चित्रपट कसा वाटला? (जुना धागा)

Submitted by admin on 2 June, 2008 - 02:50

आपण नुकताच पाहिलेला एखादा नवीन अथवा जुना चित्रपट आपल्याला कसा वाटला? आपले परिक्षण "नवीन लेखनाचा धागा" वापरुन लिहावे.

या आधीची समिक्षा इथे पहा.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

चिनूक्स मला वाटले तुम्ही रोबॉट नाहीतर अ अ ला गेलात कि कॉय. खिचडी खरेच मस्त असणार.

रोबोट , रजनी फॅन्सना आवडेल असा आहे. काही सिन्स हॉलीवुड मुवीजच्या थोबाडात मारतील असे आहेत विशेषतः शेवटी जेव्हा सगळे रोबोटस एकत्र येऊन वेगवेगळे शेप्स बनवतात , त्यावेळेस भल्या मोठ्या ऑफीसच्या आवारात , शेकडो कमांडोजच्या आजुबाजुला , मोठमोठी क्षेपणास्त्र सोडली जातात ते पाहुन तर बघुन तर हसावं की रडावं तेच कळत नाही.
पुर्वी ऐश्वर्याचा चेहराच बघणेबल होता आता चेहर्‍यापासुन पायापर्यंत बघणेबल झालीय म्हणायला हरकत नाही ( कोण म्हणालं रे ते , दुसर्‍यांच्या बायको / सुनेबद्दल असं बोलु नये Proud :दिवा:)

इथे मागे सिटी ऑफ गोल्ड ची चर्चा झाली होती, पण मला तो आज बघायला मिळाला.
जयंत पवारांच्या अधांतर या नाटकाचेच कथानक, मागे आणि पुढे वाढवले आहे, पण आजही त्या नाटकाचा माझ्या मनावरचा ठसा पुसलेला नाही. मी बघितलेला प्रयोग, हा मूळ संचातलाच होता, तरी काही कालावधीनंतर सादर झाला होता, आणि त्या काळात व्यस्त असलेले कलाकार, भरत जाधव, संजय नार्वेकर, राजन भिसे, लिना भागवत, सविता मालपेकर या प्रयोगासाठी एकत्र आले होते. आईच्या भूमिकेत अर्थातच ज्योति सुभाष होत्या.
या सिनेमात मात्र काही बाबी बर्‍या तर काही गोष्टी खटकणार्‍या आहेत. हे कथानक आहे १९८२ च्या गिरण्यांच्या संपाच्या काळातले. नाटकातल्या पात्रांना उगाचच चांगुलपणा दिलेला नव्हता, त्यामुळे ती अस्सल वाटत असत, चित्रपटात मात्र "तसं कुणी वाईट नसतं" हे सांगायचा प्रयत्न केलाय.
नाटकातला मोठा मुलगा लेखक बनायच्या प्रयत्नात असतो. अर्थात कमाई काहीच नसते, उलट आईकडेच पैसे मागत असतो. सिनेमात मात्र तो, मधल्या भावाने केलेल्या अफरातफरीची भरपाई करण्यासाठी किडणी विकतो.

नाटकात शेजारची मामी, मधल्या मूलाला नादी लावते. त्याला तसे काही कारण नसते. पण सिनेमात मात्र ती निपुत्रिक दाखवलीय, आणि तिचे वागणे जष्टीफाय करायचा प्रयत्न केलाय.
नाटकात वडीलांचे पात्र नाही, त्यांचे निधन झालेले असते. चित्रपटात मात्र ते पात्र आहे.
नाटकात जावयाच्या भुमिकेत असणार्‍या कलाकाराचे नाव मी विसरलो. (तोच कलाकार महेश मांजरेकर आणि सुहास जोशीच्या, डॉक्टर तूम्हीसुद्धा नाटकात पण होता.) चित्रपटात हि भुमिका सचिन खेडकरने केलीय. तो अजिबात युनियन लीडर वाटत नाही.
नाटकात नसलेले स्पीडब्रेकरचे (सिद्धार्थ जाधव) पात्र चित्रपटात आहे. त्याने चांगले काम केलेय. पण त्याच्या वडीलांच्या भुमिकेत असलेला, विनय आपटे, अगदीच मिसफिट.
चित्रपटात अनेक मराठी कलाकारांना घेतलेय याबद्दल महेश मांजरेकरचे कौतुकच करायला पाहिजे.
पण बर्‍याच बाबी खटकल्या, त्या अशा.

