चित्रपट कसा वाटला? (जुना धागा)

Submitted by admin on 2 June, 2008 - 02:50

आपण नुकताच पाहिलेला एखादा नवीन अथवा जुना चित्रपट आपल्याला कसा वाटला? आपले परिक्षण "नवीन लेखनाचा धागा" वापरुन लिहावे.

या आधीची समिक्षा इथे पहा.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

फस गए रे ओबामा मस्त आहे.
जागतीक मंदीचे दूरगामी परिणाम छानच दाखवले आहेत. थोडा प्रेडिक्टेबल आहे, पण नक्की पहाच.

सर्वांची कामे उत्तम.....नेहा धुपिया सोडून. कोर्‍या करकरीत चेहर्‍याने वावरते पुर्ण चित्रपटात....तिच्या जागी दिव्या दत्ता असायला हवी होती. एका द्रूष्यात तर ती चक्क कॅटवॉक करत चालतेय.

चंगेझखानाच्या आयुष्यावर बेतलेला तीन चित्रपटांच्या मालिकेतील पहिला चित्रपट 'मंगोल' पाहिला. मंगोलियाच्या वाळवंटात जन्मलेल्या व संघर्षपूर्ण बालपण वटाल्या आलेल्या चंगेझची जडण-घडण यात दाखवलीय. टोळीयुध्द, परस्पर संघर्ष यांची लागण झालेल्या मंगोल टोळ्यांची कथा यात आलीय, तसा चांगला वाटला. चीन-मंगोलिया सीमेवरचा विस्तीर्ण सुंदर परिसर व कलाकारांची उत्तम कामे ही जमेची बाजू वाटली तर संथपणे जाणारी कथा ही थोडी कमकुवत बाजू वाटली.

रशियन हुकुमशहा 'स्टॅलिन' याच्या आयुष्यावरचा 'स्टॅलिन' हा दुसरा चित्रपट पाहिला. १९१७-१८ सालची रशियन क्रांती व कम्युनिस्ट पार्टीचा संस्थापक लेनीनच्या नेतृत्वाखाली काम करणारा स्टॅलीनपासून चित्रपट सुरू होता. स्टॅलीनची मुलगी स्वेतलानाच्या मनोगतातून चित्रपट उलगडत जातो. लेनीनने सत्ता बळकावल्यावर त्याच्या उत्तराधिकराच्या स्पर्धेत स्टॅलिन व ट्रॉटस्की यांच्यात संघर्ष सुरू होतो. विविध मार्गाने कपटे खेळून स्टॅलीन सत्ता आपल्याकडे ठेवण्यत यशस्वी होतो. त्यानंतर त्याने केलेली रशियाची वाताहत, हिटलरशी केलेला अनाक्रमणाचा करार, जर्मन-रशियन युध्द्दात केलेले नेतृत्व व शेवटी शेवटी आपल्या प्रत्येक सहकार्यावर संशय व्यक्त करणार्‍या स्टॅलीनचे दर्शन या चित्रपटात होते. स्टॅलीन बद्द्ल वाचले होतेच, त्याबद्दल आणखी माहिती चित्रपटातून मिळाली.

स्टार मूवीजवर 'रॅटाटूली' हा माझा अत्यंत आवडता अ‍ॅनिमेशन चित्रपट परत पाहिला. पॅरिसमधील प्रसिध्द अशा 'गुस्ताव्ह' रेस्टराँचा संस्थापक गुस्ताव्हचे काम बघून पाककला शिकलेल्या उंदराची कथा यात अतिशय सुंदरपणे मांडलीय. या रेस्टराँमध्ये एक नवशिका आचारी (शेफ) काम मागण्यास येतो आणि हा उंदीर त्याच्या करवी एक उत्कृष्ट पदार्थ बनवतो व त्यामुळे तो आचारी पोरगा कायम होतो , मग दोघे एकमेकांच्या सहकार्याने उत्तम पदार्थांची मेजवानीच देतात. पण त्या रेस्टराँचा सधाचा मालकाला मात्र या पोरावर संशय असतो. मग त्याच्यावर पाळत ठेवायला सुरू करून त्याचे रहस्य जाणोन घेण्याचा प्रयत्न करत असतो मग उर्वरित चित्रपटात मग अनेक मस्त मजेदार प्रसंग आहेत. त्या उंदराने एखादा पदार्थ कसा खावा याचे केलेले वर्णन मस्त आहे आणि शेवटी असलेले 'इगो' या टिकाकाराचे स्वगत/परिक्षण तर जबरदस्तच. लहान मुलांना नक्की बघण्यासारखा आहे.

