Submitted by तृप्ती आवटी on 2 December, 2009 - 09:34
हा बाफ फक्त आणि फक्त शेपूची भाजी आवडणार्यांसाठी आहे शेपूच्या नावाने करपट ढेकर देणार्यांनी इथे येऊ नये. अपमान किंवा अनुल्लेख किंवा दोन्ही केले जाइल
आपल्याला आवडणार्या, माहिती असणार्या शेपूच्या पाककृती योग्य जागी लिहा व इथे दुवा देऊन शेपूप्रेमींची दुआ मिळवा
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
पाककृती नाही माहिती... पण मी
पाककृती नाही माहिती...
पण मी पंखा आहे...
मी ही. न करता, न खाताच
मी ही. न करता, न खाताच नुसत्या रेसिप्यांनी पंखा झालेय. तेव्हा अपमान, अनुल्लेख दोन्ही करु नका.
मी शेपूची भाजी कधी खाल्लीच
मी शेपूची भाजी कधी खाल्लीच नाहीय. मी आले तर चालेल का?
मी पण शेपूचा पंखा आहे.. पण
मी पण शेपूचा पंखा आहे.. पण पाकृ योजाटा वगैरे काही जमणार नाही बघा..
एक स्टँडर्ड शेपूची परतून केलेली भाजी आणि दुसरी डाळीचं पीठ लावून केलेली पातळ भाजी एवढ्याचं माहीत आहेत.. ह्या पेक्षा वेगळ्या पाकृ असतील तर नक्कीच सांगा..
सिंडे, चक्क फॅन क्लब?? मी शे
सिंडे, चक्क फॅन क्लब??
मी शे फॅ नसले तरी भाजी आवडते. शेपूची मूगडाळ घालून (कोरडी), शेपू-तूरडाळ घालून (लिपती), शेपू-पालक (पातळ) भाजी, शेपूच्या (कोथिंबीरीसारख्या) लोट केलेल्या वड्या, शेपूच्या पुर्या इतके प्रकार खाल्लेत.
मी पण अजुन फॅ झाले नाहिये पण
मी पण अजुन फॅ झाले नाहिये पण परवा केलेली आवडली..
मी पण
मी पण
मी शेपूची फॅन आहेच मी असा
मी शेपूची फॅन आहेच
मी असा करते:
हिंग हळदीची फोडणी करून त्यात भरपूर लसूण (नुस्ता ठेचलेला , अगदी पेस्ट नको) खमंग परताय्चा , त्यात शेपू घालायचा, हवा तर पाण्याचा हबका मारायचा. थोडा शिजला की तिखट मीठ घालून त्यात थोडे बेसन पेरायचे. मी भरड लाडू बेसन वापरते. शिजायला आवश्यक तेवढंच पाणी वापरायचं , जास्त नाही. झाकण ठेवून बारिक आचेवर शिजवायचं अन खाताना वरून चरचरीत हिंगाचं तेल घालून खायची ही भाजी. यम्मी लागते! माझी आई कधी कधी यात भिजवलेले शेंगदाणे पण घालते. मस्त लागतात.
मला पण शेपूची मूगडाळ घालून
मला पण शेपूची मूगडाळ घालून (कोरडी) भाजी, शेपू-पालक घालुन केलेले पिठले आणि फलाफल मधे शेपू आवडतो. अजुन काहि प्रकार असतिल तर सांगा.
ही एक माझी (म्हणजे आईची ):
ही एक माझी (म्हणजे आईची :)): मूगडाळ भिजत घालायची. अयत्या वेळी गरम पाण्यात घातली तर पटकन भिजते. शेपू स्वच्छ धुवुन, निवडुन चिरुन घ्यायचा. एक जूडी शेपूला ८-१० लसूण पाकळ्या आणि ५-६ हिरव्या मिरच्या घ्यायच्या. हिंग/हळद/मोहोरी/हि.मी.ची फोडणी करुन त्यात लसूण चांगला लाल होइतो परतून घ्यायचा. मग शेपू घालायचा. अंगचोरटी भाजी असल्याने मीठ जरा शेवटीच घालायचे.
मागे बहुतेक बी ने एक रेसिपी
मागे बहुतेक बी ने एक रेसिपी लिहिली होती. शेपू+ मटकी.
