चित्रपट कसा वाटला? (जुना धागा)

Submitted by admin on 2 June, 2008 - 02:50

आपण नुकताच पाहिलेला एखादा नवीन अथवा जुना चित्रपट आपल्याला कसा वाटला? आपले परिक्षण "नवीन लेखनाचा धागा" वापरुन लिहावे.

या आधीची समिक्षा इथे पहा.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

'ग्रीन झोन' आवडला होता. पुस्तकाचा लेखक जॉन स्टुअर्टवर आला होता. आय ओपनर. काल 'घोस्ट रायटर' बघितला. चांगला पोलिटिकल थ्रिलर. रोमन पोलॅन्स्कीचा आहे.

किमी काटकर आणि ऋषी कपूर आहे का ह्यात?
<< तो 'खोज' ना ?
ज्यात किमी त्याची बायको असल्याचं नाटक करत असते ?
धुन्द चांगलाय झीनत अमान चा.

हो हो तो खोज .. त्यातही सस्पेंस बरा होता म्हणून मला तोच आठवला ..

परवा अटोनमेंट बघितला .. चांगलाही नव्हता आणि वाईटही नव्हता .. Happy

"नॉक आउट" मस्त वाटला. संजय दत्त आणि इरफान मस्त काम केलय. तो इन्स्पेक्टर् कोण आहे, चांगला कलाकार वाटतो.

५०० कोटी इनोव्हात आणि ३२००० कोटी इंटरनेटवरुन ट्रान्सफर.... हम्म्म .. ते सोडुन पिच्चर पैसा वसुल. ट्रेलरमध्ये इरफान (खान ?) नाचताना दाखवला आहे, तो सीन मजेदार वाटला.

इंडीया टिव्हीची रिपोर्टर कोण आहे. नवा चेहरा वाटतो. आवाज कापलेला वाटला, बरेचदा.

नवा चेहरा वाटतो
>>
कंगना रणाऊत आहे ती...
बर्‍यापैकी जुना झाला तो चेहेरा आता...

@ अँकी नं. १ :- अरे ! म्हणजे मी म्हातारा झालो वाटते. Happy आता नविन हिरवीन ओळखु येत नाही मला Wink हा हा हा ......

क्रुक ची हिरॉइन रविना टंडनसारखी दिसते... ( माझेही वय झाले की काय? ) Happy

हिस्स... नावाचा भयाण चित्रपट बघण्याचं धाडस करु नका ! काल मी यूट्यूब वर फक्त ट्रेलर पाहिलं. आई गं !!!!!!!!!!! काय बिभत्स प्रकार होता तो !

कालच 'कातीन' हा पोलीश चित्रपट पाहिला. दुसर्‍या महायुध्द्दात रशियाने पोलंड व्यापल्यावर जवळपास १२००० पोलीश ऑफिसर्सची हत्या केली, कातीन या स्थळी व आख्या जगासमोर इतिहास दडवून ठेवला.
पण नंतर जर्मनीने रशियावर आक्रमण केले त्यावेळी त्यांनी त्या ठिकाणावरील हत्याकांदावर प्रकाश टाकला व त्याचा वापर रशियाविरुध्द केला.
संपूर्ण चित्रपटात हिंसा अगदी शेवटच्या १५ मिनिटात येते जे की एखाद्या युध्दपटाच्या दृष्टीने नवलच आहे. चित्रपट पाहताना सुन्न होतं व रशियन अस्वलाने असे आणखीण किती नृशंस हत्याकांड लपवून ठेवले असतील याचीच शंका येते.

मिपावर या चित्रपटाबद्दल वाचले, तेथील माहितीपूर्ण परिक्षणाचा दुवा -> कातीन...एक दडवलेला इतिहास...

मी काल रोबो बघितला. सानी ने लिहिल्याप्रमाणे, काही विनोद भाषांतरात निष्प्रभ ठरलेत. (उदा. मुंबईत हप्ता / चायपानी / तोड हे शब्द वापरात आहेत, कट नाही ). ज्या अर्थी "भावना, प्रेम " हे शब्द देवनागरीत लिहून दाखवलेत, त्या अर्थी दोनदा शूटींग केलेले आहे. मग तसे सगळेच विनोद हिंदीत आणता आले असते.
टेक्नीकली ठिक, पण फार ग्रेट नाही वाटला. ऐश्वर्या खुप सुंदर दिसलीय / नाचलीय.
हेवी गेटप, तिला शोभलाही आहे.
रजनीकांतला तरुण दाखवण्यासाठी बराच खर्च / मेकप केलाय. त्याने अभिनय बरा केलाय पण तो तेवढा फिट वाटत नाही. रोबो म्हणून आणखी कुणीतरी हवा होता (उदा. हरमन बावेजा !!) पण मग शेवटचा प्रसंग गंडला असता. रोबो म्हणून हृतिक असता तर त्याने सगळा सिनेमा खाल्ला असता !
ज्याला हुबेहुब मानव दिसणारा रोबो बनवता येतो, त्याला ऐश्वर्याचा रोबो पण बनवता आला असता. (बुद्धीमत्तेच्या चीपचा खर्च वाचला असता.)
हाताची शीर कापून फक्त एकच थेंब रक्त येते ?
लेबर रुममधल्या पेशंट बद्दल, कुणीतरी एकच वाचेल, असे डॉक्टर बोलतात ?
माचू पिचू चे दर्शन छान.

रक्तचरित्र पाहिला.......... रिव्ह्यु लिहिलेल्यानी चांगला असा रिव्ह्यु का दिला ते कळले.......... ३०-४० मर्डर तेही वेगवेगळ्या पद्धतीनी......... घाबरुन लिहिले असणार त्यानी........... Happy

आता काय बघू ? हिस्स्स्स्स का कस्स्स्स्स ?

