मुंबईवर अतिरेकी हल्ला

Submitted by समीर on 26 November, 2008 - 15:36

मुंबईत सध्या युद्धजन्य परिस्थीती झाली आहे. ATS चे ४ प्रमुख अधिकारी मारले गेले आहेत. अनेक ठिकाणी गोळीबार, बाँबस्फोट होत आहेत..त्याची चर्चा /माहिती देण्यासाठी हा धागा.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मनुस्विनी,
बर मग आता तुम्हीच काहितरी ठोस कृती करा बर...

लिम्ब्या,
शांत गदाधारी भिम.. Happy
हे असे उकीरड्यावर भुंकणारे कुत्रे बरेच आहेत...

ह्याना कधिहि जाग येणार नाही, जाग कोणाला येते जे झोपल्याल्याना जाग येते पण झोपल्याचे सोग घेणारयाना जाग येत नाही.

अन तिकडेही सूटल्यावर रॉ असनारची कसाबचा गेम करायला. तो पाक मध्ये करावा. त्याचे नापाक रक्त पाक मध्येच पडू देत.
तिकडे र्रॉ ने कारवाया कराव्यात असे आपल्याला वाटते तसेच इकडे आय एस आय
ने कारवाया कराव्यात असे जाज्वल्य देशाभिमानी पाकिस्तानी नागरिकाना वाटत असणार.

अफझलच्या बाबतीत मात्र त्याला फाशीच द्यावे.

चला, चर्चा समेवर आली.

उरण(जि.रायगड) ला आदल्या दिवशि हे अतिरेकि थाब्मले होते.
तिथे त्याना जेवण व दारुगोळा पुरवण्यात आला .
तेव्हा स्थानिक मुस्लिमांचा यात हात आहे हे नक्कि.

तिकडे र्रॉ ने कारवाया कराव्यात असे आपल्याला वाटते तसेच इकडे आय एस आय
ने कारवाया कराव्यात असे जाज्वल्य देशाभिमानी पाकिस्तानी नागरिकाना वाटत असणार >>

हो नक्कीच आणि त्यात काहीही गैर नाही. हा खेळ असतो विजय. आणि त्याला आतरंराष्ट्रीय राजकारण म्हणतात.
त्यांचा कारवाया आपल्या देशात न होऊ देने हे आपल्या हातात (पक्षी सरकारच्या कक्षेत येते) जर त्याकडे आपण देश म्हणून दुर्ल्क्ष करनार असू तर ते काही हरिश्चचंद्र नाहीत.

उरण(जि.रायगड) ला आदल्या दिवशि हे अतिरेकि थाब्मले होते.

कशावरून? तुम्ही म्हनता म्हणून? उगीच काहीतरी पुड्या सोडू नका. मायबोलीकराना एवढे बुद्धू समजू नका.
---------हितगुज दॅट इ़ज....
पंडितसे मिले पंडित, हो जाय दो दो बातें..
गधेसे मिले गधा, हो जाय दो दो लातें.....

मला खरोखर प्रश्ण पडला आहे की इथील चर्चेचा 'खरोखर' फायदा आहे का?
मला वाटते आहे, जरा का आपण स्वता पासून सुरवात केली तर....

मला पाकिस्तानी शिर-खूर्मा , लोणचे , मसाले इत्यादी आवडतात.
पण मी आता ठरवलेले आहे की पाकिस्तानी गोष्टी विकत घ्यायच्या नाहीत.
त्यानी काही फरक पडेल का ? मला माहित नाही, पण माझ्या पासून छोटीशी सुरवात.