अनयुज्वल वाटते, पण चांगले लागते ते काँबिनेशन! लसणाची फोडणी करून साधारण एक लहान जुडी किंवा मोठी असेल तर अर्धी जुडी शेपू परतायचा, त्यात भिजवून मोड आलेली मटकी घालायची (मटकीचे प्रमाण आवडीप्रमाणे )अन मन्द आचेवर शिजवायची. यात काळा मसाला चवीप्रमाणे घालायचा.
छान लागते ही भाजीपण (की उसळ?)
मला शेपू मनापासून आवडत नसला
मला शेपू मनापासून आवडत नसला तरी आईच्या ओरड्यामुळे आता खाते .
शेपू स्वच्छ धुवून अगदी बारीक चिरायचा . काकडीचे सालासकट पातळ ( बटाटा वेफर्ससारखे ) काप करायचे . दह्यात मीठ , काळ्या मिर्याची पूड , जिरे पूड घालून चिरलेला शेपू घालायचा . खायच्यावेळी काकडी घालून मिक्स करायचे . शेपू घातलेले दह्याचे मिश्रण फ्रीजमध्ये ठेवून थंड करून घेतले तर फारच मस्त लागते . मिरे नको असल्यास हिरवी मिरची घालता येईल .
माणसे शेपू खातात यावरून
माणसे शेपू खातात यावरून उत्क्रांतीच्या टप्प्यात माणूस पूर्वी चतुष्पाद प्राणी होता आणि अजूनही त्यात प्राण्यांचे कॅरॅक्टर्स शिल्लक आहेत या सिद्धान्ताला पुष्टी मिळते.
(मी थोडा तिकडच्या बीबी वर जाऊन येतो :फिदी:)
शेपू मला अत्यंत आवडतो. माझ्या
शेपू मला अत्यंत आवडतो. माझ्या आवडत्या रेसिपीज.
शेपूची फळं:-
कणिक मिठ टाकुन भिजवुन घ्यावी. त्याच्या छोट्या छोट्या चपट्या गोळ्या करुन घ्याव्या. एका पातेल्यात पाणी उकळत ठेवावे, पाण्याला उकळी आल्यावर त्यावर चाळणी ठेऊन केलेली फळं वाफऊन घ्यावीत. वाफऊन झाल्यावर. एका कढईत तेलाची लसुणाची फोडणी करुन धुऊन चिरलेला शेपू तिखट, मिठ टाकुन वाफऊन घ्यावा. मग फळं टाकुन परतुन घ्यावे. जरा जास्त वेळ कढईत राहिले तर जरा कडक होतात, छान लागतात.
शेपुचं वरण:-
लसुण, जिरं, मोहोरी, कडिपत्ता, हिंगाच्या फोडणीत शेपू वाफऊन घ्यायचा. शिजला कि तुरीचं शिजलेलं वरण, तिखट, मिठ, गोडा मसाला, पाणी घालुन उकळु द्यायचं. ५-१० मि वरण तयार.
शेपू आणि ज्वारीची भाकरी.
शेपू आणि ज्वारीची भाकरी. अहाहा!!!
मला शेपु नाही आवडत. पण परवा
मला शेपु नाही आवडत. पण परवा एका रेस्तॉरंट मध्ये कच्चा शेपु घालुन सॅलाड खाल्ल. बाल्सामिक vinaigrette ड्रेसिंग होत.मस्त लागत होत.
शेपुची भाजी मी तरीही खाण अवघड आहे.
मी शेपु-पंखी(?) नाही पण, अगदी
मी शेपु-पंखी(?) नाही पण, अगदी आवडत नाही असही नाही..तर आता क्रुती.
पाल़क्-आणि शेपू सारख्या प्रमाणात घेवुन धुवुन्-कापुन घ्यावा.आल्-लसुण्-मिरचीची पेश्ट करुन तेलावर परतावी. (आवडत असेल तर अजुन लसणाचे तुकडे आधी परतुन मग पेष्ट परतावी.)शेपु-पालक टाकुन परतावा,जाडसर दाण्याचा कुट घालुन परतावे.सगळ्यात शेवटी मिठ घालावे.
