Making of photo and status : २. जावळ.

Submitted by सचिन काळे on 14 October, 2017 - 22:52

प्रस्तावना : ज्यांची प्रस्तावना वाचायची राहून गेली असेल, त्यांनी ती वाचण्याकरिता कृपया खाली दिलेल्या लिंकवर हळुवारपणे टिचकी मारावी.

https://www.maayboli.com/node/64155

छायाचीत्राचा खालचा भाग पहा बरं ! काय दिसतंय ? काळ्या कातळावर केसासारखं काहीतरी दिसतंय ना ? फसलात ! ते आहे हत्तीच्या टाळक्यावर उगवलेलं जावळ !

Making of photo and status :
हा! हा!! हा!!! आहे की नाही सगळीच गंमत. आपलं डोकं कितीही लढवलं तरी ह्या फोटोवरून कोणाच्याही लक्षात येणार नाही की हा कसला फोटो आहे. मी केरळला गेलो असता तिथे हत्तीची राईड केली होती. आम्ही हत्तीच्या पाठीवर बसलो होतो, तर समोरच हत्तीचं भलं मोठं डोकं डुगुडुगू डुगुडुगू हलताना दिसत होतं. आणि त्याच्या डोक्यावर जावळासारखे दिसणारे काळेभोर विरळ केससुद्धा! It was so cute looking!! मी पट्कन हत्तीच्या डोक्याचा आणि त्याच्या केसांचा फोटो काढून घेतला. काय सुंदर दिसत होते ते केस!! एकेका केसांमध्ये चांगलं अर्ध्या सेंटिमीटरचं अंतर! आणि उंचीने भरपूर वाढलेले! खरं सांगू! मला त्या केसांवरून हात फिरवावासा वाटत होता. पण माझी हिंमतच झाली नाही. न जाणो त्याला ते आवडलं नाही तर!!? माझंच जावळ धरून उपटायचा. हा! हा! हा! पण काहो!? जशी सिंहाची आयाळ असते तसे हत्तीच्या डोक्यावरचे केस हे त्यांच्यात सौन्दर्याचे लक्षण मानले जाते का? Hmmm! कोणाला तरी विचारायला पाहिजे.

हत्तीच्या राईडची एक गंमत सांगतो. हत्तीची राईड ही घोड्याच्या राईडसारखी उडी मारून टांग टाकून बसायची नसते काही!! हत्ती पार्किंग करण्याच्या जागी एका बाजूला कायमस्वरूपी एक उंच मचाण बांधलेलं असतं. त्याला टेकूनच हत्तीला उभं करतात. आपण शिडीने मचाणावर चढायचं आणि डायरेक्ट हत्तीच्या पाठीवर बसायचं. पण मांडी ठोकून नाही. हत्तीच्या पाठीवर रेक्झिनची जाड गादी टाकलेली असते. आपण एक पाय इकडे आणि एक पाय तिकडे टाकून बसायचे असते. ते बसणेपण सुखाचं नसतं हो! हत्ती काही घोड्यासारखा बारीक नसतो. हत्तीची ही मोठ्ठी पाठ आणि हे मोठ्ठं पोट. आपला एक पाय डावीकडे आणि दुसरा पाय उजवीकडे असा १८० कोनात ताणले जातात. थोड्यावेळाने आपल्या पायाच्या दोन्ही जांघेत जोराची कळ मारायला लागते. अर्ध्यातासाने जेव्हा आपली राईड संपल्यावर आपण हत्तीवरून खाली उतरतो ना, तेव्हा कितीतरी वेळ आपण फेंगडेच चालत असतो. हा! हा!! हा!! मग बघणार ना कधीतरी हत्तीची राईड करून!!!?

--- सचिन काळे.

माझा ब्लॉग : http://sachinkale763.blogspot.in

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हत्तीचं जावळ... Lol
अंबारी वाला हत्ती असेल तर नक्की राईड करायला आवडेल. Lol

आपलं डोकं कितीही लढवलं तरी ह्या फोटोवरून कोणाच्याही लक्षात येणार नाही की हा कसला फोटो आहे. >>>>>>>> माफ करा पण मला तर फोटो पाहील कि लगेच कळालं कि, स्पेसिफिकली डोक्यावरील अस नाही पण ही हत्तीच्या अंगावरील केसं आहेत.

पुढील भागांना खुप शुभेच्छा !!

जशी सिंहाची आयाळ असते तसे हत्तीच्या डोक्यावरचे केस हे त्यांच्यात सौन्दर्याचे लक्षण मानले जाते का? Hmmm! कोणाला तरी विचारायला पाहिजे.>>
सौ.हत्तींणताईच ह्याबद्दल खात्रीशिर सांगू शकतील Rofl

हासुद्धा भाग मस्त झालाय.. खुप छान !
आणि तुमच्या संडे टू संडे दिलेलं प्रॉमिस निभावण्याच्या वक्तशिरपणाबद्दल खरंच कौतुक Happy

हा भाग सुद्धा छान.

