एकांत

Submitted by उमेश वैद्य on 11 March, 2011 - 03:56

एकांत....

रात्री तळ्यातल्या पाण्याचा
मला वाटतो हेवा
किती छान एकांत!!
असा आपल्याला हवा.

अर्थ तुझ्या श्वासांचा
जरा कुठे उमगतो
सेकंड शिफ्टचा मन्या
धड़ धड़ जिना चढ़तो

चौपाटीचा दगड
बरा अस वाटल
पोलीसाचा दंडूका
पाहून काळीजच फाटल

चिम्ब चिम्ब पावसात
जाव जरा भिजायला
दापोलीची आत्या
येते चार दिवस रहायला

चंद्र रोज हसतो
मनात येउन बसतो
पण आयुष्याच्या झिम्म्याचा
ताल जरा चुकतो

उमेश वैद्य २०११

गुलमोहर: 
शब्दखुणा: