले, त्यांना भारताने परत करण्याची तयारी दाखवली होती. 'हे आमचे सैनीकच नाही' असे म्हणुन पाकने स्विकारायला नकार दिला होता. मग भारतीय सैनीकांनीच शेवटचे सोपस्कार केलेत.

जिवाच्या भितीनी तो माहिती नक्की सांगेल.
--- जिवाची भिती तुम्हा अम्हाला. आपण जगण्यावर प्रेम करतो, हे मरणावर प्रेम करतात (हिच त्यांची मजबुत बाजू आणि म्हणुन खुप धोकादायक), हे अतिरेकी म्हणजे डोक्यातील मेंदु काढलेली जमात आहे. आता हाल-अपेष्टा यांना एखादे वेळी बधेल.

बी पण या जिहाद्यांना असं ही प्रशिक्षण दिलेलं असतं की, प्राण गेला तरी तोंड उघडायचं नाही... Sad

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
नयी तहज़ीब में दिक़्क़त ज़ियादा तो नहीं है I
मज़ाहिब रहते हैं क़ायम, फक़त ईमान जाता है II
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

नाही तो आता बोलतो आहे. तो शुद्धीवर आल्या आल्या म्हणाला मला सलाईन लावा.. मला जगायचं आहे. तो देखील मरणारा भितो आहे. मला वाटतं, पकडल्या गेल्यावर भारतातील पोलिसांना काय उत्तर द्यायचे याचेही त्यांनी प्रशिक्षण घेतले असावे. त्यामुळे त्याच्या उत्तरावर एकदम विश्वास ठेवणेही चुकीचेच आहे. तो मुलगा फक्त २१ चा आहे. म्हणजे अजून बराच अजाण आहे. पैशापायी त्यानी हे कृत्य केले असेल. नक्कीच तो जिवाला घाबरून बोलेल.

आपले सगळे नेते इतके दीन वाटतात ना.. की त्यांना नेते म्हणावे याचीही लाज वाटते. मनमोहनसिंग तर काय कुजबुजल्या सारखे बोलतो त्यालाच माहिती. नेता आणि त्याला आवाज नाही = wrong equation indeed!!!!!

जर तो बोलत असेल तर आता भारताची दिशाभूल नक्की.. Sad

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
नयी तहज़ीब में दिक़्क़त ज़ियादा तो नहीं है I
मज़ाहिब रहते हैं क़ायम, फक़त ईमान जाता है II
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

मंडळी, जेजे, जिटी आणी सेंट जॉर्ज ह्या हॉस्पिटलच्या डॉक्टरनी अपिल केले आहे की रुग्णांसाठी बिस्किटे आणी फळे यांची आवश्यकता आहे. हॉस्पिटल्स या गोष्टी पुरवु शकत नाही. आपल्या पैकी कुणाला जर हे शक्य होणार असेल तर ईथे नमुद करा. मी आणी amitad तिथे जाण्याचा विचार करतो आहोत. जर कुणी distributor ओळखिचा असेल तर त्याच्याशी बोलुन बघा. धन्यवाद.

J J Hospital .. Dr. Jaidev - 23735555

St George Hospital .. Dr. Ashok Shinde - 9869050622

GT Hospital .. 22630553

मला आलेली एक मेल :-

LETTER TO PRIME MINISTER

Dear Mr. Prime minister

I am a typical mouse from Mumbai. In the local train compartment which has
capacity of 100 persons, I travel with 500 more mouse. Mouse at least
squeak but we don't even do that.

Today I heard your speech. In which you said 'NO BODY WOULD BE SPARED'. I
would like to remind you that fourteen years has passed since serial bomb
blast in Mumbai took place. Dawood was the main conspirator. Till today he
is not caught. All our bolywood actors, our builders, our Gutka king meets
him but your Government can not catch him. Reason is simple; all your
ministers are hand in glove with him. If any attempt is made to catch him
everybody will be exposed. Your statement 'NOBODY WOULD BE SPARED' is
nothing but a cruel joke on this unfortunate people of India.

Enough is enough. As such after seeing terrorist attack carried out by
about a dozen young boys I realize that if same thing continues days are
not away when terrorist will attack by air, destroy our nuclear reactor and
there will be one more Hiroshima.

