शेपू फॅन क्लब

Submitted by तृप्ती आवटी on 2 December, 2009 - 09:34

हा बाफ फक्त आणि फक्त शेपूची भाजी आवडणार्‍यांसाठी आहे Happy शेपूच्या नावाने करपट ढेकर देणार्‍यांनी इथे येऊ नये. अपमान किंवा अनुल्लेख किंवा दोन्ही केले जाइल Proud

आपल्याला आवडणार्‍या, माहिती असणार्‍या शेपूच्या पाककृती योग्य जागी लिहा व इथे दुवा देऊन शेपूप्रेमींची दुआ मिळवा Happy

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हुडत्! हाड्-हूड! :p

गाढवाला गुळाची चव काय!

मराठी वाचता येतं ना .. बीबी च्या प्रस्तावनेत काय लिहीलंय ते वाचलं नाही का? योग्य त्या सूचना वाचायला कधी शिकणार लोक?

आपण निघण्याचे करावे!

:p

(मी सहसा कोणाचा अपमान करत नाही .. फक्त सिंडरेला च्या मताला मान देतेय! :p)

सशल Lol

बायांनो, मला असं वाटतं की तुम्ही रेसिपी योजाटा आणि इथे लिंक द्या...

नाहीतर तुम्ही इथेच लिहा, आणि मी पुन्हा योजा लिहितो.. Happy

आता आणि कुठे योजाटा? आहारशास्त्र नी पाककृती बीबीच आहे ना हा? नाव नेहमीपेक्षा वेगळं दिलं म्हणून काय झालं? Uhoh
तूच योजा जा नी लिहावंस हे उत्तम. Wink

शेपूचे कितीतरी प्रकार आहेत.

  1. सुकी भाजी
  2. ह्यात बटाटे,टोंमॅटो,सोया चक्सं)

  3. पातळ भाजी
  4. (वेगवेगळ्या डाळी आलटून पालटून, कधी टोंमॅटो,कधी नुसती भरपूर लसूण

  5. पिठल्यात टाकून
  6. वड्या वाफवून
  7. फलाफल
  8. मेडीटेरीयन सॅलड
  9. (दही,शेपू,काकडी रायता)

  10. कोलंबी शेफू भजी/भाजी
  11. ही भजी मस्त कुरकुरी होते/लागते. बाहेर मस्त पाउस व खिडकीत बसून ही भजी व चहा.

  12. थालीपिठ

.

मिलींदाने योग्य लिहिलं आहे. ईथे ज्या विवीध पाककृती लिहिल्या आहेत त्या प्रतिसादात न लिहिता नवीन पाककृती प्रकार वापरून तसेच शब्दखुणामध्ये "शेपू" हा शब्द देऊन लिहिल्यात तर पुढे वर्गिकरण आणि शोधाच्या दृष्टीने बरं. ईथे त्या धाग्यांच्या दुवा द्यायला हरकत नाही.

मी पण शेपू ची प्रचंड फॅन !!
वर लिहिलेल्या पाककृतिं पैकी मुग डाळ वाली, लाल मिर्ची आणि भरपूर लसणाच्या पाकळ्या टाकून फोडणी दिलेली भाजी सर्वात आवडती !
बरोबर भाकरी, हिंगाच् तेल असेल तर झक्कास !( हे वरून तेल वगैरे वर घेउन खाण्याला जमाना गुजर गया.!)

मलाही शेपूची भाजी प्रचंड आवडते. सिंडरेला, तुमची शेपूच्या भाजीची पाककृती फारच छान.. सोबत ज्वारी/बाजरीची भाकरी, लाल मिरचीचा ठेचा म्हणजे स्वर्गसुखच..
आजच इं. ग्रो. स्टोरमध्ये जाऊन शेपू आणला पाहिजे. Happy

शेपू लो. ग्रो. मधे पण चांगला मिळतो. होल फूड्समधे तर मस्तच कोवळा कोवळा मिळतो.

मिलिंदा, आता तू कोरड्या शेपूच्या सगळ्या एकात, पातळ भाजीच्या एकात आणि शेपूच्या वरणाच्या एकात अशा कन्सॉलिडेट कर रेसिप्या आणि इथे लिंका पण दे Happy

छे! अ‍ॅडमिन नी सुद्धा येऊन घसाफोड केली तरी पहिले पाढे पंचावन्न! :p

Consolidate करू नका/एकाच बीबी वर अनेक recipes लिहू नका असं सांगतायत ते .. Happy

सायो, हिरवी मूगडाळ कुठली ग? आख्खे मूग म्हणायचय का तुला? ते नाही चालणार. पिवळी डाळच पाहीजे.