माझी अजून एक: शेपू चिरुन
माझी अजून एक: शेपू चिरुन कूकरमधे शिजवुन घ्यावा. २ शिट्ट्या पुरेत. शिजलेल्या शेपूत चमचाभर डाळीचे पीठ लावावे. हिंग/हळद/मोहोरी/तिखटाची फोडणी करावी. भरपूssssर लसूण लाल होइतो परतावा आणि त्यात शेपू + पिठाचे मिश्रण घालावे. भाजी जशी पातळ हवी त्याप्रमाणे गरम पाणी घालुन उकळी काढावी.
ज्वारी/बाजरीची भाकरी, कच्चे तेल घालुन लाल मिरच्यांचा गोळा (पाट्यावर वाटलेली चटणी), कच्चा कांदा आणि ही भाजी म्हणजेच स्वर्ग
खाताना भाजीत सुद्धा चमचाभर कच्चे तेल घातले तर मस्त लागते.
शेफॅक्ल स्थापनच झाला नाही तर
शेफॅक्ल स्थापनच झाला नाही तर वाहिला सुद्धा.
सगळ्यांच्याच रेसिपी एकदम अनयुज्वल आहेत.
ह्यात आता नी ची बटाटा घातलेली भाजीही येऊ देत.
अहाहा !मस्त आहेत सगळ्या
अहाहा !मस्त आहेत सगळ्या रेसिपीज! लवकरच परत आणावा लागणार शेपू असं दिसतंय
माझी सुद्धा हि प्रचंड आवडती
माझी सुद्धा हि प्रचंड आवडती भाजी आहे. आई टोमॅटो घालुन करते.
तेलात जीर्याची फोडणी द्यायची, मग त्यात हिरवी मिरची, भरपुर लसुण घालुन परतायच. मग बरिक चिरलेले टोमॅटो परतायचे. नंतर चिरलेली शेपु घालायची. भाजी शिजत आली कि मीठ घालायचं.
सहिच आहेत एक एक पाकृ...
सहिच आहेत एक एक पाकृ...
मी पण मी पण..
मी पण मी पण..
माझी पण अतिशय आवडती भाजी.
माझी पण अतिशय आवडती भाजी. माझी पद्धत बरीचशी सिंडीसारखीच आहे.
केवळ अप्रतिम लागते.
मूगडाळ भिजत घालायची. खरंतर नाही भिजवली तरी चालते. तशीच टाकली तेलात तर अजून खरपूस लागते.
शेपू पूर्वी मी निवडून घ्यायचे. पण इथे मिळणार्या शेपूचे दांडे इतके कोवळे असतात की आजकाल मी निवडतच नाही. प्रचंड वेळ वाचतो. फक्त धुवून, बारीक चिरून घ्यायची.
तेलात हिंग, लाल सुक्या मिरच्यांची फोडणी द्यायची. (मी परतून करायच्या कुठल्याच पालेभाजीला मोहरी, जिरे, हळद घालत नाही. ) भरपूर लसणाच्या पाकळ्या नुसत्याच ठेचून त्यात टाकायच्या. जास्त करपू द्यायचा नाही लसूण. किंचीत लालसर झाला की लगेच डाळ टाकायची. डाळ खरपूस परतली गेली की शेपू टाकायचा. भाजी थोडी बसली की मीठ टाकायचे. व्यवस्थित परतून तयार झाली की बाजरीच्या भाकरीबरोबर खायची.
अरे देवा... I
अरे देवा... I LOOOOOOOVVVVEEEEEEEEEEEEEEE SHEPOOOOOOO
सिन्ड्रेला, काय झकास बीबी आहे.
मृ, नुसती नावे नको ना लिहु, कृत्या पण लिही. प्रिया, पिठले लिही ना.
मैत्रीयी, हिंगाचे तेल नक्के कसे करतेस?
कसल्या एकसे एक आहेत कृत्या..
माझी, एकदम सोपी. ही पण छान होते.
हरभरा डाळ मुठभर भिजवायची छान मऊ होईस्तोवर. १ मोठी जुडी शेपू , मुठ दिड मुठ कांदा बारीक चिरायचा.
