मेक्सिकन पाककृती

Submitted by अश्विनीमामी on 22 June, 2014 - 08:21

मेक्सिकन स्वयंपाक कसा करावा. बेसिक माहिती व प्रमाण इत्यादींसाठी चर्चा येथे करावी. माझ्या शंका खालील प्रमाणे.
बरिटो एंचिलाडा, फाहिताज, केसाडिया हे सर्व कसे करतात. गूगल करून माहिती नक्की मिळेल पण जर घरी करतच असाल तर ते सोपे पडेल. बेसिक मसाले काय आणायचे? चिली मध्ये राजमा बीन्स वापरायच्या का तोत्तिया म्हणजे पोळीच का पातळ लाटलेली असे फार बेसिक प्रश्न आहेत. इथे फाहिताज बरोबर एक राइस
मिळतो तो फार मस्त लागतो त्याची नक्की काये रेशिपी?

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

केसाडिया एकदम झटपट होणारा प्रकार आहे.
तवा गरम करत ठेवायचा. गरम तव्यावर आच मंद करुन तॉर्तिया टाकायचा. तॉर्तियावर चीझ पस्रायचे. वर दुसरा तॉर्तिया ठेवायचा. आच वाढवायची. चिज वितळले की उलटायचे. दोन्ही बाजूने तॉर्तिया कुरकुरीत झाल्या की पोळपाटावर काढून ४-६ भागात कापायचे. या बेसिक रेसिपीत चिझच्या जोडीला मक्याचे दाणे, शिजवलेले ब्लॅक बिन्स, उरलेले चिकन, भाज्या वगैरे घालून विविधता आणता येते. जोडीला साल्सा.

अमा,

एंचिलाडा चि पाकृ मि टाकलि आहे.ति तुम्हि बघू शकता.
किसाडिया साठी पनिनि मेकर सुद्धा छान पर्याय आहे.मि तुम्हाला विपु करण्याचा प्रयत्न केला पण शक्य झाले नाहि

मेक्सिकन आवडतं.. मस्त धागा चालु केलाय अमा!
चिपोट्ले राईस पण घरी ट्राय केला होता.. व्हेजी स्टर फ्राय, ग्वाकोमोल घालुन पण अगदी तशीच चव आली नाही..
भात शिजवताना काही वेगळं करतात का? साल्सा चे प्रकार पण लिहा कोणीतरी..

सशल Happy

कृपया सगळ्या रेसीपीज या एका धाग्यावर लिहू नका नंतर शोधणे कठीण होते. आणि पाककृतींसाठी नवीन "धागा" न वापरता "पाककृती" अशी वेगळी सोय आहे ज्यामुळे त्या पाककृतींला लागणारी साधने वगैरे लिहणेही सोपे जाते.

बेसिक साल्सा
पिकलेले पण घट्ट रोमा टॉमेटो, लाल कांदे किंवा शॅलट्स, कोथिंबीर, हालापेन्यो किंवा कुठलिही तिखट मिरची, मीठ, लाइम ज्यूस .
कांदे टॉमेटो मिरची बारीक चिरुन त्यात मीठ अन लाईम ज्यूस मिक्स करुन बारीक चिरलेली कोथिंबीर घालणे.

यातच बारीक चिरलेले अननसाचे तुकडे, आंबट-गोड आंब्याचे तुकडे, पीचेस ते तुकडे घालू शकता.
कोवळे मक्याचे दाणे पण मस्त लागतात.

मोठ्या प्रमाणावर करायचे असल्यास फूड प्रोसेसर, किंवा हँडी चॉपरमधे पण करता येईल पण सगळ्याचा गचका नाही झाला पाहिजे. थोडा थोडा वेळ पल्स करावे.

केसादियामधे भरण्यासाठी :
ऑलिव्ह ऑइल गरम करुन त्यात एक दोन पाकळ्या बारीक चिरलेला लसूण परतून घेणे. त्यात आवडी प्रमाणे रंगीबेरंगी फुग्या मिरच्या, कांद्याची पात, मश्रुम्सचे तुकडे असे घालून परतून घेणे. कोवळे अस्पॅरॅगस पण छान लागते.

कॉर्न + बीन सॅलड
ब्लॅक बीन्स / पिंटो बीन्स भिजवून उकडून त्यात मक्याचे दाणे, फुग्यामिरचीचे तुकडे , भाजलेल्या जिर्‍याची पूड, ऑलिव्ह ऑइल, लाइम ज्यूस, मीठ, आवडत असल्यास तिखट मिरची चे तुकडे ( हालापेन्यो, सेरानो, कायेन ) घालून मिसळून घ्या. सर्व्ह करायच्या फार आधी मिसळून ठेवू नये.