गुझारीश बद्द्ल दिनेशना शेवटचे वाक्य सोडून अनुमोदन.. Happy मला ती फारशी प्रेमकथा वगैरे वाटली नाही...
संजय लिला भन्साळीचा नजिकचा भूतकाळ बघता अजिबात अपेक्षा न ठेवता हा चित्रपट पाहिला आणि आवडला... बाकी त्यात काही टेक्निकल चुका काढता येऊ शकतीलही कदाचित... e.g. गोवा गोवा न वाटणं, न्यायाधिशांना केस घरी जाऊन चालवता येते अथवा नाही येत, ऐश्वर्या आणि इतरांचे कपडे / घरातले फर्निचर आणि काळ ह्यांचा ताळमेळ नसणं... वगैरे पण ते सगळं असेल आणि वजा जाताही चित्रपट अगदीच टाकाऊ नाहीये...

ब्रेक के बाद.. भयंकर आचरटपणा आहे.. अजिबात आवडला नाही...

गुझारीश ठिक आहे. चित्रपटगृहात 'पाहायला' जास्त चांगला.
तो The Prestige वर आधारित आहे अशी अफवा ऐकली आहे. पण तसा काहिही संबंध नाही. वास्तविक हिरोला जादुगार दाखवायची काही गरज नव्हती... dancer ही चालला असता... तसेही त्याचे जादुचे प्रयोग भयंकर हास्यास्पद आहेत.

पराग मला वाटतं न्यायाधिशांना तसे अधिकार आहेत.
पणजी चे कोर्ट तसे नाही, पण पणजीतल्याच काही सरकारी इमारती, खास करुन एंट्री टॅक्स शी तशीच आहे. (माझा बराच वावर असे तिथे.)
सॅम, नायकाला नर्तक दाखवले असते तर हृतिक चे आणख छान नाच बघायला मिळाले असते.

माझा अतिशय आवडता अंडरग्राउंड मी परत बघितला काल. त्याबद्दल लिहायचं तर स्पॉयलर्स च स्पॉयलर्स तेव्हा लोकहो जमेल तिथून मिळवा आणि अंडरग्राउंड बघा.
http://www.imdb.com/title/tt0114787/ ही IMDB लिंक

टँगल्ड अ‍ॅनिमेशन सिनेमा पाहिला , मस्त आहे , आवडला. तुमच्या लहानग्यांना दाखवायला विसरु नका.

कालच Chronicles of Narnia: VDT-3D पाहिला. आधिचे दोन आवडले होतेच. हा पण आवडला.. त्यातून 3D असल्याने खूप मजा आली.
आता यातल्या पुढच्या भागाची प्रतीक्षा! Happy

मामी अनुमोदन. कोरियन सिनेमे चांगले असतात असा शोध नुकताच लागला.
http://www.imdb.com/title/tt0374546/
Spring, Summer, Fall Winter and Summer हा नुकताच पाहिला वर्ल्डमुव्हीज की लुमिए वर..
जरा टिपीकल होता, नाही असे नाही, पण तरीही अमेझिंग वाटला. काय ती जागा. सर्व जपानी गार्डन्सचा परिपाक.

बाळु जोशी, लिंकबद्दल धन्यवाद,

खरोखर छानच लेख लिहला आहे. लेखिकेच अभिनंदन करायला मात्र "सकाळ" ने निर्माण केलेली जागा म्हणजे रात्रीचा अंधकार आहे. हा लेख वाचल्यानंतर गुजारिश हा उत्तम सिनेमा आहे हे माझ मत पक्क झाल.

Underground हा एक classic चित्रपट आहे. गोरान ब्रेगोविक चे संगीत जबरदस्त आहे, विशेषत: शेवटचा सीन.
हा चित्रपट तूनळी वर उपलब्ध आहे.

http://www.youtube.com/watch?v=G0yJEGe_KSo

तू नळीवर चित्रपट पाहणे म्हणजे डोक्यातल्या उवा शोधण्यासारखा डोळ्याला ताण देणारा प्रकार आहे. असे पेन्डसे गुरुजी म्हणतात.