We the people are left with only one mantra. Womb to Bomb to Tomb. You
promised Mumbaikar Shanghai what you have given us is Jalianwala Baug.

Today only your home minister resigned. What took you so long to kick out
this joker? Only reason was that he was loyal to Gandhi family. Loyalty to
Gandhi family is more important than blood of innocent people, isn't it?

I am born and bought up in Mumbai for last fifty eight years. Believe me
corruption in Maharashtra is worse than that in Bihar. Look at all the
politician, Sharad Pawar, Chagan Bhujbal, Narayan Rane, Bal Thackray ,
Gopinath Munde, Raj Thackray, Vilasrao Deshmukh all are rolling in money.
Vilasrao Deshmukh is one of the worst Chief minister I have seen. His only
business is to increase the FSI every other day, make money and send it to
Delhi so Congress can fight next election. Now the clown has found new way
and will increase FSI for fisherman so they can build concrete house right
on sea shore. Next time terrorist can comfortably live in those house ,
enjoy the beauty of sea and then attack the Mumbai at their will.

Recently I had to purchase house in Mumbai. I met about two dozen builders.
Everybody wanted about 30% in black. A common person like me knows this and
with all your intelligent agency & CBI you and your finance minister are
not aware of it. Where all the black money goes? To the underworld isn't
it? Our politicians take help of these goondas to vacate people by force. I
myself was victim of it. If you have time please come to me, I will tell
you everything.

If this has been land of fools, idiots then I would not have ever cared to
write you this letter. Just see the tragedy, on one side we are reaching
moon, people are so intelligent and on other side you politician has
converted nectar into deadly poison. I am everything Hindu, Muslim,
Christian, Schedule caste, OBC, Muslim OBC, Christian Schedule caste,
Creamy Schedule caste only what I am not is INDIAN. You politician have
raped every part of mother India by your policy of divide and rule.

Take example of former president Abdul Kalam. Such a intelligent person,
such a fine human being. You politician didn't even spare him. Your party
along with opposition joined the hands, because politician feels they are
supreme and there is no place for good person.

Dear Mr Prime minister you are one of the most intelligent person, most
learned person. Just wake up, be a real SARDAR. First and foremost expose
all selfish politician. Ask Swiss bank to give name of all Indian account
holder. Give reins of CBI to independent agency. Let them find wolf among
us. There will be political upheaval but that will better than dance of
death which we are witnessing every day. Just give us ambient where we can
work honestly and without fear. Let there be rule of law. Everything else
will be taken care of.

Choice is yours Mr. Prime Minister. Do you want to be lead by one person or
you want to lead the nation of 100 Crore people?

Prakash B. Bajaj

Chandralok 'A" Wing, Flat No 104

97 Nepean Sea Road

Mumbai 400 036

Phone 98210-71194

PLEASE READ N FORWARD AS MANY PEOPLE IN YOUR CONTACT LIST

केवळ दिड लाखांसाठी हे १० जण जिवावर उदार झाले म्हणे.

तरूण मुलांना भडकवणं सहजशक्य असतं म्हणून... Sad

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
नयी तहज़ीब में दिक़्क़त ज़ियादा तो नहीं है I
मज़ाहिब रहते हैं क़ायम, फक़त ईमान जाता है II
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

त्या अतिरेकीला म्हणावं आम्ही तुला दहा लाख रुपये देतो फक्त खर खरं सांग.. जेणेकरुन त्यातून पुरावे देखील प्राप्त होतील.

मझ्याकदे mail box madhye p.d.f. file aahe.tyat Arvind Inamdarancha ek vachaniy lekh aahe. ti file ithe kashi taku?

kmayuresh,

तु दिलेली link वाचली आणि readers comments सुदधा वाचल्या.

बर्याचशा readers ने ( ते बहुतेक UP / बिहारी असावेत) पाकिस्तान चे बरोबर आहे .. आणि ठाकरे ला तिकडे पाठवून द्या, असे म्हटले आहे.

e.g. ravikant, Delhi का कहना है :अगर पाकिस्तान दाऊद के बदले ठाकरे को माँग रहा है तो,अब ठाकरे को मुंबई और भारत की भलाई के लिए खुद आगे आना चाहिए और अपने आपको पाकिस्तान के हवाले कर देना चाहिए.