टोणगेश,
कसाबला वकील न मिळाल्यास त्याची मदत होते हे खरे असेल तर बार कौंन्सिलने त्याला नकार कशाला दिला असता??का त्यांनाही हे कळत नाही???वकील दिला न दिल्याने काही फारसा फरक पडेल असे दिसत नाही.कसाब दहशतवादी आहे याबद्दल ठोस पुरावे नक्कीच आहेत्.एफबीआयने सुध्द्दा ते मान्य केलेच आहे.उगाच संधी मिळाली की ठाकर्‍यांवर टीका करायचा चान्स सोडला नाहीस्.म्युनिच ऑलिंपिक्स मध्ये दहशतवाद्यांनी इस्राईलच्या खेळाडूंना मारुन टाकल्यावर पुढील २-३ वर्षात सर्व दहशतवादी इस्राइली एजेंट्सनी मारले होते कुठलाही खटला न चालवता.खटला न चालवल्याने असा काय फरक पडला???
केदार,
कसाबला पाकमध्ये पाठवायचा उपाय चुक आहे.कारण त्याने तिथे काहीच गुन्हा केलेला नाहीये.शिवाय अशी आत्मविघातक कृती कुठल सरकार घेईल्???पुढे आयुष्यभर हेच ऐकुन घ्याव लागेल त्यांना.आता भाजपचे मोठे नेते अजहरला सोडल्याबद्दल डोक्यावर हात मारुन घेत असतील्.कारण त्यावेळी जी लोक १५८ लोकांना काहीही करुन सोडवा म्हणत होती तिच लोकं आता मसुदला का सोडला म्हणुन बोंबा मारत आहेत.शिवाय पाकही पुढे नेहमीच दहशतवाद्यांना (उदा.दाउद ) भारताकडे सोपवण्यास नकार देईल्.ते म्हणतील की तुमच्या देशातील दहशतवादी हल्यामध्ये हल्ला करताना पकडल्या गेलेल्याला तुम्ही शिक्षा न करता सोडुन दिले तर ह्या दाउदला वगैरे तुम्हाला सोपवुन काय फायदा.शिवाय ही माणस पाकी कोर्टात अथवा पोलिसांच्या ताब्यात असुनही भारतीविरोधी कृत्ये बिनधास्तपणे करु शकतात्.कसाब तिकडे गेल्यास तिथला तो हिरो होईल.
विजयराव,
इतके वर्ष पोटाच्या नावानी बोंबा मारत होता मग आता स्वतःच नवा कायदा आणुन पोटा कायदा बरोबर होता आणि तो रद्द करुन तुम्ही चुक केली हे अप्रत्यक्षपणे मान्य करत नाही आहात का??
----------------------
सरणार कधी रण प्रभू तरी, हे कुठवर साहू घाव शिरी|| दिसू लागले अभ्र सभोती, विदीर्ण झाली जरी ही छाती, अजून जळते आंतर ज्योती, कसा सावरु देह परी || होय तनूची केवळ चाळण , प्राण उडाया बघती त्यातून, मिटण्या झाले अधीर लोचन, खङग गळाले भूमीवरी

इथे ज्यानी अमेरिकन नागरिकत्व स्वीकारले आहे त्याना करता येण्यासारखी गोष्ट म्हणजे
आपापल्या सिनेटर कॉन्ग्रेसमन लोकाना फोन पत्र किन्वा ईमेल ने सम्पर्क करणे.
पल्लोन, मेन्देनेझ अकर्मन सारख्या लोकानी पाकिस्तान ची मदत बन्द करण्याचे प्रयत्न
सुरु केले आहेत. त्याना पुढच्या निवडणूकीत देणगी देणे. ई ई .

विजय यांनी चांगला मुद्दा मांडला आहे ! पाकला अमेरिकेचा बहुतेक पैसा हा दहशतवादाच्या विरोधी शस्त्रांच्या रुपात येतो... तो ज्या कामासाठी येतो त्या कामासाठी न वापरता पाकची सेना तो भारताच्या विरुद्ध कारवाया (त्यात ताज मधील अमेरिकन नागरिकही मारले जातात) करण्यासाठी वापरते. अप्रत्यक्षरित्या अमेरिकेच्याच आर्थिक/ शस्त्र मदतीने, भारताला हजारो लहान जखमा करायच्या. भारताने अमेरिकेच्या पाक मदतीला दहशतवादास हात भार लावल्याबद्दल काही प्रमाणात तरी दोषी धरावे. धान्य, वस्त्र, निवारा या स्वरुपातील थेट मदतीला कुणाचीच हरकत नसावी. समोरा समोरच्या युद्धात पाकला पराभवाच्या शिवाय दुसरे काहीच हातात आलेले नाही त्यामुळे भारताला हजारो जखमा करण्याचे तंत्र जनरल झिया हक यांच्या काळापासून सुरु आहे, आर्थिक दृष्टिने ते त्यांना चांगलेच परवडते.

