चित्रपट कसा वाटला? (जुना धागा)

Submitted by admin on 2 June, 2008 - 02:50

आपण नुकताच पाहिलेला एखादा नवीन अथवा जुना चित्रपट आपल्याला कसा वाटला? आपले परिक्षण "नवीन लेखनाचा धागा" वापरुन लिहावे.

या आधीची समिक्षा इथे पहा.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आजच मेगामाइंड बघीतला. मला आवडला. एकदा बघण्यासारखा आहे.
त्यातला मेगामाइंड खुप क्युट दिसतो.

हॅरी पॉटर नाही पाहिला का कुणी?>>>> काल पाहिला 'हॅरी पॉटर अँड डेथली हॉलोज-१'. दरवेळी प्रमाणे यावेळी देखिल थोडाफार रनीगं वाटला. एखाद्याने पुस्तक वाचले नसल्यास त्या व्यक्तीला सिनेमा पहाताना खुप डोक खाजवायला लागेल.
सिनेमातले हॉट दृश्य पहाताना तर 'हॅरी पॉटर' सिरीज इनोसन्स लॉस करतेय अस वाटायला लागत, पण काय करणार कॅरेक्टर्स वयाने मोठे झालेत.
काही कॅरेक्टर्सची डेथ झाल्यावर पुस्तकामधे जो ईमोशनल टच वाटतो, त्याची कमतरता सिनेमामधे जाणवते.

Harry potter and the deathly hallows... पुस्तकातलं जेमतेम २० % च पडद्यावर येऊ शकलंय. का असं करतात हे लोक ? ज्यांनी पुस्तकं वाचली नाहियेत त्यांना पिक्चर पाहून ही अप्रतिम सिरिज अजिबात आवडणार नाही.
मला एक विचारायचंय . मी पाहिलेल्या पिक्चर मधे harry चा डर्स्लींच्या घरापासून रॉन च्या घरापर्यंतचा प्रवास दाखवलेला नाहिये. तो खराच पिक्चर मधे नाहिये की मी पाहिलेल्या प्रिन्ट मधे कापलेला होता ?
कारण हया प्रवासाचं पुस्तकामधे फार थरारक वर्णन केलय. ह्याच प्रवासात mad eye moody मरतो. आणि george weasly चा कान कापला जातो.

तो खराच पिक्चर मधे नाहिये की मी पाहिलेल्या प्रिन्ट मधे कापलेला होता ?>>>>> अस्मानी, तुम्ही चित्रपटगृहामधे उशीरा पोहोचलात proud.gif

नाही प्रसिक. harry च्या घरी सगळे येतात. मग पॉलीज्यूस पोशन पिऊन सात पॉटर्स बनतात. इतके दाखवले गेले आणि मग डायरेक्ट रॉनचे घरच आले.

गोलमाल ३ बरा वाटला.

'अ‍ॅक्शन रिप्ले' अत्यंत इरिटेटिंग, भयाण, भयानक, अतिमहाभयानक आहे. ऐश्वर्या आणि अक्षय या दोघांनीही अत्यंत निलाजरे आणि कोडगे होऊन सिनेमा स्विकारला असावा. आणि तितकेच मूर्ख आणि बिनडोक काम पण केलेय.

१८वा उंट.. तुमच्या फॅमिलीने थेटरात नेववुन तुमच्याकडुन पिक्चरचे पैसे उकळलेले दिसताहेत. Proud राग अगदी मनापासुन व्यक्त झालाय इथे. इतके इरिटेट नका होऊ. उतारा म्हणुन गुजारीश पाहा

कालच गुजरिश पाहिला रंगाशेठ आणि श्री यांनी वर लिहले आहे.

संजय लिला भन्साळी यांनी वर वर बोअर वाटणार्‍या मध्यवर्ती कथेला न्याय दिला आहे. सिनेमा पहाताना आता बच्चन झालेल्या ऐश्वर्याने अभिषेक बच्चन साठी का आग्रह नाही धरला असा प्रश्न पडला होता जो ह्रतिकच्या अभिनय सामर्थ्याने सिनेमा संपायच्या आत सुटला.

