शेपू फॅन क्लब

Submitted by तृप्ती आवटी on 2 December, 2009 - 09:34

हा बाफ फक्त आणि फक्त शेपूची भाजी आवडणार्‍यांसाठी आहे Happy शेपूच्या नावाने करपट ढेकर देणार्‍यांनी इथे येऊ नये. अपमान किंवा अनुल्लेख किंवा दोन्ही केले जाइल Proud

आपल्याला आवडणार्‍या, माहिती असणार्‍या शेपूच्या पाककृती योग्य जागी लिहा व इथे दुवा देऊन शेपूप्रेमींची दुआ मिळवा Happy

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वर्ष प्रतिपदा-गुढीपाडवा -नविन वर्षाची सुरुवात ..आजच्या जेवणाचा विशेष मेनु शेपुची भाजी सुरती पापडीचे दाणे घालुन्,शेवग्याच्या शेंगाची आंबटगोड आमटी,इंद्रायणी तांदुळाचा भात,चितळ्यांचे केशरयुक्त श्रीखंड , आणि पुरी,चवीला खास कोल्हापुरी लालभडक ठेचा असा होता.आता उद्या सकाळी भाजीची पाकृ लिहीते.

रणथंबोर, <<< शेपूच्या नावाने करपट ढेकर देणार्‍यांनी इथे येऊ नये. >>> हे वरचे वाक्य वाचले नाहीत का? नसेल तर वाचावे अशी मी आपणास नम्र सूचना करू इच्छितो. Proud

मी कढईत तेल गरम करुन घेते. त्यात हिंग, मोहरी टाकुन तडतडली की त्यात बारिक चिरलेला कांदा टाकते तो परतला की बारिक चिरलेला लसुण आणी बारिक चिरालेला टमाटा टाकते. थोडे परतले की त्यात भिजलेली मुगाची डाळ टाकुन परत थोडी परतायची मग त्यात
खवलेले ओले खोबरे हळद, तिखट मिठ टाकुन परत परतायचे. मग त्यात बारिक चिरलेला शेपु टाकायचा, मिठ टाकुन कढईवर झाकण ठेउन चांगली वाफ आणायची. शिजली की गरम पोळीबरोबर खावी.

छान. मी पण शेपू फॅन क्लबात. शेपूची नेहमीची डाळ घालून भाजी, शेपू घालून वरण, शेपूचे थालीपीठ, दशम्या सगळे प्रकार आवडतात.

मला बरेच पालेभाज्या आवडतात. शेपूची मात्र खास अशी आपली एक हटके चव आहे. तिला तोड नाही. एकाच वेळी म्हणजे एकाच घासाला जास्त खाऊ शकत नाही. पण जी थोडी थोडी चवीला लाऊन खातो त्याने एकूणच घासाची लज्जत वाढते.

मलाही शेपू आवडतो , मी दाळ घालून किंवा बेसन घालून भरडा भाजी करते. त्याचा आगळावेगळा गंध आवडतो. वडिलांनी इतके वेगवेगळे आणून खायला घातले आहे , खाण्याच्या काही तीव्र आवडीनिवडी नाहीत. काही चालते ,आवडते. कडकडून भूक असली की सगळं छान लागतं. Happy
सगळ्या पाककृतीचा मुख्य घटक भूक असतो.

सगळ्या पाककृतीचा मुख्य घटक भूक असतो.>> क्या बात अस्मिता! अगदी बरोबर आहे! Happy
शेपू मलाही आवडतो. भिजवलेली मूगडाळ आणि कांदा लसूण घालून. एकदा चक्क शेपूचे पराठे केले होते मेथीसारखे. तेही मस्त झाले होते.

मी पण शेपुफॅनक्लब मधे.