मागच्या आठवड्यात नाटो सैन्याला पुरवठा करणार्‍या ट्रक्सवर पेशावर मधे हल्ले झाले, आता हे हल्ले परतवण्या साठी पाकच्या पोलीस/ सैन्याकडे अतिरेक्यांशी मुकाबला करता येतील असे आधुनिक शस्त्रे नव्हती (हे कारण अजुन मदत उकळणे... आता मदत उकळण्यासाठी हे हल्ले मॅनेज केले असतील कां?) म्हणजे १० बिलियन $ पोटात (मदतीचा आकडा यापेक्षा मोठाच असेल) ठकलले तरी यांच्या कडे अजुन शस्त्रेच नाही. म्हणजे तुमचा राशन पुरवठा सुरळीत चालू हवा असेल तर अजुन अजुन मदत द्या...

मला अन्तुल्यान्चे म्हणणे तितके चुकीचे वाटत नाही.
करकरे आणि अन्य दोघे लोक इतक्या पटापट मारले गेले ह्यात काहीतरी चुकले आहे. आता त्यात खरोखरची चूक होती का काही काळेबेरे होते ते शोधले पाहिजे. तथाकथित हिन्दुत्ववादी अतिरेक्याना ह्यात दोषी ठरवायचा कावा त्यामागे असेलच असे मला वाटत नाही. जर असला तर कर नाही त्याला डर कशाला? होऊन्द्या तपास.
निदान पुन्हा असे काही झाले तर (आणि ते दुर्दैवाने होईलच) असले रथी महारथी इतके सहज बळी जाणार नाहीत अशी काळजी घेतली जाईल. वरिष्ठ अधिकारी हातघाईच्या लढाईत लढवायची काय गरज आहे? त्यान्चे प्राविण्य अन्य क्षेत्रात असते. तिथे ते वापरावे.

आता असे म्हणून काय साध्य? because the harm is already done! Sad

अरे वा... भारत सरकारने भारतीय क्रिकेट संघाच्या पाकिस्तान दौर्‍याला परवानगी नाकारली आहे.... Happy

अल्पसंख्याक कल्याण मंत्री बॅरिस्टर अरारा अंतुले यांचा राजिनामा... लिम्बुटिम्बु आता गाडी खुष?

काहितरि पुड्या सोडु नका)))) का रे तुझ्या दाढिला का मिरच्या झोंबल्या मुसलमानाचे नाव आले म्हणून
अरे काल च हि बातमि टाइम्स व लोकमत मधे आलि आहे.उरण ला त्याना चानगले जेवण पण दिले व
बाकिचि मदत पण दिलि.
बाकि लोकमत या मुस्लिम धार्जिण्या ( सोनिया भक्त दर्डा) नि हि बतमि दिलि आहे म्हाणजे हि
खरि असणार.

ज्या लोकानि कासाब व इतर अतिरेकयाना सिम कार्ड दिले त्या पच्शिम बन्गाल मधिल लोकानि अशि बातमि दिलिय कि कलकत्त्यात पण असेच ८ अतिरेकि घुसलेत व कधिहि ते मुम्बै सारखि कारवाइ करतिल

अरे फुटकळ्,आधी हीच काँग्रेस तक्रार करत होती ना की सगळ्यांनी एकत्र येउन पाकिस्तानपुरस्कृत दहशतवादाचा विरोध करुया???मग आता काय झाले???मोदींनी अस काय मोठ पाप केल होत की इतकी टिका केली???अंतुलेंपेक्षा तरी बरोबरच बोलले होते.प्रश्न हा आहे की घटनेची चौकशी करताना याची चौकशी केलीच जाईल की त्यांना तिकडे कोणी पाठवल वगैरे.मग अजुन याच्यासाठी वेगळी चौकशी कशाला???आणि अंतुलेंच म्हणन आहे कामा हॉस्पिटल म्हणजे फारस महत्वाच स्थळ नव्हत.वा रे वा न्याय्!!!!!फक्त ताज आणि ओबेरॉयच महत्वाच होत असच यांना वाटत का??सगळीकडे २-२ अतिरेकी गेले होते मग सगळी स्थळ तितकीच महत्वाची होती ना??शिवाय कामा हॉस्पिटलला दहशतवाद्यांशी सामना करताना पोलिसांच्या बहुतेक गोळ्या संपल्या आणि त्यांना कुमक द्यायला आणि मदत करायला हे तिघे गेले होते असे अविनाश धर्माधिकारी यांच्या भाषणात ऐकले होते.
----------------------
सरणार कधी रण प्रभू तरी, हे कुठवर साहू घाव शिरी|| दिसू लागले अभ्र सभोती, विदीर्ण झाली जरी ही छाती, अजून जळते आंतर ज्योती, कसा सावरु देह परी || होय तनूची केवळ चाळण , प्राण उडाया बघती त्यातून, मिटण्या झाले अधीर लोचन, खङग गळाले भूमीवरी

