मायबोली शिर्षक गीत स्पर्धा

मायबोली शिर्षकगीत - "ज्योतीने तेजाची आरती' - हेमंत पुराणिक

Submitted by हेमंत पुराणिक on 6 September, 2011 - 12:26

चला करुया ज्योतीने या तेजाची आरती
अशीच आहे तेजोमय ती मराठी मायबोली

बोल तिचे हे अमृताचे ओविते ज्ञानेश्वरी
तुका लिहीली अमृत गाथा तारिते इंद्रायणी
शिवरायाने लढून राखली शान मराठीची
चला करुया ज्योतीने या तेजाची आरती

महाराष्ट्राची माय माऊली बोले मायबोली
चला गर्जुया चला वंदुया आपुली मायबोली
ज्ञानवंत ती कलागुणी ही विनंम्र मायबोली
चला करुया जोतीने या तेजाची आरती

मायबोलीचे स्वागत करीती सोन किरणे रविची
रजनी नटते चंद्रासवे ही चांदण्या चमचमती
जोवरी सूर्य चंद्र प्रकाशती अमरशक्ती मायबोली
चला करुया ज्योतीने या तेजाची आरती

विषय: 
Subscribe to RSS - मायबोली शिर्षक गीत स्पर्धा