एक नातं सलत होतं

Submitted by कल्पी on 20 April, 2011 - 09:36

एक नातं सलत होतं
एक नातं उलत होत
केशरीच्या देठासोबत
हळुहळु डोलत होतं

स्पर्ष खोल उरत होते
नाजुक भाव तरळत होते
जर तर च्या भाषेत
म्रुदुगंध खुलत होते

हुरळुन जायचे फ़ुल
रूजताना गार वा-यात
डोलताना हिरवी तनु
झुकायचे भर रानात

सुसाट सुटले फ़ुल
पाकळी पाकळी विलगली
गंध दरवळ घेउन
मातीमध्ये कोमेजली

कहानीला पेव आले
पाकळीला नाही भावले
उन्हामध्ये कोमेजुन
चुर चुर झाले

वारा धावला दुरवर
नजर त्याची कुठवर
आकाशाच्या पदरी
चांदण्याची वरवर

कल्पी जोशी

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

एक नातं सलत होतं
एक नातं उलत होत
केशरीच्या देठासोबत
हळुहळु डोलत होतं>>>सलत होतं,उलत होतं म्हटल तर डुलेल कसं हे कळल नाही, तुम्हाला वेगळ काही म्हणायच असेल तर माफ करा पोचल नाही Sad

श्यामली असं असू शकेल, दोन वेगवेगळी नाती रेफर केली जाताहेत, एक सलणारं दुसरं उलणारं (उमलणारं). उमलणारं नात डोलू शकेल की.

सुसाट सुटले फ़ुल
पाकळी पाकळी विलगली
गंध दरवळ घेउन
मातीमध्ये कोमेजली

कहानीला पेव आले
पाकळीला नाही भावले
उन्हामध्ये कोमेजुन
चुर चुर झाले>>> कल्पे, फारच सुंदर रचना केली आहेस..!गंध दरवळ घेउन
मातीमध्ये कोमेजली... व्वा. बहुअर्थि रचना.

कल्पीताई, श्यामलीताईंशी सहमत....

रचना छान आहेत. पण काही शब्दांचे परस्पर संबंध न कळाल्याने गोंधळायला होतय. शेवटच्या ओळीतील 'चांदण्याची वरवर' म्हणजे काय?

श्यामली अन विशालशी सहमत...
माफ करा पण काही शुद्धलेखनाच्या चुका आहेत की मुद्दाहून तशी रचना आहे कळले नाही.
स्पर्ष = स्पर्श
म्रुदुगंध = मृदु गंध ( mRud gaMdh ) की मृदगंध ?
कहानीला = कहाणीला ( kahaaNIla )
दुरवर = दूर वर (dUra var)

अरे वा !
ब-याच दिवसांनी कल्पीजींची कविता पाहतोय. चार चार चरणाच्या कडव्यात, पद्यरूपातला कवितेचा हा प्रयत्न खूप छान... लिहीत रहा. सराव होइलच.

अवांतर : मित्रत्वाच्या हक्काने एकदा एका ठिकाणी यमक जुळवण्याबाबत कुणाला तरी सल्ला दिलेला. उत्तरादाखल आम्हाला नको यमकबिमक अशी भीषण कविता दोन दिवसात पहायला मिळालेली तेव्हापासून कानाला खडा Happy