Submitted by कल्पी on 22 August, 2011 - 11:40
मीही मनात गातो
तूही मनात गावे
काळीज जरी उडाले
तरीही सूरात गावे
मैफ़ल जीवनाची
अधुरी न राहू द्यावी
अश्रु तुझी कहाणी
तू ठेव ना उशाशी
येऊ नकोस मागे
सावली बणून वेडी
जा ना त्या किनारी
घेऊन जा ती होडी
अस्तित्व आज माझे
दिसले माझ्यात आज
नकोच रे आसवांचा
आता मला तो साज
यात्रा नभात भरली
चाहूल मला मिळाली
पक्षी बनून झाले
गाणी सूरात झाली
कल्पी जोशी
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा
छान यात्र नभात भरली..यात्रा
छान
यात्र नभात भरली..यात्रा समजून वाचलय्,बरोबर आहे का?
.
विभाग्रज, होय बरोबर आहे
विभाग्रज, होय बरोबर आहे
मग सुधारा की.
मग सुधारा की.
सुधारले हो ,रागावू
सुधारले हो ,रागावू नका.......edit option आहे हेच माहीत नव्हते