चित्रपट कसा वाटला? (जुना धागा)

Submitted by admin on 2 June, 2008 - 02:50

आपण नुकताच पाहिलेला एखादा नवीन अथवा जुना चित्रपट आपल्याला कसा वाटला? आपले परिक्षण "नवीन लेखनाचा धागा" वापरुन लिहावे.

या आधीची समिक्षा इथे पहा.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नाही तो कुणाल खेमु. हुडा सुद्धा असेल, लक्षात नाही. त्या "डी" मधे ही होता.

रणादीप हुडा मॉन्सुन वेडिंग मधे छोट्या रोल मधे होता शिवाय लव्ह खिचडी मधे, लेटेस्ट रुबरु मधे , अजुन एका मुव्ही मधे ज्यात तो इन्स्पेक्टर आणि विनोद खन्ना डॉन असतो, त्यात पण होता आणि वन्स अपॉन मधे जो इन्स्पेक्टर फ्लॅश बॅक सांगतो तो पण रणदीप हुडा!
सही आहे हुडा :).

रुबरु मधे ...

रुबरु पाहिला मी काही आठवड्यांपुर्वी.. मला त्यातला हुडा आणि चित्रपट दोन्ही आवडले.

सानी "देशद्रोही" अजिबात बघु नको. बकवास मुव्ही.>>> धन्स रचु... देशद्रोही कॅन्सल Happy

हुडा इतका हॉट आहे की बाकी हॉटीजकडे लक्षच जात नाही... कसले ते रफ लुक्स... सह्ह्ह्ही. 'वन्स अपॉन अ टाईम इन मुंबई'चा इम्पॅक्ट जाता जाईना मनातून...

सानी "देशद्रोही" अजिबात बघु नको. बकवास मुव्ही.>>> धन्स रचु... देशद्रोही कॅन्सल>>>>
निषेध, तीव्र निषेध. कमाल खान सारख्या 'फाटक्या' व्यक्तिमत्वाच्या माणूस हिंदी सिनेमाचा हिरो होण्याचे (तेही दोन-दोन हिरविणींसोबत!) धाड्स करतो. त्याच्यासाठी तरी हा सिनेमा पाहाच. Proud
सानी, तू कधी 'इट्स सो बॅड दॅट इट्स गुड' हा प्रकार ऐकला आहेस का? असे वाईट सिनेमा पाहूनच चांगल्या सिनेमाची टेस्ट तयार होते.

मी जॉर्ज क्लूनी साठी, द अमेरिकन,
मायकल डग्लससाठी, वॉल स्ट्रीट
आणि झॅक साठी सेंट मायकल (नावाबाबत खात्री नाही) बघितले.
तिन्ही अपेक्षाभंग करणारे चित्रपट.

काल कोम्डुस्कर ट्रॅवलच्या कृपेने बसमध्ये 'हापूस' पाहिला... चुलबुल पांडे नाही तर गोलमाल समोर येईल अशी अपेक्षा होती.. पण चक्क हापूस पाहिला........ .... शिवाजी साटम, सुलभा देशपाम्डे आणि अनास्कर.... चांगला मराठी चित्रपट आहे..

देसद्रोही आपल्याला तरी आवडला बुवा ! .. ( यु पी ची भासा जानत हो का नाही ? देश नाही बाबा देस.. देस.. ! ) साक्षात रामभैय्या दसरथराव सूर्यवंसी ( युपीवाले) म्हमईला वाळकेश्वरला काही दिवस राहून गेले. तिथे आता पूर्ण कचरापट्टी झाली आहे समुद्रकाठाला.... म्हमईपुढे साक्षात रामाची डाळ शिजली नाही तिथं कमाल खान किस झाड की पत्ती ! Proud

अ‍ॅक्शन रीप्ले आणि गोलमाल ३ पाहिले.
अ‍ॅ.री.बकवास ,काहिच अर्थ नाहि त्या मूवीत.त्यापेक्शा गोलमाल ३ मस्त आहे.अर्थात पहिल्या दोघांची सर नाहि,पण एवढा वाईट पण नाहि.पैसा वसूल आहे.(मी फुकटात पाहिला :))

