चित्रपट कसा वाटला? (जुना धागा)

Submitted by admin on 2 June, 2008 - 02:50

आपण नुकताच पाहिलेला एखादा नवीन अथवा जुना चित्रपट आपल्याला कसा वाटला? आपले परिक्षण "नवीन लेखनाचा धागा" वापरुन लिहावे.

या आधीची समिक्षा इथे पहा.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

तेरे बिन लादेन हुकला त्या वन्स अपॉन टाइमच्या नादात. लक्षातच राहिल नाही.

चुकवु नका. टिवीवर लागेल परत. गेले चार आठवडे दर रविवारी कुठल्याना कुठल्या चॅनेलवर आल इस वेल चालु होते... Happy

>>गेले चार आठवडे दर रविवारी कुठल्याना कुठल्या चॅनेलवर आल इस वेल चालु होते.. >> बेबे Lol

>>वर्ल्ड टिव्ही प्रीमियरच्या नावाखाली दाखवलेला वन्स अपॉन टाइम इन मुम्बई पाहिला.
उगाचच कुथुन कुथुन बनवलेला पिक्चर वाटतोय.<<
आयला, असं आहे होय. मी काल हळहळत होतो की हा चित्रपट मिस झाला म्हणून. पण ठिकाय आत्ता बरं वाटतयं. Happy

---
'बिफोर सनराइज' व 'बिफोर सनसेट' पाहिले. एक अमेरिकन तरुण, जेस, विएन्नाला आपल्या मित्राला भेटायला जात असतो. त्याला ट्रेन मध्ये एक फ्रेंच तरुणी, सेलिन, भेटते. मग ओळख काढून हळूहळू गप्पा मारत मैत्री निर्माण होते. त्याची फ्लाइट अगदी पहाटे असल्याने तो तिला पहाटेपर्यंत विएन्नातच बोलत बसूया अशी गळ घालतो. आणि मग संपूर्ण चित्रपट त्यांच्या गप्पांमध्ये सामावून जातो. शेवटी ते दोघे सहा महिन्यांनी पुन्हा विएन्नातच भेटायचे ठरवतात व चित्रपट संपतो. संपूर्ण चित्रपट हलकाफुलका आहे, गप्पांचा विषयपण आपले नेहेमीचेच अस्ल्यसारखे वाटतात. त्यांच्या गप्पा ऐकताना मस्त वाटतं, कुठेही भडकपणा नाही. जणू माझे दोन मित्रच माझ्याशी बोलतायत. विएन्ना नगरीचे मस्त दर्शन, एका प्रदर्शनातील सुंदर चित्रे, नदीजवळ भेटलेला कवी या चित्रपटात मजा आणतात.

बिफोर सनसेट हा याचाच सिक्वल. पहिल्या भागात ठरल्याप्रमाणे हिरो (जेस) सहा महिन्यानंतर विएन्नात परत येतो पण ती येत नाही. दरम्यानच्या मग आठ वर्षाच्या काळात नॅथन विएन्नातील त्या रात्रीच्या अनुभवावर एक पुस्तक लिहितो जे बेस्टसेलर ठरते. त्या पुस्तकाच्या प्रमोशनसाठी तो पॅरिसला एका पुस्तकालयात येतो, तिथे पत्रकारांच्या शंकांना उत्तर देताना त्याला सेलिन दिसते. मग पत्रकार परिषद संपवल्यानंतर त्यांची भेट होते. त्याच्या विमानाला काही अवधी असतो, तत्पूर्वी तो वेळ एकत्र घालवण्यासाठी हे दोघे गप्पा मारत पॅरिस फिरतात. त्यावेळी जेस सेलिनल विएन्नात ठरल्याप्रमाणे न आल्याचे कारण विचारतो व मग पहिल्या भागाप्रमाणेच अनौपचारिक गप्पा सुरू होतात. यात पण पॅरिसच्या गल्ल्या, बोट सफरीची द्रुष्ये मजा आणतात.
मग

