मायबोलीचे सदस्य, भाऊ नमसकर, त्यांच्या खुसखुशीत व्यंगचित्रांमुळे आपल्या सगळ्यांच्या परिचयाचे आहेतच. यंदाच्या गणेशोत्सवाकरता त्यांनी सर्व भक्तांना हसवायचा नियम केला आहे. दर दिवशी एक नवे व्यंगचित्र या हास्य-दालनात आपले स्वागत करेल .....
स्मितरेषा ११

स्मितरेषा १०

स्मितरेषा ९

स्मितरेषा ८
स्वेटर विणताना शेजारी जोरात आवाज करत खेळण्यातील गाडी चालवत असलेल्या आपल्या नातवाला म्हणजे अमेयला आजींनी आवाज कमी करण्याचा सल्ला दिला आणि नेहमीप्रमाणेच तो न ऐकता अमेय उलट अधिक आवाज करू लागला. समोरच्या फोटोतील पतीच्या चेहर्याकडे सहज नजर गेली आणि आजींचा श्वास रोखला गेला. मनातील विचारांना व्यक्ततेचे अमूर्त स्वरूप मिळाले तसे विचार सैरावैरा डोळ्यातून वाहू लागले.
ही स्पर्धा नाही, पण तुमच्यातल्या लेखिकेला / लेखकाला आवाहन आहे. खाली एक अधुरी कथा दिली आहे. एका टप्प्यावर आणून ती सोडून दिली आहे. आता, ती तुम्ही पूर्ण करायची आहे.
याकरता, 'मायबोली गणेशोत्सव २०११' या गृपमध्ये एक वेगळा लेखनाचा धागा उघडा. त्यात ही अर्धवट कथा कॉपी पेस्ट करा आणि त्याखालीच तुमची कथा लिहा. मात्र इथल्या प्रतिसादात आपल्या धाग्याची लिंक जरूर द्या.
विसरू नका : कथा पूर्ण करण्याबरोबरच तिला शीर्षकही द्यायचे आहे.
सर्वसाधारण मुंबईतील कोकणस्थ म्हणत असतात, तसा आमचा गणपती गावाला. आमचे मूळ गाव राजापूर. म्हणजे आमच्या घराण्याचा मूळ गणपती तिथेच असतो. मला मात्र इतक्या वर्षात कधीही तिथे जाता आले नाही. पूर्वीदेखील गणपतीला एस्टीच्या जादा गाड्या सोडत असत. आताही असतात, आता तर रेल्वेच्या जादा गाड्या पण असतात. पूर्वी लोक गणपतीच्या सजावटीचे सामान घेऊन कोकणात जात असत. खूपदा गावचे घर बंदच असे. मग तिथे जाऊन साफसफाई करावी लागे. आता निदान कोकणातील घरात लोक राहतात.
गणेशचतुर्थीच्या आधी काही दिवस मात्र, मुंबई गोवा हायवे नुसता भरून वाहत असतो. एस्टीबरोबरच आता खाजगी गाड्याही भरपूर दिसतात.
ॐ नमो जी आद्या। वेद प्रतिपाद्या। जय जय स्वसंवेद्या। आत्मरूपा ॥
मराठी मातीच्या आणि मराठी माणसाच्या मनात असलेले गणपती बाप्पाचे प्रेम, श्रद्धा, भक्ती खरी बहरून येते ती गणेशोत्सवाच्या काळात! जागोजागी गणेशभक्तांचे मेळे, मंडपांत विराजमान गणपती बाप्पा मोरयाच्या आगमनार्थ रचलेले सोहाळे, रोषणाई - सजावटी - मंगल आरत्या, पठणांसह घरांघरांतून उत्साह, मांगल्य व आनंदाला आलेले उधाण... खास महाराष्ट्रात प्रचंड मोठ्या प्रमाणात साजरा होणारा असा हा उत्सव! ढोल, ताशे, झांजांच्या गजरात वाजत-गाजत येणार्या गणरायांच्या आगमनाची प्रत्येक घरातून सारे वर्ष आतुरतेने वाट पाहिली जाते.
गणपती यायला फक्त एकच महिना बाकी होता पण आम्हा कार्यकर्त्यांच्या कामाची सुरुवात तेव्हाच होते. रीतसर शेजारच्या सरवरला कोपच्यात घेऊन मीच अध्यक्ष होणार हे 'समजावून' सांगून पुढची दोन वर्षे त्याला देऊन टाकली. पण गोष्ट ती नाही, तर गोष्ट आहे... प्रेमाची, म्हणजे प्रेमा नावाच्या मुलीची नाही तर इंग्रजीत क्रश ज्याला म्हणतात त्या प्रेमाची! तसं माझं अनेक मुलींवर प्रेम बसलं (आता प्रेम उभं टाकलं हे म्हणता येत नाही म्हणून नाहीतर ते ही म्हटलं असतं) पण त्यातल्या त्यात हे आगळंवेगळं, गणपती प्रेम. आणि म्हणून सांगण्याचा उपद्व्याप.
पहिल्यांदा घरात गणपती बसवायचा हट्ट धरला तेव्हा आम्ही भावंडं सात-आठ वर्षांची असू. त्या आधी का कुणास ठाऊक, पण आमच्या घरात गणपती बसवण्याची प्रथा नव्हती. दादांनी या गोष्टीला आधी नाही म्हणून पाहिलं. त्यामागचं कारणही तसंच होतं.
एखादा दिवस असा उगवतो की त्या दिवशी घडणार्या सगळ्याच गोष्टींना एक विशिष्ट संदर्भ असतो. योगायोगच तो.. पण होतं खरं असं.
त्या दिवशी ऑफिसात आले. रीतसर स्थानापन्न वगैरे होऊन कॉम्प्युटर चालू केला. इन्बॉक्सात पडलेल्या खंडीभर मेलींपैकी त्या एका मेलीने माझे लक्ष वेधून घेतले... 'दिनूचे बिल'. काहीतरी लख्खकन् मनात चमकून गेले. इतर कामाच्या मेलींकडे दुर्लक्ष करून सगळ्यात आधी तीच मेल उघडली.