चित्रपट कसा वाटला? (जुना धागा)

Submitted by admin on 2 June, 2008 - 02:50

आपण नुकताच पाहिलेला एखादा नवीन अथवा जुना चित्रपट आपल्याला कसा वाटला? आपले परिक्षण "नवीन लेखनाचा धागा" वापरुन लिहावे.

या आधीची समिक्षा इथे पहा.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी पण Tangled पाहीला. खरच एकदम मस्त मूव्ही आहे. नकीच पाहण्याजोगा Happy
<< डिस्ने अ‍ॅट देअर बेस्ट ... प्रिन्सेस, चेटकीण, जादू, रोमान्स, सगळे मसाले पर्फेक्ट >> अगदी अगदी.

"The Tourist" पाहीला. चांगला आहे पण शेवट Predictable होता.

ब-याच दिवसांनी रॅट रेस पुन्हा एकदा पाहिला मज्जा आली.. तथाकथित विनोदी चित्रपट बनवणा-यांनी हा बघावा म्हणजे पुढचे चित्रपट तरी चांगले काढतील..

तीस मार खान पाहिला... महेश कोठारी-लक्ष्या-अशोक सराफ यांच्या लायकीचा विषय आहे.... Happy

गैर बद्दल http://www.maayboli.com/node/11849 इथे एवढी वाफ दवडली असताना लोकांनी बघायचे धाडस का केले? असो. आता पुढच्यांनी सावधान.

तीमाखा चे आणखी एक म्हणजे एका विनोदी शॉट मधे ब्रिटिशांची दडपशाही दाखवताना बहुधा एक खरीच जुनी फिल्म वापरली आहे. बघताना चुकीचे वाटते.

तीमाखा फु़कटात सुद्धा बघु नका,भयानक सिनेमा.मी दोनदा प्रयत्न केला बघायचा,पण पाउण तासाच्या वर नाहि बघु शकले.

Peepali live baddal charcha zali aahe ka kuthe? Koni link dyal ka?

अरे देवा... अगं पण आशू ती चर्चा पीपली लाइव्ह वर कुठे होती. तो सिनेमा न बघता तो किती वाईट आहे हे प्रूव्ह करण्याबद्दल होती ना.. Wink

"UP" पाहिला. खुप छान Animation आ॑हे.
लहाणानसोबत मोठ्यानी पण पहावा असा आहे
म र वा

'झिंग चिक झिंग' ह मराठी चित्रपट पाहिला. एका कापूस उत्पादक शेतकरी कुटुंबाची कथा व त्यातील मुलगा. श्याम, हा कथानायक. विदर्भात होणार्‍या दुर्दैवी आत्महत्यांवर हा चित्रपट बेतलाय. लावलेला कापूस जेव्हा विकला जाइल तेव्हा सर्व उधारी फेडता येतील, मुलांच्या इच्छा पूर्ण करता येतील असा आत्मविश्वास बाळगणारा शेतकरी, मौली (भरत जाधव), आणि मोठेपणी कार घेण्याचे स्वप्न पाहणारा त्याचा मुलगा श्याम यांचे नातेसंबंध उत्तम दाखवलय. जेव्हा कापसाला अपेक्षित भाव येत नाही त्यावेळी होणारी कुटुंबाची अवस्था उत्तमरित्या दाखवलीय, त्यात घर आणि जमीनसावकाराला गहाण ठेवलेली आणि ती सोडवण्यासाठी १०००० रु. ची गरज असते. हे पैसे मिळ्वण्यासाठी श्याम व त्याची बहीण दिप्ती यांनी केलेली धडपड , गावात वेडा शेतकरी अथवा कवीदादा म्हणून ओळखला जाणारा शेतकरी (दिलीप प्रभावळकर) यांनी सेंद्रिय शेतीबद्द्ल केलेले प्रयोग , त्यांनी लहान मुलांना गांडूळाचे महत्व सांगताना केलेला खेळवजा प्रयोग , पूर्ण चित्रपटात छान जमलेत.
कापूस विकून हातात पैसे मिळून कारखान्याच्या गेट बाहेर येईपर्यंतच निम्मे पैसे वसूली वाल्यांकडून वसूल होतात हा प्रसंग तर शेतकर्‍यांची आजची दशा दाखवून जातो.

एकूण सध्याच्या अवस्थेवर वेगळ्या पध्दतीने तयार केलेला हा चित्रपट आहे, बघण्यासारखा आहेच.

ऑन ड्युटी २४ तास पाहिला.

खास काही नाही. तुकडे जोडून बनवलाय असे वाटत राहते. नायक पंजाबी असण्यामागचे लॉजिक कळले नाही.

ना धड करूण, ना धड विनोदी, ना धड गंभिर. ...... असे काहितरी प्रकरण आहे.

प्रचंड चुका, अगम्य घटनाक्रम इ. मुळे अगदी हीरमोड झाला.

ब्रॅड पीट/मॉर्गन प्रीमन जोडीचा 'सेवन' पाहिला, जबरदस्त सस्पेन्स चित्रपट आहे. शहरात होणार्‍या खूनांचा छडा लावण्यासाठी या दोघांची नेमणूक होते आणि मग गुन्हा घडला त्या ठिकाणी मिळणारे पुरावे जमवून खुन्याच तपास कसा करतात हे प्रत्यक्ष पाहाणेच भारी.

