चित्रपट कसा वाटला? (जुना धागा)

Submitted by admin on 2 June, 2008 - 02:50

आपण नुकताच पाहिलेला एखादा नवीन अथवा जुना चित्रपट आपल्याला कसा वाटला? आपले परिक्षण "नवीन लेखनाचा धागा" वापरुन लिहावे.

या आधीची समिक्षा इथे पहा.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

डिंगोराचा डांगोरा पिटल्या बद्दल धन्यवाद मला पण तो गंध व इतर सिनेमे बघायचे होते.

ते मेंबरशिप घ्यावी लागते व क्रेडिट कार्डवर स्क्रीनिन्ग विकत घ्यावी लागेल. कलेक्षन सॉलिड आहे पण. मला साइट चा लेआउट आवड्ला. फ्रेश क्लीन अनक्लटर्ड.

उर्फ प्रोफेसर बघितला. अजिबात आवडला नाहि आणि पटला पण नाहि.अगदी अंगावर येतो.भाषा,त्यातले काहि द्रुश्ये अगदीच न बघण्यासारखी (माझे वैयक्तिक मत).माझ्यासाठी तरी अ.अ. आणि गचाळ सिनेमा.

मराठी चित्रपट 'युट्यूब' थिएटरात
17 Dec 2010, 0402 hrs IST

सौमित्र पोटे। मुंबई

पायरसीची डोकेदुखी कायम असताना त्यास इंटरनेटवरील फ्री डाऊनलोडिंगची साथ मिळाल्याने सिनेसृष्टीपुढे संकटच उभे ठाकले आहे. पण याच इंटरनेटच्या माध्यमातील 'यू ट्यूब'द्वारे मराठी सिनेरसिकांना अधिकृतरीत्या विनाशुल्क सिनेमा पाहण्याची संधी आता उपलब्ध झाली असून त्याचा फायदा मराठी सिनेसृष्टीलाही होणार आहे.

मराठी चित्रपट उद्योगातील जुनीजाणती निर्मित्ती संस्था असलेल्या 'व्हिडिओ पॅलेस'ने हे पाऊल उचलले आहे. त्यामुळे येत्या वर्षभरात 'यू ट्यूब'च्या माध्यमातून चांगल्या दर्जाचे तब्बल ४० मराठी चित्रपट प्रेक्षकांना पाहता येतील. 'मोफत डाऊनलोडिंगमुळे सिनेमा घराघरांत पोहोचत असला तरी त्यातून पैसा मिळत नसल्याने सिनेसृष्टीचा मोठा मोठा तोटा होतो. त्यामुळे आम्ही थेट 'यू ट्यूब'बरोबर करार केला असून आता चित्रपट रीलीज झाल्यानंतर त्याची ओरिजिनल प्रिंटच आम्ही त्यावर टाकणार आहोत', अशी माहिती 'व्हिडिओ पॅलेस'चे नानुभाई यांनी दिली. 'या चित्रपटांच्या सुरुवातीला, मध्यंतरात आणि शेवटी प्रायोजकांची ३० सेकंदांची जाहिरात दिसेल. या साइटवरून चित्रपट पाहणाऱ्यांची संपूर्ण माहिती कंपनीकडे असेल. त्यानुसार जाहिरातदार आणि आमच्यात उत्पन्नाची वाटणी होईल' असे त्यांनी नमूद केले.

या उपक्रमाची सुरुवात सतीश राजवाडे दिग्दशिर्त 'गैर' या अॅक्शन-थ्रिलर चित्रपटापासून झाली आहे. 'यू ट्यूब'वर 'गैर'चे स्पेलिंग टाइप केल्यास हा चित्रपट पाहता येईल. तो डाऊनलोड करता येणार नाही. इंटरनेटवर हा चित्रपट गेल्यामुळे जगभरातील मराठीजनांसाठी तो खुला होईल. त्यावरील हिट्समधून उत्पन्न मिळेल, अशी महिती त्यांनी दिली. 'गंध', 'बे दुणे साडेचार', 'उलाढाल', 'चष्मेबहाद्दर', 'एक उनाड दिवस', 'जत्रा', 'खबरदार', 'पक पक पकाक' असे अनेक चित्रपट पुढच्या काळात 'यू ट्यूब'वर टाकण्यात येणार आहेत. 'यशराज', 'राजश्री', 'इरॉस' अशा बड्या हिंदी बॅनर्सनीही व्हिडिओ साइट्सशी करार करून आपले चित्रपट साइट्सवर टाकले आहेत. मात्र त्यांचे प्रमाण कमी आहे, असे सांगण्यात आले.

धन्यवाद चिनुक्स.... स्वप्ना आपलीमराठी चालू आहे. मी बरेचसे मराठी सिनेमे आणि नाटकं याच्यावरच बघते. mansmi18 खूप उपयोगाची माहिती दिलीत.

अंजली

आताच "गैर" पाहिला यु ट्युबवर...
मला आवडला. कथानकाबद्दल काहीच लिहित नाही कारण मजा निघुन जाईल.
जरुर पहा. (मी गाणी फाफॉ केली , गाणी नसती तरी चालले असते..)

mansmi18, डेलिया आभार.

