पुणे

पिंपरी-चिंचवड व परिसरातील मायबोलीकरांची भेट (गेटटुगेदर) १४ जानेवारी, २०१२ सायं ६.३० भक्तिशक्ति उद्यानाजवळ

तारीख/वेळ: 
14 January, 2012 - 08:00 - 10:30
ठिकाण/पत्ता: 
पिंपरी-चिंचवड व परिसरातील मायबोलीकरांची भेट दिनांक १४ जानेवारी, २०१२ रोजी सायंकाळी ६.३० ते ९.०० दरम्यान भक्तिशक्ति उद्यानाजवळ ठरविली आहे. सर्वान्नी अगत्य येण्याचे करावे ही नम्र विनंती. दिनांक : १४ जानेवारी, २०१२ वेळ : सायंकाळी ६.३० ते ९.०० स्थळ : भक्तिशक्ति उद्यानाजवळ साडेसहा ते सात दरम्यान भक्तिशक्तिच्या गुगलम्यापवरुन घेतलेल्या पुढील फोटोमधे बरोब्बर मध्यामधे लाल फुलीसहित जो पांढरा गोल दाखविला आहे, त्या कोपर्‍यापाशी सर्वांची वाट बघणेत येईल, व ७ नंतर जमलेले लोक पुढील कार्यक्रम ठरवतील

.
फलितः
ही भेट ठरविल्याप्रमाणे सम्पन्न झाली / पार पडली. याचा वृत्तान्त पुढिल लिन्क्स वर आहे.
१) http://www.maayboli.com/node/31953#new

माहितीचा स्रोत: 
पिंपरी-चिंचवड हा धागा http://www.maayboli.com/node/1897#comment-1805977 - येथिल सभासदांचे निर्णयानुसार

पुणे गटग - रविवार १८ डिसेंबर २०११ स. ९ वा.

तारीख/वेळ: 
17 December, 2011 - 22:30 - 18 December, 2011 - 01:30
ठिकाण/पत्ता: 
"गंधर्व" रेस्टॉरंट, बालगंधर्व रंगमंदिर्/पुलासमोर. शिवाजीनगर. रेस्टॉ. चा फोन नं. २५५३३४२३. ज्यांना कसे यायचे माहीत नाही त्यांनी मला संपर्क करा.

लोकहो,

नीधप या वीकेण्डला पुण्यात आहे. त्या निमित्ताने पुण्यातील लोकांचे एक गटग या रविवारी (१८ डिसेंबर) सकाळी करायचे ठरवत आहोत. वेळ सकाळी ९ वाजता.

ठिकाण - "गंधर्व" रेस्टॉ.

तर जरूर या. शक्यतो आधी येथे कळवलेत तर रिझर्वेशन करायला बरे पडेल. सध्या पुण्यात काही बाहेरगावाहून आणि परदेशातूनही आलेले लोक आहेत, त्यांनीही जरूर यावे.

मुलाफुलांची गाणी - बालदिनानिमित्त खास लहान मुलांसाठी गाणी व नृत्याचा कार्यक्रम

तारीख/वेळ: 
13 November, 2011 - 06:30 - 09:30
ठिकाण/पत्ता: 
भरत नाट्य मंदीर, पुणे

बालदिनानिमित्त सुमनांजली घेऊन येत आहे मुलाफुलांची गाणी..

खास बालगीतांचा कार्यक्रम..

१० वर्षांच्या खंडानंतर नवीन बालगायकांसह आणि धमाल नृत्यांसह...

कवयित्री सौ. आश्लेषा महाजन, सौ. संगीता बर्वे, सौ निर्मला देशपांडे तसेच कवी श्री. मंगेश पाडगावकर, श्री. सुधाकर देशपांडे, कै. गंगाधर महांबरे व कै. अशोक दातार ह्यांच्या रचनांचा कार्यक्रम..

ह्या रचनांना संगीत दिले आहे.. ज्येष्ठ संगीतकार म. ना. कुलकर्णी(मनाकु१९३०) ह्यांनी तर कार्यक्रमात सादर होणार्‍या नृत्यांची संरचना केली आहे सौ. सायली कुलकर्णी ह्यांनी...

रविवार ब्रेकफास्ट गटग...

तारीख/वेळ: 
20 August, 2011 - 23:00 - 21 August, 2011 - 00:30
ठिकाण/पत्ता: 
हॉटेल गंधर्व, पुणे. बालगंधर्व रंगमंदिराच्या पुलासमोर.

गटगचे म्हणलं तर निमित्त आहे म्हणलं तर नाही.
फारेण्ड, केदार आणि मनीष हे 'परतोनि' आलेले आहेत त्यांचे स्वागत करायचे राह्यलेलेच आहे बहुतेक.
शैलजा आणि स्वाती मोठ्ठा ट्रेक करून परत आल्यात त्या बद्दल त्यांच्याकडून ऐकायचंय. फोटोही बघायचेत जमल्यास.
आणि मी पण पुण्यात आलेली आहे.. फिदीफिदी

तर रविवारी ब्रेकफास्ट किंवा सकाळची न्याहरी हादडायला गंधर्व हॉटेलात भेटूया. सकाळी ८:३० वाजता. १०:३० पर्यंत तरी असू तिथे. म्हणजे १०:३० ला कटलेच पाहिजे असे नाही.

