मुंबईवर अतिरेकी हल्ला

Submitted by समीर on 26 November, 2008 - 15:36

मुंबईत सध्या युद्धजन्य परिस्थीती झाली आहे. ATS चे ४ प्रमुख अधिकारी मारले गेले आहेत. अनेक ठिकाणी गोळीबार, बाँबस्फोट होत आहेत..त्याची चर्चा /माहिती देण्यासाठी हा धागा.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

btw भूमिका तुम्ही अमेरिकेमधे असता ना? म्हणून जरा काही शंका येत आहेत : ती पट्टी कशी लिहिली आहे त्याचा फोटो पहायला मिळेल का? कुठल्या भाषेत लिहिली आहे ? आणि तुम्ही कुठल्या सरकार ला त्याद्वारे सन्देश देत आहात?

पाकिस्तान हे एक्मेव " मुस्लिम" अण्वस्त्रधारी राष्ट्र आहे असे मला म्हणायचे होते. पण मुस्लिम हा शब्द वापरुन मला नवीन वाद निर्माण करायचा नव्हता. पण ठिक आहे स्पष्ट विचारलत ते बरे झाले. पाकिस्तान ह्या एक्मेव मुस्लिम राष्ट्राकडे आज अण्वस्त्रे आहेत. तिथली राजकिय परिस्थिति पाहता कुठलाहि सुजाण नागरिक हे ताडु शकतो कि उद्या जर पाकिस्तान वर अतिरेक्यानी कब्जा केला ..तर तुम्ही कल्पना करु शकता कि ए के ४७ , ५६ ने ह्या लोकनी २६/११ केले . तर हे विध्वंसक अणु अस्त्र सर्व जगाचा विनाश करु शकतो. हेच टाळण्यासाठी भारताने वेळीच पाउले उचलायला हवीत.

आणि मैत्रेयी ति पट्टी मी मराठित लिहिली आहे. स्वतःच्या हाताने सफेद कागदावर लाल स्केच पेन ने. तुम्हिहि ती बनवु शकता. ती तुम्हि दंड किवा कपाळावर कुठेहि लावु शकता. वैयक्तिक पातळीवर जे करता येण्यासारखे आहे ते करावे आणि त्याद्वरे अम्हि इथे आमच्या कुटुंबातर्फे भारत सरकार ला हा सन्देश देत आहोत.

तुम्हि अमेरिकेत आहात कि भारतात कि दुसर्या कुठल्याशा देशात ह्याचा आणि जे घडलाय त्याबद्दल आपला रोष व्यक्त करणे ह्याचा काय संबंध?

मला वाटते मैत्रेयी ह्या आइ डी ना असे म्हणायचय का कि भारत सोडुन दुसरिकडे दुसर्या देशात राहणार्या लोकाना आपल्या देशाबद्दल प्रेम नाहिये? तसे असेल तर आपला हा गैरसमज क्रुपया दुर करावा.

दुर राहुनहि आपण प्रधान्मंन्त्री , परराष्ट्र कार्यालयात इ मेल करुन, पत्र पाठवुन आपला निषेध व्यक्त करु शकतो. जसे आम्हि करत आहोत.
खाली तुमच्या साठी हि लिंक देत आहे जिथे अम्हि सर्व इ मेल करुन आपल्या सरकारला आमचा निषेध व्यक्त करत आहोत. तुम्हि स्वतःही करा. हातावर हात ठेवुन काहिहि होणार नाहि. लोक्शाही मार्गानेच आपण आज निषेध व्यक्त केला पाहिजे.

To mail PMO, use the following URL
http://pmindia.nic.in/write.htm

Fax: 011 - 23019334

To mail Ministry of Home Affairs, Govt of India

Website:http://www.mha.nic.in/uniquepage.asp?Id_Pk=59

Postal Address:
Ministry of Home Affairs, North Block
Central Secretariat
New Delhi - 110 001
Phone: 23092011, 2309216

Fax: 23093750, 23092763
Email: websitemhaweb@nic.in

आम्हि भले आपला देश सोडुन इथे कामानिमित्त राहात असलो तरिहि स्वतःची भारतिय अस्मिता अजुनहि जपुन आहोत आणि क्रुपया हे असले शब्द खरडुन दुसर्या देशात राहणार्या भारतिय बन्धु भगिनिंच्या भावना दुखावु नका.

>>>मुस्लिम हा शब्द वापरुन मला नवीन वाद निर्माण करायचा नव्हता.
अहो जे सत्य आहे त्यामुळे वाद कशाला निर्माण होणार??

मैत्रेयीच्या शंकेत चूक काहीच नाही. इथे मायमराठीत लिहीलेल्या पट्ट्या अंगभर जरी डकवल्या तरी कुणाला काय त्याचं महत्व ??? स्वता:च्या समाधानासाठी करणार असाल तर गोष्ट वेगळी.(पट्ट्या चिकटवून हवं तर एक फोटो काढून तो तुम्ही वर दिलेल्या आयडीवर पाठवता येईल.)

आम्हा सगळ्यांच्या भावना आणि देशप्रेम चांगलं दणकट आहे. ते येव्हड्यातेव्हड्यानं दुखवंत नाही आणि त्याचं जाहीर प्रदर्शन करण्याची गरजही वाटंत नाही.