बाजो जसे उवा फुकट्च येतात तसेच हे. फुकट बघायला मिळतेय ना मग त्रास सहन करायचा. मी आधी अरुंधती तूनळीवरच बघितला ( मिपावर लिंक दिलेल्या) मग सीडी विकत घेतली. बोम्माली ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह दिवे घ्या हो. प्रताधिकार वगैरे अगदी मान्य आहे. जंमत केली.

मी अनस्टॉपेबल बघितला. ड्रायव्हरशिवाय पळणारी एक मालगाडी ट्रेन आणि तिला थांबवायचा प्रयत्न. असे सिनेमे जसे असतात तसाच आहे. काहि खास नाही. चित्रीकरण एवढे जलद झालेय, कि काय चाललय तेच नीट कळत नाही. आणि इंजिनाच्या स्पीडोमीटर वरचा स्पीड आणि प्रत्यक्ष गाडीचा स्पीड यात काही ताळमेळ दिसला नाही.

चित्रीकरण एवढे जलद झालेय, कि काय चाललय तेच नीट कळत नाही.<< दिनेशदा म्हणूनच हा अन्स्टॉपेबल आहे...

गुजारीश: संलीभं च्या इतर सिनेमा प्रमाणेच SO SO; nothing special. वर परागने लिहील्याप्रमाणे काळ कुठचा आहे ह्याचा पत्ता नाही. घरात रडिओ स्टेशन असते आणि ऐश्वर्या कंदिल घेऊन.... घर म्हणे कर्जात बुडलेले आहे... सिनेमा संपल्यावर कसलाच impact रहात नाही. विद्यर्थी जादुगाराची कथा कशाला जोडली आहे हे कळलेच नाही. त्यापेक्षा इच्छामरणावरच concentrate केले असते तर अधिक आवडले असते. मला एकदा वाटले की हृतिक जेंव्हा घरा बाहेर पडतो तेंव्हा त्याच्या मनात आपल्याच निर्णयाबद्दल मिश्र भावना निर्मान होते वगैरे.... काही नाट्य असेल पण तसे काहीच होत नाही. बराच flat वाटला. संलीभंचा सिनेमा नेहमीप्रमाणे सेटस्, पडदे, लाईट ईफेक्टस् यात हरवलेला वाटतो. paraplagic patients वरचा मला आवडलेला सिनेमा: My Left Foot. त्या व्यक्तीचे frustation, त्यामुळे आजुबाजुच्या लोकांवर होणारा त्याचा परीणाम, मग जगण्याची जिद्द हे सर्व फार छान दाखविले आहे. अवश्य बघावा असा.

The river Wild: Merylबाईंचा हा सिनेमा नेहमीप्रमाणे छान आहे. Kevin Bacon, John Reilly ह्यात व्हिलन आहेत. white water rafting ला गेलेल्या कुटुंबावर दोन अज्ञात माणसामुळे जीव गमवायची वेळ येते अशी कथा आहे. अतिशय सुरेख फोटोग्राफी जी कथेला जराही over shadow करत नाही, चांगला अभिनय ह्यामुळे हा नेहमीच्या पठडीतला सिनेमा लक्षात रहातो.

गोलमाल३: .....???

कालच मी Hitch पाहिला. मस्त आहे एकदम लाईट कॉमेडी. शेवटचे ट्विस्ट तर जबरी आवडले! अशा कॉमेडीज मधे काही काही गोष्टी एकदम सहज आणि सोप्या पद्धतीने होताना दाखवातात तसे आहे, पण बघताना आवडतो पिक्चर. तो हेवी बेबी का कायतरी आल्यापासून हा बघायचा होता.