असे comment देणारे सुद्धा देशद्रोहीच.
यांनाच आधी पाठ्वायला पाहिजे.

आपलेच दात आणि आपल्याच बोंबा!

अगदी खरय. आजसुद्धा माझ्या ऑफिसमधे मला मराठी आणि राज ठाकरे यांच्याबद्दल ऐकून घ्याव लागत. ते जाऊदेत, पण देशासाठी लढणार्‍या मराठी पोलिस आणि अधिकार्‍यांचाही उचित सन्मान हे लोक ठेवत नाहीत बघून व्यथित तर व्हायला होतच पण अतिशय चीड येते! होता होईतो प्रकरण वाढून एच आरकडे जाऊ नये हे मी पाहत आहे तर हे लोक जास्तीच शिरजोर होत आहेत!

आयटी त्यांना त्यांच्या आयक्यू लेव्हलबद्दल काहीतरी झणझणीत सुनाव बघू.

त्या मराठी आणि ठाकरे मंडळींचा इथे काय संबंध आहे, ते खरंच कळत नाही. उगीच वड्याचं तेल वांग्यावर नि काय?
ते अतिरेकी काय ठाकरेंचे गाव म्हणून किंवा ठाकरेंचे लोक मारायला म्हणून मुंबईत आले होते की काय?

--
.. नाही चिरा, नाही पणती.

झालय सगळं ऐकवून. कोणी वेड पांघरुन पेडगावला जायच ठरवलच तर मग काय करणार? यात माझा बॉसही येतो हे आणखी विषेश! आणि त्याच्याबरोबर टीममधले फुकटे! ४ लोकांसमोर सभ्य भाषेत त्याला अक्कल आहे की नाही हे विचारलं तरीही त्याच्या डोक्यात प्रकाश पडत नाही याला काय म्हणावे!

बी
हा मुलगा अजाण आहे))))) अरे बाबा तो इथ जाणुन बुजुन मरायाला तयार झालाय.
तो काहि १.५ लाखासाठि नाहि. त्याना माहित होते कि आपण मरणार .

म्हणुन तर ते कुल होते सिएस्टि वरचा व्हिडिओ पहा. किति आरामात हिन्डत होते.ते स्टेशन वर.
पण एकाहि पोलिसाचि त्यांना अडवण्याचे धाडस झाले नाहि. आता मिडिया ने कित्ति हि कुल्ले आपटले तरि ते आले आरामात लोकांना ठार मारले. व निघुन गेले हिच बातमि खरि आहे.

करकरे ,व कामठे हे काहि लढताना शहिद झाले नाहित. तर त्याना कळायच्या आत.
त्याना अतिरेक्यानि ठार केले.

जेव्हा अतिरेकि स्कोडा तुन पळाले व त्याना जेव्हा माळि यांच्या नेत्रुत्वा खालिल
टिम ने जेव्हा अडवले तेव्हा तिथे जि धुमश्चक्रि झालि तिथे इन्सेप. दुर्गुडे हे ठार झाले.
पण त्यातिल एक अतिरेकि ठार व एक जिवंत पकडण्यात या टिम ला यश मिळाले.
हे यश अभुत्पुर्व म्हटले पाहिजे पण त्याकडे मिडियाने मुद्दाम दुर्लक्ष केले यचे कारण काय

हे यश अभुत्पुर्व म्हटले पाहिजे पण त्याकडे मिडियाने मुद्दाम दुर्लक्ष केले यचे कारण काय
>>>
याचे कारण म्हणजे मिडीयाला अतिरेकी पकडला गेल्याने दु:ख झाले...
बाकी भाऊरावचे वरचे पोस्ट एकदम लॉजिकल आहे (अगदी दुर्मिळ योगायोग :))

---------हितगुज दॅट इ़ज....
पंडितसे मिले पंडित, हो जाय दो दो बातें..
गधेसे मिले गधा, हो जाय दो दो लातें.....