तो डाऊनलोड करता येणार नाही.>>
मटा मधे पण हीच बातमी, असंच म्हटलय. Uhoh
मी तर मघाच डाऊनलोड करून घेतला तुनळीहून! Happy
अर्थात त्यासाठी हे हवं.. http://youtubedownload.altervista.org/

गैर - एक चांगला प्रयत्न... मात्र काही चिंधीचोरांसाठी (१-२ खुन; ३-४ कोटींचा गफला) मुंबई पोलिसांनी दिड-एक वर्षं आपली यंत्रणा कामास लावली, हे काही पटलं नाही बुवा... Happy

'गैर' यू-ट्युबवर आलाय आणि चांगला आहे अशा वरच्या पोस्ट्स वाचून लगेच बघायला घेतला. सुरुवातीच्या पंधरा मिनिटांतच काहीतरी चुकतंय असं वाटू लागलं. कथानक अज्जिबात believable वाटत नव्हतं. तरी तासभर तसाच रेटला. शेवटी इतका वेळ वाया घालवलाच आहे तर शेवट तरी बघावा म्हणून डायरेक्ट शेवट पाहिला. कै च्या कै ! सस्पेन्स आणायचा म्हणून कायपण उल्लू बनवणार का प्रेक्षकांना ? साफ अपेक्षाभंग ! त्या सो कॉल्ड रहस्याबद्दल जास्त लिहित नाही पण सुरुवातीला एकदा संदीप कुलकर्णी दुभंग व्यक्तिमत्वाचा दाखवतील असंही वाटलं होतं. अर्थात तसं असतं तरीही बाकीचे प्रसंग फारच भुसभुशीत ठरले असते त्यामुळे त्या शेवटावरही पिक्चर तरला नसताच.
मराठीत एवढा चकचकीत, नेत्रसुखद पिक्चर आला पण सगळा पैसा पाण्यात असं वाटलं. सतीश राजवाडेसारख्या माणसाला निकॄष्ट कथेवर सकस चित्रपट बनू शकत नाही ही साधी गोष्ट कशी काय कळली नसावी हाच मला सर्वात मोठा सस्पेन्स वाटतो आहे Proud

अगो शी सहमत. स्लीक प्रेझेंटेशन असूनही शेवट गंडलाय.
अमिता खोपकर चा रोल काय तेच कळलं नाही/
बाकी मार्टीनी चा ग्लास आणि शँपेन चा ग्लास वेगळा असतो ना ?
बियरचा आणि शँपेनचा रंग ही वेगळा असतो ना ?
त्या लिंकच्या आजूबाजूला सांगत्ये ऐका, सवाल माझा ऐका, किचकवध असे चांगले चित्रपट आहेत. अवश्य बघा.
मी शामलन चा द लाष्ट एअरबेंडर बघितला. अगदी भूतं नसली तरी स्पिरिट्स आहेत. एकंदर कथानकातला फंडा माझ्या आकलनशक्तीच्या पलीकडचा असला तरी स्पेशल ईफेक्ट्स फार नयनरम्य आहेत. कलाकारात बरेच भारतीय वंशाचे चेहरे दिसतात.
स्पायडरमॅन फेम टोबी चा, ब्रदर्स पण बघितला. कथानक पठडीतले असले तरी (लढाईवर गेलेला मरिन, बेपत्ता होणे, तो मृत झाल्याचे समजणे, त्याच्या बायकोचे नवे प्रेमप्रकरण, पण त्याचे परत येणे वगैरे ) पण टोबीचा अभिनय दर्जेदार आहे. चेहर्‍यावरची नस न नस, डोळे यांचा वापर ग्रेट. कलाकार त्या भुमिकेत शिरण्यासाठी, शरीरावर पण किती मेहनत घेतात, ते खरेच बघावे.

'अमेरिकन ब्युटी' पाहिला, प्रचंड आवडला. त्या आवडण्यानेच,रिलेट होऊ शकण्याने, अस्वस्थता आली आहे.

हापूस बघितला .. अर्ध्यात झोप लागली पण जेव्हढा बघितला तो अर्थातच काही ग्रेट वाटला नाही ..

मधुरा वेलणकर ला लग्न मानवलेलं दिसतंय ..

तीस मार खान पाहिला: काही धमाल सीन्स आणि काही (जरा जास्तच) भंगार विनोद याचे मिश्रण आहे. दुसरा भाग बघताना वळू आठवला.

विनोदी चित्रपट म्हणून सगळेच विनोद करायला लागले तर पाचकळपणा होतो तसे झाले आहे.

खूप विनोद तर एकदम "बॅड टेस्ट" वाले आहेत. अक्षयकुमार चा नेहमी येणारा संवाद तर हॉरिबल. सेन्सॉर ने अर्धवट सोडल्यासारखा वाटतो, पण तो ही ठेवायला नको होता.

कतरिना आणि अक्षय खन्ना (हा टायपो नाही) हेच जास्त गंमत आणतात.

"दस तोला" एकदम मस्त टीपी.

तिमाखा बघण्यापेक्षा हा बघा.

Tangled -- supercute मस्त मूव्ही एकदम. डिस्ने अ‍ॅट देअर बेस्ट ... प्रिन्सेस, चेटकीण, जादू, रोमान्स, सगळे मसाले पर्फेक्ट ! मी माझी लेक अन तिच्या मैत्रिणी (सगळ्या वय ६ च्या आस पास) अशा ग्रुप बरोबर पाहिला. पर्फेक्ट एज ग्रुप!! त्यामुळे अजूनच मज्जा आली. Happy

Pages