
****************************************************************************
काय आवडलं आमंत्रण? आपल्याला अनेक प्रकारची लिखित आमंत्रणं येत असतात. लग्न, मुंज, बारसं, वाढदिवस, सत्कारसमारंभ, पुस्तक प्रकाशन, कवी-संमेलन .... अशी कितीतरी! कधी कधी मुख्य समारंभाआधीच या निमंत्रण पत्रिका आपली अत्यंत करमणूक करतात - कारण आपलं 'आवताण' अधिकाधिक 'वरताण' करण्यापायी लोक काहीही लिहितात.

**********************************************************
"हे जीवन एक रंगमंच. कधी आपण असतो या रंगमंचावरचे कलाकार. एखाद्या नटसम्राटाप्रमाणे आपण आपल्या भावना कधी हावभावातून तर कधी नुसत्या नजरेतून व्यक्त करतो आणि कधी आपण बनतो या रंगमंचावरचे सूत्रधार. मग आपला कॅमेराच बनतो आपली नजर आणि घेऊन जातो एका अनोख्या दुनियेत. पण कधी असतो आपण फक्त एक प्रेक्षक. या जीवनाच्या रंगमंचावर उमटणार्या सुख-दु:ख, आशा-निराशा यांची दृश्य बघणारे... नजरेने अनुभवणारे....

**********************************************************

**********************************************************
"कायापालट" स्पर्धेचे नियम:
१. ही स्पर्धा फक्त मायबोलीच्या सभासदांसाठी आहे.
२. या स्पर्धेसाठी तयार केलेल्या वस्तू स्वतः तयार केलेल्या असाव्यात.
३. कलाकृतीसाठी वस्तू निवडून त्याचा कायापालट करायचा आहे.
सांस्कृतिक कार्यक्रम १ : किलबिल
पद्य ध्वनिमुद्रण- आरती/ स्तोत्र/ श्लोक/ गणपतीचं कोणतंही गाणं, किंवा इतर कोणतंही आवडीचं स्तोत्र.
नियम :
१) प्रत्येक मुलासाठी/ मुलीसाठी एकच प्रवेशिका असावी.
२) ध्वनिमुद्रण किमान १ ते कमाल ३ मिनिटांचे असावे.
३) हा कार्यक्रम फक्त मायबोली सभासदांच्या पाल्यांसाठी आहे.
प्रवेशिका कशा पाठवाल?
सूत्रधार : हं... चला तयारी तर झाली. पण हे काय? मला तयार व्हायला सांगून बाईसाहेब अजून आल्याच नाहीत... या बायका तयारी करायला इतका वेळ का लावतात कोण जाणे!
नटी : आलेय हं मी... आणि एवढा काही उद्धार नकोय करायला. जरा ठेवणीतली वेशभूषा करायची म्हणजे वेळ लागायचाच!
सूत्रधार : ठेवणीतली? काही विशेष? नाही, मलाही अगदी खास तयारी करा असं म्हटलं होतंत...

तुमच्या प्रवासातल्या सुरस आणि चमत्कारिक, धाडसी आणि रोमांचक अशा घटना आम्हालाही कळवा की! प्रवासाचं सुरवातीचं आणि शेवटचं स्टेशन दिलं आहे. तुम्ही फक्त मधला प्रवास खुसखुशीत शब्दांत लिहायचा आहे. प्रवासवर्णनांबरोबर अपरिहार्य असणारी प्रचि असतील तर उत्तमच! तर निघू द्या गाडी स्टेशनातून........
प्रवासवर्णनांचे विषय (लेखन याच विषयांवर असावे) :
(१) घर ते कोपर्यावरचा भाजीवाला
(२) ऑफीसमधला आपला डेस्क ते पँट्री
(३) लग्नाच्या दिवशी : खोलीपासून बोहल्यापर्यंत
टपोर्या मोत्यांचा एखादा सुरेखसा सर असतो. त्यातला प्रत्येक मोती त्याच्या घाटदार आकाराने पटकन डोळ्यांत भरतो. ‘गोष्टीवेल्हाळ’ हा मधुकर धर्मापुरीकरलिखित कथासंग्रह अश्याच मोत्यांच्या सराप्रमाणे आहे.
त्या वर्षी
शांता गोखले
मौज प्रकाशन गृह
प्रथम आवृत्ती- ६ मार्च २००८
किंमत- एकशेपंचाहत्तर रुपये
शांता गोखलेंची ’रिटा वेलिणकर’ माझी आवडती कादंबरी. त्यानंतर १७ वर्षांनी त्यांनी लिहिलेली ही कादंबरी. दरम्यानच्या काळात त्यांचे कलासमिक्षणात्मक, बहुतांशी पत्रकारितेच्या अंगाने केलेले इंग्रजी लेखन आणि मोजक्या कथा सोडल्या तर काही वाचनात आले नव्हते.
तीन वर्षांपूर्वी मौजेची पुस्तकं ज्या शांतपणे, काहीही गाजावाजा न करता प्रसिद्ध होत असतात त्याच शांतपणे 'त्या वर्षी’ बाजारात आली. ना कुठे जाहिरात ना बोलबाला.
मायबोली दिवाळी अंक २०११ साठी ज्या मायबोलीकरांना स्वयंसेवक म्हणून काम करायची इच्छा आहे त्यांनी या धाग्यावर आपली नावे कळवा. अंकासाठी साधारण दोन-अडीच महीने आठवड्यातले काही तास इतका वेळ द्यावा लागेल.
दिवाळी अंकात काम करणार्या प्रत्येक सदस्याकडे घरी इंटरनेट सेवा असणे अत्यावश्यक आहे.
दिवाळी अंकासाठी वेगवेगळ्या प्रकारची मदत लागते, खालील पैकी कुठल्या विभागात आपल्याला काम करायला आवडेल ते कळवा.
१. दिवाळी अंक संपादन
२. दिवाळी अंक रेखाटन
३. दिवाळी अंक सजावट
४. दिवाळी अंक साचा (template - यासाठी दृपल मध्ये कामाचा अनुभव असेल तर प्राधान्य)
५. मुद्रितशोधन (शुद्धलेखन तपासणे)