संजय लिला भन्साळी यांचा चित्रीकरणाचा आवाका फारच मोठा आहे. काळाला अनुसरुन सिनेमा करणे ह्यात त्यांचा हात कुणी धरेल अस वाटत नाही. सिनेमा पहाताना मला सत्यजीत रे व त्यांची सिनेमा बनवण्याची क्षमता याची संजय लिला भन्साळी यांच्याशी तुलना करायचा मोह होत होता कारण सिनेमातली काही दृश्ये फक्त दिग्दर्शनाचा प्रभाव जाणवत होता.

जादुगार, त्याच्यावरचे सेटस अगदी उत्कृष्ट आहेत. सिनेमा एकदा जरुर पहावा पण थेटरमधे.

तो खराच पिक्चर मधे नाहिये की मी पाहिलेल्या प्रिन्ट मधे कापलेला होता ?>>>>> दाखवलंय की हे सगळं.. मी तर 'डायहार्ड' फॅन आहे हॅरी पॉटरची.. मला आवडला हा सिनेमा. Happy
पण पुस्तकात इतक्या सगळ्या गोष्टी आहेत की त्या २ तासात बसवणे शक्य नाहीये.. पण स्पेशल इफेक्टस आवडलेच.. अजुन एक वर्ष वाट बघायची पुढच्या भागाची! Uhoh
रोलिंगबाईंच्या कल्पनाशक्तीला परत एकदा सलाम...

गोलमाल३ अतिटुकार..

गोलमाल ३ खरच अतिशय वाइट !
मला तर त्या गोलमाल चे कुठलेही भाग पूर्ण बघण्याची हिंमत नाही झाली , त्यातलाच हा एक..अतिशय फालतु !
.....................................................................................................................................
रोबोट पण कसला हस्यास्पद आहे Biggrin
अर्थात रहमान ची ती ढिग भर ' ट्रॅश गाणी' फॉर्वर्ड केली तर शेवट पर्यंत पाहिला जातो , काही सिन्स धमाल विनोदी जमलेत, फुल्ल रजनी श्टाइल विनोद !
चित्रपट खरं तर चांगला होउ शकला असता पण टिप्पिकल मॉलिवुड मसाला अतिच झालाय !
रोबोट ची स्वप्नं द्रुश्य , हिरॉइन चं रोबोट ला शिफॉन ची साडी नेसून सिड्युस करंणे, रोबोट ला जगातल्या सगळ्या भाषा येतातच पण डासांची भाषाही येते, डासांच्या राज्यात जाऊन डासांना धमक्या देतो, जो डास अ‍ॅश ला चावला त्याला अ‍ॅश ची माफी मागायला लावतो वगैरे वगैरे.. Biggrin
टेक्निकल लेव्हल ला चांगला जमलाय पण टर्मिनेटर पेक्षा उजवा वगैरे नाही वाटला.
रजनीकान्तचं अजुनही स्क्रीन प्रेझेन्स लय भारी, धमाल केलीये रजनीकान्त नी Happy
अ‍ॅश काय जुनी आहे का यातली, चक्क स्लिम दिसते.. अगदी हम दिल च्या काळातल्या अ‍ॅश सारखी सुंदर दिसते, कि हा पण स्पेशल इफेक्ट ??
असो एकदा बघणेबल आहे रोबोट , गाणी पुढे ढकलून !
.....................................................................................................................................
ऋषी कपुर- नीतु सिंग चा ' दो दुने चार' आवडला , एकदम नीट अ‍ॅन्ड क्लिन कॉमेडी!!
नीतु सिंग चं पुनरागमन काय सॉलिड आहे, फार च छान केलाय तिनी दिलीच्या टिपिकल मिड्ल क्लास हाउस वाइफ चा रोल :).
ऋषी कपुर बद्दल तर काय बोलणार, किती सहज सुरेख अभिनय करतो हा माणुस, पण समहाउ त्याला फक्त चॉकलेट होरो इमेज चं क्रेडिट मिळातं, इतका छान अभिनय करतो त्याचं क्रेडिट फारसं मिळत नाही.
अगदी नाचताना सुध्द्दा इतका उस्फुर्त सुंदर अभिनय करणारा त्याच्या सारखा तोच् !!
दो दुने चार मधला अतिसामान्य अर्थिक परिस्थिती असलेला शाळा मास्तर जबरदस्तं साकारलाय , हॅट्स ऑफ !
आवश्य बघा :).