डोकं दुखवणारा.. "दबंग" पाहिला... (झंडुबाम गाणे घेतले सिनेमात ते बरंच झालं :फिदी:)
अख्ख्या सिनेमात २ (चांगली) गाणी (तेरे मस्त मस्त दो नैन आणि मुन्नी...)
बनियन मधला छेदीसिंग Happy Proud आणि सलमान चे टशन सोडल्यास चौथं काहीही पाहण्यासारखं नाही. कथेचा कुठेही मागमूस नाही, थोडी थोडी ओमकारा सारखी वाटली... तरी पण विरूद्ध वजनाची पात्रं... म्हणजे सलमान आणि छेदीसिंग... विरूद्ध विनोद खन्ना, अरबाझ खान, सोनाक्षी, अनुपम.. आणि समस्त इतर.. सलमान आणि छेदिसिंग सर्वांना पुरून उरणारे..
सलमान ची एन्ट्री आणि पहिली फायटिंग खरंच श्वासरोखी आहे, एकदम डुप्लिकेट रजनीच... पण बाकी सोनाक्षी आणि मलाईका ची एन्ट्री पण दमदार करता आली असती... तिथे मायनस पॉईंटस...
उगाच भपका नाही, कमी कपड्यातली हिरॉईन नाही.. अख्ख्या सिनेमात हिरो हिरॉईन एकदाच 'गले' मिलतात... (भाऊ हॉस्पिटलात असतो तेव्हा)
सल्लू ने पण चक्क एक्दाच शेवटच्या फायटींग मध्ये शर्ट काढलाय.. Uhoh Blush

रशीद खान थोर आहेत. आवाजाचे टिंबर इतके सुरेख आहे कि ऐकतच राहावेसे वाट्ते. हा माणूस बायको वर पण कधी खेकसत नसेल. काय तो लडिवाळपणा. माझ्या एका मैत्रीणीकडे समग्र रशीद खान आहेत. मी तिच्या सीड्या ढापायच्या प्रयत्नात नेहमी असते. आता करतेच तिला फोन.

तेरे बिन लादेन मध्ये जबरी पंचेस आहेत. त्यांना पैसे मिळाल्यावर त्यातील एक छुट्कू बॉसच्या टेबलावर सर्प न्रुत्य करतो ते अगदी महान शॉट आहे. काही सेकंदापुरताच आहे. आम्हाला सिकंदर मुर्गा व त्याचे मालक यांची शेवटी काळजीच वाटू लागली होती. इस जालीम दुनियामे ऐसे मासूमों का क्या हश्र होगा ?
पण आपली स्वप्ने अशीच असतात नाहीका छोटी छोटी. ती सीडी झक्कींना भेट पाठवायची माझी महत्त्वाकांक्षा आहे. ( दिवे दिवे)

मनीषा ला विसरणे शक्य नाही. तो गोरा रंग! अरेरे ती पण चाळीशीच्या वर गेली हर हर.

काल 'इमोशनल अत्याचार- द फिल्म' हा चित्रपट पाहिला.

शेवटपर्यंत खिळवून ठेवणारा .... खुप चांगला आहे.
एका रात्री मुम्बई - गोवा हायवेवर घडणार्‍या घटनांवर आधारीत हा चित्रपट आहे. वेगवेगळ्या लोकांच्या जीवनात घडणार्‍या अनपेक्षित घटनांची हळूहळू एक वीण बनत जाते आणि चित्रपट उलगडत जातो.

नक्की पहा.

दिनेश.. दबंग मुळे होणारी डोकेदुखी झंडुबामके बस की बात नही.. काल दुपारपर्यंत
डोकं ठणठण बडवत होतं Sad

मी अमि - ईअ इथे चालला नाही.. पण सीडी आणून पाहिन नक्की.. Happy

पण दक्षे तु गेलीसच कशी काय त्याच्या वाटेला?? आता मला कोणी लाखभर रुपयाची ऑफर दिली तर मी विचार करेन.. पण अन्यथा ... शक्यच नाही. झंडू बामच्या जाहिरातीत सल्लुला युपी भय्यासारखे नाचताना बघुन कसेतरी होते. अख्खा पिक्चर कसा सहन होईल???? तसा मला सल्लु आवडतो जाम.....

मला पण सल्लू आवड्तो. कलर्स वर काय माकड्चेष्टा करतो. इथे ओल्ड सिटीत लै फ्यान आहेत त्याचे. तो घालत असे तसले रंगीत जाळीचे बनियन पण इथे हातगाडी वर विकायला अस्तात. ऑटो मध्ये सल्लू एका साइड ला व अ‍ॅश एका साइड्ला. - अजूनही. काय ऑप्टिमिझम ना. Happy

ऑटो मध्ये सल्लू एका साइड ला व अ‍ॅश एका साइड्ला.
मला ते दोघे हम दिल.. मध्ये भारीच आवडलेले. आंखोंकी गुस्ताखी मध्ये दोघेही काय दिसतात....
अ‍ॅशने मिस्टेक केली. दिमाग की सुनी उसने, दिल की नही... Sad

काल परत एकदा लाईफ इन अ मेट्रो पाहिला. खुप सुंदर चित्रपट आणि गाणीही अगदी फिटींग (जरी चाली चोरलेल्या असल्या तरी). त्यात नफिसा गेल्यावर धर्मेंद्र म्हणतो, 'तिच्याबरोबर घालवलेले गेले दोन महिने आयुष्यातील सगळ्यात सुंदर दिवस होते. अख्खे आयुष्यच असे सुंदर गेले असते, जर मी ४० वर्षांपुर्वी दिमाग की न सुनकर दिल की सुनी होती' Sad

