विरली तुझी सल
श्वास जाहले मोकळे
कवितेच्या पार आता
नवे क्षितिज दिसले
कल्पना विलास कोठे
झेप माझी मंदावली
उरलो मी साधारण
घेतो नीज सुखातली
नको शब्दांचा फुलोरा
बरा काटेरी एकांत
झालो सजीव पुन्हा
मिटता तुझी भ्रांत
विरली तुझी सल
श्वास जाहले मोकळे
कवितेच्या पार आता
नवे क्षितिज दिसले
कल्पना विलास कोठे
झेप माझी मंदावली
उरलो मी साधारण
घेतो नीज सुखातली
नको शब्दांचा फुलोरा
बरा काटेरी एकांत
झालो सजीव पुन्हा
मिटता तुझी भ्रांत
"अनाकलनीय ?
साधा, सरळ शास्त्रीय नियम आहे हा.
...
....
तुच म्हणाली होतीस एकदा,
'बोलल्याने मन मोकळं होतं. दु:ख हलकं होतं'
...
.....
पण रित्या पोकळ्या पुन्हा भरायला वेळ लागत नाही.
मग असं मोकळं होण्यापेक्षा मन कायम तुडूंब, शिगोशिग
भरलेलं असलं तर..
एक म्हणजे, नवीन काही भर पडलीच तर ती जाणवणार नाही किंवा
उतू तरी जाईल,
शिवाय जे आहे ते न हिंदकळवता वावरण्याची सवयही लागेल.
दुसरं म्हणजे, हलक्या वस्तू पृष्ठभागावर तरंगतात.
त्यापेक्षा त्यांना जडशीळ करून तळाशी एकजीव केलं तर....... ?
...
......
मौनामुळे जगणं जास्त सोपं होईल, अस नाही वाटत तुला ?
.......... "
रे मीत, ऐक, गाऊन गीत मी करिते अंतर् खुले
कुणी कोकिळगायन म्हणो, म्हणो कुणि वाग्वेलीची फुले
आनंदी अथवा आर्त, कसाही असो सूर गाण्याचा
मन दिसते त्यातुन, जसा दिसे तळ निर्मळ पाण्याचा
हे उमजुन घे अन ऐक रे जरा गीत गाइलेले
कुणी कोकिळगायन म्हणो, म्हणो कुणि वाग्वेलीची फुले
तू कधीच नव्हते मला मानले अपुली जीवनसाथी
अन् तरिही होते लोभावुन मी तुझ्याच साथीसाठी
पण सनईच्या त्या तारस्वरानी स्वप्न हिरावुन नेले
कुणी कोकिळगायन म्हणो, म्हणो कुणि वाग्वेलीची फुले
तो तुझा तृप्त अन् हसरा चेहरा बघताना त्या क्षणी
परतवले होते निर्धाराने मी डोळ्यातिल पाणी
अन सुरेख निवडीचेही औक्षण होते मी केलेले
खाया उठली महागाई : नागपुरी तडका
नाकी तोंडी पाणी घुसले, जीव झकोले खाई
वेसन तुटली, स्वैर सुटली, खाया उठली महागाई...!!
आवतन नव्हते दिले तरी, वाजत-गाजत आली
एक तारखेस खिसा भरला, पाच तारखेस खाली
देवदर्शन दुर्लभ झाले, आता पायी पंढरीवारी
गहाळ झाल्या सोई-सुविधा, परी कर वाढतो भारी
धान्यामधी खडे मिसळती, शासक टूकटूक पाही
वेसन तुटली, स्वैर सुटली, खाया उठली महागाई...!!
तेलामध्ये भेसळ होते, मिरची मध्ये गेरू
पाचक रसा दुर्बल करते, व्याधी पाहाते घेरू
दवादारू महाग झाली,आतून काळीज पिरडी
गरिबाघरी कँसर आला, बांधून ठेवा तिरडी
मुक्ती मागे रोगी सत्वर,अन यमास नसते घाई
निळ्या, निरभ्र, निवांत आकाशाशी
बघतों मी नेहमीच नातं जोडायला
आणि जुळताताही सूर आमचे बरेचसे
उणीव काय असावी, दूरी पूरी मिटायला
ढगाळून ओथंबलेलं पांघरून आकाश
उभा ठाकतो मग जीवघेणा एक दिवस
धाड धाड ओढतही सुटतो आसूड
सूडाने पेटल्यागत अविरत तो पाऊस
अन कितीही आक्रोशून नाकारलं मी
तरी, वीजा विचकून दांत, टाकतात उजळून
नकोसं मला असलेलं खोलवरचं नातं माझं
रौद्ररुपी वरच्या त्या अस्मानी थैमानाशी
दिसणं तुझं म्हणूनच म्हणतो नाही पुरेसं
निळ्या, निरभ्र, निवांत त्या आकाशाला
चांदण्यासारखं बरसणंही हंवय तुझं मंद
नातं चांगल्याचं माझ्या, तुजसंगे बहरायला.
