शेपू फॅन क्लब

Submitted by तृप्ती आवटी on 2 December, 2009 - 09:34

हा बाफ फक्त आणि फक्त शेपूची भाजी आवडणार्‍यांसाठी आहे Happy शेपूच्या नावाने करपट ढेकर देणार्‍यांनी इथे येऊ नये. अपमान किंवा अनुल्लेख किंवा दोन्ही केले जाइल Proud

आपल्याला आवडणार्‍या, माहिती असणार्‍या शेपूच्या पाककृती योग्य जागी लिहा व इथे दुवा देऊन शेपूप्रेमींची दुआ मिळवा Happy

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

:-)))))))

हुश्श, काल फायनली शेपू नी मुगडाळ आली घरात.टोक्योतल्या एका मैत्रिणीला म्हटलं की शेपू आणलाय तर म्हणते 'बापरे, खाणारे कोण? आणि तोंडात घास तरी घेववेल का?' पण मी तरीही करुन , खाऊन बघणारच आहे.

हाहा, त्या मैत्रिणीच्या नवर्‍याला नॉनव्हेज पुढे कोणत्याच भाज्या आवडत नाही असं ती म्हणाली. मग म्हटलं बरोबरे. जास्त लक्ष द्यायला नको मग. Wink

अगं मग शेपू घालून चिकन मस्त लागेल. मध्ये एका मराठी कुकिंग शो मध्ये मी करडई घातलेली चिकन करी बघितली होती. मला वाटतं दाखवणार्‍या बाई मुस्लिम होत्या आणि त्यांच्याकडे सर्रास करतात अशा भाज्या करतात असं त्यांनी सांगितलं. पालेभाज्या पोटात जाण्यासाठी ही चांगली युक्ती आहे असंही त्यांनी सांगितलं Happy

आवडली. love at first bite वगैरे झालं Proud
भरपूर मुगडाळ घालून, ठेचलेली लसूण घालून केली. बेसन वगैरे लावलं नाही. वास वगैरेही उग्र वाटला नाही. आणखीन एक जुडी आहे. ह्या आठवड्यातच पुन्हा एकदा करणार.

पुढच्या वेळेस मूग डाळ थोडी कमी घालून बघ सायो. तशी पण मस्त लागते. मी फार डाळ घालत नाही. शेपूची चव जास्त यायला पाहिजे.

मीही शेपू पंखा आहे. इथे बहुतेक आत्तापर्यत सर्वचं कृत्या देऊन झाल्या असतील:

दाक्षिणात्य लोक चण्याची भिजवलेली डाळ भरड वाटून घेतात आणि मग त्यात शेपूची पाने घालतात. त्याचे मग वडे करतात. असेच वडे शेवग्याची पाने घालून देखील करतात.

भरपूर उकळी आलेल्या तुरीच्या डाळीच्या पातळ वरणात वरतून शेपू घालायची. तीही छान लागते.

दाक्षिणात्य लोक चण्याची भिजवलेली डाळ भरड वाटून घेतात आणि मग त्यात शेपूची पाने घालतात.<<
हे सह्ही लागत असणार. कॉम्बोच मस्त वाटतंय...

दाक्षिणात्य लोक चण्याची भिजवलेली डाळ भरड वाटून घेतात आणि मग त्यात शेपूची पाने घालतात. त्याचे मग वडे करतात.
<< yummyyyyyy...खरच तोंडाला पाणी सुटलं !!

नीधप-पियु-सर्व, शेंगदाण्याच्या मसाल्याची कशी करायची भाजी? मुळात तो मसाला कसा असतो?

दाक्षिणात्य लोक चण्याची भिजवलेली डाळ भरड वाटून घेतात आणि मग त्यात शेपूची पाने घालतात. त्याचे मग वडे करतात. >>>

हे खाल्लेत मी! तेव्हाच शेपू पोटात गेला पहिल्यांदा.

दिपांजली,

मी शेपू-मटकी करताना फोडणी अशी देतो:
१) दोन चमचे तिळाचे तेल, त्यात दोन चमचे सोयाबीनचे तेल.
२) मोहरी, उडीदाची डाळ, जिरे, बडीशेफ यांचे मिश्रण, तिळ - एक चम्मचं सर्व मिळून.
३) कढीपत्ता नको घालूस.
४) हळद
५) ठेचलेली लाल लवंगी मिरची आणि लसणीच्या पाकळ्या त्याही ठेचलेल्या.

वरील साहित्य फोडणीत घातले की आच एकदम मंद करुन घ्यावी. शेपूची भाजी फोडणीत घालावी. मग मीठ घालावे. पळीने एकजीव मीठ भाजी एकजीव करुन घावी. शेपूची भाजी गोळा झाली की त्यावर मटकीचा थर घालावा. मग मात्र पळीनी हलवू नकोस. खोल ताटात पाणी घालून ते ताट पातेल्यावर ठेवावे. पाण्यावर एक वाफ आली की मग मटकी आणि भाजी एकजीव करावी. मी शेवटून परत एकदा थोडे मीठ भुरभुरतो. पहिल्यांदा थोडेच मीठ घालतो. त्यामुळे भाजी खारट होत नाही.

लै भारी बाफ सिंडे. सगळ्यांच्या शेपु कृती वाचून दिल भर आया.
जानेवारीत एक आठवडा घरी शेपु महोत्सव करेन म्हणते.

माला बी म्येंबरशीप द्या वो या क्लबाची.

मी मनुच्या पद्ध्तीने थालीपीठ ,संपदाच्या पद्ध्तीने दही,शेपु काकडी घालुन कोशिंबीर्,सुनिधीच्या पद्ध्तीने चण्याची डाळ घालुन भाजी केली. त्यामुळे मी शेपु फॅन झाले आहे. मला मेम्बरशीप हवी आहे. सिंडरेला खुप खुप धन्यवाद हा क्लब सुरु केल्याबद्दल!!

Pages