अश्विनी, द अंग्रेज बघ गं.. तुला आवडेल एकदम. हैद्राबादमधला आहे. ओल्ड सिटी आणि बंजारा हिल्स... Happy

>>>अ‍ॅशने मिस्टेक केली. दिमाग की सुनी उसने, दिल की नही.>>><<
च्चच्च... साधना पण तसे अ‍ॅशला नसेल वाटत ना.. Proud परत सल्लूचे अतरंग चाळे ,कायद्याला धाप्यावर बसवून वागणे.. कठिणच होते ना..

ते आहे गं.. पण कदाचित सुधरलाही अस्ता.. प्रेमात माणसे सुधारतातही... त्याच्या ब-याच झाल्यात आधी आणि नंतर, पण अ‍ॅशप्रकरणानंतर तो खुप हर्ट झाला होता...

अश्विनी, मी हल्लीच पाहिला गं.. तुझीच आठवण येत होती पाहताना.... Happy

अश्विनी, मी हल्लीच पाहिला गं.. तुझीच आठवण येत होती पाहताना.... स्मित>>
फिर आना था ना इदर बेगम, तुमारेकु, बच्ची कु बिर्यानी खिलाती, चारमिनारांकने चूडियां शापिंग करते, मशहूर आइसक्रीम खाते, पानावाना खाके आरामसे पिक्चरां देखते थे अपन.

आयंगा जरुन.. वो बिर्यानी याद रखो..

काल द फिल्म इमोशनल अत्याचार अर्धा पाहिला.. अजुन प्रत्येक कॅरॅक्टर एस्टॅब्लिशच होतंय. जरा बोर झाले. उरलेला अर्धा भाग चांगल असेल होपफुली.

फिर आना था ना इदर बेगम, तुमारेकु, बच्ची कु बिर्यानी खिलाती, चारमिनारांकने चूडियां शापिंग करते, मशहूर आइसक्रीम खाते, पानावाना खाके आरामसे पिक्चरां देखते थे अपन.>>
हे हैद्राबादी हिंन्दी ना? तळ कोकणातले मुसलमान पण थोडस असच बोलतात.
अंग्रेज मस्त टाइमपास आहे. तसाच अजुनही कोणतातरि चित्रपट आहे ना?

साधना, तिनं केलं तेच योग्य आहे. नाहीतर बिचारीचं अख्ख आयुष्य हातापायाची प्लास्टर्स बदलण्यात गेलं असतं .

अंग्रेज पुन्हा एकदा बघायला पाहिजे. पहिल्यांदा टोटल डोक्यावरून गेला होता. विनोद काहीच विशेष वाटले नव्हते.

मला हैद्राबादी हिंदी लय आवडते. अंग्रेज मधे काय आहे आत्ता काहीही आठवत नाही पण आवडला होता हे मात्र आठवतय. Happy ...

हल्लीच दबंग पाहीला....एकदम झकास आहे. सलमान खान ची फायटींग सेक्वेन्स "Wanted" पसुन एकदम जबरदस्त झालीय. तेरे मस्त मस्त दो नैन, हुड हुड दबंग ही दोन गाणी फार आवडली. शेवटचा सलमान च शर्ट automatic फाटुन नीघतो...सहीच्....फुल २ टाईमपास आहे.

आत्ता मुंबई-पुणे-मुंबई बघितला.
वर रंगासेठ नी उल्लेख केलेले बिफोर सनराईज नि बि. सनसेट आहेत तसाच हा पण हलकाफुलका चित्रपट.
मुक्ता बर्वे नि स्वप्निल जोशी हे दोनच कलाकार आहेत यात. एक गाणं आहे. ते पण छान आहे. मुंबईकर मुक्ता एका मुलाला लग्नासाठी नकार द्यायला म्हणून पुण्यात येते. पत्ता विचारण्यासाठी स्वप्निल ची भेट होते. जायचं त्या पत्त्यावर कोणी भेटत नाही म्हणून टाईमपास करण्यासाठी दिवसभर दोघे पुण्यात भटकत रहातात. त्या दिवसभरात त्यांच्या ज्या गप्पा होतात त्यातून कथा अप्रतिम रित्या खुलते.
नक्की बघा हा चित्रपट. खूप दिवसांनी एक चांगला मराठी चित्रपट बघितल्याच्या समाधानात झोपते आता. शुभरात्री. Happy

'विहिर', 'गंध', 'मुंबई-पुणे-मुंबई' या चित्रपटांच्या CDs आल्यात काय? का ऑनलाइन उपलब्ध आहे?

Pages