मलाही कळलं तो हत्ती आहे. लहानपणी बाबा घेऊन जायचे हत्ती राईड करायला. आमच्या राणीबागेतही आधी हत्ती राईड असायची. हल्ली दूरवर साखळदंडाला बांधून ठेवलेले असतात. पण आईच्या पोटात असतानाही मी हत्तीराईड घेतलीय त्यामुळे एक विशेष नाते आहे हत्तीशी Happy

हत्तीवर बसताना पाय समोर घेत ईण्ग्रजी वी अक्षर बनवायचे. त्याने त्रास कमी होतो.

@ देवकी, @ ऋन्मेष, @ राहुल, प्रतीक्रियेबद्दल धन्यवाद!!

@ अंबज्ञ, सौ.हत्तींणताईच ह्याबद्दल खात्रीशिर सांगू शकतील>>> Rofl
तुमच्या संडे टू संडे दिलेलं प्रॉमिस निभावण्याच्या वक्तशिरपणाबद्दल खरंच कौतुक >>> धन्यवाद!!

आबासाहेब +१

सचिन काळे, तुमची लेखनशैली चांगली आहे .पण फोटो मात्र खास नाहीत . उगाच बळच ओढून ताणून आणल्यासारखं वाटतं .

@ जाई, तुमची लेखनशैली चांगली आहे . >>> कौतुक केल्याबद्दल धन्यवाद.
पण फोटो मात्र खास नाहीत . उगाच बळच ओढून ताणून आणल्यासारखं वाटतं . >>> आपल्या आवडीची नोंद घेण्यात आली आहे. तरी मी आपणांस सांगू इच्छितो कि साधारण तीन वर्षांपूर्वी मी निवडलेल्या फोटोवर स्टेटस लिहिले आहेत. आता मी पुन्हा त्यांच्यावर नव्याने फक्त मेकिंग लिहून प्रसिद्ध करीत आहे.

आलं का जावळं.. Lol
पुन्हा वाचायला मिळालं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद सचिनजी... Happy

@ अनिरुद्ध, मी आपल्या प्रतिक्रियेची वाट पाहतोय. हो! तेवढं रंगाचं सोडून लिहा बरं! कायेना की इकडे जरा रंग ओळखण्यात अडचण आहे. Lol

पुढील भाग उद्या रविवारी दुपारी १ वाजता टाकतोय. आपणां सर्वांस आग्रहाचे निमंत्रण आहे. पाहण्या आणि वाचण्यासाठी नक्की या. आणि आपली प्रतिक्रिया कळवायला मात्र विसरू नका बरं का!!! Happy

>>आपलं डोकं कितीही लढवलं तरी ह्या फोटोवरून कोणाच्याही लक्षात येणार नाही की हा कसला फोटो आहे<< असेल बुवा ! ज्याने हत्ती कधी पाहिलाच नसेल त्याला नाही समजणार..
असो पुढील भागांना शुभेच्छा !!

असेल बुवा ! ज्याने हत्ती कधी पाहिलाच नसेल त्याला नाही समजणार..
असो पुढील भागांना शुभेच्छा !!
>>> मी पाहिलाय हत्ती, तरी मला नाही समजला... पण मी थोडा मठ्ठ आहे त्यामुळेही असू शकेल कदाचित ☺️

@ चंबू, असेल बुवा ! ज्याने हत्ती कधी पाहिलाच नसेल त्याला नाही समजणार.. >>> अगदी बरोबर!! पण काहींना हत्ती माहीत असूनही ते ओळखायला फसलेत, बरं का!!!?
बरं ते जाऊ द्या! लिखाण आवडलं का तुम्हाला??? नक्की कळवा.

असो पुढील भागांना शुभेच्छा !! >>> आपले फार फार आभार!!

पुढील भाग कालच प्रसिध्द केलाय. त्याची लिंक खाली देत आहे. मी तिथे आपल्या प्रतिक्रियेच्या प्रतीक्षेत आहे. जरूर यावे.

https://www.maayboli.com/node/64250

बाळाचे छान जावळ दिसेल म्हणून छायाचित्र पहायला आले तर हत्तीचे जावळ दिसले Happy
आपलं डोकं कितीही लढवलं तरी ह्या फोटोवरून कोणाच्याही लक्षात येणार नाही की हा कसला फोटो आहे. >>>>>>>> मला फोटो पाहील्यावर लगेच कळाले Happy

बाळाचे छान जावळ दिसेल म्हणून छायाचित्र पहायला आले तर हत्तीचे जावळ दिसले >>> Rofl

अशाच पुढील भागांवरसुद्धा येत जा, खूप गंमतजंमत बघायला आणि वाचायला मिळेल. Happy