Submitted by तृप्ती आवटी on 2 December, 2009 - 09:34
हा बाफ फक्त आणि फक्त शेपूची भाजी आवडणार्यांसाठी आहे शेपूच्या नावाने करपट ढेकर देणार्यांनी इथे येऊ नये. अपमान किंवा अनुल्लेख किंवा दोन्ही केले जाइल
आपल्याला आवडणार्या, माहिती असणार्या शेपूच्या पाककृती योग्य जागी लिहा व इथे दुवा देऊन शेपूप्रेमींची दुआ मिळवा
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
शेपू काकडी
शेपू काकडी सॅलड
http://www.maayboli.com/node/21459
\
गिरिश, छान आहेत दोन्ही कृती.
गिरिश, छान आहेत दोन्ही कृती. पण कृपया पाक कृती वेगळ्या धाग्यावर लिहून इथे लिंक देणार का ?
अगो, पराठा भारी दिसतोय. करुन बघेन एकदा.
सिंडे, करून बघणार फक्त? मी
सिंडे, करून बघणार फक्त? मी खाणार पण

(तुझीच मांजर तुझ्यावरच म्याव)
ओ के सिंडी, धन्स !
ओ के सिंडी, धन्स !
म्याव करतेस तर ठीक आहे
म्याव करतेस तर ठीक आहे फिसकारु नकोस म्हणजे झालं
शेपू काकडी
शेपू काकडी सॅलड
http://www.maayboli.com/node/21459
शेपू कॉर्न
शेपू कॉर्न फ्रिटर्स
http://www.maayboli.com/node/21457
शेपू बद्दल काही शास्त्रिय
शेपू बद्दल काही शास्त्रिय माहिती मिळवण्यासाठी लिंक-
http://www.indianspices.com/html/s0626dil.htm
शेपू डाळ गंडोरी (बंजारा
शेपू डाळ गंडोरी (बंजारा स्टाईल)
http://www.maayboli.com/node/21527
अरे हा बाफ मला आजच दिसला ही
अरे हा बाफ मला आजच दिसला ही माझी ही एक पाक्क्रुती अक्षरशहा 'पाक' क्रुती कारण ही मला माझ्या एका पाकिस्तानी मित्रानी सान्गीतलेली हा सद्ग्रुहस्त एका कम्पनीचा एम डी आहे तो एके दिवशी मला म्हणाला आज मे आपको खाना पकाके खिलाता हून बिर्याणी के साथ त्याने शेपू ला काहीतरी ऊर्दू शब्द वापरला मला तो कळला नाही पण वाटले ही काहीतरी एक्झोटिक डिश असावी असो नमनाला वगैरेघ
आशर्य वाटून घेऊ नका ह्या क्रूती साठी सगळ्यात महत्वाचे आहे म्हणजे कडक उन्ह
एक जूडी शेपूची बरीक चिरून घ्यावी चवीप्रमाणे जूडीच्या आकारप्रमाणे चार पाच लसणाच्या पाकळ्या बारीक चिरून चवीप्रमाणे मीठ हे सगळे मिश्रण एका ताट्लीत घेउन हे जस्ट ओले होईल एव्हढे ओलिव्ह ओइल घालून भिजवावे ही चटणी कमीत कमी चार तास कडक उन्हात ठेवावी
सन्ध्याकाळी ही क्रिस्प चटणी ईतकी छान लागते
क्या बात है, खूँमार आ गया..।
क्या बात है, खूँमार आ गया..।
मुद्दा भाजी शेपूची पण करता
मुद्दा भाजी शेपूची पण करता येते !
http://www.maayboli.com/node/21683
शेपू
शेपू
जियो!!! शेपू माझा जीव की
जियो!!! शेपू माझा जीव की प्राण आहे अगदी...
सिंडरेला, शेपू फॅन क्लबची आयडीया लईच्च आवडली.
मला शेपूची मूगडाळ घालून
मला शेपूची मूगडाळ घालून (कोरडी) भाजी आवडते.Sindrela सेम रेसिपि.
लहानपणी इतरांसारखीच मलाही
लहानपणी इतरांसारखीच मलाही शेपू अज्जिबात म्हणजे अज्जिबातच आवडत नसे. आईबाबांकरता कधीमधी बनत असे आणि त्यावेळी आम्ही कटाक्षानं घराबाहेरच रहायचो. शेपूला **रट वास येतो असं आमचं म्हणणं असे. अशी मी जस्ट काही महिन्यांपासून अचानक कन्व्हर्ट झाले आहे आणि नियमानुसार अत्यंत कट्टरही झाले आहे. शेपू पाहून भाजी खायची प्रचंड सुरसुरी येते.
मी वालाची डाळ रात्रभर भिजवून मग तेलावर लसूण्-हिरवी मिरची यांची फोडणी करून त्यात ही ओली डाळ कडकडीत लाल होईपर्यंत परतून मग कांदा, शेपू, हळद, मीठ घालून भाजी करते. यम्मी!!!
मी पण मी पण.............. ७
मी पण मी पण..............
७ ही दिवस जर कोणी मला शेपु तोडुन दिली. तर मी भाजी बनवुन खाउ शकतो.........