गेल्या आठवड्यात रणवीर कपुरच्या चाहत्या मंडळींमुळे घरबसल्या 'अंजाना-अंजानी' पाहण्याची शिक्षा भोगावी लागली.. काय भयानक बकवास आहे चित्रपट. सुरू झाल्याच्या पाच सेकंदातच चित्रपट पाहायची इच्छाच मेली अचानक. उरलेली सगळी मिनिटे 'अरे निदान दबंग तरी लावा, डोके बाजुला ठेवुन, तोंड उघडे पाडून पडद्यावरची हलती चित्रे तरी पाहुया' अशी विनवणी करण्यात घालवली, पण चाहते बधले नाहीत :(. चित्रपट किती बकवास होऊ शकतो हे पाहुया असे म्हणत पुर्ण चित्रपट पाहिला. आणि चित्रपटही शुक्लपक्षातल्या चंद्रकलेसारखा मिनिटामिनिटाला जास्तच बकवास होत गेला. हा चित्रपट संबंधितानी का काढला असावा????????????? hidden agenda काय असावा????

हिडन अजेंडा, (कलाकाराना ) अमेरिकेची सहल आणि (निर्मात्याला ) इतरत्र झालेला फायदा कमी दाखवून, इनकम टॅक्स वाचवणे, असू शकतो.

हिडन अ‍ॅजेन्डा ... मला ते हिडीस अजेन्डाच वाटले Proud

अर्थात तेही खरेच म्हणा...

'इट्स सो बॅड दॅट इट्स गुड' >>> छान तत्वज्ञान!!! Happy आगावा, आता मी देशद्रोही नक्की पहाणार... Proud

दिनेशदा... तुम्ही सांगितलेले तिन्ही चित्रपट कॅन्सल... धन्स! Happy

जामोप्या, हापूस मी पण पाहिला. खुप आवडला. आपलीमराठी.कॉमवर आहे. ह्या लिंकवर क्लिका, लगेच चित्रपट पहायला लागा :हापूस (आपलीमराठी.कॉम नसते, तर किती मराठी सिनेमे आले नी गेले, समजलेही नसते.... गेल्या कित्येक दिवसांपासून मला रेणूका शहाणेचा रिटा पहायचाय...कधी मिळेल पहायला??? Uhoh )

बाकी कोणाला तमिळ येत असेल तर सांगा, अप्रतिम सिनेमांची लिस्ट देईन...

मी पाहिलेत तामिळ सिनेमे दुपारच्या दुरदर्शनवर. सबटायटल्सवाल्यांची लिस्ट दे पाठवुन मला. मला तामिळ समजत नाही

मी पाहिलेत तामिळ सिनेमे दुपारच्या दुरदर्शनवर. सबटायटल्सवाल्यांची लिस्ट दे पाठवुन मला. मला तामिळ समजत नाही>>> साधना, सबटायटल्सवाल्या फिल्म्स शोधते आणि पाठवते तुला...

फ्रिकी फ्रायडे>>> माहित नव्हता. बघते आता. Happy

गोलमाल ३ बरा आहे. मुलांनी मस्त एन्जॉय केला. एकदा पहायला चांगला आहे.

अ‍ॅ.रि अगदी कचरा. महा बोर सिनेमा.

मी आत्ताच सोशल नेटवर्क बघितला. मला खूप आवडला. तो सत्य घटनांवर आधारीत आहे का ते माहीत नाही, पण पटकथा जबरदस्त आहे. सगळेच नवे चेहरे असल्याने सत्य घटनाच डोळ्यासमोर घडताहेत असे वाटते. ऑस्करसाठी चर्चेत आहे म्हणे.

गुजारीश पाहिला , वेगळ्या धाटणीचा सिनेमा आहे , हृतिकच कौतुक करावं तेवढं कमीच आहे , संपुर्ण सिनेमा झोपुन राहण्याचा रोल करणं खरोखर एक चॅलेंज आहे आणि हृतिकने ते लिलया पार पाडलं , ऐश्वर्या आता शोभेची बाहुली राहिली नसुन खरोखर रोल मध्ये समरस होत आहे .
सिनेमा आवडला , कुठेही कंटाळवाणा वाटतं नाही हेच ह्या सिनेमाचं यश समजावं का ?

