परदेसाई यांचे रंगीबेरंगी पान

बा रा ए वे ए ठि - एक बर्फाळलेला दिवस....

बागराज्य एवेएठि हे आता रजनीकांतच्या लायनीवर जात असून, पुढच्या वर्षी त्यादिवशी बर्फ, हिवाळा, थंडी Cancel करण्यात येत आहे. यावर्षीचे एवेएठि या सगळ्याला न जुमानता पार पडलं. मँगो पाय नाही आला तर चिकनची तंगडी, आणि फिशकरी नसली तरी चिंगीकरी आणून बा. रा. करांनी आपल्या एवेएठित कोणतीही अडचण येऊ दिली नाही. बाराकरांच्या या करामतीने काही पुणेकर (आणि आता कोलकताकरही थक्क झाल्याचे वॄत्त हाती आले आहे).

सुंदर माझा गाव.. (कोकण २०१०)

बरेचसे चांगले फोटो आहेत पण ते लोड होत नाहीत... जे जमतील ते इथे देतो...
IMG_1767.JPG
(कर्ली नदी नेरूरपार पुलावरून)

IMG_1777.JPG
(हुप्या)

IMG_1781.JPG
(मालवणकडे जाताना छोटासा धबधबा)

IMG_1788.JPG
(धामापूर तळे)

IMG_1809.JPG

उन्हाळी विहार बाग राज्य सम्मेलन...

हल्ली सम्मेलनाला सम्मेलन म्हणू नये असं काही आग्रही मंडळीनी माझ्या मागे तगादा लावलेला असला तरी कुणी गटग म्हणून तर कुणी एवेएठि म्हणून सम्मेलन करत असतातच. बागराज्याच्या ए.वे.ए.ठि.ची घोषणा जवळपास डीसीला झालेल्या सम्मेलनाच्या दिवशी येताना गाडीतच झाली कारण नयनीशला एक फड संपला की दुसर्‍या फडाची स्वप्ने दिसू लागतात. त्याला त्यादिवशीही घरी जाणे मुळातच मान्य नव्हते (तरी शिंडी गाडीत नव्हती आमच्या). 'आत्ताच मैत्रेयीचा हॉल बूक करू, आणि जास्तीत जास्त पाच सहा दिवस थांबून लगेच पुढच्या आठवड्याला गटग करू,' असं म्हणायला लागला. यावरून 'श्री.

फुलपाखरू.....

अंगावरचं निथळणारं पाणी टिपत ती बेडरूम मध्ये शिरली. केसांना गुंडाळलेला टर्किश टॉवेल भिजून अजूनच चिंब झाला होता. बाथकोटच्या गाठीला पुन्हा एकदा नीट बांधून तिने केस मोकळे सोडले. ओला टॉवेल तसाच कोपर्‍यात भिरकावून ड्रेसर मधून दुसरा टॉवेल काढला.

मी, माझे वडिल आणि भ्रष्टाचार

१९७५ सालच्या दरम्यान कुडाळ-वेंगुर्ला रस्त्यावर WG Forge Allied Industries नावाची एक कंपनी सुरू झाली. गावातले लोक तिला वायमन गार्डन, वायंगान कार्ड पासून काहीही म्हणायचे. खरंतर ते Wyman Gordon होतं. माझे वडिल या कंपनीत सुरुवातीला Security Guard, आणि नंतर काही वर्षे Security Supervisor म्हणून काम करायचे. तिथे काम करणारे बहुतेक लोक हे भारतीय सेनेतून रिटायर होऊन आलेले गावकरी सैनिक होते. पहिल्या पाच सहा महिन्यात सुरक्षेबरोबर Transportation ची कामंही त्यांच्यावर आली. चार शिफ्ट, त्यासाठी नेणार्‍या आणणार्‍या बसेस, मॅनेजरांच्या दिमतीला असलेल्या गाड्या, टेम्पो इत्यादी वाहनांची जा/ये सतत चालू असायची.

खबरदार जर......

२००५ चा डिसेंबर. ५० मुलं, प्रत्येकाबरोबर एक किंवा दोन्ही पालक, आणि त्यांचे नॄत्यशिक्षक असे सगळे ताफा घेऊन भारतात गेलो होतो. शिवाजीमंदीर, दिनानाथ पार्ले, बोरिवली अश्या ठिकाणी सात कार्यक्रम होते. पहिला वहिला कार्यक्रम अर्थातच शिवाजीमंदीर दादर.

ए.वे.ए.ठि. नको पण वॄत्तांत आवर...

डीसीला झालेल्या महाग्गटग आणि महानगटग बद्दल लिहीलेल्या वॄत्तांतानी आईसलँड्ला फुटलेल्या ज्वालामुखी एवढी जागा व्यापल्यामुळे पुढील सर्व ए. वे. ए. ठि, गटग, वर्षा-वसंत-हेमंत्-विहार इत्यादी स्नेहसम्मेलनांच्या वॄत्तांतांवर पुढील नियम (हुकूमावरून) लागू करणेत येत आहेत. तसे न केल्यास आपली 'रिक्षा' जागोजागी अडवून तिच्यातली हवा (आणि हवाही) काढून टाकण्यात येतील याची नोंद घ्यावी...

डीसी स्नेहसम्मेलन

GTG20100410.pdf (37.96 KB)

घरी इंटरनेट बंद पडल्यामुळे PDF करावी लागली. तेव्हा इथून वाचा..

चंद्र आणि दिवे...

Moon&Pool.JPG

मेक्सिकोमधे घेतलेले छायाचित्र.....
चंद्र, महासागर आणि तरणतलाव...

आता गाजले की बारा...

कुणाची भारतवारी ठरलेली असो (शर्मिला) कुणी 'बदकांची रांग चाले' (तॄप्ती) किंवा कुणाला येता आले नाही म्हणून शेवटच्या क्षणाला रडू फुटले असो. बा रा चे ए. वे. ए. ठि. होणार म्हणजे होणार हे नेहमीप्रमाणे ठरलेलेच होते. आपल्याला येता येत नाही म्हणून इतरांच्या तंगड्या खेचायच्या विचाराने तॄप्तीने बर्फ पडतोय, लोक अडकलेत, हायवे बंद अशी किती तरी छायाचित्रं नेटाने नेटावर शोधून ए. वे. ए. ठि.च्या बा फ वर डकवून श्री. प्रकाश ठुबे यांच्यावर कुरगोडी करायचा प्रयत्न केला असला, तरी निरभ्र आकाश, आणि बा रा ए वे ए ठि चा मुहुर्त असल्याने