शेपू फॅन क्लब

Submitted by तृप्ती आवटी on 2 December, 2009 - 09:34

हा बाफ फक्त आणि फक्त शेपूची भाजी आवडणार्‍यांसाठी आहे Happy शेपूच्या नावाने करपट ढेकर देणार्‍यांनी इथे येऊ नये. अपमान किंवा अनुल्लेख किंवा दोन्ही केले जाइल Proud

आपल्याला आवडणार्‍या, माहिती असणार्‍या शेपूच्या पाककृती योग्य जागी लिहा व इथे दुवा देऊन शेपूप्रेमींची दुआ मिळवा Happy

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

इतकं भरुन आलय ह्या सगळ्या पोस्टी बघुन Happy आता फक्त शेपूवर एक कविता पडायचीच शिल्लक आहे Proud

अगो, शेपूमंडळ शब्द आवडला. बाफचं नाव बदलु काय ? Wink

म्हातारबुवांची माफी मागुन आजचा सुविचार टाकते आहे: अनुल्लेखाहुन मोठा अपमान नाही Lol

अहाहा ! किती सुंदर बाफ.
सकाळी शेपू आणलाच पाहिजे.
भरपूर लसूण आणि हिरवी मिरची व मुग डाळ घालून केलेली शेपूची भाजी माझी अतिशय आवडती भाजी.

मला आवडतो शेपू. पीठ पेरून बेस्ट. उंधियोसाठी करतो त्या मुठिया नुसत्या खायलाही आवडतात. शेपू घातलेलं चीजही आवडतं. Happy

मी पण शेपू फॅन. सगळेच प्रकार आवडतात पण त्यातही मुगाची डाळ अन लसूण घातलेली भाजी अन शेपू -मेथी घातलेली मकइ की रोटी हे जास्त लाडके पदार्थ. Happy

शेपूच्या बिया म्हणजे बाळशेपा. लहान बाळाना देतात ते ग्राईप वॉटर यापासूनच करतात. या बिया आणि भाजी देखील, वातासाठी उत्तम. या बिया अरब लोकात, मसाल्यात वापरतात.
आपल्या नेहमीच्या डोश्याच्या पिठात, शेपू बारीक चिरुन घातला तर तो दिसतोही चांगला आणि लागतोही चांगला.

धमाल.....धमाल क्लब आहे!! Happy

मी पण शेपु फॅन. बर्याच नव्या रेसीपीज कळाल्या.....सध्या इथे बाजारात मस्त शेपू मिळतोय ! (आता बायकोची कंबख्ती! :P)

शेफॅक्लत येउन लिहावी वाटली कविता
सिंडे ही मात्र खाSSSSSSSस तुझ्या आग्रहाकरिता Proud

तू कविता लिही म्हणालिस
मग मलाही निमित्त मिळालं
ट ला ट, र ला र जुळवायला
शेपूवरती मुक्ताफळं उधळायला

दररोज एकदातरी
मी शेपू खात जाईन
अनुल्लेखाचे तुच्छ कटाक्ष
इतरांवर मी टाकीन

अलिकडे नव्यानेच मी
मेंबरशीप घेतलिये शेफॅक्लची
माबोवर ट्रेंड आलिये
बहूढंगी शेपूच्या पदार्थांची

कधी टाकावा म्हणे आमटीत
कधी वरणफळे करावीत
उंधिओतही घालावा
नाहीतर थालिपिठे करावीत

सांगीन तिकडच्या स्वारीला
नका हो असे करपट ढेकर काढू
ही शेपूची वेगळी रेसिपी,
घ्या ना घ्या ! आणि थोडा वाढू ?

काय शिन्चे एकेक काढतील. Sad आता शेपु काय वस्तु आहे पन्खा व्हायची?
मागे एकदा एका काकवेने झोळीत चक्क शेपुची जुडी टाकलेली. Sad पुढल्या टायमाला तिच्याकडून अधपाव काजू आधी वसूल केले नि मगच पुजा सान्गितली. पुजेत पण प्रिपेड दिवस आले. हा हन्त हन्त.