पहिलीच लावणी, तूमच्या गिरणीचा वाजू द्या भोंगा (हो मराठी लावणी आहे.) रेशम टिपणीस वर चित्रीत झालीय. ती हनुमान थिएटर मधे चित्रीत झालीय अशी पाटी आहे, पण चित्रीकरण करताना मात्र, ती मधे नाचतेय आणि तथाकथित कामगार तिच्या चारी बाजून आहेत, असे दाखवलेय. हनुमान थिएटरमधे स्टेज नव्हते ? तसेच ते कामगार बनियन आणि चट्ट्यापट्ट्यांच्या कापडाच्या हाफपँटीत आहेत. तमाशा बघायला जाताना, कुणी असे जाईल ?
बाकीच्या भुमिकेत मराठी कलाकार असले, तरी आईच्या महत्वाच्या भुमिकेत्,सीमा बिस्वास आहे. (ज्योति सुभाष यांच्या भुमिकेचा प्रभाव असल्याने असेल कदाचित ) पण मला ती अजिबात पटली नाही.
तसेच ती नवर्‍याला एकेरी हाक मारताना, दाखवलीय, ते पण पटले नाही.
मामीच्या भुमिकेत काश्मिरा शहा आहे. ती पण अजिबात शोभत नाही. ती ज्या पद्धतीने नऊवारी साड्या नेसलीय. ती पद्धत त्या काळात, अजिबात प्रचलित नव्हती. अशी साडी, फरारी सिनेमात, जयश्री टी पहिल्यांदा नेसली होती. पण प्रत्यक्षात तशा साड्या कुणी नेसत नसे. (त्या काळात मी गिरगावातच वावरत होतो.)

मिलमालक किशोर प्रधानच्या घरी फ्लॅट स्क्रीन टिव्ही दाखवलाय, तोही त्यावेळी असल्याचे मला आठवत नाही.
वरळीत पोलीस बंदोबस्त आहे म्हणून मुलगा कुटुंबियांना, वडीलांचे बारावे वर्सोव्याला करायला सांगतो. आता चोरुन बारावे करायचे, तर ते उघड्यावर करेल का कुणी ?
कथानक फ्लॅशबॅक मधे दाखवलेय. मराठी नाट्यलेखक, परळच्या टॉवरमधे जागा घेण्याइतका श्रीमंत झालेला दाखवलाय, हा तर मोठाच विनोद आहे.
लहान मुलांचे गुन्हेगार होणे अंगावर येते. चाळीतली खोली आणि वातावरण छान टिपलेय.
बाकी चित्रपट आणि बाकिच्या कलाकारांच्या भुमिका उत्तम आहेत.

रोबोट सह्हीच आहे. श्रीने म्हटल्याप्रमाने खरचं हॉलीवूडच्या थोबाडीत मारील असा आहे. पण काही गाणी वजा केली असती तर बरं झालं असतं. गाण्यांमुळे अडथळा येतो.

गेल्या आठवड्यात टीव्हीवर व्हॉट इज युअर राशी पाहिला(का? का? का?). रात्री ८ ला सुरू झालेला, १ नंतर संपला. ते पण १२ नंतर जाहिरातांचे ब्रेक नव्हते म्हणून.
प्रियांका चोप्राचा अभिनय एवढेच त्यात बघण्यासारखे. हरमन बावेजाबद्दल दया वाटत होती. अभिनय नाही,आवाज पण नाही. मुलगी बघण्याचा कार्यक्रम म्हणजे रोज ऑफिस मधे जाऊन कामाला लागावे तितके रुटिन दाखवले होते.
यापेक्षा मि. योगी ही मालिका नक्कीच छान होती.
काय म्हणून आशुतोष गोवारीकरने हा चित्रपट काढला?

>>काय म्हणून आशुतोष गोवारीकरने हा चित्रपट काढला>><<
आशुतोष गोवारीकरला विचारुन उत्तर मिळाल्यावर इथे लिहाल का? बर्‍याच लोकांना पडलेला हा प्रश्ण आहे. तुम्हाला समाजसेवेच पुण्य मिळेल. Proud

रोबोट पिक्चर मधे रजनीपेक्शा ऐश्वर्याच रोबोट असावी असे वाटते..(सौजन्यः तिचा रोबोटिक अभिनय Proud )
"aishwarya has proved that she also can act" असा रिव्यु टाईम्स मधे आला होता...