जरासे जास्त तेल घालुन हिंग , थोडीशी हळद, मोहरी ची फोडणी करायची. कांदा छान परतुन घेऊन, डाळ टाकुन २-३ मि. परतुन घेते. मग चिरलेला शेपू घालुन झाकण न ठेवता मध्यम आचेवर शिजवते. अधुन मधुन हलवायची भाजी. शेवटी लाल तिखट, मीठ घालुन ४-५ मि. अजुन शिजवते. झाले तयार. भाकरी चे सुख नसल्याने पोळीबरोबरच खातो. whole foods म्धे काय सुरेख organic शेपू मिळतो.
मुगडाळ म्हणजे पिवळीच ना? ह्या
मुगडाळ म्हणजे पिवळीच ना? ह्या रंगाची मुगडाळ माझ्या घरी येणं एकेकाळी बंद झालंय. त्याऐवजी हिरवी सालांसकट मुगडाळ वापरली तर चालेल? की चांगली लागणार नाही फारशी?
माझी भटी रेसिपी विथ
माझी भटी रेसिपी विथ लसूण...
फोडणीत पडणार्या गोष्टी - जिरं मोहरी हळद हिंग आणि तडतडल्यावर लसणाच्या ठेचलेल्या पाकळ्या.
लसणाचा वास सुटला की वरून बटाटा घालणे.
बटाटा आधी शिजवणार नसाल तर साल न काढता पातळ काप करणे.
बटाटा आधी शिजवून घेतला तर साल काढून क्यूब्ज करायचे.
बटाटा परतून एक वाफ काढायची.
चिरलेल्या शेपूवर गूळ, गोडा मसाला आणि लाल तिखट घातलेलं असायला हवं
बटाटा शिजला की शेपू कढईत सोडायचा आणि परतायचा.
पाण्याचा हबका मारत मारत शिजू द्यायचा. पण गोळा होता कामा नये.
पूर्ण शिजला की अंदाजाने मीठ घालून परत पाण्याचा हबका, उलथन्याने सारखी करणे आणि मग एक वाफ. झाली तयार...
दुसरा शेपूचा उपयोग मी डाएट भाजी करते तेव्हा फ्लेवरसाठी म्हणून करते.
बाजारात असतील त्यातल्या सगळ्या पालेभाज्या, फळभाज्या आणि शेंगाभाज्या, मटार, मका असं जे काय फ्रेशमधलं आणि मग भिजवलेलं कडधान्यसुद्धा.. आवडत असेल ते सगळं एकत्र घालून भाजी करते.
प्रेशर पॅनमधे थोडसं तूप, जिर्याची फोडणी आणि फोडणी तडतडल्यावर अगदी बारीक चिरलेला थोडासा शेपू नी पुदीना सोडायचा. मग वरून आधी फळभाज्या मग शेंगाभाज्या मग मटार, मका इत्यादी आणि शेवटी पालेभाज्या असं घालून थोडा वेळ परतायचं. मग पाणी घालून पॅन बंद करून दोन शिट्ट्या काढायच्या. वाफ गेल्यावर मीठ घालून मंद आचेवर सारखं करायचं.
भाजी पळीवाढी, डाववाढी कशी हवी त्याप्रमाणे पाणी आटेपर्यंत ठेवायचं. मग ग्यास बंद.
ह्या भाजीत शिळ्या भाकरीचे तुकडे कुस्करून किंवा हातसडीच्या भातावर घालून हे अप्रतिम लागतं.
मी तर अनेकदा पास्ता करतानाही शेपूचा फ्लेवर म्हणून वापर करते.
शेपू घालून इडली करतात
शेपू घालून इडली करतात बंगळूरात. छान लागते. आणि नुसती इडली जरा कोरडी वाटते, तसेपण होत नाही.
मीही इकडे .. पण recipes इकडे
मीही इकडे .. पण recipes इकडे लिहील्या तर मिलिंदा/लालु वगैरे मंडळी ओरडतील की! :p
अरेरे ! परमेश्वरा याना क्षमा
अरेरे ! परमेश्वरा याना क्षमा कर !! आपण शेपू खातोय हे त्यांच्या लक्षात येत नाही आहे !!:फिदी:
Pages