सन्तु ह्या आय डी ने आता भाऊ राव आणि नन्तर आप्पाराव नाव घेतले आहे. का हो पोलीस चौकशीला घाबरलात की काय?--------हितगुज दॅट इ़ज....
पंडितसे मिले पंडित, हो जाय दो दो बातें..
गधेसे मिले गधा, हो जाय दो दो लातें.....

अंतुले ! मुम्बई हल्ल्याने घेतलेला आणखी एक राजकीय बळी. अर्थात जो तो स्वतःच्या गुणाने बळी जातो आहे. मंत्री होऊनही प्रकाशात नव्हते ते नव्हतेच. महाराष्ट्रातल्या मंत्र्या.ची यादी करायला लागले तर अंतुल्यांचे नाव कोणाला आठवायचे नाही. प्रकाशात आले अन मेलेच.
रामदास फुटाण्यांची एक वात्रटिका आहे.
आरम्भ मै लेता हूं
अन्त तू ले.
ऑन तू ले
अंतुले !!
शिमिटाच्या प्रकरणात अडकल्यानन्तर फुटाण्यानी केलेली वात्रटिका.

महाराष्ट्र सीमा प्रश्नावर अंतुल्यानी जे घणाघाती पुस्तक लिहिले आहे ते आजही सीमाप्रश्नाचा क्लेम करताना उपयोगी पडते. कुलाबा जिल्ह्याचे नाव रायगड ठेवणारे अन भवानी तलवार लंडन वरून आणण्याची घोषणा करणारे अंतुले. मुजोर सचिवांच्या अंगावर फायली फेकनारे अंतुले एक कार्यक्षम मुख्यमंत्री म्हणून ओळखले जात्.खरे तर शिमिटाच्या प्रकरनात अंतुलेनी भ्रष्टाचार केलाच नव्हता. स्वतःच्या फायद्यासाठी तर नाहीच. आजच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या कृत्यास भ्रष्टाचार देखील म्हणता यायचे नाही.
त्यानी पदाचा गैरवापर केल्याचा ठपका ठेवण्यात आला होता कोर्टाकडून. श्रेष्ठीना ते नकोसे झाल्यावर ह्या प्रकरणाचा आधार घेऊन त्यांचा राजीनामा घेण्यात आला.
अंतुल्यांच्या केसचे खरे वैशिष्ट्य आहे ते कोर्टात 'लोकसेवक' या शब्दाची व्याख्या करताना झालेल्या इन्टर्प्रिटेशन मध्ये. मंत्री हा पब्लिक सर्व्हन्ट आहे की लोकप्रतिनिधी? कारण भ्रष्ताचार विरोधी कायदा लोकसेवकाना लागू होतो.भयंकरच आर्ग्युमेन्ट्स झाली होती तेव्हा. स्वतः अंतुले ब्यारिष्टर. गम्मत आली.
वडखळ नाका नावाचे एक स्मगलिंगच्या प्रकरणातही त्यांचे नाव बदनाम झालेले होते.त्यांचे विरोधक वारंवार त्याची आठवण काढत. अत्यन्त मनस्वी माणूस . पु. लं चा ' अंतुलेसाब तुम्हारा चुक्याच' हा लेख प्रसिद्ध आहे.
असो . त्यांचे राजकीय करीअर आता संपल्यात जमा आहे.
---------हितगुज दॅट इ़ज....
पंडितसे मिले पंडित, हो जाय दो दो बातें..
गधेसे मिले गधा, हो जाय दो दो लातें.....