असा रिव्यु टाईम्स मधे आला होता >>>
टाईम्सचा रिव्यु वाचून सलमानचा युवराज पहाण्याचा मूर्खपणा केला मी ..ते सुद्धा मल्टिप्लेक्सला.. तेंव्हापासून टाईम्सच्या रिव्युवर विश्वास ठेवणं बंद केलंय कधीच..

पुर्वी ऐश्वर्याचा चेहराच बघणेबल होता आता चेहर्‍यापासुन पायापर्यंत बघणेबल झालीय म्हणायला हरकत नाही >>>>>
१०००००००००% सहमत

दिनेश, अधांतर हे अतिशय आवडलेलं नाटक असल्याने त्यावरचा सिनेमा बघायची हिंमतच झालेली नाही. काय आणि किती वाट लावलेली असेल अश्या विचाराने. पण काही क्लिप्स पाहून नक्की त्रास झाला. बिचार्‍या जयंत पवारला सिनेमा लिहिताना(आपल्याच नाटकाचे धिंडवडे काढताना!) काय यातना झाल्या असतील...
बाकी कश्मीरा शहा ला अभिनयासाठी घेतलं असेल असा तुमचा गैरसमज झालाच कसा? तिला अशी नाही तर तशी चीप आयटमगिरी करण्यासाठीच घेतले जाते. आणि तिला त्यापलिकडे काही येत असेल असा तिचाही गैरसमज नसावा. Happy

हो आणि पृथ्वीसाठी मराठी नाटक लिहिणारा (म्हणजे काय मला तरी माहित नाही!) वरळीमधे मोठ्ठा फ्लॅट घेतो हे स्वप्नरंजन तर स्वप्नरंजन म्हणूनही हास्यास्पद आहे... Wink

जावयाचे काम केलेला नट अनिल गवस.

गेल्या दोन वीकांतांना जरा बॅकलॉग भरून काढला...

वन्स अपॉन अ टाईम इन मुंबई:
सगळ्यांची कामं 'बरी'... डायलॉग्स 'जबरी'... कंगना 'खंग्री'...
एकूणात ठीकठाक...

खट्टा-मीठा:
गेल्यावर्षी आलेल्या प्रियदर्शनच्याच सहायकानी दिग्दर्शित केलेल्या 'चल चला चल' च्या प्लॉट शी खूप साधर्म्य.. बाकी सर्वार्थानी बकवास...
शेवटी ते 'आय अ‍ॅम अ‍ॅलर्जिक टू बुलशिट' गाणं आहे ते जर या लोकांनी सीरियसली घेतलं असतं तर हा सिनेमाच बनवला नसता...

आएशा:
अभय देओल चांगलं काम करतो हे सगळ्यांना ठाऊक आहे त्यामुळे ते वेगळं सांगायची गरज नाही...
सोनम कपूर काही अँगल्सनी चांगली दिसते.. पण हे अँगल्स एकूणच कमी आहेत...
अ‍ॅक्टिंगचा आणि तिचा काहीही संबंध नाही...
स्टोरी पण खूप प्रेडिक्टेबल आहे.. त्यामुळे बोअर होतो...

तेरे बिन लादेन:
धमाल सिनेमा...
मस्ट वॉच...
लजीज-अजीज मुर्गा वाला डायलॉग तर टू-गुड...

वेल डन अब्बा:
पूर्वार्धात काही काही ठिकाणी खूप संथ वाटतो.. उत्तरार्ध मात्र बराच नॉर्मल आहे...
पण बमन इराणीचं काम अफलातून आहे... मिनीशा लांबानीही बरंच चांगलं काम केलंय... ती अशा सिंपल लुकिंग रोल्स मधेच चांगली वाटते (यहाँ.. वगैरे) किडनॅप टाईप रोल्स मधे मिसफिटच वाटते...

हीच कथा थोड्या वेगळ्या रूपात 'जाऊ तिथं खाऊ' मधे पाहिली होती...
पण वन टाईम वर्थ वॉच आहे नक्की...

(कमिंग सून मधे जगमोहन मुन्द्राचा अपार्टमेंट आणि अनुराग कश्यप प्रॉडक्शन्स चा उडान आहेत..)