>>शेपू लो. ग्रो. मधे पण चांगला मिळतो. होल फूड्समधे तर मस्तच कोवळा कोवळा मिळतो.
अनुमोदन. शेपू आणावा तर होल फूड्समधलाच. गड्ड्या पण केव्हढ्या मोठ्या असतात.

अगं कोरड्या भाजीचे एक पान, पातळ भाजीचे एक पान असे म्हणतेय मी. दोन ओळींच्या कृतीसाठी वेगवेगळी पानं नको. कारण शोधायचे म्हंटले की सगळ्या वेगवेगळ्या शोधत बसावे लागेल.
अ‍ॅडमिन, असे करायला परवानगी द्या प्लीज Happy

अमृता म्हणतेय तिच. मी हिरव्या सालीसकट असलेल्या मुगडाळीचीच खिचडी करते.
पिवळी डाळ आणि शेपू एकदमच आणेन आता.
सिंडी, सशल Lol

शेपूची डाळभाजी. (पिवळी मूगडाळ घालून.) कृती देत नाही. कारण शे. फॅ. यो. जा. कृ. टाकतीलच! ज्यांनी आधी हे ताट बघीतलंय पार्ल्यात त्यांनी 'शिळी भाजी' म्हणून बोंबलू नये. Proud सिंडी कारवायी करेल.

shepunhaji-maayboli.JPG

वा मला पण शेपू खूप आवडतो. मुगाची डाळ घालुन जी भाजी करतात शेपुची ती वरुन लिंबु पिळून आणि ज्वारीची भाकरी.... आई ग ..... स्वर्ग .

अय्या!! डाळ एवढी जास्त टाकायची असते होय? परवा बरीच कमि टाकलेली मी म्हणजे आपण दोडक्यात चणाडाळ टाकतो न? तेवढी..

शेपू फॅन क्लब...सही आयडिया ! मलापण शेपु फार आवडतो. लहानपणी शेपूची भाजी असली तर न जेवणारी मी, आता स्वतः अगदी आवडीने शेपूची भाजी करते आणि खाते.
शेंगदाण्याचा मसाला लावून केलेली शेपूची भाजी, ज्वारीची भाकरी सोबत कच्चा कांदा, कैरिचे लोणचे आणि उडदाचा पापड्....अहाहा....आठवणीनेच तोंडाला पाणी सुटले.

शेपु आणि कारले या दोन माझ्या फार आवडीच्या भाज्या आहेत. (एकेकाळी या दोघांचा 'हार्ड'वैरी असलेला मी, भाजी खरेदी करतांना यांच्या कडे ढुंकुन सुद्दा पाहत नसे. )

माझ्या आवडीचा क्रम.
१. शेपुची फळं
२. तव्यावर परतलेली.
३. थालीपिठ
४. शेपुची डाळ-भाजी.
५. शेपुच वरण
६. शेपु + बेसन.
.
.

आता कुणीतरी कारल्यावर बीबी सुरु करा Happy

इथे मिळते ते डिल पिकल्स पण सही लागतात. शेपू, etc., च्या रसां मधे मुरत ठेवलेले काकडीचे तु़कडे... एकदम जबरदस्त!!
बाकी शेपूची भाजी - साधी, पीठ पेरुन etc, तर बोलायलाच नको. सगळ्यांनी माझ्या मनातले भाव व्यक्त केलेत.
- एक शेपू भक्त.

चला बरेच लोक आहेत शेपू आवडणारे, लग्न झाल्यावर पहिल्यांदा बायकोला जेंव्हा म्हणालो मला शेपूची भाजी आवडते तेंव्हा एक तुच्छ कटाक्ष टाकला तिने Proud गावी गेल्यावर आई हमखास करते.
मला मूगडाळ टाकून, चुका-शेपू-पालक मिक्स भाजी हाटून, कोरडी भाजी पिठ पेरुन ... आ हा हा मस्तच .... सगळेच प्रकार आवडते आहेत शेपूचे.

आता कुणीतरी कारल्यावर बीबी सुरु करा >> अगदी. काफॅ आहे मी Happy

Pages