कालच मैत्रीणीने एक लिंक पाठवली. ह्या सर्व प्रकाराचा म्हणे पाकीचा एक गायक झहीर अब्बासला काढले झी ने.
सारेगमपा साइटवर इतक्या वाईट कमेंटस ना भारतीयांबद्दल. आश्चर्य म्हणजे साईट admin हे सर्व पोस्ट वर काहीच आक्षेप घेत न्हवते काही काळ.

कर्नल आठल्ये यांचा रिडीफ वरचा लेख.

http://www.rediff.com/news/2008/dec/19mumterror-no-islamic-burial-for-mu...

स्वर्गात पोहोचण्यासाठीचे सर्व दरवाजे रोखण्याचा प्रयत्न करावा. अतिरेक्यांना धर्म नसतो मग कशाला वक्फ बोर्डा कडे त्यांच्यावर शेवटचे सोपस्कार उरकण्याची जबाबदारी द्यायची. भारत आता असले लाड करणार नाही, कारवाईत मारला गेल्यानंतरही भारत त्याच्या प्रेताला एका निधर्म/ बेवारशा सारखे वागवेल याची (जिवंत असणार्‍या) त्यांना चांगली जाणिव करुन द्यावी. एक ५-१० % तर भावी अतिरेकी विचार करतील... ते ही नसे थोडके.

या वेळेला मुस्लीम संघटनांनीच मृत अतिरेक्यांच्या विरोधात पुढाकार घेतला आहे. त्यांच्या भावनांची कदर करावी.

अरे टोणग्या मि कुणाच्या बा ला भित नाहि.
पण माय्बोलि वालेच माझि आय डि ब्लॉक करतात.
त्याला काय करणार.

बाकि आपण मराठ्यानि या मुसलमाना ना डोक्यावर घेतला म्हणुन तो आपले काम करतोय. दुसरे काय.

यशवंत रावाला कलंक ठरवल्या मुळे इदिरा बाइ ने याला
वर बढति दिलि नाहितर बसला असता श्रिवर्धन मधे नारळ मोजत

सोनुच्या प्रत्येक शब्दा बद्दल टाळ्या आणि सलाम !!

खरचं छान बोललेत सोनू निगम. मनापासून बोलला असं वाटलं.

अरे टोणग्या ,प्रकाशात येण्यासाठीच हे असे वक्तव्य अंतुलेंनी केले असेल्.व्होट बँक पॉलिटीक्स मुळे मला नाही वाटत त्यांच्याविरुध्द काही ठोस कारवाई होईल्.अशा पध्दतीने हे लोक आपल्या व्होट बँकेला संदेश देत असतात की बाबांनो आम्ही तुमच्याविरुध्द नाही.म्हणजे भारतील धर्मांध मुस्लिम पण दहशतवाद्यांविरुध्द सरकारनी दिलेल्या घोषणांनी दुर जायला नको.
----------------------
सरणार कधी रण प्रभू तरी, हे कुठवर साहू घाव शिरी|| दिसू लागले अभ्र सभोती, विदीर्ण झाली जरी ही छाती, अजून जळते आंतर ज्योती, कसा सावरु देह परी || होय तनूची केवळ चाळण , प्राण उडाया बघती त्यातून, मिटण्या झाले अधीर लोचन, खङग गळाले भूमीवरी

>>> अरे टोणग्या ,प्रकाशात येण्यासाठीच हे असे वक्तव्य अंतुलेंनी केले असेल्.

अंतुले ७९ वर्षांचे आहेत. त्यांचे राजकीय करीअर संपुष्टात आलेले आहे. आपल्या उर्वरीत आयुष्यात ते आता काहीच भरीव करू शकणार नाहीत. तिकीट मिळाले व निवडून आले तर कदाचित पुन्हा खासदार होऊन एखादे बिनमहत्वाचे मंत्रिपद त्यांना मिळू शकेल (जर काँग्रेस पुन्हा सत्तेवर आली तर). अर्थ, गृह, संरक्षण, परराष्ट्र, रेल्वे, पेट्रोलियम . . . अशी महत्वाची खाती त्यांना कधीच मिळू शकणार नाहीत. एकंदरीत ते संपलेले आहेत. त्यांचे एकमेव शक्तिस्थान म्हणजे त्यांचा धर्म. कोणतीही कुवत नसताना केवळ मुस्लीम असल्यामुळे काँग्रेसने जी मंडळी मखरात बसविली आहेत, त्यांपैकीच अंतुले हे एक.

