आम्ही मित्र मिळून 'इगतपुरी' ची एक दिवसाची ट्रीप करायची योजना बनवतोय. आम्ही पुण्याहून संध्याकाळी 'सिन्नर'ला बसने निघणार. रात्री सिन्नरला मुक्काम करणार. दुसर्या दिवशी सकाळी तिकडे एका मित्राला घेऊन इगतपुरीला फिरून त्याच दिवशी पुण्याला परत बसने (रात्री) येणार असा प्लॅन आहे.
तर इगतपुरीत एका दिवसात पाहण्यासारखी ठिकाणांबद्दल माहिती हवी आहे.
तसेच सिन्नर मध्ये कुणी कॅब भाड्याने देणारी कंपनी असेल तर त्याचीही माहिती हवी आहे. कारण पुण्याहून कॅब घेऊन ट्रीप करणे परवडणार नाही.
धन्यवाद.