"लढाया हरल्या तरी चालेल; पण युद्ध जिंकणे महत्त्वाचे,' असे सांगितले जाते. अतिरेक्‍यांना मारण्यात किंवा ताब्यात घेण्यात आपल्या सुरक्षा यंत्रणांना यश मिळाले, तरी आपण फक्त लढाई जिंकलेली असेल; युद्ध आपण यापूर्वीच हरलेले आहोत! ........

मुंबईतल्या दहशतवादी हल्ल्यांनी भारतीय अंतर्गत सुरक्षा व्यवस्थेची लक्तरे जगाच्या वेशीवर टांगली आहेत. ही व्यवस्था कमालीची ढिसाळ आहे, याची देशातल्या नागरिकांना कल्पना होतीच; पण मुंबईतल्या थैमानाने त्याचा सज्जड पुरावा मिळाला आहे. भारतातील राजकीय पुढारी आत्मकेंद्री व विखुरलेले आहेत. त्यांच्या सततच्या हस्तक्षेपामुळे इथल्या प्रशासनाची कार्यक्षमता खालावलेली आहे आणि या दोहोंच्या करंटेपणापायी इथला समाज पुरता भुसभुशीत झाला आहे, अशी शंका जगातल्या अनेकांना होती; पण मुंबईतल्या हाहाकाराने त्या शंकेचे रूपांतर खात्रीमध्ये झाले आहे.

या वस्त्रहरणामुळे अवमानित झालेल्या आपल्या सर्वांसमोर "देश' म्हणून उभे राहण्याचे आव्हान आता ठाकले आहे. स्वातंत्र्यप्राप्तीला ६१ वर्षे उलटून गेल्यानंतरही असले "प्राथमिक' आव्हान आपल्यासमोर कायम असावे, हे या देशातल्या एकशे दहा कोटी जनतेला लाजिरवाणे आहे. १४ ऑगस्ट १९४७ च्या संध्याकाळी योगी अरविंदांनी आकाशवाणीवरून भारतीय जनतेला संदेश देताना या देशाचे एक स्फूर्तिदायी स्वप्न रंगविले. नव्याने स्वतंत्र होत असलेला भारत संपूर्ण जगाला नवी दिशा देईल, असा आशावाद त्यांनी तेव्हा व्यक्त केला. त्यापाठोपाठ स्वातंत्र्याचे स्वागत करताना हा भारताचा "नियतीशी करार' असल्याचे पंडित नेहरू म्हणाले. हा देश स्वत: तर समर्थ आणि समृद्ध होईलच; पण उद्या संपूर्ण जगातही शांतता प्रस्थापित करण्यात मोठी भूमिका बजावेल, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला. आज ६१ वर्षांनंतर जगाला आधार वगैरे देणे तर दूरच; पण खुद्द आपण स्वत: ही देश म्हणून खिळखिळे झालो आहोत.

भीती, असुरक्षितता आणि दर्पोक्ती
भारतीय संसदेवर अतिरेक्‍यांनी १३ डिसेंबर २००१ रोजी केलेले आक्रमण हे आतापर्यंतचे आपल्या देशातले सर्व ांत मोठे दहशतवादी कृत्य मानले जात होते; पण मुंबईत परवा २६ नोव्हेंबरला झालेला हल्ला हा त्याहीपेक्षा मोठा आहे. याचे कारण त्याची प्रचंड व्याप्ती आणि आगळी पद्धत. ताज व ओबेरॉय (ट्रायडंट) हॉटेले, नरिमन हाउस आणि छत्रपती शिवाजी रेल्वे टर्मिनस ही हल्ल्याची ठिकाणेच किती विचारपूर्वक निवडण्यात आली होती! छत्रपती शिवाजी रेल्वे स्थानकासारख्या सामान्य मुंबईकरांच्या नित्याच्या ठिकाणी अचानक अवतार घेऊन "आम्ही अंदाधुंद गोळीबार करतो, तिथून बाहेर पडून फैरी झाडत, बॉंब फेकत मोठे अंतर चालत जातो, कामा हॉस्पिटलपाशी पोलिसांचीच गाडी अडवून पळवून नेऊन दक्षिण मुंबईच्या रस्त्यांवर आडवे येणाऱ्यांना टिपत जातो... आणि तरी तुम्ही कोणी आमचे वाकडे करू शकत नाही,' असे दाखवून देत अतिरेक्‍यांनी सामान्य भारतीयांच्या मनात (केवळ मुंबईकरांच्याच नव्हे!) भीती व असुरक्षिततेचे काहूर उभे केले. नरिमन हाउस हे ज्यू धर्माच्या काही कुटुंबांचे निवासस्थान. आतापर्यंत कोणाच्या खिजगणतीत नसलेले; पण तेही ताब्यात घेऊन "आम्ही ज्यांना शत्रू मानतो, त्यांना जगाच्या पाठीवर कुठूनही शोधून काढू,' असा एक दर्पोक्तीयुक्त संदेशच अतिरेक्‍यांनी जगाला दिला. ताज आणि ओबेरॉय (ट्रायडंट) हॉटेले जगाच्या पर्यटन नकाशावरची चिरपरिचित स्थळे. भारतासह विविध देशांतल्या आर्थिक, राजकीय क्षेत्रांतल्या "व्हीआयपीज्‌'चा तिथे बारा महिने वावर. या दोन्ही हॉटेलांवर अतिरेक्‍यांनी कब्जा घेतल्याने संपूर्ण जगाचे लक्ष त्यांच्याकडे त्वरित गेले नसते, तरच नवल.