सोशल नेटवर्क मस्त आहे. सर्व कामे, स्क्रिप्ट जबरदस्त. मार्क चे काम करणारा मुलगा व लिओ यांना ऑस्कर विभागून मिळणार नक्की. जस्टिन टिंबरलेकाचे काम पण छान आहे. प्रत्येक ठिकाणी असे असतातच. मी उद्योजक बाफ वर लिहीले होते एके काळी कि काहीतरी टोचणे, आपल्या कंफर्ट झोन मधून बाहेर फेकले जाणे आपल्या वैयक्तिक ग्रोथची सुरुवात असू शकते. तसा अनुभव मार्क चा आहे. पण इन बिलियन्स ऑफ डॉलर्स. कल्ट फिल्म होणार नक्कीच. इन्सेप्शन व सो. ने. बद्दल हॉलीवूड चे आभार. सो. ने चे संगीत पण अतिशय सुंदर आहे. जस्टिन व मार्क एका डान्स क्लब मधे भेट्तात ते व सर्वच पीसेस उत्तम रचले आहेत. शेवटी मार्क फ्रेंड रिक्वेस्ट करतो व रिफ्रेश करत राहतो ते फार क्युट. मार्क सारखे सिंगल माइंडेड व फोकस्ड राहिलो असतो आयुष्यात तर ? असा प्रश्न आलाच डोक्यात. मार्क च्या मित्राचे काम पण मस्त आहे. कंपनी मध्ये मानसिक गुंतवणूक किती असते तसेच आपण म्हणजे आपला उद्योग. हे छान दाखिवले आहे. काही काही वाक्ये कल्ट होणार. द क्रिएशन मिथ नीड्स अ डेविल व आय अ‍ॅम द सीईओ, बिच हे अगदी आवडीचे. दुसरे वाक्य विदाउट स्वल्पविराम येक्दम फेवरिट. अर्थच बदलून गेला.

ब्रेंडा साँग ही डिस्ने मालिकांतून भेट्लेली ती बघून कोणीतरी ओळखीची मुलगी भेटली असे वाट्ले.
ती मित्राला तुझे स्टेट्स सिंगल का ठेवले आहेस म्हणून भांड्ते तो प्रसंग अति मस्त आहे. बायका
मुलींचे पर्स्पेक्टिव किती वेगळे व कधी कधी डिस्ट्रॅक्षन असू शकते ते दिसते. काही मुली असतात
व मार्क वगैरे कंपनीतील जबाबदारी ठरवत असतात आम्ही काय करू विचारल्यावर मार्क मुलींना
काही नको असे तुटक पणे सांगतो तेव्हा इतके हसू आले. पूर्ण सिनेमाभर पब्लिक हसत टाळ्या वाजवत होते. मी पण. ( फेसबुक आंटी? इयू! Happy ) जस्टिन च्या मैत्रिणी बरोबर एक सीन आहे त्यात ती मैत्रीण फार गोड दिसते. We get bombarded with Munni badanaam hui type brash trash all day
so we like such cuteness and underplayedness.

मार्क ची व्यक्तिरेखा आजिबात लाइकेबल करण्याचा प्रयत्न केलेला नाही. थँक गॉड. नाहीतर आपले शारूक प्रभुती. They walk around in their own mental temples. जस्टिन म्हणतो द काढून टाका नुसते फेसबुक ठेवा तो सीन मस्त आहे. वन मिलियन्थ मेंबर ची साइन झळकते व त्याच क्षणी मार्क ने त्याचा एकुलता एक साथीदार मित्र गमविला आहे धंद्यात हा सीन ही मस्त आहे. त्यातला विरोधाभास तरुणाईला भावला नसेल पण पौर्णिमाच्या आई अगदी रुद्ध वगैरे झाल्या होत्या.