नीतु सिंग कॉफी विथ करण मधे आली होती तेंव्हा मि.जोहर सारख अमस्का मारत होता नीतुला कि पुनरागमन केलं तर माझ्याच मुव्ही मधून कर Proud
नशीब नीतुनी त्या टिप्पिकल जोहर कंपनीच्या नखशिखान्त सजून बादलीभर अश्रु ढाळाणार्‍य आई ऐवजी हा रोल पसंत केला :).

दो दुने चार बद्दल डिज्जेला अनुमोदन,
सोशल नेटवर्क पण आवडला पण मार्कने त्याच्या मित्रा (Eduardo Saverin)फसवायला नको होतं , केवळ त्याच्या पाठिंब्यामुळेच मार्क येवढं मोठं साम्राज्य उभं करु शकला, त्याने मित्राला पार्टनर म्हणुन ठेवलं असतं तर त्याच काही फारसं नुकसान झालं नसतं . आणि दिव्या नरेंद्रच काम थोडसंच पण चांगलं झालय.

चिन्गी, आम्हाला थिएटरवाल्यांनी फसवलं म्हणजे ! आणखी काय काय कापलं देव जाणे !

काय होता तिचा रोल?? >> > रंगासेठ तिचा नाही त्याचा , त्या ३ मित्रांपैकी इंडियन दिसणारा तो दिव्या , फेसबुकचा जन्म त्याच्या कल्पनेमुळेच झाला मानायला हरकत नाही.

मी आत्ताच थिएटरमधे गुझारीश बघून आलो. खूप सुंदर पण थिएटरमधेच बघायला हवा.
सुंदर चित्रिकरण असले तरी कथानक त्यापेक्षा सरस आहे. शेवटाचे सूचन असले तरी थेट शेवट केलेला नाही, त्यामूळे कुठेतरी आशा वाटत राहतेच.
संगीतात गोव्याच्या लोकसंगीताचा छान वापर केलाय. हृतिक च्या जादूच्या प्रयोगातील हालचाली एखाद्या ग्रेसफूल नृत्याच्याच आहेत आणि ऐश्वर्याचा नाच अप्रतिम आहे. तिच्या हाताच्या हालचाली खूपच नजाकतदार आहेत.
या दोन कलाकारांशिवाय रजत कपूर, शहनाझ पटेल आणि नफिसा अली थोडेतरी ओळखीचे चेहरे, पण बाकिचे कलाकार नवीन असले तरी प्रत्येकाचा अभिनय दर्जेदार आहे. हृतिकचा विद्यार्थी, त्याची प्रेयसी आणि न्यायाधिश पण छाप पाडून जातात.
चित्रीकरणाबद्दल लिहावे थेवढे थोडेच आहे. गोव्याची कथा असली, तरी गोव्याचा निसर्ग फारच थोडा दिसतो. सौदर्य आहे ते त्या घरातील चित्रीकरणात. त्या घरातली प्रत्येक वस्तू देखणी आहे. (ऐश्वर्या ज्या कपातून कॉफी पिते तो कप, ज्या किटली मधून शहनाझ च्या कपात पाणी ओतते ती किटली, आदित्य ज्या बोलमधे कागद बुडवतो तो बोल सगळेच सुंदर आहे) काही काही शॉट्स तर दाद मिळवून जातात. उदा. ऐश्वर्या संध्याकाळी घरी जाते तो होडीतला शॉट, ती कंदील घेऊन जाते तो शॉट, तिचा नवरा तिला मारतो त्यावेळचा पाकळ्यांचा शॉट आणि सगळ्यात कहर म्हणजे अपघाताच्या प्रसंगात, प्रेक्षकाच्या वाईन ग्लासमधे पडलेले रंगमंचावरील प्रकाशयोजनेचे प्रतिबिंब..
ऐश्वर्या कमालीची सुंदर दिसलीय. वरवर करारी वाटणारी नर्स तिने रंगवली असल्याने, तिचा चेहरा थोडा कठोर ठेवावा लागलाय, पण तरीही तिने सुंदरच अभिनय केलाय.
कथेतला ह्यूमर त्या त्या प्रसंगात खूप प्रभावी ठरलाय. सोफिया चे चित्रपटात कुठेच न दिसणारे "सेक्सी लेग्ज" संवादात मात्र मजा आणतात.
आणि हृतिक. काय बोलायचे त्याच्याबद्दल. ? निव्वळ चेहर्‍याने आणि आवाजाने अभिनय केलाय त्याने.
त्याच्या शरीर संपदेचेही शॉट्स नसल्याने, तो खरेच अपंग झालाय असे वाटत राहते. मकरंद देशपांडे एका संवादात त्याच्या डोळ्यातील अंगाराचा उल्लेख करतो, त्यावेळी तर त्याच्या डोळ्यावर कॅमेराही नाही, तरी तो अंगार जाणवतो. कथेच्या ओघात तो आपली कैफियत कोर्टासमोर मांडण्याची तयारी करून जातो, पण कोर्ट त्याला वेळ देत नाही. ते तयार केलेले भाषण एका क्लबमधे मांडायची पण त्याची इच्छा असते, तीही पूर्ण होत नाही. हे हमखास मेलोड्रॅमॅटिक ठरणारे भाषण टाळण्यासाठी तो आणि दिग्दर्शक दोघांचेही कौतूक आहे.
मी तरी या रोलमधे त्याच्याशिवाय कुणाचीही कल्पना करु शकत नाही.
आणि कथा, मला नाही वाटत कि ती कथा इच्छामरणाची आहे. ती एक प्रेमकथा आहे. (आशयात थोडिफार मी लिहिलेल्या "राधा" या कथेसारखी). अवश्य बघाच.