ती पट्टी कशी लिहिली आहे त्याचा फोटो पहायला मिळेल का? कुठल्या भाषेत लिहिली आहे ? आणि तुम्ही कुठल्या सरकार ला त्याद्वारे सन्देश देत आहात ? >>>>

माझ्या मते ह्या दुर्दैवी हल्याने प्रत्येक जणच संतापलेला आहे.... आणि कोणत्या ना कोणत्या प्रकारे आपल्या भावना व्यक्त करत आहे...
e.g. मुंबई त लोकं गेटवे ऑफ इंडिया ला जमले होते.. बरेच जण आपल्या ब्लॉग वर लिहितात... किती जण मेसेंजर वर किंवा आपल्या इमेल सिग्नेचर मधे काळी फित किंवा काही स्लोगन लिहितात... आपण इथे मायबोली किंवा इतर साईटस वर तावतावने चर्चा करतो... Happy इथे अमेरीकेतही कितीतरी कंपन्यांमधे देसी लोकांनी काळ्या फिती बांधल्या होत्या...
आता ह्या सगळ्याच गोष्टी सरकारपर्यंत पोहोचतातच असे नाही पण मनातला उद्रेक कुठेतरी व्यक्त होतो...
तशाच प्रकारचा हा attempt भुमिकांचा असेल असं मला वाटतं...

मला वाटते मैत्रेयी ह्या आइ डी ना असे म्हणायचय का कि भारत सोडुन दुसरिकडे दुसर्या देशात राहणार्या लोकाना आपल्या देशाबद्दल प्रेम नाहिये? तसे असेल तर आपला हा गैरसमज क्रुपया दुर करावा. >>>> मैत्रेयी च्या पोस्ट वरून (निदान मला तरी) असं वाटत नाही की तिला असं म्हणायचं असेल..

सगळ्यांनाच एक विनंती... एकमेकांच्या पोस्ट चे किस पाडून ह्यांना हे म्हणायचं आहे का आणि त्यांना ते म्हणायचं आहे का ह्या चर्चा pls ह्या बीबी वर करू नका... भावनेच्या भरात आपण सगळेच काहीबाही लिहित आहोत.. आणि काही ठिकाणी टायपो सुद्धा झाली असल्याची शंका नाकारता येत नाही.....

धन्यवाद एडमिन.

<<पाकिस्तान ह्या एक्मेव मुस्लिम राष्ट्राकडे आज अणुवस्त्रे आहेत >>

ते 'अणुवस्त्रे' असं नसुन 'अण्वस्त्रे' आहे... अणु + अस्त्र = अण्वस्त्र अशी संधी आहे ती....

<<धन्यवाद एडमिन >>

भूमिका, अहो तो एडमिन नाहिये.... तो आपला adm (अडम) आहे... Happy

भूमिका, अहो तो एडमिन नाहिये.... तो आपला adm (अडम) आहे...

Happy

६ डिसे. ला आंबेडकर पुण्यतिथीसाठी येणार्‍या लोकांना गाईड करण्यासाठी, crowd control साठी व्ही.टी. स्टेशनला ७५ डि.एम्.व्ही. नी अशा पट्ट्या कपाळावर, दंडावर, पाठीवर लावून काम केले. तेथे त्यांना मिश्र प्रतिक्रिया मिळाल्या. तेथील ड्युटीवर असलेल्या पोलिस व कमांडोजनी वैयक्तिक पातळीवर त्यांना सांगितले की आम्हाला अशाच स्पष्ट व प्रत्येकाकडून सपोर्टची गरज आहे, आम्हाला हे पाहून खूप बरे वाटले. एक मुस्लिम तरुण म्हणाला, माझी पण हीच इच्छा आहे की असेच होवो, पण तुमच्या जे गट्स आहेत ते माझ्यात नाहीत. काही असेही भेटले की जे म्हणाले हे असे लिहून काय होणार? कशाचाही काही उपयोग होणार नाही (यावर DMVs नी जाणिवपुर्वक काहिही reaction दिली नाही). एक मिडियावाला आला व DMVs ना म्हणाला, या कमांडोज बरोबर फोटोसेशन साठी उभे रहा Angry यावर DMVs नी निक्षून नकार दिला व सांगितले की आम्ही सेवेसाठी आलो आहोत व एकिकडे आम्ही आमचा निषेधही दर्शवत आहोत, आम्हाला फोटोसेशनशी देणेघेणे नाही.

असो, आज प्रत्येकाचेच रक्त उसळते आहे, प्रत्येकाच्याच हृदयात आग पेटली आहे. दहशतवादाचे गळू कापेपर्यंत ती विझू नाही दिली पाहिजे. गळू कापताना थोडे दुखेल पण नाही कापले तर सेप्टीक भारताच्या शरीरभर पसरुन मरण पहावे लागेल Sad

जय हिंद, वंदे मातरम.

------------------------------
श्री राम राम रणकर्कश राम राम

धन्यावाद अश्विनि ताई. मी इथे अटॅच कसे करायचे फोटो? मला डिजिटल कोपी पण मिळाली आहे असे लिहलेले. इथे कसे अटॅच करायचे? मी माझ्या फोटो मधेहि तेच टाकायचा प्रयत्न करतेय.