आपल्याला २००९ च्या लोकसभा निवडणुकीत पुन्हा तिकीट मिळणार नाही याची त्यांना कुणकुण लागली असावी. आपले महत्व असे वाढवावे जेणेकरून आपले ति़कीट कापणे पक्षाला अवघड जाईल हे मनात ठेऊन त्यांनी मुद्दामच करकरेंच्या मृत्युबद्दल संशय व्यक्त करून संशयाची सुई संघ परिवाराकडे वळविण्याचा प्रयत्न केलेला आहे. अपेक्षेप्रमाणेच मुस्लीम समाजातून त्यांना पाठिंबा मिळत आहे. त्यामुळे काँग्रेसला त्यांच्याविरूद्ध कोणतीही कारवाई करणे अवघड झाले आहे. दिग्विजय सिंगांसारखे गांधी घराण्याचे निष्ठावान होयबा त्यांना पाठिंबा देण्यासाठी रिंगणात उतरले आहेत (लागोपाठ दुसर्‍यांदा काँग्रेसचा मध्य प्रदेश मध्ये पराभव झाल्यामुळे दिग्विजय सिंगांचे महत्व सुद्धा एकदम कमी झालेले आहे) कारण त्यांना सुद्धा प्रकाशात येण्याची आवश्यकता आहे (मग तो दुसर्‍याचे घर जाळून पाडलेला प्रकाश का असेना, प्रकाशात आल्याशी कारण). त्यामुळे काँग्रेस अंतुल्यांविरूद्ध कोणतीही कारवाई न करता त्यांचे विधान अनुल्लेखाने मारेल.

२-३ वर्षांपूर्वी ७५ वर्षांच्या उपद्रवी अर्जुन सिंगांनासुद्धा मंत्रीमंडळातून डच्चू देऊन एखाद्या राज्याचा राज्यपाल करण्याची मालकीणबाईंची योजना होती. हे लक्षात येताच, मनमोहन सिंग व मालकीण बाई या दोघांनाही कल्पना न देता त्यांनी अचानक लोकसभेत जाहीर केले की, "UPA सरकार इतर मागासवर्गीयांना IIT, IIM अशा अतिउच्च शिक्षण संस्थांमध्ये राखीव जागा ठेवण्यासाठी घटनादुरुस्ती करेल". त्यांच्या या चतुर खेळीला सर्व पक्षांना पाठिंबा द्यावा लागला व अर्जुन सिंगांचे मंत्रीपद शाबूत राहिले.

"सत्तातुराणां न भयं न लज्जा"! आपल्या वैयक्तिक स्वार्थासाठी वाटेल ते करणारी हीच मंडळी परत परत निवडून येतात हे आपले दुर्दैव!

हे ही भारीच

कन्दाहार प्रकरणाची पुनरावृत्ती झाल्यास पुन्हा अतिरेक्याना सोडेन असे जसवन्त सिन्गानी जाहीर केले आहे. त्याचे समर्थन इथे कोणी करणार आहे की नाही.? ते अशाने एकटे पडतील ना. जसवन्त आगे बढो हम तुम्हारे साथ है...

---------हितगुज दॅट इ़ज....
पंडितसे मिले पंडित, हो जाय दो दो बातें..
गधेसे मिले गधा, हो जाय दो दो लातें.....

जसवंत सिंग या माणसानी स्वैर प्रसिध्दीसाठी काहीही वक्तव्ये करायची असे ठरवलेले दिसतेय्.मागे पण स्वतःच्या पुस्तकाच्या पब्लिसिटी साठी असाच प्रकार केला होता
----------------------
सरणार कधी रण प्रभू तरी, हे कुठवर साहू घाव शिरी|| दिसू लागले अभ्र सभोती, विदीर्ण झाली जरी ही छाती, अजून जळते आंतर ज्योती, कसा सावरु देह परी || होय तनूची केवळ चाळण , प्राण उडाया बघती त्यातून, मिटण्या झाले अधीर लोचन, खङग गळाले भूमीवरी

अस जसवन्त सिन्ग नि म्हटल नाहि.
हि आपलि मिडिया वाल्याचि लोणकढि.

काल च भारत पाक वर हल्ला करणार म्हणुन ब्रेकिन्ग न्युज दाखवत होते.

Pages