जगण्यावरतीच ओढून कवच मरणाचं
रणरणत्या त्या राखेच्या वाळवंटात
निपचीत पडून राहिलेली जीवसॄष्टी सारी
थरारून उठते, न्हाते,फुलते अन बहरते
साधून निमित्त चुकल्या-माकल्या एखाद्या सरीचं
आणि, हंसत मोजते मोल मरणप्राय यातनांच
वर्षाकांठीं केवळ कांही क्षण खरंखुरं जगण्याचं
अन रखरखत्या अगदीं त्याच रेजिस्तानात
रसरसलेल्या अविरत जगण्याचं वरदान लाभलेला
अभागी स्वतःला समजणारा एक जीव केविलवाणा
भटकतोय अनवाणी, आक्रंदून मरणच कवटाळायला
जगणंच ठरवून मातीमोल, कुठल्याशा म्हणे लैलाविना !
दरवर्षी नव्या पुस्तकांना घातलेल्या कव्हरसारखं
या पावसातही तुझ्या आठवणींना
लपेटून घेतलं मी कवितेत.
हळूच दुडले काही दिवस
एकमेकांसोबतचे
शाकारली स्वप्नांची कौलं
नि पडलो जरासा वाचत मजेत
नव्या छपराखाली त्याची वाट बघत
चवदार शब्दांचे घुटके घेत
पण वाचता वाचता डोळा लागताच
हा कोसळून गेला धबाधबा
माझी फिरकी घेत.
जाग येऊन बेघर झालो पुन्हा
नि फुटक्या कौलांचा तो ढीग
घेतला पुन्हा कवेत.
आता
आधी कौलं घालू की वाचन संपवू
इतकाच प्रश्न आहे.
पुन्हा बेघर व्हायची भीती वाटते ना!
तू आलास की मन कसं अगदी शहारून जातं
श्रावणातल्या पहिल्या सरीत चिंब झाल्यासारखं होतं
तुझा नुसता भास होतो नि मी माझ्याशीच हसते
फुलून आलेल्या रजनीच्या कानी हळूच काही कुजबुजते
रातराणीला अन् त्या चाफ्याला नकळत काही खुणावते
गंधीत झालेल्या वार्याबरोबर, स्वप्नांची एक मैफल सजवते
तू आलास की मन कसं......
तुझ्या भेटीतला प्रत्येक क्षण आठवून कणाकणानं मोहरते
तुझे बोलणे आठवून मनातले एक गाणे गुणगुणते
स्पर्श तुझा आठवून हातांचे हळूच एक चुंबन घेते
चोरून पाहणार्या चांदण्याला मग वेडावून दाखवते
तू आलास की मन कसं......
खरं सांगू, डोळे भरून आले की तुझ्या खांद्यावर डोकं ठेवावसं वाटतं
पुन्हा आली तुझी सय माझी उदासे नजर
माझे काळीज कापते सांज कातर कातर
पुन्हा आली तुझी सय उंचावला हा उंबरा
आसुसल्या या दाराला कधी होणार सामोरा?
पुन्हा आली तुझी सय भांडते मी भांड्यांशीही
लागे उचकीही अशी नाही उसंत तिलाही
पुन्हा आली तुझी सय माझ्या भिजलेल्या गाला
आठवता तुझी खोडी पहा नाजूक लाजला
पुन्हा आली तुझी सय रुसली का माझी नीज
परि स्वप्न पाही तुझे विरहिणी माझी शेज
पुन्हा आली तुझी सय माझे फुलले हृदय
माझ्या चालण्यात सख्या नाचे तुझीच की लय
पुन्हा आली तुझी सय सोबतीला तिच्या वारा
गहिवराचे खोल पाणी,
का गेले झिरपुन,
सांजेची उदास राणी,
गेली अनोळखी हसुन.
तळहाताच्या पळवाटांवर,
नको आता फिरणे,
मारव्याची निरोप बाधा,
कुठे पुन्हा भोगणे.
अंधारच्या काटशहाने,
बधीर जाहले जगणे,
प्रदक्षीणेच्या संचिताचे,
पुरे आता मागणे.
- शशांक प्रतापवार