आपण युद्ध हरलोच आहोत...
"लक्ष्यां'ची निवड जितकी विचारपूर्वक होती, तितकेच या हल्ल्याचे नियोजन काटेकोर अन्‌ कार्यवाही अफलातून होती. अतिरेक्‍यांनी जे जे पादाक्रांत केले, त्या प्रत्येक ठिकाणचा भूगोल, तिथली यंत्रणा आणि तिथली व्यवस्था त्यांना आधीपासूनच इत्थंभूत माहिती होती. मुख्य म्हणजे त्यांना काही फक्त विध्वंस किंवा मनुष्यहानी करायची नव्हती. जास्तीत जास्त लोकांना जास्तीत जास्त काळ ओलीस ठेवून त्यांना संपूर्ण जगाचे लक्ष स्वत:वर खिळवून ठेवायचे होते. त्यांचा हा उद्देश पूर्णत: सफल झाला. "लढाया हरल्या तरी चालेल; पण युद्ध जिंकणे महत्त्वाचे,' असे सांगितले जाते. अतिरेक्‍यांना मारण्यात किंवा ताब्यात घेण्यात आपल्या सुरक्षा यंत्रणांना यश मिळाले, तरी आपण फक्त लढाई जिंकलेली असेल; युद्ध आपण यापूर्वीच हरलेले आहोत!

हे युद्ध सर्वंकष होते. एरवी जमिनीवरून चालून येणाऱ्या अतिरेक्‍यांनी या वेळी समुद्र मार्गाचा कल्पक व धाडसी वापर करून भारतीय यंत्रणांचा गाफीलपणा पुन्हा एकदा "एक्‍सपोज' केला. अतिरेक्‍यांकडचे आरडीएक्‍स, अत्याधुनिक बंदुका आणि त्यांना मिळालेले प्रशिक्षण पाहता, लष्कर-ए-तैयबासारख्या पाकिस्तानस्थित अव्वल संघटनेचे ते हस्तक होते, हे तर उघड आहेच; पण त्यांचे एतद्देशीय "अंडरवल्ड'शीही संधान होते, असे मानण्यास जागा आहे. दहशतवादाच्या या नव्या चेहऱ्याला जगातले काहीही वर्ज्य नाही आणि जमीन, आकाश, समुद्र व सायबर स्पेस यांतले काही त्याच्यापासून अस्पर्शित नाही, हेच आताच्या घटनेतून पुन्हा एकवार अधोरेखित झाले आहे.

अनुत्तरित प्रश्‍न
दुर्दैव हे, की आपण इतिहासातून खरोखरीच काही शिकत नाही आहोत. आणि म्हणून आपल्या देशातल्या अनेकांच्या मनात कितीतरी अनुत्तरित प्रश्‍नांचा डोंब उसळला आहे...