संजय दत्त-इरफान खान चा 'नॉक आउट् '( इन्स्पायर्ड मुव्ही असला तरीही) आणि अक्षय खन्ना-अजय देवगण-परेश रवाल चा 'आक्रोश' दोन्ही आवडले.
एकदा बघायला छान वाटले दोन्ही.

परेश रवाल? हा कोण आहे? गावस्करला अखेरपर्यन्त गवास्कर म्हणणारे लोक सम्पले नाहीत वाटतं !

अ‍ॅक्शन रिप्ले पाहिला. ठिकठाक आहे, एकदा चुकुन चित्रपटगृहात पाहिला तर पैसे फुकट गेल्यासारखे वाटणार नाही, पण आवर्जुन चित्रपटगृहात जाऊन बघण्यासारखेही काही नाही. अक्षयकुमारने दोन्-चार वाईट चित्रपट दिल्यानंतर ह्या चित्रपटात जरा बरे काम केले आहे. ऐश्वर्याजागी दुसरी कोणीही असती तरी फरक पडला नसता. शोभेच्या बावलीचेच काम आहे. फक्त ऐश्वर्यामुळे जरा स्टार व्हॅल्यु आली एवढेच. त्या दोघांचा पोरगा मात्र मला खुप आवडला. मस्त आहे एकदम.... Wink

कोणीतरी ह्या चित्रपटाबद्दल खालिल उद्गार काढले
"Action Replayy is a light-hearted rom-com that should be viewed without really seeking much rationale or logic behind every action and reaction".

हे a 2 z सगळ्या हिंदी चित्रपटांना लागु होते....

गोलमाल ३ अजिबात बघु नका. मी बघुन चुक केली. त्यात फक्त जॉनी लिव्हरचे काम चांगल आहे.
बाकी पुरा पिच्चर बकवास आहे.

अ‍ॅक्शन रिप्ले पाहीला. साधनाने म्हटल्याप्रमाणे एकदाच बघण्याच्या लायकीचा आहे. प्रीतमचं संगीत जाम आवडलं.
गोलमालचा ३रा भाग साफ फसलाय. आधीच्या २ भागांपेक्षा अगदीच बकवास. नुसता गोंधळ घातलाय.

अ‍ॅक्शन रिप्ले पहाणार. गोलमाल थ्री पहाणार नाही... त्यातून वाचलेला वेळ मायबोली वाचण्यात घालवेन.. Proud धन्स लोकहो... Happy

गोलमाल-३ आवडला, SMS मधून येणारे आणी 'कॉमेडी सर्कस' मधील स्टँड-अप कॉमेडीतील पंचेस एकत्र करुन स्क्रिप्ट तयार केलीय असं वाटतं. पहिल्या दोन भागांसारखा खास नाहीये, पण टाइमपास झाला आणी काही काही सीन्सना प्रचंड हसलो. त्यात मिथूनची जूनी गाणी दाखवून धमाल आणलीय.
जॉनी लिवरने फोडलयं. मिथूनदांनी पण सही काम केलयं.
कुणी दाखवला तर नक्की बघा, नाहीतर जानेवारीपर्यंत येइलच सेट मॅक्स वर (रक्तचरित्र येतोय तसा).

वर कुणीतरी उल्लेख केलेला 'द निगोशिएटर' पाहिला. खिळवून टाकणारा चित्रपट आहे, सस्पेन्स चांगलाच टिकवून ठेवलाय.

काल 'देशद्रोही' पाहून माझे भान हरपले आहे. काय तो छपरी कमाल खान आणि विग लावलेली भयानक ग्रेसी सिंग (लगान ते देशद्रोही, काय करिअर ग्राफ आहे! इतके अधःपतन तर अंजली जठारचेही झाले नाही)
सानी, माझा 'अणुभवाचा' सल्ला. अ‍ॅ.री. पेक्षा गो३ पहा.

सानी,तु हिंदी सिनेमे कोणत्या साईटवर बघतेस?>>> भान, तशा तर भरपूर वेबसाईटस आहेत गं... त्यातल्या त्यात peepat.com, desi-radio.com, ह्यावर चांगल्या पिक्चर क्वालिटी सह पाहता येतील...

सानी, माझा 'अणुभवाचा' सल्ला. अ‍ॅ.री. पेक्षा गो३ पहा.>>> ओके मग बेस्ट वे दोन्हीही पहाते... धन्स रे आगावा... Proud आणि भान हरपले, म्हणजे तो 'देशद्रोही' चांगलाय की वाईट?? Uhoh

रच्याकने, मी काल 'वन्स अपॉन अ टाईम इन मुंबई' पाहिला. जबरदस्त सिनेमा आहे.... अतिशय आवडला. सगळीच स्टार कास्ट माझी आवडती....अजय देवगण, इमरान हाश्मी, कंगना रनौत... वाह वाह! सर्वांची अ‍ॅक्टिंग आणि सिनेमा पण मस्तय...
त्यातल्या पोलिसाची भुमिका करणारा "रणदिप हुडा" खुप ओळखीचा चेहरा वाटला... एकदम ट्युब पेटली, हा तर मॉन्सुन वेडिंग मधे दिसला होता. गुगलून कन्फर्म केलं.... काय जबरी अ‍ॅक्टिंग केलीये त्याने.

खुप्प्प्प्प्प्प्प्प मस्त सिनेमा आहे. अ‍ॅक्शनपट आवडणार्‍यांनी नक्की पहा. Happy

सानी "देशद्रोही" अजिबात बघु नको. बकवास मुव्ही.
तो कमाल खान खरच डोक्यात जातो.

"मेगामाईंड" कुणी बघीतला का?

Pages