मीपण मीपण.... मला शेपूच काय शेपू आंबा पण आवडतो. शाळेत असताना शेपूची भाजी डब्यात असली की डबा लवकर संपायचा माझा. Happy

ए शेपूमंडळीनो माझ्या डोक्यात एक आयडियेची कल्पना आलीये
मायबोलीवरची शेपू सुगरण शोधायची. शेपू कॉन्टेस्ट ठेवायची.
म्हणजे ...
शेपूच्या वड्या (कोथिंबीर वडी)
शेपूच्या पुडाच्या वड्या (नागपुरी )
शेपूचे पराठे (मेथीचे थेपले करतो तसे)
शेपूचे खाकरे
असे अजून नव नवे पदार्थ मिळतिल. Happy

सांगीन तिकडच्या स्वारीला
नका हो असे करपट ढेकर काढू
ही शेपूची वेगळी रेसिपी,
घ्या ना घ्या ! आणि थोडा वाढू ?

>> Rofl जमलंय , तिकडच्या स्वारीचा वाण लागला वाट्टं Proud

वा वा, काय बाफ आहे!
शेपू ही माझी फार आवडती भाजी आहे. शेपूची भाजी करण्याबद्दल मी मिनिमलिस्टिक आहे. तेल, जिरं, मोहरी, थोडीशी मुगाची डाळ (आधी १५-२० मिनिटं भिजवून घ्यावी), भरपूर हिरव्या मिरच्या आणि मीठ. शेपू निवडावी, म्हणजे जाड दांडयांचा भाग काढून टाकावा, पण चिरायची गरज नाही... शक्यतो चिरू नयेच. फक्त वाफ धरेल इतकाच २-४ थेंब पाण्याचा शिबका. बस! मंद आचेवर शिजू द्यावी. वा वा, लिहितानाच तोंडाला पाणी सुटतंय!!

१. शेपूच्या करंज्या
२. शेपू भरून स्ट्फ्ड मश्रूम्स
३. शेपू घालून ग्रिल केलेलं फिश
४. शेपूच डिप

अजून काय काय.

शेपूचे समोसे कोणी खाल्लेत का?
छान लागतात. हे समोसे चिकन किंवा मटणचा खीमा आणि शेपू वापरुन बनवतात. गल्फ मध्ये असताना भरपूर खाल्लेत. विशेषता अरबी लोक रोजा सोडताना नेहमी खातात.

कलमी व्हरायटी येण्यापूर्वी (म्हणजे तसे अजूनही आहे.) ,गावातल्या प्रत्येक आम्ब्याच्या झाडाच्या फलांची विशेषतः कैर्‍यांची चव वेगवेगळी असे. व या चवी झाडानिशी अख्ख्या गावात प्रसिद्ध असत. उदा. आमट्या(खरे तर आम्बट्या , प्रचन्ड आम्बट, ), खोबर्‍या .खोबर्यासारखा, शेन्दर्‍या (हे रंगावरून) इत्यादी. तसे आमच्या शेजार्‍याच्या झाडाला 'शेप्या' आम्बा म्हणत का तर त्याची चव 'शेपट' (गावातला शब्द) लागे. म्हणजे चक्क शेपूसारखी ! एक वेगळी चव म्हणून कधीमधी फार आम्बट नसल्याने आम्ही खात असू. त्यावेळी एखादी कैरी खाल्ली म्हणून ग्रामपंचायतीच्या इलेक्शनचे उट्टे काढण्यासाठी टाळकी फोडण्याची सुन्दर पद्धत नव्हती....

images[2]_11.jpg

लहानपणी मला शेपू अजिबात आवडत नसे कारण त्याचा तो विशिष्ट उग्र वास. पण शेपूच्या पेंडीवरून हात फिरवायला खूप आवडायचं. आमच्या घरी गौरी यायच्या दिवशी त्यांना शेपूची भाजी आणि भाकरी असा नैवेद्य असायचा. त्याचदिवशी फक्त मी कसाबसा त्या भाजीचा एक घास खायचो. आईने ही माझी नाटके बघितली. एक दिवस वाटीभर भाजी पानात वाढली आणि म्हणाली 'खा बघू ही भाजी तोंड वाकडं न करता'. माझी कुरकुर सुरू झाली. आई म्हणाली, ' ही एवढी सगळी भाजी खा. शेवटचंच. पुन्हा मी जन्मात कधीही तुला शेपूची भाजी खाऊ घालणार नाही.' जीवावर आल्यासारखं मी खायला सुरवात केली. जेवण संपल्यावर मात्र मी आईला खालमानेने सांगितलं 'मी आतापर्यंत मोठीच चूक केली शेपूला नावे ठेऊन.' Happy

शेपू फॅन क्लबचा विजय असो!

Pages