आजच घरातहि भिन्तिवर पट्टिवर लिहुन ठेवलेय की " पाकिस्तान चा विनाश होवो" . ७ तारखेपासुन १४ तारखे पर्यंत आत्मक्लेश हि सुरु केलेत. १ आठवडा रोज १४ तास फक्त पाणी पिवुन राहायचे. सहकाराने सत्याग्रह. "गांधी गिरि " हा शब्द हेटाळणी म्हणुन बर्याच वेळा वापरलाय पण आत्मक्लेशा ने जी मनाला शांति मिळतेय आणि आपल्या भारतासाठी ज्या अटुट सामर्थ्याची आवश्यकता आहे ते मिळतेय याची अनुभुति येतेय. असे प्रत्येकाने केले तर किती मोठा परिणाम घडुन येईल ना?
आता कळतेय की १९४७ च्या आधी ...स्वातंत्र्याच्या आधी आपल्या देश बांधवांची काय मानसिकता असेल ते.

त्यांचेहि मन असेच उद्वेगाने भरुन आलेले असेल आणि तेहि देशासाठी " जिंकु आणि मारु" असेच म्हणाले असतिल. त्याच वेळी त्या महामानवाने ( गांधिजीनी ) सत्याग्रह, आत्मक्लेश चा मार्ग दाखवला. मनातला क्रोध -> ऊचित पराक्रम आणि त्या पराक्रमासाठी आवश्यक त्या सामरर्थ्यात रुपांतरित करणारा मार्ग आहे हा हे पटत आहे.

डि.एम्.व्ही. नी योग्यच केले कोणतिहि रिऍक्षन नाही दिले ते. काहिहि न करण्यापेक्शा काहितरि केलेले योग्यच. काळे निशाण पण लावुन ठेवा रोज.

भारतातल्या मुस्लिम बांधवांनी आता खुपच छान प्रतिक्रिया दिलेल्या आहेत. खरच अभिमान वाटावा असेच आज ते वागत आहेत. खात्री पटतेय कि १०० तले १ टका खराब लोके असतील पण ९९ टके मनापासुन भारतिय आहेत. खुप बरे वाटले हे सर्व पाहुन.

Happy ७ ते १४ रोज नको करुस. बेशुद्ध पडलीस तर नवर्‍याला मदतीला कोण? कमीतकमी एक दिवस करायचा आहे. अर्थात मुस्लिम लोक ३० दिवस पाण्याशिवाय रोजे करतातच Happy पण करायला गेलो एक व झाले भलतेच असे व्हायला नको. कुठचीही गोष्ट मर्यादेत पाहिजे.

------------------------------
श्री राम राम रणकर्कश राम राम

गळू कापताना थोडे दुखेल पण नाही कापले तर सेप्टीक भारताच्या शरीरभर पसरुन मरण पहावे लागेल .... >>
अगदी मनातले लिहीलेस. सुरुवात झाली आहे असे आत्त्ता वाटते तरी आहे. बघुया सरकारचा हा उत्साह किती दिवस टिकतो.

शनिवारी रात्री 'स्टार माझा' वर एक बातमी दाखवली. नागपुर मधे स्वेटर / शाली विकणार्‍या सर्व मुस्लिम बांधवांचे ID proof तपासले जात आहे. त्याच बरोबर त्यांनी सिम कार्ड खरेदी करण्यासाठी दिलेल्या कागद पत्रांची सुद्धा फेर तपसणी करण्यात येत आहे. दिवस भर काय करायचा तो धंदा करुन 'रोज' संध्याकाळी त्यांना पोलिस स्टेशन ला हजेरी लावण्याची सक्ती आहे.

हे सगळे मुंबईत केले तर किती तरी धागे दोरे हातात येतील. 'झटपट' पावले उचल्याण्याची गरज आहे. पण आपले राज्य सरकार बिचारे 'पदाचे' राजकारण, अपक्ष आमदारांचे भाव या त्यांच्या भवितव्याच्या चिंता करण्यात व्यस्त आहे. Sad

>>लालु तुम्हाला नक्की काय हवं आहे ते ठरवा,
आगाऊ, सुरक्षित भारत हवा आहे एवढे नक्की. त्यासाठी काय केले पाहिजे याबद्दच इथे मते मांडली जात आहेत. नक्की काय आणि मुख्य म्हणजे कसे केले पाहिजे हे इथे कोणाला माहित आहे असे वाटत नाही, तशी अपेक्षाही नाही. फक्त मते मांडली जात आहेत. तुमच्या मनात लष्करी राजवटीची जी प्रतिमा आहे तशी भारतात असावी असं अजिबात म्हणायचं नाही आहे हे आधीच स्पष्ट केलंय.

>>आपल्या देशाचा आकार पाह्ता दुसरी गोष्ट प्रॅक्टीकली मला शक्य वाटत नाही.
का? लोकसंख्येच्या आणि देशाच्या आकाराच्या मानाने लष्कर आणि पोलीस कमी आहेत? वाढवा मग!

