चित्रपट कसा वाटला? (जुना धागा)

Submitted by admin on 2 June, 2008 - 02:50

आपण नुकताच पाहिलेला एखादा नवीन अथवा जुना चित्रपट आपल्याला कसा वाटला? आपले परिक्षण "नवीन लेखनाचा धागा" वापरुन लिहावे.

या आधीची समिक्षा इथे पहा.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

रोबोट पाहिला.... दबंगपेक्षा बरा आहे.
टिपीकल सौदिंडीयन अ आणि अ मूव्ही. Happy
खुप चांगले स्पेशल इफेक्ट्स आहेत असे वाचण्यात आले... पण तसे काहीच दिसले नाही.

'टर्मिनेटर' बरोबर मनातल्या मनात तुलना होणे स्वाभाविक होते. त्यादॄष्टीने अगदीच बाळबोध आहे.

स्पेशल इफेक्ट्सच पहायचे असल्यास 'टर्मिनेटर' चे सर्व भाग पहा.

रोबोट पाहिला , ठीक आहे. काही काही प्रसंग आवडले पण एकूण चित्रपट काय खास वाटला नाही.
>>खुप चांगले स्पेशल इफेक्ट्स आहेत असे वाचण्यात आले... पण तसे काहीच दिसले नाही.<< खरयं, निराशा झाली Sad

असो पण ऐश्वर्या राय मात्र संपूर्ण चित्रपटभर सुंदर दिसतीय, तेवढीच जमेची बाजू. Happy
'किलीमांजारो' गाणं अफाट आहे, काय शब्द आहेत गाण्यातले...किरकिरे साहेबांना लिहिताना आणि गायकांना गाताना कसं वाटलं असेल कोण जाणे Happy आणखीण एका गाण्यात , "मै कामातुर यंत्र हूं" इ. शब्द आहेत. या सगळ्याला थिएटरमध्ये फुल्ल हशा , टाळ्या आणि शिट्ट्या पडत होत्या.

मागे एक आफताबचा चित्रपट आला होता... त्यात तो स्वतःचा क्लोन बनवतो अशी काहितरी स्टोरी होती. तो रोबोट पेक्षा बरा होता असे म्हणावे लागेल.

"दो दुनी चार " बघीतला.स्वीट ,फॅमिलि मूव्ही ,रिषी-नीतु अजुनहि सोबत खुप सुन्दर वाटतात.

रंगासेठ, माऊंट किलिमांजारो हा अफ्रिकेतील सर्वात उंच पर्वत आहे (तो दाखवलाय का गाण्यात ?) ऐन एक्वेटोर वर असून त्याच्या माथ्यावर बर्फ पडतो. वरील विरळ हवेमूळे, त्यावर चढाई केल्यास माणसे वेड्यासारखी वागतात. (असे डॉ. श्रीराम लागू यांनी लिहिलेले आहे.. खाली आल्यावर परत शहाणी होत असावीत. ) आता या सगळ्याचा रोबो मधल्या गाण्याशी काही संबंध आहे का ? (ते लिहा.)

दिनेशदा, अहो रोबोटामध्ये किलिमांजारो गाणे चक्क माचू पिचू ला घेतले आहे हे वर कुठतरी आले आहे . अर्थात त्यामुळे माचू पिचू पहायला मिळल्ते हे सोडा....

काय रे डोकी यांची ? आता गाण्यात किलिमांजारो पेक्षा, माचू पिचू चपखल बसलं असतं की.
माचू पिचू, माचू पिचू
आम्ही आता नाचू, नाचू...
वगैरे वगैरे ..

दिनेश, हल्लीच्या चित्रपटांमधले गाण्यातले शब्द, गाण्याचे म्युसिक, चित्रपटातली सिच्युयेशन आणि गाण्यावरचे हावभाव यांचा एकमेकांशी काही संबंध असतो का??

असा संबंध शोधणे म्हणजे किलिमांजारो वर चढाई करुन तिथे माचुपिचु का दिसत नाहीत म्हणुन वेडे होण्यासारखे आहे... Happy

दिनेशदा, साधना Lol
खरय , असले भयानक शब्द मुख्यतः हिंदित अनुवादित झालेल्या दाक्षिणात्य चित्रपटात आढळते. सेट मॅक्स, स्टार गोल्डवर हे चित्रपट लागले की गाण्याचे शब्द ऐकून व त्यांच्याशी संबंध नसलेले नृत्य पाहून मस्त टाइमपास होतो.

