पुनश्च हरिओम....

Submitted by विशाल कुलकर्णी on 28 April, 2017 - 02:57

खुप वर्षांपुर्वी चित्रकला, स्केचेस करायचो. कामाच्या व्यापात सगळे काही मागे राहून गेले होते. आता बर्‍याच वर्षांनी पुन्हा एकदा पेन हातात घेतलाय.
हो, पेनच. पेन्सिल न वापरता थेट शाई पेन वापरून स्केचेस करावी म्हणतोय. इथे काही खाडाखोड करता येत नसल्याने, मुळातच जपून काम करावे लागते आणि त्यामुळे नेटके आणि नेमकेपणाची सवय लागेल अशी आशा आहे.

सुरूवात म्हणून मनातल्या काल्पनिक चित्रातला एक मोर आणि काही दिवसांपूर्वी गेट वे ऑफ इंडियासमोर बसून काळ्या शाईच्या पेनने स्केचबुकवर मारलेल्या उभ्या-आडव्या रेघा. खुप गॅप पडलाय. त्यामुळे लाइन्स आणि स्ट्रोक्स खुप कमजोर झालेत. फारसा फोर्सही नाही उतरलेला. पण सरावाने जमेल हळु-हळु. बघा कसे वाटताहेत ते...

मोर

Peacock.jpg

गेट वे ऑफ इंडिया

Gate way of India.jpg

धन्यवाद.

विशाल कुलकर्णी

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्तच Happy

मस्त.

मोर सुंदर आहे.
आणखी चित्रे रेखाटत राहा आणि इथे टाकत राहा.

Wow!!

दोन्ही मस्त !!

बायदवे....मोराचा पिसारा आणि झाडाची पाने सेमच रेखाटलीस Happy

सुंदर जमलाय मोर. मस्तच.
दुसरं फेबुवर पाहिलं होतच. तेही छान आहे.
(काय काय येतं ह्याला तोच जाणे) Happy