>>आणी 'कटींग द हेड' असं तुम्हि म्हणत नसाल तरी ते प्रत्येक लष्करी राजवटीत होतेच,त्यामुळे भार्तीय >>लष्कराबद्दलही ? असा भाबडा भ्रम बाळगण्याची गरज नाही (इथे लष्कराचा अवमान करायचा कोणताही उद्देश >>नाही,मात्र 'power currupts & absolute power currupts absolutely',हे सुत्र सर्वांनाच लागु आहे)
हे पुन्हा तुम्ही 'लष्करी राजवट म्हणजे अशीच असते' या तुमच्या मनातल्या कल्पनेला धरुन बोलताय. देशाच्या सुरक्षिततेसाठी लष्कराचा योग्य पद्धतीने उपयोग करुन घेतला जावा असंच मला म्हणायचं आहे. मग त्याला लष्करी राजवट म्हणा किंवा अजून काही!

आम्हि भले आपला देश सोडुन इथे कामानिमित्त राहात असलो तरिहि स्वतःची भारतिय अस्मिता अजुनहि जपुन आहोत आणि क्रुपया हे असले शब्द खरडुन दुसर्या देशात राहणार्या भारतिय बन्धु भगिनिंच्या भावना दुखावु नका.

अहो भूमिका, अश्या रागावू नका. अहो, भारतात फॅशनच आहे असे म्हणायची. त्याच फॅशनचा आणखी एक भाग म्हणजे 'तुम्ही 'फोरेन' हून आलात म्हणजे तुम्हाला जास्त अक्कल आली का?'

तर त्याकडे पूर्ण दुर्लक्ष करा.

या इथे जे लोक म्हणतात पाकीस्तानचा विनाश होवो, त्यांना नक्की काय म्हणायचे आहे? पाकीस्तानवर स्वारी करून त्यांच्याकडून युद्धात हरलो असे लिहून घ्यायचे? की तिथल्या सर्व लोकांना मारून टाकायचे? की आपल्याला माहित असलेल्या वाईट, अतिरेकाला मदत करणार्‍या व्यक्तींना पकडून भारतात तुरुंगात ठेवायचे? किती आहेत असे लोक पाकीस्तानमधे? फक्त शंभर दोनशे? नि त्यांना पकडून इथे आणले तर त्यांच्यावर खटले भरायचे? नि त्याचा (कधि नि)काय निकाल लागतो, याची वाट पहायची?

फक्त पाकीस्तान्यांना पकडले की बाकी सगळे मुसलमान गप्प बसतील? कुणि इतर लोक, जसे यूरोपमधले नि इतरत्र असलेले मुसलमान गप्प बसतील? खात्री आहे?

नि पाकीस्तानचा पराभव म्हणजे त्या लोकांना भारतात सामिल करून घ्यायचे? अरे देवा! नको. नको. आहेत तेव्हढे मुसलमान सांभाळता येत नाहीत आणखी त्यात भर कशाला? त्या लोकांना अक्कल कमी, कामे करण्याची सवय नाही. त्यांचा इथे काय उपयोग? फक्त उपद्रवच!

तर त्याचा विचार करून सांगा.

शिवाय अमेरिकेनि ईराकवर हल्ला केला, नि तिथले शिया नि सुन्नी यांनी देशात गहजब माजवला. भारतातले मुसलमान शिया की सुन्नी? पाकीस्तानातले सुन्नि आहेत म्हणे. तसला गहजब भारता हवा आहे का? जरी ते आपआपसात लढले तरी आपल्या सुरक्षा यंत्रणेवर भार पडणार नाही का?

त्या दृष्टीने मला पाकीस्तानशी सर्व संबंध तोडून टाकणे नि त्याची कडक अम्मलबजावणी करणे, सीमेवरून एकहि पाकीस्तानी कुठल्याहि कारणाने भारतात येऊ शकणार नाही असे करावे.

पण हे भारतात होणार नाही. राजकारण्यांपासून खालपर्यंत प्रचंड स्वार्थी, लाचखाऊ लोक. चोरटा उद्योग सोडणार नाहीत! लाच खाणे चालूच राहील. भारताचाच विनाश आधी होईल!! तरी हे लोक थांबणार नाहीत!!

<<पण हे भारतात होणार नाही. राजकारण्यांपासून खालपर्यंत प्रचंड स्वार्थी, लाचखाऊ लोक. चोरटा उद्योग सोडणार नाहीत! लाच खाणे चालूच राहील. भारताचाच विनाश आधी होईल!! तरी हे लोक थांबणार नाहीत!!>>

अनुमोदन! एक चांगला लेख वाचनात आला. कुणी आगोदर टाकला असेल तर माफ करा पण झक्कि यांच्या पोस्टच्या अनुषंगाने टाकावासा वाटला.
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/3802774.cms

कल्पू

या इथे जे लोक म्हणतात पाकीस्तानचा विनाश होवो, त्यांना नक्की काय म्हणायचे आहे? पाकीस्तानवर स्वारी करून त्यांच्याकडून युद्धात हरलो असे लिहून घ्यायचे? की तिथल्या सर्व लोकांना मारून टाकायचे? की आपल्याला माहित असलेल्या वाईट, अतिरेकाला मदत करणार्‍या व्यक्तींना पकडून भारतात तुरुंगात ठेवायचे? किती आहेत असे लोक पाकीस्तानमधे? फक्त शंभर दोनशे? नि त्यांना पकडून इथे आणले तर त्यांच्यावर खटले भरायचे? नि त्याचा (कधि नि)काय निकाल लागतो, याची वाट पहायची?