शेवटी ते 'आय अ‍ॅम अ‍ॅलर्जिक टू बुलशिट' गाणं आहे ते जर या लोकांनी सीरियसली घेतलं असतं तर हा सिनेमाच बनवला नसता...

प्रियदर्शनने आता नविन चित्रपट काढण्याआधी हे गाणे दिवसरात्र ऐकावे आणि त्यातुन योग्य तो बोध घ्यावा...

सोनम कपूर काही अँगल्सनी चांगली दिसते.. पण हे अँगल्स एकूणच कमी आहेत...
अ‍ॅक्टिंगचा आणि तिचा काहीही संबंध नाही...

Happy Happy हे तिला कधी कळणार??? स्टारपुत्रांचे बरे असते, त्यांच्या घरात पैसा खुप असतो वाया घालवायला...

नीधप, आभार अनिल गवस या नावाबद्दल. एवढे सगळे मोठे कलाकार असूनही, त्याची छोटि भुमिका लक्षात रहात असे.
बाकि काश्मिरा शहा, यापुढे काहि बोलण्यासारखे रहातच नाही.

अँकी, 'अपार्टमेंट' पाहण्यापेक्षा तो ज्यावरुन चोरलाय तो 'सिंगल व्हाईट फिमेल' पहा.
वन्स अपॉन ए टाईम बद्द्ल एकदम एकमत, काय सही डायलॉग्ज आहेत, ' खास चीज नही मिली इसलिए, आम चीज को खास दाम में खरिदा'

द इल्युजनिस्ट बघितला....... अप्रतिम... मास्टरपीस आहे..... दिग्दर्शकाला नक्की काय सांगायच आहे हे त्यालाच नीट महिती असल्यामुळे शेवट्पर्यंत पकड मजबुत रहाते कथानकावर...

वन्स अपॉन ए टाईम बद्द्ल एकदम एकमत, काय सही डायलॉग्ज आहेत
>>
मैने काम करनेकी जगह बदली है, तेवर नहीं..!!
अगर शेर से हल चलवाओगे तो किसान तो मरेगाही..!!

मैने काम करनेकी जगह बदली है, तेवर नहीं..!!>>> असं नाय काय!! - 'मैने अपनी जिंदगी का तरीका बदला है, तेवर नहीं'

रणदीप हुडा-शहाना गोस्वामीचा रुबरु छान आहे :).
स्टोरी आवडली आणि घेतलाय छान एकदम शेवट पर्यंत.
शहाना गोस्वामी आणि रणादीप दोघही छान वाटलेत आपापल्या रोल्स मधे, डीव्हीडी मिळाली तर अगदी नक्की बघा :).
अंजाना अंजानी पण पाहिला, जब वुई मेट च्या लायनीवरचा अजुन एक मुव्ही, ठिक आहे, टीपी म्हणून पण अडीच वर स्टार्स नाही डिझर्व करत !
रणबीर -प्रियांका पेअर अजिबात नाही आवडली, रणबीर त्या रोल साठी अगदीच बच्चा दिसतो, प्रियंका पण काही खास नाही.
सलिम सुलेमान चे बॅक्ग्राउंड म्युझिक ऐकताना 'फॅशन' ची आठवण होते, त्यात स्क्रीन वर प्रियांका !
राहतचं 'तू ना आस पास है खुदा' गाणं बाकी सुंदर आहे.

रणदीप हुडा चांगलाच आहे. त्याला मोठा ब्रेक मिळणे आवश्यक आहे. इरफान खानसारखा. पेन्डसे गुरुजी म्हणत होते इरफान खान टिपू सुलतानपासून चांगले काम करतोय पण उशीरा न्याय मिळाला...

रणादीप हुडा अंडररेटेड आहे, मागे पण २-३ मुव्हीज मधे छान काम केलं होतं, एक लव्ह खिचडी आणि एक विनोद खन्न्ना बरोबर चा कुठला तरी, त्यात इन्स्पेक्टर चा रोल केला होता, छान अ‍ॅक्टिंग करतो आणि दिसायला सुध्दा कसला हंक आहे !!
तरी फारसा दिसत नाही. (खरं तर चांगलच आहे, ओव्हर एक्स्पोजर झालेले चेहरे पाहून कंटाळा येतोच आणि ते चेहरे ' कॅरेक्टर्स' पण वाटत नाहीत सहसा, त्या पेक्षा मोजक्या मुव्हीज मधे दिसणारे चेहरे पहाताना छान वाटतं.)

Pages