वरदा - मग नेहमी कलकत्त्याला निघताना पुलंच्या पानवाल्यासारखे "यहाँ तमाकू खाय लो वहाँ तमाकू नाय" सीन असतो का तुमच्याकडे? Happy

माबोवरच आहे की शेपू चिकन पाकृ.
मला आवडेल खायला. पण आमच्या घरात अंडे सोडून, नॉनव्हेज बनवणे चालत नाही आणि बाहेर कुठे शेपू चिकन मिळेल असे वाटत नाही.

शेपू बारीक चिरुन त्यात गूळ, तांदळाचे पीठ ,मीठ पाणी घालून पातळसर करायचे.तव्यावर तेल सोडून पोळे/ धिरडी घालायची.लहानपणी हे आवडते होते.

शेपू किंवा मेथी गोळा भाजी करताना, थोडी थोडी तव्यावर टाकत परतत , कोरडी करत परततात. एकदम सगळी ओतली तर पाणी सुटून सत्यानाश होतो. पचपचीत होते.

>>>>>>>अरेरे ! परमेश्वरा याना क्षमा कर !! आपण शेपू खातोय हे त्यांच्या लक्षात येत नाही आहे !!:फिदी:
Submitted by रॉबीनहूड on 2 December, 2009 - 12:27

हाहाहा

>>>>>>मलादेखील आवडते शेपू... आलू, शेपू आणि मेथी मिळून छान भाजी बनते...
आहाहा झकास चवच कळतेय की. आलू कशातही ढकला. सर्वगुणसंपन्न, जगन्मित्र फळभाजी.
आजच जे एस क्यु ला जाउन बटाटे मेथी शेपू आणण्यात येईल. यम यम!!

धन्यवाद मंडळी! शेपू आणला खरा. मग शेपुचे कायतोळे म्हणून एक लालन सारंग यांची recipe आहे. ती शोधत होते, कुठे मिळाली नाही. पण हा धागा मात्र सापडला!

टर्किश एग्ज किंवा सिलबीर मध्ये शेपू महत्वाचा भाग असतो, मस्त क्रिस्पी बटर टोस्ट, सोबत उत्तम पोच एग्ज आणि वरतून चिली ऑइल पण हे स्वादब्रह्म अपुरे असते जोवर त्याच्यावर बारीक चिरलेले डील उर्फ शेपू नसते फायनली.

आमच्याकडे गौरी-गणपतीला जेव्हा गौरींचे आवाहन (गणपतीचा तिसरा दिवस) असतो त्यादिवशी ज्येष्ठा व कनिष्ठ गौरी बाळासोबत घरी येते असे मानतात, ती घरी अवचित आलेली माहेरवाशीण मानून तिची सायंकाळी पाद्यपूजा होते मग माहेरवाशीण वेळीच आली असल्याने जो स्वयंपाक घरी तयार आहे तोच तिला वाढण्याच्या सिम्बॉलीक अंतर्गत तूप गुळ गोडाला, भाकरी, त्या भाकरीवरच शेपूची तव्यावर परतून केलेली भाजी आणि सोबतीला दही मिर्ची असा "नैवेद्य" असतो, तो घालताना आई "जय आई महालक्ष्मी माते, चुकलंमाकलं क्षमा करा, आज माहेरवाशीण म्हणून आलात तर आहे ते गोड मानून घ्या, उद्या पुरण कुरडईचा पाहुणचार करते" असं म्हणत असे, मग दुसऱ्या दिवशी गौरींची महापूजा व सोबतीला पुरणपोळी, कटाची आमटी, डाव्या बाजूच्या उजव्या बाजूच्या पदार्थांनी परिपूर्ण नैवेद्य असे स्वरूप असे.

मी स्वतः शेपू फॅन नसले तरी माझी दोन्ही मुलं मुगाची डाळ आणि भरपूर लसणाची फोडणी घातलेली शेपू अगदी आवडीने खातात..

जेम्स वांड.. माझ्या आईकडे अशाच पद्धतीने गौरीचा नैवेद्य असतो. बाजरीची भाकरी. पण शेपू एवजी मेथी चालते

Pages