भुमिका
पाकीस्तानचा विनाश होवो हे आपल्या देशाच्या मुळावर उठलेल्या शत्रुचा विनाश होवो असे देवाला, स्वत:ला, जगाला सांगण्यासाठी आहे. माझा एका ठाम सिधांतावर विश्वास आहे " युवर माईंडस विश ...इझ माय कमांड" असे देव सतत आपल्या मनुश्य नावाच्या बाळाला सांगत असतो. माझ्या अमेरिकन रुममेट ने मला एक पॉझिटिव विचाराची सी डी दाखवली त्यात बहुतांशी असेच होते. त्याचा मी प्रयोगहि करुन पाहिला. कुणाला नाव हवे असेल त्या सी डी चे तर मी नक्कि तिला विचारुन लिहेन.

त्यात तुम्हि इछाशक्तिला स्मरुन जे हवाय त्याची इच्छा धरा आणि ती इछा पुर्ण होतेच होते. लहान किवा मोठी कशीहि. आज किवा उद्या कधिहि... जसे की एखादा चेक , अचानक कुठुन्तरि जुनी येणी मिळणे, मित्र मैत्रिणिंची बर्याच वर्शाने भेट, परदेश वारी, एखादी गोष्ट जि अशक्य असेल असे वाटणे पण इछा करायची कि ती घडतेच. निदान मला तसे अनुभव आले.

मग आपल्या देशच्या शत्रुचा विनाश होवो अशी देवा कडे प्रार्थना केली तर बिघडते कुठे?

पाकीस्तानवर स्वारी करून त्यांच्याकडून युद्धात हरलो असे लिहून घ्यायची गरजच नाहिये कारण एकदा हरवले कि पार पाळेमुळॅ उखडुन टाकायची. तिथल्या सर्व लोकांना मारून टाकायचे असे मला मुळीच म्हणायचे नाहिये. आपल्याला माहित असलेल्या वाईट ( २० जणांची लिस्ट आहेच तयार ते सर्व) , अतिरेकाला मदत करणार्‍या व्यक्तींना, लश्कर, उद दवा एत्यादी विध्वसंक संस्थाना नेस्तनाबुत कारायचे.

मुळापासुन उखडुन टाकायचे. किती आहेत असे लोक पाकीस्तानमधे? फक्त शंभर दोनशे की हजार वीस हजार? जितकी असतिल त्या सर्वांना ( अतिरेकि आणि त्यांना मदत करणारे सर्व ) ह्या सर्वांना आपल्या सैन्याने नेस्तनाबुत करायचे. ठेचुन काढायचे हे विंचु. एकदा कि ही घाण साफ झाली कि उरलेले जे लोक्शाहिवादी - चांगली लोकं, नेते, सुशिक्शित समाजाविषयी कणव मनात असलेल्या पाकिस्तान मधल्याच नेत्याना सत्तेवर आणुन सुखाने राज्य करावे म्हणा.

भारताला कधीही पाकिस्तान ला गिळण्याचे स्वप्न नव्हते. पण आता पाणी नाका तोंडात गेलेय. युधाचा एकच नियम असतो " समोरच्या शत्रुला मारा नहितर तो तुम्हाला तुमच्या मुला बायका समवेत मारुन टाकेल. जे आताच ते अतिरेकी करुन गेलेत.

भारत सरकारने जर आताही बावळट धोरण अवलंबुन काहिहि कारवाई केली नाहि तर फार भिषण परिणाम अमेरिका आणि भारत , ईस्रायल समवेत सर्व जगाला भोगावे लागतील हे शेंबड्या पोरालाहि कळतय पण सरकार ढिम्म हलत नाहिये. आता जे काय आहे ते आपल्या देव, सुपर नैचरल पावर ज्याला मानता त्या परमेश्वरावर आहे. म्हणुन वैयक्तिक पातळिवर जितके करता येईल ते करणे तरी आपल्या हातात आहे ते करतोय. ह्यामुळे काहि होवो न होवो मनाला समाधान तरी आहे की आम्हि आमच्या शत्रुचा विनाश चिंतत आहोत.

फक्त पाकीस्तान्यांना पकडले की बाकी सगळे मुसलमान गप्प बसतील? कुणि इतर लोक, जसे यूरोपमधले नि इतरत्र असलेले मुसलमान गप्प बसतील? खात्री आहे? नि पाकीस्तानचा पराभव म्हणजे त्या लोकांना भारतात सामिल करून घ्यायचे? अरे देवा! नको. नको. आहेत तेव्हढे मुसलमान सांभाळता येत नाहीत आणखी त्यात भर कशाला? त्या लोकांना अक्कल कमी, कामे करण्याची सवय नाही. त्यांचा इथे काय उपयोग? फक्त उपद्रवच! तर त्याचा विचार करून सांगा.