आपल्या देशात हे अतिरेकी हल्ले वारंवार का होत आहेत? त्यांच्यामागे "परकीय शक्ती'चा हात आहे, असे आपले राज्यकर्ते म्हणतात, तेव्हा त्यांचा निर्देश पाकिस्तानकडे असतो का? तसे असेल, तर पाकिस्तान म्हणजे कोण? तिथले सरकार, तिथली आय.एस.आय. ही गुप्तचर संघटना, की तिथे तळ ठोकून असलेले लष्कर-ए-तैयबासारखे अतिरेकी गट आणि दाऊद इब्राहिमसारखे डॉन? त्यांचे परस ्परांशी काही संबंध आहेत का, असतील तर नेमके कसे आहेत, त्यांना पाकिस्तानच्याही बाहेरच्या कोणा देशातून पाठबळ मिळते का, या सर्व बाबी आपल्या सरकारला माहीत असतील, तर आपली यापूर्वीची सरकारे व आत्ताचे सरकार त्याबाबत इशारे देण्यापलीकडे काही करीत का नाही?

इस्लामच्या नावाखाली हे अतिरेकी हल्ले केले जात आहेत, याची नेमकी काय प्रतिक्रिया मुस्लिम व हिंदू समाजात उमटत आहे? अलीकडच्या अतिरेकी हल्ल्यांचे कारण बाबरी मशिदीचे पतन व गुजरातमधील दंग्यांशी जोडण्याचा काहींचा प्रयत्न असतो. ते पूर्णांशाने खरे मानले, तर त्या दोन्ही घटनांच्याही आधी झालेल्या दहशतवादी व घातपाती कारवायांची संगती कशी लावायची? "इस्लामी' अतिरेक्‍यांबरोबरच अलीकडे "हिंदू' अतिरेकीही उघडकीस येत आहेत. हा काय प्रकार आहे? काश्‍मीरच्या खोऱ्यातल्या दहशतवादाचे काय? पंजाबात १९८०च्या दशकात उसळलेला दहशतवाद निवळला व थांबला. तर मग आताचा हा दहशतवाद का थांबत नाही...?

हे सारे प्रश्‍न इथे नोंदविले याचे कारण, ते या देशातल्या लोकांच्या मनात दीर्घ काळापासून खदखदत आहेत. ते कोणा व्यक्तींना वा पक्षांना अडचणीत आणण्यासाठी उपस्थित केलेले नाहीत. या प्रश्‍नांकडे आणखी दुर्लक्ष करणे आपल्याला परवडणारे नाही. कारण त्यांच्यापासून आपली सुटकाच नाही. या प्रश्‍नांना आपल्याला निदान आता का होईना; पण एकत्रितपणे भिडावेच लागेल. यातील "एकत्रितपणे' हा शब्द सर्वांत महत्त्वाचा. कारण त्याबाबत आतापर्यंत अक्षम्य हेळसांड केल्यामुळेच आपला देश आताच्या दारुण स्थितीला पोचला आहे.

फुटकळवादी बघ्यांची संस्कृती
मुंबईतील हल्ल्यांनंतर पंतप्रधान मनमोहनसिंग व विरोधी पक्षनेते लालकृष्ण अडवानी यांनी परस्परसामंजस्याची भूमिका घेऊन आशेचा किरण दाखविला आहे. ओलीस व सुटका नाट्य सुरू असताना तरी बाकीच्या पक्षांनीही बव्हंशी संयमी भूमि का घेतली. पण ही राजकीय प्रगल्भता अल्पकाळच का टिकते आणि त्यासाठी मुंबईसारखा महाउत्पातच का घडावा लागतो? एरवी दहशतवादासाख्या राष्ट्रीय आव्हानाबाबतही ही मंडळी एकमेकांच्या हातात हात गुंफण्याऐवजी एकमेकांच्या उरावर बसतात. प्रकाश कारत अडचणीत आले, की राजनाथसिंहांना उकळ्या फुटतात आणि शिवराजसिंह चौहानांची गोची झाली की सीताराम येचुरींच्या रसवंतीला बहर येतो. दहशतवादाला धर्म नसतो, असा जप एकीकडे करीत असतानाच आपल्या राजकारणातील डावी आणि उजवी मंडळी प्रत्यक्षात अत्यंत चलाखीने व सातत्याने अनुक्रमे मुस्लिम व हिंदू दहशतवाद्यांचा अनुनय करीत असतात.

