माझे पण आहार पुराण

Submitted by paragmokashi on 11 July, 2011 - 12:24

नमस्कार मंडळी.. Happy मायबोली वर सध्या "माझे शाकाहार पुराण " चर्चेचा आणि वादाचा मुद्दा ठरू पाहत आहे.. प्रथम हेच सांगू इच्छितो कि ते माझे नाहीये .. त्याचे नाव माझे आहे.. जसे लहान पाणी आपण शाळेतल्या मुतारीत लिहायचो "वाचणारा वेडा.. किवा मी वेडा आहे "वगैरे वगैरे.. (अर्थात हे जरा जास्तच लहानपणी चे उदाहरण आहे कारण थोडे मोठे झाल्यावर मुले चित्रलिपीत जास्त प्रगत होतात आणि मोठी अचंबित करणारी भित्ती चित्रे रेखाटतात. असो.. हा आपला मुद्दा नाहीये हे आपले नशीब.)
तर लेखाचे नाव माझे...... असून ते माझे म्हणजे असे लिहिणार्याचे वैयाक्रिक मत आहे असा अर्थ आहे. नशिबाने हा सुद्धा आपल्या चर्चेचा विषय नाहीये..
आईल्ला मग नक्की की लिहितोय मी..(नशिबाने हा हि आपल्या चर्चे चा मुद्दा नाहीये ..)

आहार बाबत खूप जणांनी मते मंडळी असून तिथे जास्त गिचमिड करणे योग्य वाटले नाही म्हणून इथे लिहितोय..

बर आता "बासी कढीला उबाळ" द्यायचाच आहे तर उगाच मुद्देसूद मांडणी वगैरे करत बसत नाही

तर आहार विषयीच्या काही facts ..
१. मुळात हे शाकाहार प्रकरण हिंदू धर्मात वाढले ते जैन आणि बुद्ध भिक्खून मुळे .. असे काही ठिकाणी वाचनात आले होते.. त्या आधी ऋषी मुनी कंद मुळे आणि फळे खात असे सुद्धा उल्लेख आहेत. पण त्यांचा जीवना कडे बघण्याचा चा दृष्टीकोन पूर्ण पाने वेगळा होता. त्या मुळे आपण त्यांना (ऋषी मुनींना ) वगळू..

२. जेवा जैनिस्म आणि बुद्धीस्म चा प्रसार खूपच जोमाने होऊ लागला.. तेवा धर्म टिकवण्य साठी काही बदल करण्यात आले ज्यात शाकाहार चे inclusion आले. (जसा लोकांमध्ये आलेली विरक्ती घालवण्या साठी व लोकांनी हिंदू धर्म सोडून भिक्खू होऊन राज्याचे व धर्माचे होणारे नुकसान टाळण्या साठी खजुराहो सारखीसुंदर मंदिरे उभारण्यात आली तसाच शाकाहार चा स्वीकार हा हि एक त्यातलाच प्रकार होता..)..just F Y I चाणक्य सुद्धा भिक्कू च्या विरोधात होता.. कारण त्याच्या मते हे लोक राज्याच्या कुठल्याही प्रकारे उपयोगी न पडणारे असून त्यांना राज्यातून हाकलून देण्यात येत असे.

३. ब्राह्मणांचे म्हणाल तर फार पूर्वीच्या काळी हिंदू धर्मात मांसाहार ही खूपच शुल्लक बाब होती.. काही याध्ण्यात बोकड , घोडा वगैरे प्राण्यांची बळी देण्याची प्रथा होती व त्यांचे सेवन हि केले जायचे. गाय खाल्ली जात नसे पण रेडेनवमी साजरी होत असे आणि रेड्याचा बळी दिला जात असे. आणि त्याचेच गावजेवण पण असे. घोड्याचे म्हणाल तर अश्वमेध याग्न्यात त्या घोड्याला बळी दिल्यावरच याध्न्या सफल होत असे. (मीराबाई यांचे ज्या राजाशी लग्न झाले होते त्यांनी अश्वमेध केला होता.. व प्रसाद म्हणून त्या घोड्याचे मांस शिजवण्यास सांगण्यात आल्यावर मीराबाईने नकार दिला होता.. यावरून राजपुरोहित क्रोधीत झाले होते व नंतर राजाही असेही वाचनात आले आहे.) राजपुरोहित अर्थात ब्राह्मण होते हे सांगावयास नको.. अजूनही बंगालचे कित्याक ब्राह्मण भात मासे खातात.

