पापपुण्याचा जमाखर्च

Submitted by माता on 3 May, 2012 - 03:36

"आनंदाचे डोही आनंद तरंग "
माणूस नेहमी आनंदाच्या शोधात असतो.घरदार,नोकरी पैसा,गाडी,जमीनजुमला,मूलबाळ यातच खरा आनंद आहे असे त्याला वाटते.परंतु हे सगळे मिळाल्यावरही माणूस अतृप्तच असतो.कारण तो शोधात असतो सच्चिदानंद आणि हा सच्चिदानंद ऐहिक गोष्टींमधून मिळत नाही.त्यासाठी त्याला शिरावे लागते अध्यात्मामध्ये.
अध्यात्म म्हणजे काय?२४ तास पोथ्या-पुराण करणे म्हणजे अध्यात्म नव्हे.अध्यात्म म्हणजे कुणाच्या अध्यात नाही आणि मध्यात नाही आणि दुसऱ्याच्या मनाचा विचार.भगवद्गीतेत सांगितल्याप्रमाणे
"ममैव अंशो जीवलोके,जीवभूता सनातन:
मानाशाष्ठानी इम्द्रीयांनी ,प्रकृती स्थानिकार्षति /"
ईश्वर हा प्रत्येकाच्या शरीरात असतो त्यामुळे प्रत्येकाचे मन जपणे महत्त्वाचे असते.गोड-गोड बोलून स्वतः:चा फायदा करून घेणे याला संधीसाधूपण म्हणतात.मना जपणे म्हणजे दुसऱ्याच्या मनाला आनंद मिळेल असे वागणे.त्यासाठी दुसऱ्याचा फायदा करण्याची वृत्ती पाहिजे.यातून आपल्या पदरी पुण्य पडते.समोरचा व्यक्ती जर कृतघ्न असेल आणि असूयेने प्रेरित होऊन नुकसान करत असेल तर अशा व्यक्तीला काय वाटते याचा विचार करणे भेकडपणाचे ठरते.रामदासस्वामी म्हणतात ,
"धटासी असावे धट,उध्दटासी उद्धट
नटखटासी नटखट अगत्य करी /"
असूयेने,स्वार्थाने बरबटलेल्या माणसांना परखड भाषाच समजते.त्यामुळे त्यांच्याशी फटकळपणे वागणे पुण्याचे होईल.कारण इतरांवरील अन्याय थांबेल आणि त्यांच्या बेफाम वागणुकीवर लगाम बसेल.
विनोदातूनही आनंद निर्मिती होते.मात्र दुसऱ्यांना आनंद मिळेल हा त्याचा हेतू पाहिजे.दुसऱ्यांना दु:ख देऊन स्वतः: आनंद मिळत असेल तर त्याला 'आसुरी आनंद ' म्हणतात.कुचेष्टा ,टोमणे मारणे हे पापात जमा होते.
जे आपण करत नाही पण दुसऱ्यांकडून करवून घेतो तो सुद्धा दुसऱ्यावर अन्यायाच होतो कारण व्यक्ती तितक्या प्रवृत्ती असतात.आपल्याला जे आवडतं,जे भावत ते दुसऱ्याला आवडेलच असे नाही.माझा ते सगळंच चांगलं आणि दुसऱ्याचं वाईट हे पापच नव्हे काय?
आपल्या क्षणभंगुर जीवनात खरा सार आहे-त्याला मिळणारी संगत!सत्संगामुळे वाल्याचा वाल्मीकी होतो.चांगलं कुटुंब,चांगले शेजारी,चांगले मित्र,चांगले पुस्तक याचा सहवास लाभला तर जीवनाच्या वृक्षाला सत्कृतीची फळे येतात.सज्जनांच्या सुसंगतीचा लाभ मिळत नसेल तर better alone than in bad company.
मोरोपंतांनी मोक्षप्राप्तीसाठी जीवनात साधुसंतांचा सहवास लाभला पाहिजे हे जाणले म्हणून ते परमेश्वराकडे प्रार्थना करतात "सुसंगती सदा घडो,सुजनवाक्य कानी पडो."
ज्याच्याकडे माणुसकी आहे तो पुण्यवान.माणुसकी म्हणजे तरी नक्की काय?दुसऱ्यानच्या नयनातले अश्रू पाहून गलबललेलं हृदय, दुसऱ्याचा आनंदी,हसरा नूर पाहून स्वतः:शीच हसलेला उर, या भावना म्हणजे माणुसकी!
पण आजच्या युगात माणसात पशुत्वाचा संचार झालेला आहे.दुसऱ्याचं प्रेम,दुसऱ्याची संपत्ती ,दुसऱ्याचा आनंद ,दुसऱ्याचं स्वातंत्र्य ओरबाडण्याच्या तो मागे लागला आहे.त्याचे डोळे गलिच्छ पाहण्यात आनंद मानताहेत.त्याची जीभ दुसऱ्याच्या कुटाळया ,निंदा करण्याच काम करते आहे हे कटू सत्य जाणणाऱ्या बहिणाबाई आर्ततेने म्हणतात
"अरे माणसा माणसा कधी होशील माणूस ?
लोभापायी झाला माणसाचा रे कानुस "

गुलमोहर: 

सच्चिदानंद ऐहिक गोष्टींमधून मिळत नाही.त्यासाठी त्याला शिरावे लागते अध्यात्मामध्ये.>>>हे कोणी सांगितले तुम्हाला? इथे पोस्ट करताना कॉम्प्युटर, इंटरनेट ईत्यादि ऐहिक गोष्टींचा वापर करत आहात, त्यातुन चांगली पोस्ट केल्याचा सच्चितानंद मिळत नाही का तुम्हाला.?