बाकी 'डेस्पिकेबल मी' आणि 'स्टेप अप ३' पण पाहीले. 'डेस्पिकेबल मी' मस्तच आहे, लहान मुलांना तर अवश्य दाखवण्याजोगा. 'स्टेप अप ३' पण मस्त आहे.

आत्ता 'स्टॅलीनग्राड' व नीधप यांनी सांगितलेला 'अंडरग्राउंड' पाहायचे आहेत या विकांताला.

कदाचित इथे रिलेव्हंट नाही, पण मुंबईत उत्तम डिव्हीडी कुठे मिळू शकतील, ते कुणी सांगू शकेल का ?
अगदी नावं लक्षात ठेवून, चौकशी करायला जावे तर नन्नाचाच पाढा ऐकायला मिळतो.

ओये लक्की लक्की ओये पाहिला. निखळ करमणूक. फार डोके कोठे लावायचेच नाहीए. एक हुशार, चलाख, संवेदनशील, प्रेमळ चोर आणि त्याने चोर्‍या करताना केलेल्या नाना हरकती करामती व त्याची अक्कलहुशारी एवढाच तो काय सिनेमाच जीव. पण त्यात त्या नायकाचे बालपण, तारुण्य, सभोवतालचे वातावरण, नायकाची महत्त्वाकांक्षा, त्याचे प्रेमप्रकरण, दोस्ताना या गोष्टींनी रंग भरला आहे. खास पंजाबी/ जाट धाटणीचे वातावरण, तसेच खास त्या स्टाईलचे संवाद, वैचारिक प्रवृत्ती ह्यांचे उत्तम चित्रण. पार्श्वसंगीतही चांगले आहे. कोठेही अंगावर न येणारे. चित्रपटातील गाण्यांच्या स्थळी जुन्या हिट हिंदी गाण्यांचा वापर छान वाटतो. अगदी आपल्या आयुष्यातील घटनांसाठी आपल्याला हिंदी चित्रपटातील गाणी आठवावीत त्याप्रमाणे. नायकाचे सर्वसामान्यीकरण करण्यात यशस्वी. चित्रपटाचा शेवट अपेक्षित आहे. कोठेही फारसे धक्के न देता हा चित्रपट भरपूर कोपरखळ्या मात्र मारतो. अभय देओल, परेश रावळ दोघांचाही चांगला अभिनय. अर्चना पुरणसिंगचे काम सुसह्य. तरुण अभय देओल चे काम करणार्‍या (नाव माहित नाही) नटाचे कामही छान झाले आहे. थोडक्यात म्हणजे, चित्रपट आवडला, पैसा वसूल.

एक हुशार, चलाख, संवेदनशील, प्रेमळ चोर आणि त्याने चोर्‍या करताना केलेल्या नाना हरकती करामती<<
अकु त्या हुशार , चलाख प्रेमळ चोराने बिग बॉस मध्ये काय गुण उधळले होते माहित आहे ना?
ज्या चोरावरून हा सिनेमा काढण्यात आला आहे तो होता या पर्वात...बाकी सिनेमा खरंच छान आहे यात वाद नाही

'आयडियाची कल्पना' आवडला.
थोडा लांबवलाय आणि थोडा अतिशयोक्तीपुर्ण असला तरीही सर्वांच्या अभिनयासाठी पहा.

मी १५ दिवसांच्या सुट्टीत भरपुर इंग्रजी चित्रपट बघितले. त्यातले मोजकेच आवडलेले सांगते.
आईस एज३, ट्रान्स्फॉर्मस, ट्रान्स्फॉर्मस २, ट्रान्स्पोर्टर २
अर्धवट बघितलेले अंडरवर्ल्ड-ईवोल्युशन, मायनॉरीटी रिपोर्ट
पुन्हा एकदा बघितलेले फाईंडींग निमो, मेन इन ब्लॅक २

>>ज्या चोरावरून हा सिनेमा काढण्यात आला आहे तो होता या पर्वात...
Uhoh आता हा कोण? अप्डेट प्लिचज ...

"स्पार्टन, व्हॉट इज युअर प्रोफेशन?
व्हूSSSS व्हूSSSS"
झक्कास डायलॉग '३००' या इंग्रजी चित्रपटातला!
मस्त चित्रपट, बघू बघू म्हणत पाहीला एकदाचा!
लई आवड्या! Happy

मी परवाच विक्रम गोखले-मुक्ता बर्वे यांचा "आघात" हा मराठि सिनेमा पाहिला. सुंदर सिनेमा!

"गंध" आता dingora.com वर available नाहीये का? मी dingora.com वर प्रोफाईल create करून, लॉग इन करून पहिलं. पण तरीही तो unavailable च दिसतोय.
अजून कुठे तो मिळू शकेल का?

जागोमोहनप्यारे,
'टूनपूर का सुपरहिरो' बघितला. अतिशय सुमार दर्जाचा वाटला. त्यातली पात्रही यथातथाच आहेत आणि सगळ्यांनी कोणानकोणाची नक्कलच केलेली आहे.

सोहा,
तू नेटफ्लिक्स ची मेंबर आहेस का? तिथे मिळाला तर बघ.

अंजू

Pages