भुमिका:
पाकिस्तान्याना नाहि पकडले तरिहि ते ईतर मुस्लिम गप्प बसणार आहेत का? नाहि. मुळिच नाहि. पण निदान त्यांच्यवर जरब बसेल. भारत हे आता " ईझी टार्गेट " नाहि असा वचक बसणारा संदेश तर त्या अतिरेक्यां पर्यंत नक्कि पोचेल याची १०८ % खात्री आहे.

कारण मला तरी ईथे सरळ सरळ समीकरण दिसत आहे... भारत , युरोप, अमेरिका वर कमीत कमी खर्चात जास्तित जास्त विनाश घडवुन आणण्याचे हे सगळे प्लान्स आहेत. ह्यात महत्वाच्या, सांस्क्रुतिक, केंद्रे, तेल उध्योग, अणु प्रकल्प, देशाच्या भरभराटिला जे हात्भार लावतात त्यावर हल्ले अशा गोष्टि हे अतिरेकी करत आहे हे स्पष्ट्पणे दिसत आहे. नुकतेच सोनिया गांधी ना जिवे मारण्याची धमकी देणारा फोन आलाय असे कुठल्याशा वर्तमान पत्रात वाचले. ह्याचा स्पष्ट अर्थ असा आहे कि महतवाच्या राजकिय नेत्यांना, लोकाना ( ह्यात देश विदेश सगळेच आले... ज्यावर सर्व जगातिल खास करुन श्रधा आहे असे लोकं ) ह्यांना जराहि काहि झाले तर जनमत खवळुन उठेल.

आणि जगभरातल्या मुस्लिमाना कशाला घाबरायला हवे? नि पाकीस्तानचा पराभव म्हणजे त्या लोकांना भारतात सामिल करून घ्यायचे असे काहि नाहि. तुमच्याकडे क्शमता नवह्ती म्हणुन आम्हि अतिरेक्यांवर कारवाई केली आता सांभाळा तुमचा देश असे म्हाणावे त्यांना. किंवा जे काहि त्या काळानुरुप सुयोग्य असेल तसे करावे. [ आपले राज नितिज्ञ आहेतच कि यावर विचार करायला]

त्या लोकांना अक्कल कमी, कामे करण्याची सवय नाही. त्यांचा इथे काय उपयोग? फक्त उपद्रवच! तर त्याचा विचार करून सांगा असे जे तुम्हि म्हणालात त्यावर मी आपल्या देशातल्या लोकांबद्दल काय बोलु? आपल्याकडेहि आहेतच कि असे लोक... त्यामुळे हा एक वैश्विक प्रश्न आहे.

पण म्हणुन जर आपण आज आपल्या शत्रु विरुद्ध काहि केले नाहि तर हे बूमरँग आपल्यावरच उलटणार आहे. कारण आता पाकिस्तान जि लश्कर वर कारवाई करण्याचे नाटक दाखवत आहे ते वेळ्काढु धोरण आहे. आतुन तिथे वेगळेच काहितरि भयंकर शिजत आहे असे स्पश्ट्पणे कळतय. ज्या बेनझीर ला मारायला अतिरेक्यानी मागे पुढे पाहिले नाहि तिच्या नवर्याला मारणे किवा मुशरफ प्रमाणे सत्तेआड करणे हे तिथल्या अल कायदा प्रणित एम एम ए ( मुत्तेहिद्-मजलिस्-इ-कलम) आणि लश्कर तोयबा सारख्या लोकाना मुळिच कठिण नाहिये. एका दिवसात तिथे अफरतफरी होवुन अतिरेकी प्रणित सत्ता स्थापन होवु शकते आणि असे झाले तर विनाश आणि फक्त विनाश... पण त्यावेळी हा विनाश भारत, अमेरिक, इस्रायल, युरोप आणि इतर जगाचा असेल.

कारण पाकिस्तान हे एकमेव मुस्लिम "अण्वस्रधारि " देश आहे. एकदा का हे पाकिस्तान अतिरेक्यांच्या हातात गेले तर भयंकर विनाश ठरलेलाच आहे.( जे होणे अटळ आहे जर का अमेरिका आणि भारताने वेळीच पाकिस्तान ला रोखले नाहि तर...)

जे लोक ए के ४७ , ५६ ने फक्त १० लोक येवुन आपल्या चिंधड्या उडवतात ते हातात अणु बॉम्ब आले तर काय काय करतिल ह्याचा विचारहि करवत नाहि. आणि ही भिती अनाठायी नाहिये.

शिवाय अमेरिकेनि ईराकवर हल्ला केला, नि तिथले शिया नि सुन्नी यांनी देशात गहजब माजवला. भारतातले मुसलमान शिया की सुन्नी? पाकीस्तानातले सुन्नि आहेत म्हणे. तसला गहजब भारता हवा आहे का? जरी ते आपआपसात लढले तरी आपल्या सुरक्षा यंत्रणेवर भार पडणार नाही का? पण हे भारतात होणार नाही. राजकारण्यांपासून खालपर्यंत प्रचंड स्वार्थी, लाचखाऊ लोक. चोरटा उद्योग सोडणार नाहीत! लाच खाणे चालूच राहील. भारताचाच विनाश आधी होईल!! तरी हे लोक थांबणार नाहीत!!