रच्याकने हा सिनेमा मुंबैत तो ही रात्री ११ चा शो तो ही एका फेसबुक जनरेशन मित्राबरोबर पाहिला ही बाय इट्सेल्फ एक चित्तरकथा आहे लेकिन वो किस्सा फिर कभी. Happy <3

इन्सेप्शन व सो. ने. बद्दल हॉलीवूड चे आभार.>> १०० टका अनुमोदक!
बाकी सध्या कांती शहाच्या चित्रपटांचा शौकीन झालोय Proud
हा माणूस ठरवून इतके वाईट चित्रपट बनवतो कि ते तसे होतातच? पण निव्वळ करमणूक म्हणून सध्याच्या भंपक बॉलीवूड चित्रपटांपेक्षा हे बरेच! Happy

गुजारिश पाहिला..बर्‍याच दिवसांनी एक सुंदर चित्रपट पाहायला मिळाला. वर श्रीने लिहिलयच की अभिनयाची बाजू तगडी आहे, हृतिकने जबरदस्त परफॉर्मन्स दिलाय. अ‍ॅश, व इतर सहकलाकारांनी पण उत्तम कामे केलीत.
चित्रपट सुंदर वाटला कारण वापरलेले फ्रेम्स अतिशय सुंदर होते. गोव्याचे अप्रतिम सौंदर्य, गोव्यातील घरे उत्तम चित्रित झालीत. हृतिक समुद्रकिनार्‍यावर जातो तो प्रसंग अथवा पहिल्यांदा इच्छामरणाची इच्छा व्यक्त केल्यानंतर त्याच्या वकिलाला दिसलेले आकाश, हृतिक करत असलेले जादूचे प्रयोग इ. सगळ काही भव्य आणि अप्रतिम वाटतं. ट्रेलर्स वरुन 'ब्लॅक' सारखा वाटला पण प्रत्यक्षात ब्लॅकपेक्षा पॉसिटिव्ह वाटला.

आणखीण एक जमेची बाजू म्हणजे चित्रपटाचे संगीत, संजय लीला भन्साळींनी या चित्रपटाला स्वतः संगीत दिलय आणि नृत्यदिग्दर्शनपण केलयं. चित्रपटाची सगळीच गाणी मस्त आहेत. शीर्षक गीत पण सुंदरच. पार्श्वसंगीतावरपण मेहेनत घेतलीय हे जाणवतं. यातील एक गाणं 'माझो सायबा' विभावरी जोशीने गायलय.

श्रीने लिहिलय तसं एक वेगळ्या धाटणीचा चित्रपट आहे, स्वतःच्या आजारांना कंटाळून मृत्यूचा मार्ग पत्करणे हा पलायनवाद आहे का असं वाटत राहतं पण हृतिकची बाजू ऐकन पटतं. मराठीत इच्छामरणावर 'सुखांत' हा चित्रपट आहे, तोही पाहायला हवा आता.

'द घोस्ट रायटर' हा 'रोमन पोलंस्की' यांनी दिग्दर्शित केलेला पॉलिटिकल थ्रिलर चित्रपट पाहिला. राजकारणातून निवृत झालेल्या ब्रिटिश पंतप्रधानाच्या आठवणी पुस्तक स्वरुपात प्रसिद्ध करण्याचे ठरल्यावर त्यांनी लिहिलेल्या आठवणींचे संकलन करुन पुस्तक स्वरुपात तयार करण्यासाठी इवानची निवड घोस्ट रायटर म्हणून होते. घोस्ट रायटर म्हणजे एखाद्या व्यक्तीसाठी पडद्यामागे राहून त्यांचे विचार, आठवाणी इ. विषयावर लिखाण करणारा, ज्याचे नाव कधीच लोकांना कळत नाही.

