एकांत

द्वेष : एक भय गूढकथा, भाग ९

Submitted by प्रथमेश काटे on 2 March, 2024 - 00:56

वेळ हळू हळू पुढे सरकत होता. अस्वस्थता... चित्त विचलित करणारी. शिवाय या अस्वस्थतेसोबत काहीशी भीतीही होतीच. ' करावं तरी काय ?' - राजाभाऊंना उमजत नव्हतं. ते फक्त तिकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करत होते. निष्फळ प्रयत्न. परिणाम काही नाही. उलट हे मळभ कणाकणाने दाटतच चाललं होतं.

ओहोटीच्या लाटा

Submitted by रंगारी on 6 June, 2023 - 08:30
ओहोटीच्या लाटा

भाजीबाजार संपल्यानंतर पुढं मासळीबाजार लागणार हे आता इतकं सवयीचं झालेलं की खिशातील रुमाल काढून भाजीबाजार संपण्याआधीच त्यानं आपोआप नाकाला लावला.

विषय: 
शब्दखुणा: 

गझल - सोबत

Submitted by अनिवार on 8 August, 2022 - 02:31

सोबत

सारा विखूरलेला आकांत सोबतीला
मारायला मनाला एकांत सोबतीला

गर्दीत आसवांच्या उठबैस आठवांची
चित्रास हार त्यांच्या मरणांत सोबतीला

रात्रीस मेघ आले तारांगणात माझ्या
येणार चांदण्यांचा परप्रांत सोबतीला

माझ्या रणांगणी त्या गाथा विदूषकांच्या
आधार हाच खोटा धादांत सोबतीला

वारी खुशाल देते आव्हान पोचण्याचे
त्या पालखीत आता विश्रांत सोबतीला

का गूढ हासतो मी पडलीच भ्रांत आहे
हास्यात ताण माझे ते शांत सोबतीला

एकांत

Submitted by Rudraa on 29 May, 2021 - 13:06

फणफणत्या मस्तकात,
दुर्बलतेच्या भेगा......
अश्रूतून वाहे,
बंधिस्त वाटा.....

दुःखास कवटाळले,
आज भरदुपारी ......
एकांताच्या कपारीत ,
एकटीच ह्यावेळी मी .......

हृदयाच्या कोपऱ्यात,
दुर्दैवी छाया मायेची.....
फसवा तु की फसवी मी,
क्रोधात जळते भावनाच तरीही.....

दुःखाच्या पहाटेला,
मनाचे कवाडे बंद.....
अंताच्या क्षितिजातील,
ही शेवटची सांजवेळ.......

रुद्रा......

शब्दखुणा: 

एपिक चॅनेल

Submitted by स्वप्ना_राज on 22 January, 2015 - 09:50

"एकांत" ह्या एपिक चॅनेल वर दर गुरुवारी रात्री १०:३० वाजता (रिपिट टेलिकास्ट - शुक्रवार रात्रौ ८:३०) लागणार्‍या कार्यक्रमामध्ये भारतातल्या एके काळच्या गजबजलेल्या पण आता ओसाड झालेल्या जागांबद्दल माहिती देतात. हा कार्यक्रम बहुतेक नोव्हेंबर २०१४ पासून सुरु झाला असावा कारण हे चॅनेलच मुळी तेव्हा सुरु झालं. माझे सुरुवातीचे काही भाग चुकले असावेत. राजस्थानमधलं भानगढ, त्रिपुरातलं उनाकोटी आणि गुजरातमधलं लखपत ह्यावरील भाग मी पाहिले. आणि त्यावरची माहिती 'संथ चालती ह्या मालिका' इथे पोस्ट केली. ती कायमस्वरुपी साठवून ठेवावी अशी सूचना झाली म्हणून हा धागा काढला.

एकांत (बालविक्रिडीत वृत्त)

Submitted by संतोष वाटपाडे on 20 January, 2014 - 09:57

काढत बसते जुनाट कपडे कपाटातले,
गोंडस झबले विजार इवली जरी फ़ाटले...
लाजत पहिला खट्याळ गजरा हळू पाहते,
रेशम लुगडी कधी पसरते घड्या घालते....

गोल वळकटी निखार भरल्या तरी खोलते,
पत्रविवरणे मला खरडली पुन्हा मोजते....
पान निसटले कुठून जरका तिथे खोचते,
खंगत पडल्या उदास कविता कधी वाचते,

आठव सगळे जमून मजला उगा टोचती,
थेंब निथळते भकास नयनी सदा वाहती...
रोज गवसते जरी कवडसा भुयारात मी
खोदत हसते मनात दडली जुनी खाण मी....

भग्न तसविरी विराण पुसते दिसाया जरा,
हार बदलते कृत्रिम पिवळा जसा की खरा .....
बांधव नवरा मुले विलगली अनायास का,
आत तडपण्या उरात उरले अता श्वास का.....

भूतान बद्दल माहिती हवी आहे

Submitted by भानुप्रिया on 31 January, 2013 - 04:47

नमस्कार!

जुलै १५ नंतर भूतान ला जाण्याचा विचार आहे, पण टिपिकल ट्रिप करायची नाहीये! हनीमूनसाठी जाणार आहे. आम्हा दोघांनाही टूरिस्ट टॅग असलेल्या जागा सोडून जरा ऑफ-बीट ठिकाणं बघायची आहेत. शांत निसर्ग हवा आहे, फोटोग्राफी करायची आहे, लोकल मार्केट बघायचं आहे आणि तिथली जीवनशैली जवळून अनुभवायची आहे!

कोणाला काही माहिती असेल तर प्लीज सांगा!

धन्स इन अ‍ॅड्व्हान्स!! Happy

एकांत

Submitted by रमा नाम़जोशी on 27 May, 2012 - 00:59

एकांतप्रिय आत्मा आणि माणसांचा नको इतका सहवास,
तरी मी कुडीत जपलेला तुझ्या निरवतेचा सुवास......

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

एकांत

Submitted by उमेश वैद्य on 11 March, 2011 - 03:56

एकांत....

रात्री तळ्यातल्या पाण्याचा
मला वाटतो हेवा
किती छान एकांत!!
असा आपल्याला हवा.

अर्थ तुझ्या श्वासांचा
जरा कुठे उमगतो
सेकंड शिफ्टचा मन्या
धड़ धड़ जिना चढ़तो

चौपाटीचा दगड
बरा अस वाटल
पोलीसाचा दंडूका
पाहून काळीजच फाटल

चिम्ब चिम्ब पावसात
जाव जरा भिजायला
दापोलीची आत्या
येते चार दिवस रहायला

चंद्र रोज हसतो
मनात येउन बसतो
पण आयुष्याच्या झिम्म्याचा
ताल जरा चुकतो

उमेश वैद्य २०११

गुलमोहर: 
शब्दखुणा: 
Subscribe to RSS - एकांत