या चित्रपटाला थोडेफार गालबोट लागले ते सबटायटल्स मधे, मूळातच इंग्रजी असणारे संवाद भाषांतरीत करण्यात, त्या "कलाकाराने" आपले डोके चालवले आहे, संवादातला हॉरिबल चा होतो टेरिबल, स्टॉप चा होतो एंड...
पण शेवटच्या प्रसंगात त्याच्या बेडकडे सगळे धाव घेतात, त्या प्रसंगात आपणही तिथे जावे असे वाटत राहते.

ब्रेक के बाद मस्त आहे... इम्रानपेक्शा दिपिका खरच चांगली आहे अभिनयाबाबत....
गाणी ऐकणेबल आहेत अन महत्वाच म्हण्जे ती बॅग्राउंड ला आहेत...
वेगनान शिणुमा हाय....
ऑस्ट्रेलिया, समुद्र, ड्रिंक्स.. भर्पुर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र हिंग्लीश...
सहकलाकारांनीसुधा मस्त काम केलयं..
बस. शर्मिला टागोर दिपिका चि आई-- ये बात कुछ हजम् नही होती...

अमा, आभार. तसेही मी ब्रेक के बाद या टाईपचे रंगीबेरंगी जेम्सच्या गोळ्यांसारखे गोडगोड चित्रपट टाळतेच.. पण रिव्यु वाचुन मनोरंजन अगदी झकास झाले.

रोबोट...एन्धिरन..एकदा बघणेबल...
ऐश्वर्याचे हावभाव खुप रिपीट होतायत असं वाटलं...
रजनीचा स्क्रीन प्रेसेन्स जबरदस्त...

गुजारीश काल पाहिला. दिनेश तुमच्या प्रत्येक वाक्याला अनुमोदन. अ प्र ति म हेच शब्द येतात चित्रपट पाहताना.. ऋतिकने काय अभिनय केलाय.. त्याला पाहुन डोळ्यात पाणी येते पण त्याचवेळी त्याची किंव, दया मात्र अजिबात वाटत नाही. अरेरे,बिच्चारा हे शब्दही विसरायला होते. डोळ्यातले पाणी परतवुन निग्रहाने हसणा-या इथनला मानाने मरण्याचा हक्क कोर्टाने द्यावा असेच वाटत राहते शेवटपर्यंत. चित्रपट संपल्यावर थोडा वेळ सुन्नपणे बसुन राहिले खुर्चीवर Sad

हम दिल.... नंतर ऐश्वर्या या चित्रपटात मला खुप आवडली. अतिशय कठोर पण इथन वर जीवापाड प्रेम करणारी सोफिया तिने अप्रतिम उभी केलीय. तिचे कपडेही तिला अतिशय खुलुन दिसलेत. काळेभोर केस, निळसर हिरवे डोळे, लालभडक लिपस्टिक आणि काळे+लाल रंगसंगती असलेले गोवन पोर्तुगीझ छापाचे कपडे.. अतिशय सुंदर दिसलीय. नाचाच्या सिनमध्येही खुप छान शोभलीय. फक्त जे काही फार थोडे हसण्याचे प्रसंग मिळालेय त्या प्रसंगामध्ये ती जुनीच नाटकी हसणारी ऐश्वर्या डोकावते.

