इच्छा

Submitted by Mi Patil aahe. on 24 November, 2018 - 01:43

बालपणापासून माझे एक स्वप्न आहे,जे आजही पूर्ण झालेच नाही अन् होईल असे आता वाटतही नाही.का? असे काय स्वप्न आहे माझे?
तसे फार मोठे नाही---- पण कठीण नक्की आहे.
कारण इच्छाशक्ती कमी आहे.
तशी इच्छा हीच स्वप्नांची माऊली असते.आईशिवाय लेकराची आबाळ होते तशीच इच्छाशक्ती शिवाय स्वप्न साकार होणे कठीण!!!!
आणि इच्छा मनात जन्मते,म्हणून इच्छेला शक्तीची (मनाची) जोड हवी.तरच स्वप्न साकारली जाऊ शकतात.
म्हणजे इच्छा ही स्वप्न आणि मन यातला महत्त्वाचा दुवा आहे.
तशा इच्छा अनेक असतात. प्रत्येक इच्छा निर्मिती मागे संस्कार, सहवास,वातावरण कारणीभूत असतात.चांगल्या वाईट इच्छा या माणसाला कृती करायला भाग पाडतात.
त्यातून माणसाच व्यक्तीमत्व विकसित होत राहतं.
बरेचदा इच्छापूर्ती होईलच असे नसते, मग कुणालातरी साकडे घातले जाते वा हट्ट केला जाऊ शकतो, फक्त इच्छापूर्ती साठी, "इच्छा माझी पूरी करा!"

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

नीट कळाले नाही.
थोडे अजून विस्ताराने सांगितले तर वाचायला आवडेल.

मनसागराच्या तळाशी पोषक विचारांचा उद्रेक झाल्याशिवाय इच्छाशक्तीचा सुनामी उसळत नाही.

<<मनसागराच्या तळाशी पोषक विचारांचा उद्रेक झाल्याशिवाय इच्छाशक्तीचा सुनामी उसळत नाही.>>
अरे बाप रे! नुसती इच्छाशक्ति असायला एव्हढे सगळे व्हावे लागते?
मला तर नुसते असले काही वाचून लिहायची इच्छा होते. कुठे उद्रेक नाही, कुठे सुनामी नाही. लिहीतो नि विसरून जातो.
हे असले सगळे न होता, साधे शांत आयुष्य जगता येते! जगलो आहे बरेचसे.