भुमिका:
मुख्य म्हणजे भारतातल्या हिंदु मुसलमानांमधे शत्रुत्व होणारच नाहिये हे युद्ध आहे ते भारत पाकिस्तान मधले शत्रुत्व ..त्यामुळे अशी भिती कशाला करायची? मुंबैचे पोलिस कमिशनर श्री हसन गफूर साहेब आणि श्री जावेद अहमद अश्या ईस्लाम धर्मियांच्या कर्तव्य परायणतेवर आणि देश प्रेमावर कोणिहि शंका घेवु शकणार नाहि. भारतिय मुसलमान भारतच्याच बाजुने उभे राहणार हे आतच जे दिसतय त्यावरुन स्पष्ट आहे. मुल्ला मौलवी नी मेलेल्या अतिरेक्याना दफन करयला नकार दिलेला आहे. अतिरेक्याना फाशी तीही लवकरात लवकर द्या , कडक कारवाई करा असा मुजफ्फर हुसेन यांचा उत्क्रुष्ट लेख आजच वाचनात आलाय "सामना" मधे.

हे त्यांच्या देश प्रेमाचे आणि करतव्य पालनाचेच ध्योतक आहे.

आपल्या सुरक्शा सेवेवर अतिरिक्त भार तर आहेच. पण आपण एक् करु शकतो... आपण आपल्या वैयक्तिक पातळिवर एक गस्ति पथक बनवयचे स्व्ताहच्या गल्लि पुरते, बिल्डंग पुरते, गावा पुरते , जिथे काहिहि अशी एखादी हालचाल आढळली की लगेच पोलिसाना कळवायचे.

सर्वानी च कान डोळे उघडे ठेवुन सजग राहायचे. जवळापासच्या पोलिसाना भेटुन त्यांच्याशी चर्चा करुन काहि प्लान्स करु शकतो.

निदान "इमेर्जेन्सी" वाटले तर काय करावे, पटकन कोणाला कळवावे ह्याची माहिती काढुन ती सर्वांनी आपल्या मोबाईल मधे ठेवावी. उदाहरण म्हणजे मासेमारि करणार्या कोळ्यांनी ह्या लोकाना पाहिले पण कळवले नाहि. गुजरातेतल्या मचिमार लिडर ने कळावुनहि सरकार आणि पोलिस काहिच करत नव्हते तेव्हा अशा वेळी कोणाला कळवयचे? मिडिया ला सांगु शकतो. ते ही गंभीर बाब लोकांसमोर आणुन झोपलेल्या आणि सुस्तावलेल्या अजगराना सरळ करतील. पण पोलिस सैन्य , नाविक दल सर्व दले खरच खुप चांगली आहेत. एखाद दोन असे तसे लोकं असले म्हणुन सर्व विभागच तसा असतो असे नाहि. नाहितर जिवाची बाजी लावणारे पोलिस आणि कमांडोज २६/११ मधे दिस्लएच नसते. तेव्ह ह्यांच्यावर आरोप न करता त्यांना जास्तित जास्त सहकार्य कसे करता येइल ते पाहु शकतो.

आणि सरकार कितिहि नालायक, षंढ, कचखावु काय द्यायचीत ती विशेषणे दिली तरिहि हेच सरकार आहे जे निर्णय घेणार आहे. आणि मला वाटतेय कि ह्या वेळी तरी आपण सर्वांनी देशाचे नागरिक म्हणुन सरकार वर पाकिस्तान वर कायमची कारवाई करायला लोक्शाहि मार्गाने दबाव आणलाच पाहिजे. जसे की पी एम, परराष्ट्र विभागाला इ मेल करणे, ओळखिच्या राजकारणी लोकाना भेटुन त्यांना आपाला विचार कळवणे. इथे खाली दिलेल्या लिंक वर रोज जितके पाठवता येतील तितके इ मेल करा. सुजाण नागरिक ह्या नात्याने आपल्या सरकारला आपली मते कळवा. असे करोडो अब्जो इ मेल , पत्रे त्यांना गेली तर प्रचंड जनमत दबाव आहे हे त्यांनाहि कळेल. आपले मिडिया हि ह्यात हात्भार लावतच आहे. आपण आपला खारीचा वाटा उचलुयात.

To mail PMO, use the following URL
http://pmindia.nic.in/write.htm

Fax: 011 - 23019334

To mail Ministry of Home Affairs, Govt of India

Website:http://www.mha.nic.in/uniquepage.asp?Id_Pk=59

Postal Address:
Ministry of Home Affairs, North Block
Central Secretariat
New Delhi - 110 001
Phone: 23092011, 2309216

Fax: 23093750, 23092763
Email: websitemhaweb@nic.in

त्या दृष्टीने मला पाकीस्तानशी सर्व संबंध तोडून टाकणे नि त्याची कडक अम्मलबजावणी करणे, सीमेवरून एकहि पाकीस्तानी कुठल्याहि कारणाने भारतात येऊ शकणार नाही असे करावे.राजकारण्यांपासून खालपर्यंत प्रचंड स्वार्थी, लाचखाऊ लोक. चोरटा उद्योग सोडणार नाहीत! लाच खाणे चालूच राहील. भारताचाच विनाश आधी होईल!! तरी हे लोक थांबणार नाहीत!!