भेटू तर मग.

माहितीचा स्रोत: 
पुपुकर :)

वैभव जोशी यांच्या गझल, कवितांची अनोखी मैफील - शब्द झाले मायबाप

तारीख/वेळ: 
20 August, 2011 - 07:30 - 10:30
ठिकाण/पत्ता: 
२० ऑगस्ट रोजी, टिळक स्मारक मंदीर, पुणे

.
काही दिवसांपूर्वी तिन मायबोलीकर गप्पा मारत होते.
'पूर्वी कसली मजा यायची माबोवर.'
'का रे? मजा तर आताही येते.'
'तस नाही रे. काही वर्षांपूर्वी माबोला सुगीचे दिवस होते. बरेचजण उच्च लिहायचे.
कविता, गझल, लेख... मेजवानी असायची नुसती. ती गंमत हल्ली नाही येत. डोळ्यांना, कानांनाही सवय होते उत्तम वाचायची, उत्तम ऐकायची. एकदा का ती सवय झाली की मन फक्त तोच दर्जा स्विकारतं.'
'हे मात्र खरं. हल्ली वैभव जोशी तर काहीच लिहित नाही.'
'हो रे.. तिच तर खंत आहे. कुठे गेले हे लोक?'
'वैभव हल्ली बराच बिझी असतो त्यामुळे वेळ मिळत नाही त्याला तेवढा.'
'अरे मग आम्हाला त्याच्या कविता वाचायला कशा मिळणार?'

हिज हायनेस चिंतामणराव पटवर्धन गर्ल्स हायस्कूल, पुणे

पुण्यातली सगळ्यात जुनी मुलींची शाळा. १२५ वर्ष पूर्ण होऊन गेली.
आमच्या शाळेचं हेच्च नाव आहे. बाकी नावांनी हाक मारू ने. स्मित पुणे

पुण्यात झालेले बंगू गटग - २१ मे २०११

तारीख/वेळ: 
21 May, 2011 - 08:30
ठिकाण/पत्ता: 
ऐका, ऐका, ऐका! पुण्यनगरीमध्ये एक ढॅणटॅडॅ बंगू गटग होत आहे होऽऽऽ!!! :) शनिवारी २१ मे २०११ रोजी संध्याकाळी ०५: ३० ला प्राची आणि सत्या आणि डॅफोला भेटण्यासाठी कोण कोण येणार, त्यां सगळ्यांनी फटाफट नावनोंदणी करावी होऽऽऽ!!

भेटायचे ठिकाण: ओकवूड हॉटेल. ओकवूड , भांडारकर रस्त्यावरच, फर्ग्युसन रस्ता गुडलक चौकापाशी मिळतो, तिथे जवळच आहे. तर, तिथे भेटूयात शनिवारी २१ मे २०११ रोजी संध्याकाळी ०५: ३० ला.

सगळ्यांना गटगला यायचे आमंत्रण स्मित

जाहिरातींचे भाषांतर

माझ्याकडे एका जाहिरातीच्या भाषांतराचे काम येउ घातलेय. त्यांनी काय चार्जेस घ्याल असं विचारलय. मला या अशा स्वरुपाच्या कामाचे काय चार्जेस असतात काहिच माहिती नाही . कोणी सांगू शकाल? मला साधारण अंदाज दिला तरी चालेल.

गझल सहयोगचा मुशायरा - वेदनेचा शौक - सस्नेह आमंत्रण

तारीख/वेळ: 
19 March, 2011 - 17:00 - 20:00
ठिकाण/पत्ता: 
छत्रे सभागृह, भरतकुंज वसाहत, गणेशनगर, पुणे (एरंडवणा विभागातील मेहेंदळे गॅरेजकडून नवसह्याद्रीकडे जायच्या रस्त्यावर उजवीकडे कर्नाटक हायस्कूलकडे जाणारा रस्ता आहे त्या रस्त्यावरील तिसर्‍या डाव्या गल्लीत हे सभागृह आहे.)

(सदर मुशायरा सायंकाळी पाच ते सायंकाळी आठ या वेळात आहे. काही कारणाने कदाचित वेळ वेगळी दिसत असू शकेल. )

माहितीचा स्रोत: 
गझल सहयोग संयोजक: अजय जोशी व बेफिकीर

श्री. अस्चिग यांना भेटण्यासाठी गटग - पुणे, ९ जानेवरी, २०११

तारीख/वेळ: 
9 January, 2011 - 07:30 - 09:30
ठिकाण/पत्ता: 
वाडेश्वर, फर्गसन कॉलेज रस्ता, पुणे

लोकहो,

मायबोलीकर अस्चिग आणि अनुदोन ९ जानेवारीला पुण्यात येत आहेत. त्यांना भेटण्यासाठी रविवारी संध्याकाळी ६ वाजता गटग आयोजित केलं आहे.

कृपया सर्वांनी येण्याचे करावे. स्मित