अलीकडेच "अल्लाह के बन्दे" अन "सुंबरान" हे दोनचित्रपट पाहिले. सुंबरान च्या काही फ्रेम्स अप्रतिम आहेत, पण ओवर आल मला तो तेवढासा आवडला नाही. पण सगळ्या कलाकारांची एक्टिंग विशेषता रवि काले, रविन्द्र मंकनी आणि रवि काले च्या बायकोची भूमिका केलेली नटी. खुप छान कामे केली आहेत त्यांनी. मकरंद अनासपुरे वेगळ्या रुपात आहे पण बोर करतो. त्याच्या वाट्याला सगळे serious प्रसंगच आले आहेत. काही छान झालेत पण बऱ्याचदा त्याला ते न जमल्यामुले हसयालाच होत. बाकी मग इतर कलाकाराना काही विशेष काम नाहीये. मुक्ता बर्वे लहान प्रसंगात भाव खावुन जाते. दिग्दर्शकाचा जुन्याचा नव्याशी सांगड़ घालायचा प्रयत्न चांगला (लीव इन रिलेशनशीप चा प्रसंग). Overall आर्ट टाइप ज्यादा वाटतो आणि ते expect करून गेलात तर चांगला नाहीतर बोर.

अल्लाह के बन्दे मात्र मला आवडला. पदार्पनातच फारूक कबीर ने दिग्दर्शन आणि अभिनय दोन्हीत बाजी मारली आहे. लहान मुलांच गुन्हेगारी विश्व फार छान रेखाटल आहे त्यात. दोन लहान मुले जी गुन्हेगारी क्षेत्रात वाढतात व नंतर तिथले Don होवू इच्छितात त्यांची कथा आहे ती. शर्मन जोशी न फारूक कबीर यानी ते रोल केले आहेत. पण तेवढ्याच ताकदीने किंबहुना त्यांच्याहून थोडे जास्त चांगले वाटतात ते त्यांचे लहानपनीचे रोल करणारे बाल कलाकार.(त्यात शर्मन जोशी चा रोल मदन देवधर ने केलेला आहे "विहीर" वाला). नसरुद्दीन शहा छोठयाशा रोल मधे अभिनय कसा करावा हेच जणू शिकवून जातो. Hats off to him ... (त्याचा होटलमधील चहा पिण्याचा प्रसंग लाजवाब). अतुल कुलकर्णी पण नेहमीप्रमाने मस्तच. एक सच्या शिक्षकाची मुलांप्रती तळ्मळ फार छान साकारली आहे त्याने. सक्षम कुलकर्णी चा पण रोल आहे पण त्याला तो तेवादासा सूट वाटला नाही. बाकी दिग्दर्शन खुपच सुरेख. एक गाने पण छान आहे.

बाकी जिथे "ब्रेक के बाद" सारख्या मूवीला तिकिटासाठी रांग लागली होती, तिथे "अल्लाह के बन्दे" पाहण्यासाठी आम्ही थेटरात फक्त 8 जण होतो.
एकेकाची आवड दुसरे काय?

उर्फ प्रोफेसर पाहिला , २००१ चा सिनेमा आत्ता रिलिज झालायं , ब्लॅक कॉमेडीच्या पठडीतला वेगळा सिनेमा आहे , भाषा अंगावर येते, ज्यांना अशी भाषा आवडत नाही त्यांनी बघु नये.
फस गये रे ओबामा , पण असाच वेगळा कॉमेडी सिनेमा आहे, रिसेशन वर आधारित कथा आहे, रजत कपुर चा NRI आणि नेहा धुपियाची मुन्नी मस्त जमलीय.

फस गए रे ओबामा मस्त आहे...
मन्ने आवड्या...
सगळ्यांचीच कामं मस्त झालीयेत...

Pages