माजी ब्रिटीश पंतप्रधान अ‍ॅडम लँग (पिअर्स ब्रॉस्नन) आपल्या आठवणी पुस्तक स्वरुपात प्रदर्शित करण्याच्या मार्गावर असतात त्याचवेळी त्यांचा घोस्ट रायटर मायकल माक्राचा गूढ मृत्यू होतो. तेव्हा त्याच्या बदली नवीन घोस्ट रायटर (इवान)ची निवड केली जाते. त्याला ही एक मोठी ससंधी वाटते, पण जसं जसं काम सुरू होतं तसं तसं विचित्र घटना घडतात. अ‍ॅडमचा एकेकाळचा सहकारी मंत्री रायकार्ट त्याच्यावर इराक युध्दात ब्रिटनने युध्दकैद्यांवर अत्याचार केलेत असा आरोप लावतो. मग एका मागोमाग घटना घडायला सुरू होतात. अ‍ॅडमची पत्नी 'रुथ' व अ‍ॅडमची सहायक 'अ‍ॅमिलिया' यांच्यातील शीतयुध्द, अ‍ॅडम राहत असलेल्या बेटावरचे गूढ वातावरण तसेच अ‍ॅडमचा ठावठिकाणा कळल्यावर युध्दविरोधी लोकांनी केलेली निदर्शने इ घटना घोस्टरायटरच्या मनात गोंधळ वाढवत असतात. याचाच मागोवा घेण्यासाठी तो अ‍ॅडमचा हार्वर्डमधील सहकारी प्रोफेसर एमेटना भेटतो पण त्यांच्याकडूनही उडवाउडवीची उत्तरे मिळाल्यावर व त्याच्या अज्ञात व्यक्तींकडून पाठलाग झाल्यानंतर त्याचा अ‍ॅडम हा 'CIA' चा एजंट आहे हा संशय दृढ होतो.

अचानक अ‍ॅडमचीच हत्या होते आणि मग जणू काही सर्व संपल्यासारखं घोस्ट रायटर त्याचे पुस्तक पूर्ण करतो. इथूनच शेवटचे रहस्य उलगडायला सुरू होते. शेवट पाहिल्यावर दिग्दर्शकाला सलामच ठोकावा असं वाटतं. पॉलिटिकल सस्पेन्स या प्रकारात पाहिलेला आणखीण एक मस्त चित्रपट.

रक्त चरित्र १ पाहिला...

मला आवडला...
रागोव आणि विवेक ओबेरॉय दोघेही त्यांच्या रिस्पेक्टिव्ह कंफर्ट झोन मधे आहेत त्यामुळे भट्टी चांगली जमैलिये...
काही प्रसंग बहुतांशी लोकांना किळसवाणे वाटू शकतात... पण दिग्दर्शकाला तेच अंगावर येणारे सीन्स अपेक्षित आहेत त्यामुळे तसं होणारंच...
कामं ही चांगली झाली आहेत...

भाग २ च्या प्रतीक्षेत...

आत्ताच 'द सोशल नेटवर्क' पाहिला. अश्विनीमामी तुमच्या संपूर्ण पोस्टला अनुमोदन, चित्रपट वेगवान आहे. मार्कला कुठेही हिरोचं वलय देण्याचा प्रयत्न केला नाही. चित्रपटाची टॅगलाइन सांगते तसं 'करोडो मित्र मिळवण्यासाठी काही शत्रू बनवावे लागतात.'

चित्रपट पाहिल्यानंतर असं वाटत राहिलं की हार्वर्ड, कोलंबिया, येल, स्टॅनफर्ड या विद्यापीठातील विद्यार्थी अशा अनेक संशोधनात गुंतले असतात. पण आपल्याकडे IIT सोडल्यास किती विद्यापीठातून अशा संशोधनाला प्रोत्साहन मिळते? किती विद्यार्थ्यांचा घरातून असा पाठिंबा मिळतो? केवळ जॉब मिळवण्यासाठीच शिक्षण घ्यायचे अशा व्यवस्थेत आपल्याला संशोधन कार्यातपण पाश्चातांवर अवलंबून राहावे लागेल काय? Sad

सोशल नेटवर्क वर फेसबुक ने बहिष्कार टाकलाय असे वाचले.
रंगासेठ, आत्ताच एका मुलाखतीत एक वाक्य वाचले, त्याचा मतितार्थ असा, कि शिक्षणाचा उपयोग केवळ पैसा कमावण्यासाठी करायचा हा आपला गैरसमज आहे, खरे तर शिक्षण म्हणजे व्यक्तीमत्व घडवण्याचा मार्ग आहे... !!

सो ने ची गोष्ट अ‍ॅक्सिडेंटल बिले कि मिलेनिएअर्स नावाच्या पुस्तकातून घेतली आहे. अगदी अ‍ॅक्युरेट नाही. खरा मार्क जास्तिच इन्स्पायरिंग आहे असे वाचले.

Pages