माझे

इच्छा

Submitted by Mi Patil aahe. on 24 November, 2018 - 01:43

बालपणापासून माझे एक स्वप्न आहे,जे आजही पूर्ण झालेच नाही अन् होईल असे आता वाटतही नाही.का? असे काय स्वप्न आहे माझे?
तसे फार मोठे नाही---- पण कठीण नक्की आहे.
कारण इच्छाशक्ती कमी आहे.
तशी इच्छा हीच स्वप्नांची माऊली असते.आईशिवाय लेकराची आबाळ होते तशीच इच्छाशक्ती शिवाय स्वप्न साकार होणे कठीण!!!!
आणि इच्छा मनात जन्मते,म्हणून इच्छेला शक्तीची (मनाची) जोड हवी.तरच स्वप्न साकारली जाऊ शकतात.
म्हणजे इच्छा ही स्वप्न आणि मन यातला महत्त्वाचा दुवा आहे.

विषय: 
शब्दखुणा: 

स्वप्नवत्

Submitted by Mi Patil aahe. on 24 November, 2018 - 01:32

जेव्हा मी वाचायला शिकले, जेव्हा मी लिहायला शिकले,अन् मग मलाही वाटू लागले आपल्याला ही असेच लिहायला आले तर, आपलं लिहिणं कुणाला आवडलं तर---
हे स्वप्न त्याच लहानपणी शाळेत असताना साकारले.शिक्षक, शाळेतले विद्यार्थी माझ्या निबंधाचे कौतुक करू लागले अन् मी आs वासून स्वत:च्या आत डोकावू लागले.
हे सारे माझ्यासाठी स्वप्नवत् होते.
तशी स्वप्न झोपल्यावर ( डोळे मिटल्यावर) पडतात सहसा--- बय्राचजणांना स्वप्न पडत नाहीत किंवा आठवतं नाहीत!
काहीजणांना उघड्या डोळ्यांनी स्वप्न पाहायची सवय असते.(शेखचिल्ली स्वप्न /दिवास्वप्न म्हणा हवी तर)

विषय: 
शब्दखुणा: 

चित्र

Submitted by Mi Patil aahe. on 24 November, 2018 - 00:34

मनात आले एकदा रेखाटावे चित्र!
वाटत होते सारखे ----
त्यात दिसावे आपले प्रतिबिंब!
सगळ्यासाठी असले ;
जरी ते नुसतेच चित्र-----
पण माझ्यासाठी होते ;
ते आगळेच स्वप्न!

शब्दखुणा: 

भेट

Submitted by Mi Patil aahe. on 23 November, 2018 - 11:22

मी आज तुला वास्तवात भेटले;
पण मनास ते स्वप्नच भासले!
आले ते दिवस परतूनी क्षणात;
तुला भेटताच माझ्या मनात!
एकच आहे इच्छा मनोमनी;
तुझी न् माझी भेट व्हावी क्षणोक्षणी!
भेटत जा ना;
कधीतरी-----
वास्तवात नाही ;
स्वप्नात तरी!!!!!

शब्दखुणा: 

काहीतरी

Submitted by Mi Patil aahe. on 23 November, 2018 - 03:42

मला आज काहीतरी लिहावस वाटलं
कुणाला काहीतरी सांगावस वाटलं
अन् मग काय? मायबोली आली साक्षात!
अन् म्हणाली, बोल माझ्या कानात!!!

शब्दखुणा: 

माझे मनपाखरू

Submitted by Mi Patil aahe. on 23 November, 2018 - 03:38

<माझे मन पाखरू मनपाखरू
उडतसे नभी!
पहा मनी बांधिला खोपा कुणी?
खोपा कुणी?
कोण ही आली नवी?
आली नवी?
न्याहळते नजरा-----!!!
हास्य फुलते अधरा----!!!!
होती तहान अधुरी----!!!!!
तीच होते का आज पुरी?>

शब्दखुणा: 

भोपळा

Submitted by Mi Patil aahe. on 23 November, 2018 - 03:33

मराठी माझी मायबोली
तरीही वेडावते इंग्रजी
काही गणित कळत नाही
सायन्स अजून वळत नाही
इतिहास तसा कच्चाच आहे
भूगोलाचा गोल शून्यच आहे

शब्दखुणा: 

माझे पण आहार पुराण

Submitted by paragmokashi on 11 July, 2011 - 12:24

नमस्कार मंडळी.. Happy मायबोली वर सध्या "माझे शाकाहार पुराण " चर्चेचा आणि वादाचा मुद्दा ठरू पाहत आहे.. प्रथम हेच सांगू इच्छितो कि ते माझे नाहीये .. त्याचे नाव माझे आहे.. जसे लहान पाणी आपण शाळेतल्या मुतारीत लिहायचो "वाचणारा वेडा.. किवा मी वेडा आहे "वगैरे वगैरे.. (अर्थात हे जरा जास्तच लहानपणी चे उदाहरण आहे कारण थोडे मोठे झाल्यावर मुले चित्रलिपीत जास्त प्रगत होतात आणि मोठी अचंबित करणारी भित्ती चित्रे रेखाटतात. असो.. हा आपला मुद्दा नाहीये हे आपले नशीब.)
तर लेखाचे नाव माझे...... असून ते माझे म्हणजे असे लिहिणार्याचे वैयाक्रिक मत आहे असा अर्थ आहे. नशिबाने हा सुद्धा आपल्या चर्चेचा विषय नाहीये..

गुलमोहर: 

Pages

Subscribe to RSS - माझे