४. आता जरा माळकरी लोकांकडे वळू या... शाकाहाराचा स्वीकार इतर जातीपातीतल्या लोकांना सहजतेने करता यावा हे हि माळकरी समाजाचे एक कारण असू शकते..
हिंदू धर्मात आहारावर कुठल्याही प्रकारची बंधने लादल्याचे माझ्या वाचनात नाही.. तसेच आहार हि प्रत्येकाची वैयक्तिक बाब असावी असे मला वाटते.केवळ कुणी ब्राह्मण म्हणून शाकाहारीच असला पाहिजे किवा कोणी इतर जातीचा म्हणजे त्याने मांसाहार केलाच पाहिजे अशा प्रकार चे बंधन शास्त्रात कुठेही घातलेले नाहीये.. पण तसे सुचवायचा प्रयत्न मात्र शास्त्रात भरपूर ठिकाणी केलेला आहे ( ते बंधन नसून suggestion आहेत असे मानायला हरकत नसावी )

५. आता च्या काळी शाकाहाराची जी व्याख्या गृहीत होती ती थोड्याफार प्रमाणत बदलली आहे ते bread , cake वगैरे सारख्या पदार्थांमुळे.. दुसरे महत्वाचे कारण आहे ब्रोईलेर अंडी. जी non productive असतात त्यामुळे काही लोकांच्या मते ती शाकाहारात मोडण्यास हरकत नसते...तसेच ice cream व दुधात असलेले चरबीचे घटक हे घटक सुद्धा शाकाहाराची व्याख्या बदलायला मोठ्या प्रमाणात कारणीभूत आहेत.

६. मांसाहारा बाबत म्हणाल तर.. अमुक खावे आणि तमुक खावू नये अशी restrictions का आहेत हे मला अजूनही समजत नाही... उदा. मोर, हत्ती, साप, सरडे, अशा प्रकारचे प्राणीखाणे अनैतिक किवा बेकायदा का व कसे.. ते फूड चैन चा part आहेत आणि आपण (म्हणजे मनुष्य ) फूड चैन rule करतो. Thailand मध्ये हे सर्व प्रकार चालतात पण गुप्त पणे. आणि सर्रास म्हणाल तर ते लोक कुत्रे किवा मांजर पण खातात esp. vietnam. नुकतेच बेफिकीरांच्या 'हाफ राईस ...' मध्ये सुद्धा याबाबत त्यांनी केलेले वक्तव्य खूप विचार करायला लावण्या सारखे आहे.. 'मोर आणि कोंबडी' चे उदाहरण खूप चांगल्या प्रकारे मांडले आहे त्यांनी.तसेच सध्या महाराष्ट्रात गाई मारलेली चालते पण बोकड.. अथवा रेडा बळी दिलेला नाही चालत.. कायद्याने बळी देणे हा गुन्हा ठरवलेला आहे.. बळी नको पण कुर्बानी चालते हा की प्रकार आहे हे मला अजून तरी उमगले नाहीये.. असो...

