कोथरुडमधल्या 'सिटीप्राईड' येथे 'पाऊलवाट'चे संध्याकाळी सहा व सात वाजता- असे दोन प्रीमियर शो झाले. या दोन्ही खेळांना चित्रपटाचे निर्माते, दिग्दर्शक, संगीतकार, गीतकार, कलाकार असे सारे उपस्थित होते. या कीर्तीवंतांची मांदियाळी, रांगोळ्या, लाल गालिचे, सनईचे सूर, कॅमेर्यांचा क्लिकक्लिकाट अशा भारलेल्या वातावरणातल्या या प्रीमियरना १४ मायबोलीकरांना उपस्थित राहण्याची संधी मिळाली.
उपस्थित मायबोलीकरांनी इथे वृत्तांत व फोटो टाकावेत. तसेच चित्रपटाबद्दल काय वाटलं, ते लिहावं, ही विनंती.
प्रिय प्रेक्षक ,
सप्रेम नमस्कार .
पाऊलवाटच्या संपूर्ण टीमची आपणां सर्वांसोबत ओळख करून दिल्याबद्दल सर्वप्रथम मायबोलीचे अनंत आभार. परंतू केवळ आभार मानणे हा ह्या पत्राचा हेतू नसून आपल्यात निर्माण झालेला जिव्हाळा अधोरेखित करण्यासाठी हा प्रपंच .

आदित्यने दिग्दर्शित केलेला या पहिल्याच चित्रपटात मी नायकाची भूमिका करतो आहे, ही माझ्यासाठी आनंदाची आणि महत्त्वाची गोष्ट आहे. अनेक प्रोजेक्ट्स मध्यंतरी आले, त्यावर विचार झाला, पण काही ना काही कारणाने ते पूर्णत्वास गेले नाहीत. पण 'पाऊलवाट' त्याला अपवाद ठरला. ही नवी वाट आदित्यला मराठी चित्रपटसृष्टीतल्या एका महत्त्वाच्या मुक्कामावर घेऊन जाईल, असा मला विश्वास आहे.
.. उडनछू! (भाग दुसरा)
सिनेमामध्ये एका हिंदी गझलेचा अंतर्भाव केला आहे. त्याबद्दल काही सांग
काही वर्षांपूर्वी सातत्याने आणि आता सणासुदीला मायबोलीवर भेटणा-या वैभवची मुलाखत घेण्याचं जेव्हा ठरलं तेव्हा मनात बरेच प्रश्न होते. 'पाऊलवाट'मधल्या गाण्यांबद्दल बरंच काही ऐकून, वाचून झालेलंच होतं. इतर संभाषणात बरेचदा गप्प असणारा वैभव, कवितांचा (मग त्या कुणाच्याही असोत) विषय निघताच किती भरभरून बोलतो हे अनेकदा पाहण्यात आलं होतं आणि झालंही तसंच .
मायबोलीवर कविता लिहिता लिहिता आता एक गीतकार म्हणून मायबोलीला मुलाखत देताना कसं वाटतं ?
’..जैसे हर एक फ्रेन्ड जरूरी होता है!’ ही अॅड पाहिली असेल टीव्हीवर. प्रत्येकाला आयुष्यात एक फ्रेन्ड, फिलॉसॉफर आणि गाईडची आवश्यकता असते. किंबहुना तो असावाच! पण कसा शोधायचा तो फ्रेन्ड? तो काही पाटी घेऊन येतो का, की बाबा रे हा आलो मी. आजपासून मी तुझा फ्रेन्ड! छे! असं नसतं हो. तो शोध कधी केव्हा कुठे आणि कोणापाशी संपेल ह्याचं उत्तर कोणीच देऊ नाही शकणार! तो एखादा मित्र, मैत्रीण, नवरा, बायको, एक त्रयस्थ माणूस, शिक्षक, गुरू, एखादा लहान मुलगा, नातेवाईक- कोणीही असू शकतो.
५ नोव्हेंबर २०११ रोजी पत्रकार भवनात 'पाऊलवाट'च्या संकेतस्थळाचं उद्घाटन श्री. दाजीकाका गाडगीळ यांच्या हस्ते झालं. 'पाऊलवाट'चं www.paulwaatthefilm.com हे संकेतस्थळ मायबोलीकर प्रसाद शिरगांवकर यांनी केलं आहे.

या कार्यक्रमाचा हा फोटो वृत्तांत.
चित्रपटाबद्दल बोलताना दिग्दर्शक श्री. आदित्य इंगळे.

निर्मितीच्या आणि संगीत दिग्दर्शनाच्या अनुभवांबद्दल बोलताना श्री. नरेंद्र भिडे.
स्टेट ऑफ द आर्ट फिल्म्सची निर्मिती असलेला ’पाऊलवाट’ हा चित्रपट १८ नोव्हेंबर, २०११ रोजी प्रदर्शित होत आहे. दिग्दर्शक आदित्य इंगळे ह्यांचा हा पहिलाच चित्रपट. अभिराम भडकमकर ह्यांची कथा- पटकथा, नरेन्द्र भिडे ह्यांचं संगीत आणि वैभव जोशी ह्यांची गीतं असलेल्या ह्या चित्रपटात ज्योती चांदेकर, सुबोध भावे, मधुरा वेलणकर, आनंद इंगळे, हृषिकेश जोशी आणि किशोर कदम ह्यांच्या प्रमुख भूमिका आहेत. ह्या निमित्ताने ज्योतीताईंकडून त्यांच्या भूमिकेबद्दल, सिनेमाबद्दल आणि संपूर्ण टीमबद्दल जाणून घेतलं.