याच बाफवर कोणीतरी नाना पाटेकर असलेला The Pool सिनेमा सुचवला होता. नेटफ्लिक्सवर सापडला आणि बघीतला. आवडला. हॉटेलात किंवा पडेल ते काम करणारी २ मुले, त्यांचे आयुष्य, त्यांचे भावविश्व, त्यांना एका बंगल्यातल्या पोहण्याच्या तलावाबद्दल वाटणारे आकर्षण याबद्दल आहे हा सिनेमा. सिनेमात काम करणारी २ मुले खरच बालकामगार असावीत, त्यांचे काम खूप छान झालय. खर तर छान झाले असे म्हणण्यात अर्थ नाही तेच त्यांचे खरे जीवन असेल तर असा विचार करून अस्वस्थ व्हायला होते. सगळ्या कलाकारांनी आपल्या खर्‍या नावानेच काम केलय (नाना वगळता).

Loins of Punjab Presents नावाचा सिनेमा बघीतला. या सिनेमामुळे Loins शब्द नव्याने कळला.
टाइमपास कॉमेडी आहे. याचे ट्रेलर बघीतले होते थिएटर मध्ये पण तो कधी आला आणि गेला कळलेच नाही म्हणून डीवीडीवर बघीतला. न्यु जर्सी शहरात होणारी Desi Idol स्पर्धा, त्यात भाग घेणारे स्थानिक कलाकार आणि त्या अनुशंगाने घडणारे वेगवेगळे प्रसंग असा हलकाफुलका सिनेमा आहे. काही ठिकाणी स्टीरीओटाइप प्रसंग/लोक दाखवले आहेत तरीही एकंदर आवडला. शबाना आझमीने काम चांगले केलय.

खूप दिवसांपासून The Hurt Locker बघायचा होता तो बघीतला. Breathtaking!!! युद्धभुमीवर सापडणारे बॉम्ब निकामी करण्याचे अत्यंत अवघड काम करणारे पथक, त्या पथकात काम करणारे लोक, त्यांचा लिडर, त्यांचे एकमेकांशी असलेले संबंध यावर आधारीत कथानक असलेला हा सिनेमा. संपूर्ण वेळ सिनेमा तुम्हाला खिळवून ठेवतो. काही काही प्रसंग तर अगदी अविस्मरणीय आहेत.

'गंध' हा मराठी सिनेमा खूप मस्त आहे. यात 'लग्नाच्या वयाची मुलगी', 'औषध घेणारा माणूस' आणि 'बाजूला बसलेली बाई' अशा ३ वेगवेगळ्या कथा आहेत पण त्यांच्यात 'गंध/ वास' हा समान दुवा आहे. शेवटच्या कथेत कोकणातले, तिथल्या पावसाचे, जुन्या घराचे अतिशय सुरेख चित्रीकरण आहे. सगळे कसलेले कलाकार ही अजून एक जमेची बाजू.
मला परत बघायचा आहे हा पिक्चर. भारतात असताना बघितला होता. आता नेटवर कुठे बघता येईल का किंवा त्याची डिव्हीडी आली आहे का?

अंजली

गंधची डिवीडी अजूनही आलेली नाहीये Sad नेटवर पण उपलब्ध नाही.
'गंध', 'विहिर', 'रिंगा रिंगा' हे पहायचे राहिलेत, पण कुठेच उप्लब्ध नाहीयेत.

हॅरी पॉटर - डेथली हॅलोज (भाग १) हा ३-डी नाहीये का?

रंगासेठ म्हटले की मला, रंगा सेठ , अपने आदमियोंसे कह दो ... सारखे डायलॉक आठवतात नाहीतर चिनॉय सेठ, जिनके अपने घर शीशेके होते है वो दूसरोंपर पत्थर नही फेका करते... हा तरी Proud

जिनके अपने घर शीशेके होते है वो दूसरोंपर पत्थर नही फेका करते... हा तरी फिदीफिदी<< बा जो आता या डायलॉगचे नवीन व्हर्जन आले आहे गोलमाल ३ च्या क्रुपेने ...जिनके अपने घर शीशेके होते है वो बेसमेंटमे कपडे बदलते है ...

मला पण गंध आणि विहीर हे दोन सिनेमे बघायचे आहेत. त्यांच्या DVDs आल्या की प्लीज ह्या बाफवर पोस्ट टाका. म्हणजे कोणी भारतात जाणार असेल तर मागवता येतील. चांगल्या मराठी सिनेमांच्या DVDs मिळत नाहीत हे दुर्दैव आहे.

Pages