भुमिका:
मान्य एकदम मान्य. हे जरी असेच असले तरिहि कुठेतरि सुरुवात तर करायलाच हवी ना? आणि हिच संधी आहे ह्या विंचवांना ठेचण्याची. सुरुवात करुया पुढे जे व्हयचय ते देवाच्या इछेनुसार होवो. आपण फक्त एव्हढेच लक्शात ठेवायचय " जिंकु किवा मरु " हे जुने झाले आता ..." त्यांना मारु आणि जिंकु" हे नवीन काळाचे नवीन धोरण आपल्या सर्वांचे आसायला हवे.

आजच एका मुसलमनाला औरंगाबाद मधे पोलिसानि अटक केलि
याने दिल्लित जे बाटला हाउस येथे जे अतिरेकि मारले गेले( जिथे मोहनलाल शर्मा शहिद झाले.) त्याना सर्व प्रकरचि मदत केलि असा त्यावर आरोप आहे.
यावरुन येथिल स्थानिक मुसलमानाचे सहभाग सिध्द होतो

त्याचा एकदा स्फोट होवुन भारताचे दोन तुकडे झाले.
---- आपण आपल्या विचारांत बदल केला नाही तर अजुनही काही भाग वेगळे होतील.

कल्पु,

लिंक बद्दल खुप खुप धन्यवाद. कोणि हे फॉर्म्स इंटरनेट वर अपलोड करु शकेल का? इथुन सह्या करुन पोस्टाने पाठवण्याचि जबाबदारि प्रत्येकचि.

भारतानी / अमेरिकेनी हल्ला करून अतिरेक्यांना मारू नये म्हणून पाक सरकार नी आज त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्या सुरक्षेची पुरेपूर काळाजी घेतली आहे...
पकडलेल्यात मसूद अजहर ही आहे...
नेहमीप्रमाणे त्यांना भारताच्या ताब्यात न देता पकिस्तानातच खटला चालवायच्या गोष्टी पाक करतय...

_______
आँखोंमें सपने लिये
घर से हम चल तो दिये
जाने ये राहें अब ले जाएगी कहाँ...!

ankyno1 - अगदी बरोबर आहे तुमचे. भारत/ अमेरिका यांना कारवाई करायला कारण नको म्हणुन हा डाव. मी मारल्यासारखे करतो, तु रडल्या सारखे कर. प्रत्येक गोष्टीत कमालीचा खोटेपणा दिसतो आहे.

आमचे अतिरेकी नव्हतेच पण आम्ही तपासात मदत करु, ISI प्रमुख भारताला तपासकामात मदत करण्यासाठी येतील, नाही ते येणार नाहीत पण प्रतिनिधी भेट देईल आता तो ही येणार नाही, आम्ही हे दुष्कृत्य केले त्याचे आम्हाला(च) पुरावे द्या, भारताने ठोस पुरावे दिल्यास आम्ही कारवाई करु, आम्ही अतिरेक्यांना पकडू पण पाक न्यायालयात त्यांच्याकर खटला भरला जाईल (गुन्हा भारतात, खटला पाकमधे), पाकिस्तान देखील अतिरेक्यांच्या कारवायांमुळे पिडीत आहे (दहशतवादाचे रोपटे कोणी लावले?), भारतातून फोन वर धमकी दिल्या गेल्याने पाक अध्यक्षांनी देशाला सतर्क रहाण्याचा (अगदी युद्धाची तयारी) सल्ला दिला, पाक लष्कराची 'तोयबा/ दवा' वर कारवाई (एव्हढ्या सहज पणे हातात आले?, कोणाला खरचटले देखील नाही?), पाकमधे मुंबई हल्ल्याची योजना आखणार्‍यास अटक केली पण या अटक केलेल्यांची चौकशी भारताला/ अमेरिकेला करता येणार नाही, कुठल्याही पाकिस्तानच्या नागरिकाला भारताच्या स्वाधीन करण्यात येणार नाही...

दुसर्‍या देशात दहशतवादी हल्ल्यांशिवाय कुठलीच गोष्ट मनापासुन करायची नाही ही सवय खुपच अंगवळणी पडली आहे.

ह्या मुस्लिम लोकाना वेगळा न्याय आहे काय १ किवा २ बस्स्स असा भारतिय नागरिकाला संदेश दिला जातो आणि आजकाल जर तो पाळला हि जातोय तर ह्यांची लोक्संन्ख्या कशी काय वाढतेय? तितकिच हिंदु ची कमी होतेय. दिपुर्झा तुम्हि दिलेली लिंक वाचली ... सर्वच भयंकर आहे. आपण खरच गप्प बसुन चालणार नाहिये.

deepurza,
तु दिलेल्या लिंक वरुन काय कारस्थान चालले आहे हे निटच कळते आहे. या सगळ्यातुन देशाला कोणी वाचवु शकेल तर जे न घाबरता, न लाजता हिंदुत्ववादाचा पुरस्कार करतात तेच.

Pages