७. तर शाकाहारात काय येते हे सर्वांना ठाऊक आहेच .. मांसाहारात limitations का.. मध्ये कोणी नेत्याने हरीण मारले आणि शिजवून तिकडेच खाल्ले तर त्याचे पद गेले. का?? मांसाहारात हरीण नसावे असा कायदा कशाच्या आधारे करण्यात आला हे कोणास ठाऊक असेल तर सांगावे. डोडो पक्षी लुप्त होण्यामागे हेच कारण आहे लोकांना त्याचे मास आवडायचे आणि त्यांनी शिकार करून आखी जमातच संपवली.. यात दोष कोणाचा..afterall आपण सगळेच foodchain चा part आहोत मग बिनसले काय.. तसेच एखाद्या वाघाने माणूस खाला तर त्याला नर भक्षक का म्हणायचे?? माणूस सुद्धा एक प्राणी आहे आणि त्याच फूड चेन चा part आहे ज्यात इतर प्राणी येतात.. (अगदी काही वर्ष पूर्वी ऑस्ट्रेलिया मध्ये सोल्लिड किस्सा झाला होता माणसाने माणूस खाल्ला होता... आठवतेय... काही तांत्रिक लोक सुद्धा मृत व्यक्तीचे चितेत भाजलेले मांस खातात .. आणि कवटी देखील पुढील प्रक्रियेसाठी घेवून जातात...[ कवटी फुटो स्तोवर स्मशानात थांबणे या पाठी मागे प्रेत अशा लोकांच्या हाती लागू नये याची खबरदारी घेणे हे सुद्धा अनेक कारणांपैकी एक असू शकते...]

८. आता हे मारुतीचे शेपूट भरपूर लांबवता येईल.. पण थोडक्यात सांगायचे झाले तर आहाराला categorise करणे हे सर्व मनाचे खेळ आहेत.. ज्याला जे हवे ते त्याने खावे.. आपल्या प्रकृतीला काय उत्तम काय योग्य हे पहावे म्हणजे झाले ....

आणि हो जे काही खाल ते अंगावर दिसले पाहिजे ... नाहीतर उगाच मी मांसाहारी आहे म्हणायचे आणि आणि वजन ४० किलो.. निदान वेळ आली तर आमची आम्ही शिकार करून खावू हे म्हणायला तरी अंगात दम अन जोर असला पाहिजे.. कोंबडी पकडायला सुद्धा कष्ट पडतात .. आहात कुठे?? (आणि मारायला सुद्धा)

९. माणूस पहिले शिकारी होता.. शेती वगैरे सगळे नंतर शिकला त्या मुळे माणूस हा गाय बैला सारखा शाकाहारी आहे हे म्हणणे साफ चुकीचे आहे.. एवढे मात्र सांगू इच्छितो.. फार तर असे म्हणी कि जस जसा प्रगतीशील होत गेला तास तसा शाकाहाराचे प्रमाण वाढले... असेही म्हणता येईल जस जसा सुसंकृत पण वाढला तास तसा माणूस शाकाहार कडे वळला.. थोडक्यात काय मांसाहार म्हणजे जरा असंकृत आणि अप्रगत माणसाचे लक्षण असे म्हणायलाही वाव राहू शकतो..

असो.. माझ्या पुरते बोलायचे झाले तर मी शाकाहारी आहे.. आणि अंडी आणि चरबी फक्त indirect sources through च घेतो..
एवढे बोलून मी आता आपली रजा घेतो.. हळू हळू सगळ्याची हजेरी घेईनच (हे आलेच ओघा ओघा ने )

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

आहाराला categorise करणे हे सर्व मनाचे खेळ आहेत.. ज्याला जे हवे ते त्याने खावे.. आपल्या प्रकृतीला काय उत्तम काय योग्य हे पहावे म्हणजे झाले ....>>>>>>>> अगदि बरोबर.....

[ कवटी फुटो स्तोवर स्मशानात थांबणे या पाठी मागे प्रेत अशा लोकांच्या हाती लागू नये याची खबरदारी घेणे हे सुद्धा अनेक कारणांपैकी एक असू शकते...]

Rofl पुलंनी एवढं खाद्यजीवन लिहूनही लोकांची जेवण या विषयावर विनोदी लिहायची भूक अजून शिल्लक आहे..... Rofl

>>हळू हळू सगळ्याची हजेरी घेईन Lol
तुम्ही लिहिले आहे की मोर, साप, हरिण, इ. मारून का खाऊ नये.
अनेक जाती (पशू पक्ष्यांच्या) नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत त्यामुळे त्या जातीच्या पशू पक्ष्यांची शिकार करू नये असा कायदा केला गेला आहे.