शेपूची भजी साहित्य - शेपू,
शेपूची भजी
साहित्य - शेपू, डाळीचं पीठ, २ मिरच्या, जिरे, पाणी, मोहन
कृती- शेपू चिरून घ्यावा, जिरे, मिरच्या व पाणी घालून MIXER वर बारीक करून घ्यावे..
एका भांड्यात काढून घ्यावे व त्यात मावेल इतके डाळीचं पीठ घालावे व नंतर मीठ व मोहन घालून हलवावे. हे पीठ जास्त पातळ नसावे.
नंतर कडकडीत तापलेल्या तेलात छोट्या चमच्याने भजी सोडवीत.. मस्त तळून झाल्यावर गरम गरम भजी तयार...
(हे माझा पहिलेच POST आहे मायबोली वरचे, त्यामुळे थोडे सांभाळून घ्या...)
प्राजक्ता-मंदार
मी आज डब्ब्यात शेपुची भाजी
मी आज डब्ब्यात शेपुची भाजी आणली आहे...
म्म्म्म... यम्मी.
प्राजक्ता, पहिल्यांदाच ऐकला
प्राजक्ता, पहिल्यांदाच ऐकला हा प्रकार. ईथे टाकल्याबद्दल धन्यवाद. आजच शेपु घालुन वरण केले होते! मघाशी हा बाफ बघायला वेळ झाला नाही नाहीतर आजच शेपुभजी केली असती!
मुगाचे वडे शेपु घालुन -- (मी
मुगाचे वडे शेपु घालुन -- (मी बरेचदा starters म्हणुन करते पार्टी साठी , एकदम हिट होतात हे वडे )
मुगाची डाळ ४-५ तास कोमट पाण्यात भिजवुन ठेवायची. नंतर ही भिजलेली डाळ + आलं-लसुन-हिरवी मिरची+मीठ + जिरं+कोथींबीर मिक्सर मधुन काढुन घ्यायची. पाणी अगदी जरुरी पुरते घालायचे.
ह्या मिश्रणात वरुन बारिक चिरलेला शेपु घालायचा आणि मध्यम आचे वर छान वडे तळुन घ्यायचे.
सॉस किंवा पुदिन्याच्या चटणी सोबत खायचे
(मी एकदा ह्या मधे खुप बारिक चिरलेला कांदा घातला होता .. मस्त चव आली होती तेंव्हा पासुन मी जेव्हा जेव्हा हे वडे करते तेव्हा कांदा घालतेच)
हे वडे लहान मुलांना पण खुप आवडतात त्यामुळे मिरची जरा जपुन किंवा त्यांचे साधे आणि आपले मस्त खमंग असे वेगळे करु शकता
माधुरी, सहिच.
माधुरी, सहिच.
आता एक नवीन पदार्थ जन्माला
आता एक नवीन पदार्थ जन्माला येणार आहे. शेपू अननस भाजी.... प्रेरणा: पाठारे अननस सांबारे..
माधुरी.. हे शेपूवडे
माधुरी.. हे शेपूवडे पुण्यातल्या नेहरु मेमोरियल हॉल मधली फेमस डीश होती पूर्वी..
अरे व्वा हो का !! चिउ धन्स
अरे व्वा हो का !!
चिउ धन्स
शेपू आणि अननसाचे बारीक तुकडे
शेपू आणि अननसाचे बारीक तुकडे असलेली भाजी छान झाली होती... पण शेपूला अधुन मधुन बडीशेपचा स्वाद येत होता.... शेपूच्या पानात बडीशेपच्या पानांची भेसळ तर नसेल? बडेशेपची पाने पण खातात का?
संस्कूतमध्ये शतपुष्पा
संस्कूतमध्ये शतपुष्पा म्हणतात... http://en.wikipedia.org/wiki/Dill
शेपू भरपूर लसणीबरोबर परतून
शेपू भरपूर लसणीबरोबर परतून आवडतो.
मूगडाळ, लसूण व शेपू असा प्रकार आवडता.
सासरी शेपू हा मेथीसारखा पीठ पेरून करतात.
रुचीपलट म्हणून छान लागतो.
माझ्या एका मैत्रिणीने अख्ख्या मुगाची उसळ करून जाडसर चिरलेला शेपू कोथिंबीरीसारखा त्यावर भूरभूरवला होता. तो प्रकार सरप्राईजिंगली भारी लागला. शेपूचा हवाहवासा उग्रपणा नसून त्याची मंद चव इतकी छान लागू शकते हे पहिल्यांदा समजले. त्याबरोबर तिने तव्यावरची पोळी तूप लावून पानात वाढली आणि मी मनानी माहेरी पोहोचले.
एकंदरीतच शेपू आवडतो.......म्हणजे मी प्रेमातच आहे शेपूच्या!
मैने: मुगाच्या उसाळीवर शेपू??
मैने:
मुगाच्या उसाळीवर शेपू?? भारी रेसिपी ग! नक्की करणार.
माझी आई शेपूची गोळाभाजी (लसणीच्या फोडणीच शेपूच पिठल) आणि नाचणीची भाकरी करते. हे कॉम्बिनेशन पण जबरद्स्त लागत.
कलकत्त्यात शेपू मिळत नाही
कलकत्त्यात शेपू मिळत नाही
Pages