शाळा

भेट सावली संस्थेच्या मुलांशी!

0

गेले वर्षभर आपण मायबोलीच्या संयुक्ता सुपंथ परिवारातर्फे ह्या ना त्या रूपात पुण्यातील सावली सेवा संस्थेच्या गरजू मुलामुलींना शैक्षणिक मदत करत आहोत. परंतु या संस्थेच्या विश्वस्त मृणालिनीताई भाटवडेकर व संस्थेच्या देखभालीतील काही मुलांना भेटायचा माझा योग आला तो मायबोलीकरीण रुनी पॉटर हिच्या पुणे भेटीत! या भेटीचा हा वृत्तांत व अनुभव मांडण्याचा प्रयत्न केलाय!

स्वाभिमानाचे नव-किरण

0

स्थळ : पुण्यातील सुप्रसिद्ध बी. एम. सी. सी. कॉलेजचे टाटा सभागृह. सकाळची वेळ. खच्चून भरलेल्या सभागृहातील तरुण विद्यार्थिनींमध्ये उत्सुकता, कुतूहल व कार्यक्रम सुरू होण्याअगोदरची अस्वस्थ चुळबूळ. थोड्याच वेळात कार्यक्रमाला सुरुवात होते. पांढरे टी-शर्ट व निळ्या जीन्स या वेशातील तरतरीत कॉलेज कन्या मायक्रोफोनचा व मंचाचा ताबा घेतात. समोरील श्वेतपटावर सरकणार्‍या अतिशय नाजूक व संवेदनशील विषयावर आधारित चित्रांसोबत दिल्या जाणार्‍या माहितीचे गांभीर्य लक्षात येताच सभागृहातील अस्वस्थ चुळबूळ थांबते व सार्‍या श्रोत्या तरुणी - स्त्रिया बघता बघता कार्यक्रमाच्या विषयात समरस होऊन जातात...

संदीप खरे यांची कविता आणि आजचे कटु सत्य

0
Average: 3 (1 vote)

"इवली इवली पाठ आणि लटलटणारे पाय
एवढ्या मोठ्या दप्तरातून नेतेस तरी काय?

रोज करतेस वह्या पुस्तक ढीग ढीग गोळा
शिकणे म्हणजे रमणे नव्हे दमणे झाले बाळा
पंख असून पाखरु चाले घासत घासत पाय

पाठीवरती घेऊन अवघ्या भूगोलाचा भार
एक माणूस शास्त्रे आणि भाषा झाल्या फार
तुझ्यापेक्षा जड तुझे ज्ञान होऊन जाय

काय म्हणू थट्टा की हा आयुष्याचा दट्टा
नाजूक नाजूक फुलावरती पडतो आहे घट्टा
जगणे मागे रोजीरोटी वय साखरसाय"

शाळा - Traditional preschool की montessori?

0

नमस्कार. आम्ही अमेरिकेत आहोत. सध्या मुलीसाठी (वय ३ वर्षे) शाळा शोधत आहोत. Montessori schools आणि traditional pre-school यापैकी जास्त चांगले कुठले आहे? का ते प्रत्येक मुलावर अवलंबून असते? शाळांना भेटी द्यायचा विचार आहे पण याबाबत काही सल्ला मिळाल्यास खूप मदत होइल.

विमलाबाई गरवारे प्रशाला - नवीन धागा, इथे पोस्टी टाका :)

0

विमलीज ग्रूप - इथे पोस्टी टाका...म्हणजे वाहून जाणार नाहीत बहुतेक स्मित

हिज हायनेस चिंतामणराव पटवर्धन गर्ल्स हायस्कूल, पुणे

पुण्यातली सगळ्यात जुनी मुलींची शाळा. १२५ वर्ष पूर्ण होऊन गेली.
आमच्या शाळेचं हेच्च नाव आहे. बाकी नावांनी हाक मारू ने. स्मित पुणे

अति

0

*अति* अति कोपता कार्य जाते लयाला, अति नम्रता पात्र होते भयाला, अति असे ते कोणतेही नसावे, प्रमाणामध्ये सर्व काही असावे .

शाळेची निवड

0

आज आपल्या भोवती अनुदानीत / विनाअनुदानीत, मराठी / इंग्रजी माध्यम, SSC / ICSC / CBSC असे वेगवेगळे बोर्ड अशा अनेक पर्याय असलेल्या शाळा उपलब्ध आहेत. आपल्या पाल्याला नक्की कुठल्या शाळेत घालावे याचा गोंधळ उडतो. या विविध पर्यांयांचे फायदे / तोटे आणि त्याच्या अनुषंगाने इतर बाबींची चर्चा करण्यासाठी हा बाफ.

१०/१२ वी नंतर काय?

0

मंडळी,

१०/१२ वी नंतर च्या वेगवेगळ्या वाटांच्या चर्चेसाठी हा बीबी.

इथे अशा वाटा, त्यांचे उपयोग वगैरे ची चर्चा अपेक्षीत आहे.

आपल्या आजूबाजूला किंवा नात्यात बरीच हुशार मुले असतात. पण परिस्थितीमुळे त्यांना फार उच्च शिक्षण घेता येत नाही. ते short course करून लवकरात लवकर घरच्यांना हातभार लावायचा विचार करतात. असे काही courses इथे discuss केले तर अशा मुलांना काही मार्गदर्शन करता येईल असे वाटले म्हणून हा बीबी.

१० वी नंतर योग्य मार्गदर्शनाची आवश्यता

0

आज रिझ्ल्ट कळणार (नेटवर)!!!!!!! अहो १० वी चा
तुम्हा मायबोलीकरांना विनंती आहे की, या धाग्यावर तुम्हाला माहीत असलेले शेक्षिणिक माहिती सांगा.
सामान्य नागरिकांना माहित नसलेली

फक्त ग्रूप सभासदांसाठी