ओमर अब्दुल्ला आणि महबुबा मुफ्ती यांचे सर्वोच्च प्राधान्य काश्‍मीर खोऱ्यातली आपापली व्होटबॅंक सांभाळण्याला. त्यामुळे त्यांच्या कुरघोड्यांना खंड नाही. राज आणि उद्धव ठाकरे मराठी मतपेढीवरचा वारसा हक्क आक्रस्ताळेपणे बजावत असताना तिकडे लालूप्रसाद बिहारचे नेतेपण ओरबाडू पाहतात. तमिळनाडूतील (आणि श्रीलंकेमधील) तमिळींच्या हितरक्षणासाठी करुणानिधी व जयललितांमध्ये जुंपलेली असताना मायावती व मुलायमसिंह उत्तर प्रदेशच्या संस्थानासाठी कोणत्याही थराला जातात. नरेंद्र मोदी हे तर बोलून चालून "स्वयंभू!' त्यांचे सारेच निराळे! आपापला "अजेंडा' राबवीत असताना राष्ट्रीय हित जपण्याला यांच्यापैकी कोणाला वेळ कुठे आहे?

यातला प्रत्येक जण केव्हाना केव्हा तरी जात्यात येतो, तेव्हा बाकीचे खरे म्हणजे सुपात असतात; पण सुपात असणारे कायमच फक्त बघ्याची भूमिका घेतात. परिणामत: राष्ट्रीय महत्त्वाच्या मुद्‌द्‌यांवरही आपल्या राजकारणात एक फुटकळवादी बघ्यांची संस्कृती निर्माण झाली आहे. प्रशासन यंत्रणेला दिशा देण्याची जबाबदारी ज्या राजकीय नेतृत्वाची, त्या राजकारणातच फुटकळवादी बघ्यांची भाऊगर्दी झाल्यावर प्रशासनाची, सुरक् षा यंत्रणांची कार्यक्षमता टिकेल आणि वाढेल कशी?

पोषण बांडगुळांचेच...
दुर्दैवाने ही फुटकळवादी बघ्यांची संस्कृती आपल्या देशभरातल्या जनतेत खालपर्यंत झिरपली आहे. मतपेटीतून उभ्या राहणाऱ्या लोकशाहीच्या वृक्षाचे आपण गेली सहा दशके वाखाणण्याजोगे जतन केलेले असले, तरी त्या वृक्षाला राष्ट्रीय हिताच्या खतपाण्यापासून बव्हंशी वंचित ठेवले जात आहे. म्हणूनच या लोकशाहीच्या वृक्षाला राष्ट्रीय एकात्मतेची फळे लागण्याऐवजी प्रांतवाद, जातिवाद, धर्मवाद, भाषावादासारखी घातक बांडगुळेच जडत चालली आहेत. फुटकळवादी बघ्यांच्या दर निवडणुकीत पडणाऱ्या कोट्यवधी मतांमुळे आता या बांडगुळांचेच पोषण होऊ लागले आहे; लोकशाहीच्या मूळ वृक्षाचे नव्हे.

बांडगुळांची संख्या व आकार वाढत गेला, की राष्ट्रीय एकात्मतेचा पुरस्कार करणाऱ्या लोकशाहीच्या वृक्षाचा जीवनरस शोषला जाऊन तो वृक्ष केव्हातरी कोसळेल. त्याला वेळ लागेल; पण दरम्यानच्या काळात दहशतवादाचा भस्मासुर आपल्या सर्वांचे (म्हणजेच सर्व धर्मीयांचे, जातीयांचे, प्रांतीयांचे, भाषकांचे) जिणे नासवून टाकेल.

