पायातली साखळी.
"ऋषि उठला का गं ?" माईनी विचारलं
"नाही अजून माई."
अरे तुम्हाला लवकर निघायला हवं गुरुवायुरला पोचायचं असेल तर."
"तो म्हणाला आपण सहा वाजता निघालो तरी संध्याकाळी सहा वाजता पोचतो."
"हा असाच आहे लहानपणापासून. रात्री नुसतं जागायचं. दोन दोन वेळा अंगाई गीत गायचं तरच हे महाशय झोपणार."
" कुठलं लल्ला बाय माई?" मी विचारलं.
" सांगते गं, पण त्याला तुला मांडीवर घेऊन म्हणता येणार नाही त्याचं काय?!"माईनी माझी फिरकी घेतली.
" मला सांगा माई, पुढच्या वर्षी उपयोगी पडेल ना..!" मी ही गुगली टाकली.
निसर्गलाच प्रश्न
एका ठिकाणी एक लहान मुलगा खूप रडत होता कारण त्याने लावलेल एक रोपट पावसामुळे खाली जमिनीतून उद्वस्त होऊन पडल होत, आणखी एक लहान मुल,त्याला पण त्याच गायीच वासरु दिसत नव्हत म्हणुन गायी पेक्षा जास्त कावीलवान आणि निरागस होऊन ते वासरू कुठ दिसत का ते तो शोधत होत........
आणि हे अस फक्त लहान मुलंच करू शकतात,
लहान मुलांची मन खरच फुलासारखी सुंदर आणि पवित्र असतात कोणीतरी म्हटलेलंच आहे लहान मुले म्हणजे देवाघरची फुले असतात त्यांना जस सांगीतलेल शिकवलेल असत ते तसच वागतात व बोलतात ( maturity comes from childhood )
लेक. वेडी बाई. कुठे आणि कशी तयार झाली ही? पाच फूटही उंची नाही, पन्नास किलोही वजन नसावं. ती खरं तर कोणाच्याही मागे सहज लपेल इतकी लहानशी आहे, पण दोनशे जणांच्या जमावातही तिच्या चेहऱ्यावरचं तेज लपत नाही. अथक, अविरत काम. हत्तींचा वेड्यासारखा ध्यास. किती पर्यटन कंपन्यांनी आजवर कोर्टात खेचलंय, लोकांनी जीवे मारायच्या धमक्या दिल्याएत, हत्तींसाठी तिला कायद्याशी कायद्याने लढायला लागलंय, लोकांच्या पारंपारिक समजुतींच्या प्रवाहाविरुद्ध जाऊन काम करायला लागलंय... अर्जुनाला माशाचा डोळा दिसत होता; हिला हत्तीचा. बाकी कोण काय म्हणतंय याने तिला काहीच फरक पडत नाही.
१६.१०.१५
सकाळी खोलीबाहेर आल्यावर डावीकडे पहिले ही हत्तीण दिसते. जायडी. पासष्ट वर्षांची खवीस म्हातारी तिच्या गोठ्यात सगळ्यात आधी उठून बसलेली असते. आल्या दिवसापासून रोज सकाळची कामं झाली की मी तिच्या माहुताबरोबर जाऊन तिला कलिंगडं भरवते. तिला दात नाहीत म्हणून गाल अगदीच खपाटीला गेलेत. भोपळे चावत नाहीत. राणीसाहेबांना सोललेली कलिंगडं आणि निवडलेल्या चिंचा लागतात.
मागचा भाग (दोन-पायी पाहुणे): http://www.maayboli.com/node/56618
--------------------------------------------------------------------------------
पहिले काही दिवस सगळं नवीन नवीन होतं तोवर फक्त कौतुक वाटलं. किती या सगळ्या गुणी हत्तिणी आहेत नि त्यांचे किती लाड करू आणि किती नको! मग सरावल्यावर त्यांना माझ्या आणि मला त्यांच्या लहानसहान लकबी गोड खुपायला लागल्या. तिन्ही त्रिकाळ त्याच गोतावळ्यात वावरल्यावर, त्यांच्यात रुळतानाच्या या काही गोष्टी. त्या त्या वेळी हाताशी असलेल्या कागद-पेनाने खरडून ठेवलेल्या.
वहानांच्या गर्दीतून डुलत वाट काढताना कितीतरी वेळा हत्ती पाहिले होते. लहानपणी शहराबाहेर तंबू लागायचे तेव्हा सर्कशीतही. मग झू मधे हत्तीच्या पाठीवर बसून फेरी मारून आले होते. आपल्यासमोरचा जिवंत प्राणी अख्खा दिसावा म्हणून मान पाठीला टेकवावी लागते याचीच गंमत वाटायची. लांबलांब पापण्या, सोंडेचं वेटोळं, शांत आणि सुजाण डोळे, असं गणपतीसारखंच, पण हालचाल करणारंही कोणीतरी असतं याचं किती अप्रूप!
काळ्या शाईच्या पेनाने......दहा मिनिटात पुन्हा...... ये दोसती हम नही तोडेंगे