धन्यवाद रतन !!!
रोहित,ऐहिक गोष्टीं मधुन आनन्द मिळतो ,पण तो क्षणैक असतो .चिरकाल टिकणारा आनंद म्हणजेच सच्चिदानंद असतो. संत म्हणतात 'जयाचे निनामे महादोष जाती ,जयाचे निनामे गती पाविजेती ,जयाचे निनामे घडे पुण्यसेवा,प्रभाते मनी राम चिंतीत जावा'्एच मनुष्यजीवनाचे खरे सार आहे असे मला वाटते.प्रतिसादाबद्दल धन्यवाद.

चांगला उपदेश केला आहे.
पण उपदेश करणे हे अगदीच सोपे काम आहे. शक्य असल्यास चर्चा करूया.

गोड-गोड बोलून स्वतः:चा फायदा करून घेणे याला संधीसाधूपण म्हणतात.
"व्यापार" कशाला म्हणतात?

"ईश्वर हा प्रत्येकाच्या शरीरात असतो त्यामुळे प्रत्येकाचे मन जपणे महत्त्वाचे असते."
"असूयेने,स्वार्थाने बरबटलेल्या माणसांना परखड भाषाच समजते.त्यामुळे त्यांच्याशी फटकळपणे वागणे पुण्याचे होईल."
"दुसऱ्याचा आनंदी,हसरा नूर पाहून स्वतः:शीच हसलेला उर, या भावना म्हणजे माणुसकी!"

ही सर्व विधाने परस्परांना काँट्रॅडिक्ट करत नाहीत काय?
एखाद्याचा आनंदी/हसरा नूर आपल्याला त्रास देऊन होत असेल तर त्याच्याशी कसे वागावे? त्याच्या शरीरात ईश्वर असेल की नसेल?

मुळात 'आपण' आणि 'ते' अशी ठळक विभागणी करता येते का? चांगले-वाईट अशा दोन रंगात जगाची विभागणी करता येते का? अशा काही मुलभूत गोष्टींवर अध्यात्मवद्यांनी बोलले पाहिजे. शतकानुशतके तीच ती गुळमुळीत वाक्ये लोकांच्या तोंडावर फेकून त्यांचा आणि स्वतःचाही गंड पोसत राहण्यात अर्थ नाही.

दाद, तुम्हाला 'जयाचेनि नामे...' म्हणायचय का?
बरोबर आहे मला 'जयाचेनि नामे' म्हणयचे होते.

ज्ञानेश,"व्यापार" कशाला म्हणतात?
व्यापार ही एक प्रकारची देवाणघेवाण असते.पण एखाद्याशी गोडगोड बोलु स्वतःचा फायदा करुन घेणे आणि नण्तर ते विसरणे याला संधिसाधुपणा म्हणतात.अशी संधिसाधु माणसे तुम्हाला भेटली नाहीत का??ती सगळी व्यापारी होती का??

ही वाक्य कॉन्ट्रॅडीक्ट नक्कीच करतात पण जगात अशा कॉन्ट्रॅडीक्टरी गोष्टी नक्कीच आहेत अस मला वाटत.

एखाद्याचा आनंदी/हसरा नूर आपल्याला त्रास देऊन होत असेल तर त्याच्याशी कसे वागावे?
याचे उत्तर वर दिलेले आहे.'धटासी असावे धट' या न्यायाने स्वतःला कारण नसताना त्रास करुन घेणे बरोबर नाही.पण दुसर्‍याची प्रगती पाहुन आपल्याला आनंद व्हायला पाहिजे(जरी तो व्यक्ती आपल्या विरोधात असेल) असे मला म्हणायचे होते.

'आपण' आणि 'ते' अशी ठळक विभागणि नक्कीच करता येते. येथे 'आपण' चा अर्थ 'मी' धरावा.

'चांगले' आणि 'वाईट' अशी विभागणी परिस्थितीसापेक्ष रीतीने केली तर बहुतांश वेळा करता येते.उदा.मोठ्या आवाजात स्पिकर सुरु ठेवल्याने लोकांना विनाकारण त्रास होतो ही गोष्ट वाईट म्हणता येईल पण समजा उद्या एखादी नैसर्गिक आपत्ती आली तर स्पिकरवरुन सुचना देणे 'चांगले' ठरते.