शोभिवंत सर ओघळतो.. (कविता आणि भाषांतराचा प्रयोग-२)

Posted
11 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
11 वर्ष ago

नवी कविता आणि तिचं भाषांतर..

वार्‍याचे बघ धैर्य सखे, तो करितो लाघवगान!
प्रणयोत्सुक आकाशसुंदरी, अन्‌ होते बेभान!
शोभिवंत सर ओघळतो गं, घेता चुंबनतान.
लाल हरित मखमालीवरती मोती विराजमान.

-संघमित्रा

See the courage of wind,
he openly sings a love song.
The amorous babe called sky,
blushes and sings along.
The precious necklace breaks,
in a passionate, hasty kiss.
On the red-green velvet of leaves,
the pearls thus land in bliss..

-Sanghamitraa

विषय: 
प्रकार: 

खूप सुंदर! पावसाची सर काय ती.... इतकं मोहक वर्णन की अगदीच उभा राहिला डोळ्यांसमोर तो लाडिक प्रेमाविष्कार! Happy अनुवाद ही खूपच आवडला.. तितकाच प्रभावी. मस्त! Happy

आभारी आहे.. Happy
भाषांतर हा एक प्रयोग म्हणून मी करून बघतीय.
आधी फक्त मराठीत विश्वासाने लिहू शकायचे. थोडंफार हिंदीत. मग कधीतरी लक्षात आलं की वेगवेगळ्या फ्लेवरच्या भावना वेगवेगळ्या भाषेत जास्त चांगल्या व्यक्त होऊ शकतात. काही कल्पना येतानाच त्यांना कुठल्या भाषेची प्रावरणं शोभतील हे ठरून जातं. प्रश्न असतो तो आपल्याला कुठली भाषा कितपत वळवता येते, तिला कट्स आणि फिनिशेस देता येतात याचा. म्हणून हे प्रयोग. (की स्वतंत्र कविता म्हणून भाषांतर उभं राहू शकतंय का?)
म्हणून जर कुठे काही खटकत असेल तर प्लीज सांगा.
जसं अमेलियाने मला सांगितलं की बेब हा शब्द खटकतोय. तिचं म्हणणं अगदीच योग्य आहे. तो वापरला कारण तो मीटर मधे बसत असल्याने तो डोक्यात घोळत होता. त्याला बदल म्हणून ब्युटी हा शब्द वापरणार होते. पण एका पारंपरिक कल्पनेला एक ट्विस्ट म्हणून तो तसाच राहू दिला.
तरीही ते विजोड वाटत असेल तर नक्की सांगा.. आणि अजून काही असेल तरी..

चिन्नु, मला ते हळुवार उतरण्याचा फील हवा होता.. गरगरत पान किंवा कागदाचं विमान उतरावं तसा. म्हणून लँड. तरीही काही दुसरा शब्द सुचत असेल तर सुचव ना.
अमित, थँक्यू Happy

वावा छान आहेत दोन्ही.

-- प्रतिशब्द तुम्ही शोधत होतात म्हणून..

the pearls thus land in bliss..

lazily, the pearls alight in bliss..

प्रयोग चांगला जमला आहे.खरं म्हणजे फारा दिवसांनी तुमची कविता वाचायला मिळाली, त्या पुनर्‍भेटीचा आनंद जास्त! पण 'लाघवगान', 'चुंबनतान' या शब्दांची मजा त्या-म्हणजे मूळच्या- भाषेतच. त्यांचा अनुवाद नाही होऊ शकत.
-बापू