साधना Rofl

दिनेश, हल्लीच्या चित्रपटांमधले गाण्यातले शब्द, गाण्याचे म्युसिक, चित्रपटातली सिच्युयेशन आणि गाण्यावरचे हावभाव यांचा एकमेकांशी काही संबंध असतो का??
>>
त्याले 'कोलाज' मंतेत बाप्पू...

अगदी रोझा, बॉम्बे पासून चाललय हे. रहमानच्या मूळ रचनेवर, ठोकून ठोकून हिंदी शब्द बसवायचे !!
दोन दोन चाली, दोनदा चित्रीकरण कुणाला परवडणार ? पुर्वी शांतारामबापूंनी असे अनेक यशस्वी प्रयोग केले होते. (शेजारी-पडोसी, स्त्री-शकुंतला, इये मराठीचीये नगरी-लडकी सह्याद्री कि...)

knock out... बरचसा wednesday धाटणीचा.... पण बोअर अजिबात होत नाही. मस्त...

पण इनोव्हा मध्ये ५०० कोटी कसे काय बसु शकतात ( आता हर्षद मेहता सारखे बसवुन दाखवावे लागतील ) हे जरा चमत्कारीक वाटलं....

१००० च्या ५० लाख नोटा....

कोणाकडे १००० ची नोट असेल तर एका नोटेचे वजन किती आहे सांगाल का प्लिज...

जरी ०.५ ग्राम असेल तरी २.५ टन वजन होते... इनोव्हा २.५ टन वजन कॅरी करु शकते काय? Happy

>>knock out... बरचसा wednesday धाटणीचा.... पण बोअर अजिबात होत नाही. मस्त...<<

चला बघायला हरकत नाही तर. पण "knock Out" हा 'फोन बूथ' वरुन ढापलाय असं ट्रेलर्स वरुन तरी वाटतयं.

कुणी ईराणी चित्रपट color of paradise पाहिलाय का? उत्तम कथानक, उत्क्रुष्ट कामं आणि अप्रतिम फोतोग्राफी
याचा सुंदर मिलाप आहे. उसगावात राहणा-यानो लायब्ररीत नक्की मिळेल पहा आणि मला कळवा.

<<द इल्युजनिस्ट.....>>

जादूगार आणि राजकुमारीची लव्ह स्टोरी असलेलाच का?
मी पण पाहिलाय तो आणि तुम्हाला १०० मोदक!!!
खरंच अप्रतीम सिनेमा आहे!! मी ५ वेळा पहिला ३ दिवसांत...कॉपी केला होता.
(सगळी स्टोरी पूर्ण लक्षात राहिलेला हा पहिला आणि बहुधा एकच विन्ग्रजी शिणुमा..असं नवर्याचं मत!!)

सध्या Audrey Tautou चे फ्रेंच मुव्हीज बघते आहे. कोको बिफोर शनेल नंतर तिची फॅन झाले. आणि तीच दा विंची मधे पण होती हा शोध लागला. मग तिचा Amelie बघितला. सुरुवातीला क्न्फ्युजींग वाटला आणि थोडा विचित्र , पण जशी स्टोरी डेव्हलप होत गेली तसा आवडत गेला. मग तिचे he loves me he loves me not, priceless बघितले. .brilliant actress , very beautiful and talented.

करंजी मी पण ऑड्री ची फॅन आहे तिचा प्राइस लेस बघ. दा विन्चित उगीचच प्रौढ दिसते. अमेलीत फार गोड दिसते.

ग्रीन झोन जबरदस्त आहे. सीरियाना ज्यांना आवडला असेल त्यांना आवडेल.

एक जुना धुन्द पाहिला परत. आधी पाहिला होता. बर्‍यापैकी सस्पेन्स आहे.

एक जुना धुन्द पाहिला परत. आधी पाहिला होता. बर्‍यापैकी सस्पेन्स आहे. >> किमी काटकर आणि ऋषी कपूर आहे का ह्यात?

Pages