हा सर्वनाश टाळण्यासाठी सर्वसमावेशक राष्ट्रीय एकात्मतावादी धोरणाची राजकीय संस्कृती तातडीने व निर्धाराने निर्माण करावी लागेल. भारत हे अगणित धर्म, जाती, भाषा, प्रांत व पंथांचे गाठोडे नाही, तर या सर्वांना राष्ट्रीय एकात्मतेच्या एका समान सूत्रात खरोखरीच बांधणारा हा "देश' आहे, हे बिंबविणारी सामाजिक जीवनशैली अंगीकारावी लागेल. कॉंग्रेस व भाजप हे आपल्या देशातील सर्वांत मोठे पक्ष. म्हणून या महाकाय प्रयत्नांसाठी त्यांनीच संयुक्तपणे पुढाकार घ्यायला हवा. आपापल्या संकुचित हितापलीकडे जाऊन असा प्रयत्न हे दोन पक्ष करीत असल्याचे दिसले, तर देशभरातले इतर लहान-मोठे पक्षही त्यांना साथ देतील किंवा त्यांना तशी साथ द्यावी लाग ेल.

दहशतवाद्यांच्या मुंबईतील हल्ल्यांनंतर जी परिस्थिती देशभर निर्माण झाली आहे, त्या परिस्थितीचे हे मागणे आहे - आपल्या तमाम राजकीय नेत्यांकडे, पक्षांकडे... पर्यायाने आपल्याकडे.

सर्वेपि सुखिनो सन्तु सर्वे सन्तु निरमयह सर्वे भद्राणि पशन्तु मा कश्चिद दुखमाप्नुयात

........ The so called justification for the hype the channels built around
heritage site Taj falling down (CST is also a heritage site), is that
Hotel Taj is where the rich and the powerful of India and the globe
congregate. It is a symbol or icon of power of money and politics, not
India. It is the icon of the financiers and swindlers of India. The
Mumbai and India were built by the Aam Aadmis who passed through CST
and Taj was the oasis of peace and privacy for those who wielded power
over these mass of labouring classes. Leopold club and Taj were the
haunts of rich spoilt kids who would drive their vehicles over
sleeping Aam Aadmis on the pavement, the Mafiosi of Mumbai forever
financing the glitterati of Bollywood (and also the terrorists) ,
Political brokers and industrialists.

It is precisely because Taj is the icon of power and not people, that
the terrorists chose to strike.

The terrorists have understood after several efforts that the Aam
Aadmi will never break down even if you bomb her markets and trains.
He/she was resilient because that is the only way he/she can even
survive........

.

............ बरोबर लिहिले आहे..........

युद्ध आपण यापूर्वीच हरलेले आहोत >> १००० टक्के सहमत. १९३०, १९४२, त्या पुढे १९४७, १९४८, त्यापुढे २००३ व त्या नंतरचे सर्व बॉम्ब हल्ले हे आपल्यला निर्नायक मात देवून गेले.

आपन सर्व भारतीयांच्या भावना व्यवस्थित मांडल्या आहेत. हे सर्व बदलन्याची ताकद, वेळ व बुध्दी आमच्या पिढीला मिळो. निदान पुढची पिढी तरी आम्हाला दोष देनार नाही. वेळीच ह्या पिढीने पावले उचलली नाहीत तर अवघड आहे.

इथे व्यक्त केलेली सगळी मते ही मायबोली प्रशासनाची नसून त्या सभासदाची वैयक्तिक मते आहेत आणि त्याची संपूर्ण जबाबदारी त्या व्यक्तीवर आहेत. या संदर्भात त्या व्यक्तिची अधिक माहिती काढण्यासाठी कुठल्याही शासकीय प्रशासनाबरोबर मायबोली पूर्ण सहकार्य करेल.

सध्याच्या परिस्थितीत आपल्या सगळ्यांना येणारी चीड आम्ही समजू शकतो. परंतू फक्त एका विशिष्ट समाजाला उद्देशून केलेल्या प्रतिक्रिया बर्‍याचदा मर्यादेच्या बाहेर जात आहेत. कुठल्याही धार्मिक/राजकीय विचारसरणीचा प्रसार करण्यासाठी मायबोली ही जागा नाही. दहशतवादाचा प्रचार(मग तो दुसर्‍या दहशतवादाचा विरोध म्हणून का असेना) करण्यासाठी तर नाहीच नाही.

आपल्या सगळ्याना मायबोली सुरू रहावी असे वाटत असेल तर कृपया या जबाबदारीची जाणीव ठेवा.

Pages